( पारीत दिनांक : 18/07/2014)
( मा. प्रभारी अध्यक्ष, श्री मिलींद आर.केदार यांच्या आदेशान्वये).)
तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द दाखल केली असून, तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे आहे.
01 तक्रारकर्ता यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांनी विरुध्द पक्ष यांच्या दुकानातून टाईल्स खरेदी केले. सदर टाईल्स एम.आर.पी. किंमती पेक्षा जास्त किंमत रु.14,497/- घेतल्याचे त.क. चे म्हणणे आहे. त.क. नुसार त्याने खालीलप्रमाणे टाईल्स पेटया खरेदी केल्या.
- SAVIO 2 X 2 ( S.Sr. 1011) 40 Box 54/- Rs. Sq.F. 34560.00
- GABON 2X 2 (सिरॅमीक डिजीटल)9 Box 53/-Rs.Sq.F. 7632.00
- Swastik Elevion 1 X 2 (Whi & Black) 12 Box 500/-Rs.Per Box 6000.00
मात्र पेटीवर छापील किंमत अशा पध्दतीत होती. ती खालीलप्रमाणे ः
- SAVIO 2 X 2 ( S.Sr. 1011) 40 Box 620/- रुपये पर बॉक्स होती. याप्रमाणे 40 बॉक्सची किंमत रु.24,800/- (चोवीस हजार आठशे रुपये) होतात. म्हणजेच त्यांनी तयावर रु. 9,760/- (नऊ हजार सातशे साठ रुपये) एम.आर.पी. किंमती पेक्षा जास्तीचे घेतले.
- GABON 2X 2 (सिरॅमीक डिजीटल)9 Box एका बॉक्सच्यावर
635/-रुपये प्रिंटेड एम.आर.पी. होती.9 बॉक्सचे रु.5,715/-
होतात. परंतु 7,632/- रुपये घेतल्याने एम.आर.पी.
किंमतीपेक्षा रु. 1,917/- जास्तीचे घेतले.
- Swastik Elevion 1 X 2 (Whi & Black) 12 Box च्या एका
पेटीवर एम.आर.पी. होती रु.265/-त्याप्रमाणे 12 बॉक्सची किंमत रु.3280/- घ्यावयास पाहिजे असतांना त्यांनी प्रति बॉक्स 500/- रुपये प्रमाणे रु.6000/- घेतले. म्हणजेच त्यांनी रु.2820/- आगावूचे घेतले.
ऊर्वरित खरेदी केलेल्या वस्तुबाबत काही म्हणावयाचे नसले तरी उल्लेखित तिन वस्तूंवर एम.आर.पी. किंमतीच्या तुलनेत एकूण रु.14,497/- त्यांनी हेतुपुरस्सर जास्तीचे घेतलेले आहे. ही बाब त.क. यांनी आपल्या तक्रारीत नमूद केली आहे. याबाबत वि.प. यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी त.क. यांना रक्कम परत केली नाही व टाळाटाळ केली. त्यामुळे सदर जास्तीची घेतलेली रक्कम परत मिळविण्याकरिता मंचात तक्रार दाखल केली. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये15,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.5000/-ची मागणी केली आहे.
02 सदर तक्रारीची नोटीस वि.प. यांना मंचामार्फत बजाविण्यात आली. सदर नोटीस वि.प. यांना मिळून ही ते मंचासमक्ष हजर झाले नाही व लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे दि. 18.06.2014 रोजी त्यांच्या विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
03 सदर तक्रार मंचासमक्ष युक्तिवादाकरिता आली असता मंचाने त.क. यांनी केलेले कथन, युक्तिवाद व दाखल केलेले दस्ताऐवज इत्यांदीचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षा प्रत पोहचले.
-: कारणे व निष्कर्ष :-
04 तक्रारकर्ता यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले की, वि.प. यांनी त्यांच्याकडून रु.14,497/-एम.आर.पी. किंमती पेक्षा जास्त घेतलेले आहेत. तक्रारकर्ता यांनी मंचासमक्ष नि.क्रं. 3, दस्ताऐवज क्रं. 1 दाखल केले असून त्यात बिल दि. 12.10.2013 व डिलीव्हर मेमो रुपये50,230/- असे नमूद आहे. यावरुन त.क. यांनी वि.प. यांच्याकडून टाईल्स खरेदी केल्या होत्या ही बाब स्पष्ट होते. तसेच यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे ही बाब सुध्दा सिध्द होते.
05 सदर तक्रारीची नोटीस मंचामार्फत बजाविण्यात आली असता वि.प. यांनी नोटीस स्विकारलेली नाही व त्याची दखल घेतली नाही. सदर लिफाफा “No Claim” या पोस्टाच्या शे-यासह परत आला. सदर लिफाफावर सूचना दिल्याबाबतची नोंद आहे. तरी देखील वि.प. यांनी पोस्टामध्ये जावून सदर तक्रारीची नोटीस स्विकारलेली नाही. त्यामुळे दि. 18.06.2014 रोजी विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
06 तक्रारकर्ता यांनी तक्रारीत केलेले कथन हे प्रतिज्ञात्रावर आहे. त.क. यांनी वेगळे शपथपत्र दाखल केलेले आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचे कोणतेही कथन खोडून काढलेले नाही व त्याबद्दल तसदी घेतली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे शपथपत्र ग्राहय धरण्यात येते व विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून एम.आर.पी. किंमती पेक्षा जास्त रक्कम वसूल केल्याचे ग्राहय धरण्यात येते. त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, वि.प. यांनी त.क. यांच्याकडून एम.आर.पी. पेक्षा जास्त घेतलेली रक्कम रु. 14,497/- मिळविण्यास त.क. पात्र आहे.
तक्रारकर्ता यांनी शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 15000/- ची मागणी केली आहे. सदर मागणी अवाजवी असल्यामुळे न्यायाच्या दृष्टीने त.क. शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रु.5000/- व तक्रारीचा खर्च म्हणून 1000/-रुपये मिळविण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
उपरोक्त सर्व विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) विरुध्द पक्ष यांनी त.क. यांच्याकडून एम.आर.पी. पेक्षा जास्त घेतलेली रक्कम रुपये 14,497/- आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत त.क. यांना परत करावी. अन्यथा त्यानंतर सदर रक्कमेवर 6% दराने व्याज प्रत्यक्ष रक्कम प्राप्त होईपर्यंत व्याजसह देय राहील.
3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.1,000/- आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आंत द्यावे.
4) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून
जाव्यात.
5) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित
कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात.