आदेश (दिः 06/04/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रार क्र.599/2000 या प्रकरणी दि.31/01/2001 रोजी पारित केलेल्या आदेशासंदर्भात सदर दरखास्त दाखल करण्यात आले.
2. दि.05/04/2011 रोजी सदर प्ररकण सुनावणीस आले असाता विरुध्द पक्षानी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या कंपनी पिटीशन क्र.110/2000 या प्रकरणातील दि.26/09/2005 रोजीच्या आदेशाची प्रत दाखल केली. तसेच श्री. मैत्रेय दोशी यांनी विरुध्द पक्षासाठी प्रतिज्ञापत्र सादर केले.
3. मंचाचे असे निदर्शनास येते की, गैरअर्जदार कंपनीवर मा. उच्च न्यायालयाने अवसायकाची नियुक्ती केलेली आहे. गौरअर्जदाराचे वकीलांनी सुनावणीचे वेळेस असे नमुद केले की न्यायालय नियुक्त अवसायकासमोर अर्जदाराने आपला दावा दाखल करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंचाने सदर दरखास्त निकाली काढावे.
4. मंचाच्या मते मा. उच्च न्यायालयाने गैरअर्जदार कंपनीवर अवसायकाची नियुक्ती केलेली असल्याने सदर प्रकरणात या मंचाने हस्तक्षेप करणे योग्य ठरणारे नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडुन आदेशानुसार वसुल करावयाच्या रकमेचा दावा अवसायकानसमोर सादर करणे आवश्यक आहे व तसे करण्ययास तो पात्र आहे.
..2.. (दरखास्त क्र.187/2009(599/2000) 5. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो - आदेश 1.दरखास्त क्र.187/2009 निकाली काढण्यात येते. 2.खर्चाचे वहन उभ यपक्षांनी स्वतः करावे. दिनांक – 06/04/2011 ठिकाण - ठाणे (ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |