Maharashtra

Sangli

CC/11/140

Ajit Bharamappa Avate - Complainant(s)

Versus

Panchasheel Nag.Sah.Pat.Mar.Ashtha - Opp.Party(s)

S.B.Dhole

06 Jan 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/140
 
1. Ajit Bharamappa Avate
Ullhasnagar, Kupwad, Tal.Miraj,
Sangli
Maharashtra
2. Trishala Ajit Avate
Ullhasnagar, Kupwad, Tal.Miraj
Sangli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Panchasheel Nag.Sah.Pat.Mar.Ashtha
Ashtha, Tal.Walva
Sangli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:S.B.Dhole, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

                                                         नि. २२
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
                                                    
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे                            
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१४०/२०११
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख    :  १९/०५/२०११
तक्रार दाखल तारीख  :  २५/०५/२०११
निकाल तारीख         ०६/०१/२०१२
-------------------------------------------
 
१. श्री अजित भरमाघा आवटे
    वय ४७, धंदा शेती
२. सौ त्रिशला अजित आवटे
    वय ३८, धंदा घरकाम
    उभयंता रा.कन्‍नूर, ता.गोकाक, ता.बेळगांव
    द्वारा महावीर आण्‍णा कोथळे,
    रा.उल्‍हासनगर, कुपवाड, ता.मिरज जि.सांगली                 ..... तक्रारदारú
  
 विरुध्‍द
 
१. पंचशील नागरी सहकारी पतसंस्‍था लि.
    आष्‍टा, मुख्‍य शाखा आष्‍टा
    ता.वाळवा जि. सांगली
 
२. श्री वसंत आण्‍णा आवटी (चेअरमन)
    वय सज्ञान, धंदा शेती, रा.सावळवाडे गल्‍ली
    आष्‍टा, ता.वाळवा जि. सांगली
 
३. श्री बापूसो आप्‍पा चौगुले (व्‍हा.चेअरमन)
    वय सज्ञान, धंदा शेती, रा.चौगुले गल्‍ली
    कदम वेस, आष्‍टा
 
४. श्री जयपाल नेमा मगदुम
    वय सज्ञान, धंदा शेती,
    रा.अंबाबाई देवळाजवळ, आष्‍टा
 
५. श्री सुरेश बापूसो आवटी
    वय सज्ञान, धंदा शेती,
    रा.चव्‍हाणवाडी, आष्‍टा
 
६. श्री सुभाष शंकर लिंगाडे
    वय सज्ञान, धंदा शेती,
    रा.मिरज वेस, आष्‍टा
 
७.  श्री कृष्‍णराव शिवाजी थोरात
    वय सज्ञान, धंदा शेती,
    रा.महात्‍मा गांधी चौक, आष्‍टा
 
८. श्री कुलभूषण कुशाबा आवटी
    वय सज्ञान, धंदा शेती,
    रा.आवटी गल्‍ली, आष्‍टा
 
९. श्री प्रकाश विठोबा शिंदे
    वय सज्ञान, धंदा शेती,
    रा.शिंदे चौक, शिंदेनगर, आष्‍टा.
    ता.वाळवा जि. सांगली
 
१०. श्री अनंत गणपतराव कासार
    वय सज्ञान, धंदा शेती,
    रा.भाजीमंडई शेजारी, आष्‍टा
    ता.वाळवा जि.सांगली
 
११. श्री संपत बापूसो ढोले
    वय सज्ञान, धंदा शेती,
    रा.ढोले गल्‍ली आष्‍टा
    ता.वाळवा जि.सांगली
 
१२. सौ सुचिता चंद्रकांत हालुंडे
    वय सज्ञान, धंदा शेती,
    रा.मिरज वेस, आष्‍टा                            .....जाबदार
                              
                                  तक्रारदारú तर्फेò           : +ìb÷.श्री एस.बी.ढोले
 जाबदार क्र.१ ते १२: एकतर्फा
 
नि का त्र
 
 
द्वारा- मा.अध्‍यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
 
१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने मुदत ठेवी अन्‍वये गुंतविलेली रक्‍कम परत दिली नाही म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार पंचशील नागरी सहकारी पतसंस्‍था लि.आष्‍टा (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे दामदुप्‍पट ठेवी अंतर्गत रक्‍कम गुंतविली होती. तक्रारदार यांनी ठेवीच्‍या रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी अदा केली नाही. सबब, आपल्‍याला रक्‍कम देवविण्‍यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ नि.३ अन्‍वये प्रतिज्ञापत्र व नि.४ अन्‍वये एकूण ८ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
२.    प्रस्‍तुत प्रकरणी जाबदार क्र.१ ते १२ यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्‍यात आला.
 
