Maharashtra

Additional DCF, Mumbai(Suburban)

CC/14/144

GOBIND RAM SHARMA - Complainant(s)

Versus

PANASONIC INDIA PVT LTD - Opp.Party(s)

AJAY PRASHAR

18 Dec 2014

ORDER

Addl. Consumer Disputes Redressal Forum, Mumbai Suburban District
Admin Bldg., 3rd floor, Nr. Chetana College, Bandra-East, Mumbai-51
 
Complaint Case No. CC/14/144
 
1. GOBIND RAM SHARMA
1306, SHIV SRUSHTI, PANCH SRISHTI COMPLEX, NEAR S M SHETTY SCHOOL, POWAI, MUMBAI 400072
...........Complainant(s)
Versus
1. PANASONIC INDIA PVT LTD
THROUGH MANAGING DIRECTOR, 88, SPIC BLDG. AANEX, 6 TH FLOOR, MOUNT ROAD, GUINDY, CHENNAI
2. ATUL ELECTRONICS
THROUGH PROPRIETOR, 12/13, BILESHWAR TOWER, MANCH RASTA, MULUND (W), MUMBAI 400080
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. S S VYAVAHARE PRESIDENT
 HON'BLE MR. S.V.KALAL MEMBER
 
For the Complainant:
complainant by Adv. prashar prsent.
 
For the Opp. Party:
ORDER

     तक्रारदारांची तक्रार वाचली. दाखल सुनावणीकामी तक्रारदार वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद एैकण्‍यात आला. तक्रारदारांनी दिनांक 27.1.2013 रोजी घेतलेल्‍या एलईडी दूरचित्रवाणीसंच हा सुमारे एक वर्षापर्यत विना तक्रार कार्यरत होता. परंतु एका वर्षानंतर सदर दूरचित्रवाणी संचात एकाएकी बिघाड निर्माण झाला.

     अभिलेखातील कागदपत्रांचे अवलोकन केल्‍यावर असे दिसते की, सदर दूरचित्रवाणी संचाचा हमीचा कालावधी हा एका वर्षाकरीता मर्यादित होता. परंतु तक्रारदार यांच्‍या स्‍वतःच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दूरचित्रवाणी संच दिनांक 4.7.2014 पर्यत व्‍यवस्थित कार्यरत होता. सा.वाले क्र. 2 यांनी देखील सदरचा दूरचित्रवाणीसंच हमी कालावधीच्‍या बाहेर गेल्‍यामुळे सदर दूरचित्रवाणी संच विना मोबदला दूरुस्‍ती करण्‍याचे नाकारले. दूरचित्रवाणी संचाचा हमीचा कालावधी एक वर्षाचा असल्‍यामुळे सा.वाले यांची वरील कृती सेवा सुविधा पुरविण्‍यात योग्‍य वाटत नाही. तसेच कागदपत्रांवरुन असे दिसते की, तक्रारदार यांनी सा.वाले क्र.1 यांचेशी पत्र व्‍यवहार केल्‍यानंतर सा.वाले क्र. 1 हे तक्रारदारांना दूरचित्रवाणी संचाची 75 टक्‍के रक्‍कम म्‍हणजेच रु.90,000/- परत करण्‍यात तंयार होते. परंतु तक्रारदार यांनी ती न स्विकारता पूर्ण रक्‍कमेचा परतावा मागीतला. तक्रारदार यांनी सदरचा दूरचित्रवाणीसंच दिडवर्षापेक्षा अधिक काळ विना तक्रार उपभोगल्‍यामुळे सा.वाले क्र.1 यांची कृती आक्षेपार्ह वाटत नाही. सबब सदर प्रकरणात प्रथम दर्शनी देखील सा.वाले क्र. 1 व 2 यांचे कडून कोणत्‍याही प्रकारे सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर दिसून येत नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार दाखल न करता रद्द करण्‍यात येते. प्रकरण समाप्‍त. हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

  आदेशाची प्रत तक्रारदारांना पाठविण्‍यात यावी.

साधाप/( दिनांक 18.12.2014)

 
 
[HON'BLE MR. S S VYAVAHARE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.V.KALAL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.