तक्रार क्रमांक – 338/2008 तक्रार दाखल दिनांक – 12/08/2008 निकालपञ दिनांक – 17/04/2010 कालावधी- 01 वर्ष 08 महिना 05 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर कु. गायत्री बेदी 232/बि, जॅली मेकर्स अपार्टमेंट-1 कफ परेड, मुंबई 400 005. .. तक्रारदार विरूध्द 1.पाल पिजिऑट लि., कल्याण शिल रोड, मानपाडा, डोंबिवली 421 204, जिल्हा- ठाणे.
2. श्री. विनोद एल. दोशी चेअरमन ऑफ पाल पिजिऑट लि., निलम हाऊस, एम.एल.दहानुकर मार्ग, मुंबई 400 026. 3.श्री.मैत्रेय व्हि. दोशी डायरेक्टर ऑफ पाल पिजिऑट लि., निलम हाऊस, एम.एल.दहानुकर मार्ग, मुंबई 400 026. 4. श्री. अविंद एल. दोशी डायरेक्टर ऑफ पाल पिजिऑट लि., विंग क्लीफ, 15-डि, पेडर रोड, मुंबई 400 026. .. विरुध्दपक्ष समक्ष - सौ. शशिकला श. पाटील – अध्यक्षा सौ. भावना पिसाळ - सदस्या श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः तक्रारकर्ता तर्फे वकिल श्रीमती. माखिजानी वि.प तर्फे वकिल सुनील सुराना आदेश (पारित दिः 17/04/2010) मा. सदस्य सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार कु.गायत्री बेदी यांनी मे. पाल पिजिऑट लि., व इतर यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी कारचे बुकींग करताना भरलेले रु.25,000/- ही रक्कम व्याजासकट परत मागितली आहे. .. 2 .. 2. तक्रारकर्तायांनी विरुध्द पक्षकारकडे एजंटद्वारे दि.31/10/1995 मध्ये पिजिऑट 309 ही गाडी बुक करुन बुकींगसाठी रु.25,000/- रक्कम दिली व विरुध्द पक्षकार यांनी दिलेली पावती नि. C-1 वर दाखल केली आहे. परंतु काही दिवसांनी असे दिसुन आले की, विरुध्द पक्षकार यांनी मॅन्युफॅक्चरींग बंद केले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी दि.06/06/1997 रोजी सदर केलेले बुकींग रद्द केल्याबद्दल विरुध्द पक्षकार यांना पत्राद्वारे कळविले व भरलेली रक्कम रु.25,000/- परत करण्यासंबंधी सुचविले व 1998 पर्यंत स्मरणपत्रे पाठविली परंतु तरीही विरुध्द पक्षकार यांनी दुर्लक्ष करुन तक्रारकर्ता यास त्यांनी भरलेली बुकींगची रक्कम रु.25,000/- परत केले नाहीत म्हणुन सदरची तक्रार मंचापुढे दाखल केली आहे.
3. विरुध्द पक्षकार यांनी त्यांची लेखी कैफीयत दि.05/11/2008 रोजी दाखल केली आहे यामध्ये त्यांनी सुरवातीलाच तक्रार मुदतबाह्य असल्याने यामंचापुढे ही तक्रार चालु शकत नाही असे सुरवातीलाच आक्षेप घेतलेला आहे तसेच सदर उशीर झाल्याबद्दल कोणताही 'विलंब माफीचा अर्ज मंचापुढे ठेऊन मंजुर करुन घेतलेलाच नाही त्यामुळे सदर मुद्दा मंचाने लक्षात घेण्याबद्दल विरुध्द पक्षकार यांनी म्हणणे मांडले आहे.
4. पुढे विरूध्द पक्षकार नं.1 म्हणता, सदर तक्रारकर्ता यांनी भरलेली रक्कम रु.25,000/- त्यांना मिळालेली नाही तर ती डिलरने घेतलेली आहे. तसेच विरुध्द पक्षकार नं.1 यांची (wound up) बंद पडुन 'लिक्वीडेशनमध्ये' निघाली आहे व त्यांच्या विरुध्द हायकोर्टाने ऑफिशियल लिक्वीडेटरची (official liquidator) नियुक्ती केली आहे. कोर्ट रिसिव्हरला हॉयकोर्टाच्या आदेशानुसार असेटबद्दल निर्णय घेतला जाईल. 5. उभयपक्षकारांची शपथपत्रे, पुरावा, कागदपत्रे, लेखी कैफीयत व लेखी युक्तीवाद तपासुन पाहीले व पुढील प्रश्न मंचापुढे उपस्थित होतो. प्र.तक्रारकर्ता यांनी सदरहु तक्रार उदभवल्यानंतर ठरलेल्या कालावधीत दाखल केली आहे काय ? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच नकारार्थी देत असुन पुढील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा तक्रारकर्ता यांनी दि.31/10/1995 रोजी विरुध्द पक्षकार यांचेकडे पिजॉट 309 ही गाडी खरेदी करण्यासाठी बुकींगची रक्कम .. 3 .. रु.25,000/- डिलरकडे भरली होती व तत्सम पावती विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना दिलेली आहे तदंतर दि.06/06/1997 रोजी बुकींग रद्द केल्याचे तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांना पत्राद्वारे कळविले त्यानंतरही विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांनी बुकींगसाठी भरलेली रक्कम रु.25,000/-परतफेड केलेली नाही.त्यामुळे तक्रारीनुसार 1997, 1998 नंतर तक्रार उद्भवली परंतु तदनंतर सदर तक्रार 2 वर्षाच्या कालावधीत मंचापुढे दाखल केलेली नाही. त्यामुळे मंचाच्या मते सदरची तक्रार ही मुदतबाह्य ठरली आहे. तसेच तक्रारकर्ता ने विलंब माफीचा अर्ज केलेला नाही. विरुध्द पक्षकार कंपनी लिक्वीडेशमध्ये असुन हायकोर्टाने कोर्ट रिसिव्हर बसवलेला आहे. तरी हे मंच ही तक्रार खारीज करुन पुढील अंतिम निर्णय देत आहे. अंतीम आदेश 1.तक्रार क्र.338/2008 रद्दबातल ठरविण्यात येत आहे कारण तक्रार उदभवल्यानंतर 2 वर्षाच्या कालावधीत तक्रार दाखल केलेली नाही व तत्सम विलंब माफीचा अर्जही मंचाकडुन मंजुर करुन घेतलेला नाही. 2. खर्चाबद्दल कोणताही हुकुम नाही. 3.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
दिनांक – 17/04/2010
ठिकान – ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|