३.    तक्रारदारांनी त्‍यांची रक्‍कम जाबदार पतसंस्‍थेमध्‍ये गुंतविल्‍याबाबतच्‍या ठेवपावत्‍यांच्‍या सत्‍यप्रती नि.२१ चे यादीने दाखल केल्‍या आहेत. सदरच्‍या ठेवपावत्‍या या तक्रारदार अजित आवटे व त्रिशला आवटे यांच्‍या संयुक्‍त नावच्‍या आहेत. पावती क्र.४७६३ व ४७६४ अन्‍वये तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे दि.२९/१/२००३ रोजी दामदुप्‍पट ठेव योजनेअंतर्गत प्रत्‍येकी रक्‍कम रु.२०,०००/- गुंतविले आहेत. सदर पावतीची मुदत ही दि.२९/५/२००८ रोजी संपलेली आहे. मुदतीनंतर तक्रारदार यांना रक्‍कम रु.४०,०००/- मिळणे आवश्‍यक होते. तसेच तक्रारदार यांनी पावती क्र.४७८५, ४७८६, ४७८७ व ४७८८ अन्‍वये प्रत्‍येकी रक्‍कम रु.१०,०००/- दामदुप्‍पट योजनेअंतर्गत गुंतविले आहेत. सदर पावतीची मुदत दि.२७/६/२००८ रोजी संपली आहे. मुदतीनंतर तक्रारदार यांना प्रत्‍येक पावतीची रक्‍कम रु.२०,०००/- मिळणे आवश्‍यक होते. तक्रारदार यांच्‍या ठेवपावत्‍यांची मुदत संपूनही जाबदार यांनी तक्रारदार यांना रक्‍कम अदा केली नाही व सदोष सेवा दिली आहे. त्‍यामुळे सदरची रक्‍कम मंजूर करणेत येत आहे. तसेच सदर रकमेवर मुदत संपलेनंतर दुसरे दिवशीपासून द.सा.द.शे.१० टक्‍के दराने व्‍याज मंजूर करणेत येत आहे.
 
४.    तक्रारदार यांनी यापूर्वी या मंचामध्‍ये तक्रारअर्ज क्र.७९५/०८ चा दाखल केला होता. सदर अर्ज दि.२२/२/२०११ रोजी निकाली करणेत आला. सदर अर्जामध्‍ये तक्रारदार यांनी तक्रारदार यांचे सोबतच इतर अन्‍य तक्रारदारांना सामील केले होते त्‍यामुळे प्रस्‍तुतचा एकत्रित अर्ज काढून टाकण्‍यात येवून तक्रारदार यांना स्‍वतंत्र तक्रारअर्ज निकाल तारखेपासून तीन महिन्‍यांचे आत दाखल करण्‍याची मुभा देण्‍यात आली होती. प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज तक्रारदार यांनी दि.१९/५/२०११ रोजी दाखल केला आहे त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारअर्जास मुदतीची बाधा येत नाही असे या मंचाचे मत आहे.
 
५.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार पतसंस्‍थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
 
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र. २ ते १२ यांना  पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो. रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने पतसंस्‍थाच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो. 
 
६.    तक्रारदार यांनी शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांना आपली रक्‍कम मिळण्‍यासाठी या न्‍यायमंचात धाव घ्‍यावी लागणे ही बाब निश्चितच तक्रारदारांना शारिरिक मानसिक त्रास देणारी आहे. त्‍यामुळे सदरची मागणी अंशत: मान्‍य करण्‍यात येत आहे.
 
सबब, मंचाचा आदेश की,
                           दे
 
१. यातील जाबदार क्र.१ यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.४७६३ ची मुदतीनंतर होणारी
    रक्‍कम रु.४०,०००/-व या रकमेवर दि.३०/५/२००८ पासून द.सा.द.शे. १०% दराने व्‍याज
    अदा करावे असा आदेश करण्‍यात येतो.
 
२. यातील जाबदार क्र.१ यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.४७६४ ची मुदतीनंतर होणारी
    रक्‍कम रु.४०,०००/-व या रकमेवर दि.३०/५/२००८ पासून द.सा.द.शे. १०% दराने व्‍याज
    अदा करावे असा आदेश करण्‍यात येतो.
 
३. यातील जाबदार क्र.१ यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.४७८५ ची मुदतीनंतर होणारी
    रक्‍कम रु.२०,०००/-व या रकमेवर दि.२८/६/२००८ पासून द.सा.द.शे. १०% दराने व्‍याज
    अदा करावे असा आदेश करण्‍यात येतो.
 
४. यातील जाबदार क्र.१ यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.४७८६ ची मुदतीनंतर होणारी
    रक्‍कम रु.२०,०००/-व या रकमेवर दि.२८/६/२००८ पासून द.सा.द.शे. १०% दराने व्‍याज
    अदा करावे असा आदेश करण्‍यात येतो.
 
५. यातील जाबदार क्र.१ यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.४७८७ ची मुदतीनंतर होणारी
    रक्‍कम रु.२०,०००/-व या रकमेवर दि.२८/६/२००८ पासून द.सा.द.शे. १०% दराने व्‍याज
    अदा करावे असा आदेश करण्‍यात येतो.
 
६. यातील जाबदार क्र.१ यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.४७८८ ची मुदतीनंतर होणारी
    रक्‍कम रु.२०,०००/-व या रकमेवर दि.२८/६/२००८ पासून द.सा.द.शे. १०% दराने व्‍याज
    अदा करावे असा आदेश करण्‍यात येतो.
 
७.  यातील जाबदार क्र.१ यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे
    खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- अदा करावेत.
 
८.  वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.२०/२/२०१२ पर्यंत न केल्‍यास
    तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु
    शकतील.
 
सांगली
दिनांकò: ०६/०१/२०१२    
 
 
                 (गीता सु.घाटगे)                   (अनिल य.गोडसे÷)
                    सदस्‍या                                   अध्‍यक्ष           
              जिल्‍हा मंच, सांगली                   जिल्‍हा मंच, सांगली.  
       
 
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /   /२०११
      VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /    /२०११
 
 
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.