Maharashtra

Sangli

CC/11/101

Shri.Pandurang Dattatraya Khole through legal heirs Shri.Mohan Pandurang Khole (Suryawanshi) etc., 5 - Complainant(s)

Versus

Pai.Jyotiram Dada Patil Nag.Sah.Pat.Mar.Sangli etc.,13 - Opp.Party(s)

A.B.Shelar

16 Jun 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/101
 
1. Shri.Pandurang Dattatraya Khole through legal heirs Shri.Mohan Pandurang Khole (Suryawanshi) etc., 5
Dattatraya Nivas, Plot No.64, S.No.365, Yashwantnagar, Sangli, Tal.Miraj, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. Pai.Jyotiram Dada Patil Nag.Sah.Pat.Mar.Sangli etc.,13
Padmaprabha Plaza, Ambedkar Road, Sangli 416 416.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                           नि.नं.15
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
 
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
 
ग्राहक तक्रार अर्ज क्र.101/2011
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख     11/04/2011
तक्रार दाखल तारीख   15/04/2011 
निकाल तारीखः     -  11/06/2012
----------------------------------------------
 
1. पांडुरंग दत्‍तात्रय खोले
    मयत वारस
    1.1. श्री मोहन पांडुरंग खोले (सुर्यवंशी)
          वय वर्षे 26, धंदा नोकरी
    1.2. श्रीमती सुमन पांडुरंग खोले (सुर्यवंशी)
          वय वर्षे 55, धंदा घरकाम
    1.3. श्री विजय पांडुरंग खोले (सुर्यवंशी)
          वय वर्षे 25, धंदा नोकरी
    1.4 सौ मनिषा प्रविण पवार
          वय वर्षे 30, धंदा घरकाम
    1.5   सौ अनिता स्‍वप्‍नील पवार
          वय वर्षे 28, धंदा घरकाम
     सर्व रा. दत्‍तात्रय निवास, प्‍लॉट नं.64, स.नं.365,
     यशवंतनगर, सांगली, ता.मिरज जि. सांगली          ..... तक्रारदार
विरुध्‍द
 
1.  पै.जोतिरामदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
   सांगली, पद्मप्रभा प्‍लाझा, आंबेडकर रोड, सांगली-416416
 
2. श्री दत्‍तात्रय कृष्‍णाजी पाटील, चेअरमन
    कृष्‍णावुदिन, क्रांतीनगर, सांगली
 
3. श्री कल्‍लू आबा कांबळे
    रा.हिरवळ, पंचायत ऑफिसजवळ, इस्‍लामपूर  
    ता.वाळवा जि.सांगली
 
4. श्री अरुण रामचंद्र कुलकर्णी,
    रा.द्वारा रयत बॅंक एम्‍प्‍लॉईज को-ऑप.क्रेडीट सोसायटी
    लि. सांगली, खणभाग, रिसाला रोड, सांगली
 
5. श्री आप्‍पासाहेब आनंदराव पवार
    रा.मु.पो. कवठे एकंद, ता.तासगांव जि.सांगली
 
6. श्री बाळासाहेब आप्‍पासाहेब डोंबे
    रा. मंगळवार पेठ, मारुती देवळाजवळ,
    जत ता.‍जत जि.सांगली
 
7. श्री गुरुपादप्‍पा शंकर आरळी
    रा.चाटी गल्‍ली, जत ता.‍जत जि.सांगली
 
8. श्री अशोक भगवान पाटील
    रा.मु.पो.चिंचणी, ता.तासगांव जि.सांगली
 
9. श्री सुरेश व्‍यंकटराव इनामदार,
    रा.सुविधा, सुभाषनगर, सावर्डेकर प्‍लॉट सांगली
 
10. श्री नारायण शिवाप्‍पा पुजारी
    रा.हॉटेल शिवप्रसाद, शंभर फुटी रोड,
    सांगली
 
11. श्री मुन्‍नाशेठ इब्राहिम तांबोळी
    रा.दादाभाई मंजिल, हॉटेल बार्बीच्‍या मागे,
    कुपवाड रोड, सांगली
 
12. श्री शंकर पांडुरंग शिंदे
    रा.भवानीनगर, ता.वाळवा जि.सांगली
 
13. सौ पल्‍लवी सुनिल भाटे,
    रा.रतनशी नगर, पी/९, प्‍लॉट नं.६, सांगली            ..... जाबदार  
 
 
                            तक्रारदार तर्फे - अॅड श्री ए.बी.शेलार    
                            जाबदार क्र.1 व 2 तर्फे – अॅड श्री आर.आर.पाटील
                            जाबदार क्र.3 ते 13 नो से
                   
   नि का ल प त्र
 
द्वारा- मा. सदस्‍या- गीता घाटगे
 
1.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने बचत खाते व मुदत ठेवी अन्‍वये गुंतविलेल्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार पै.जोतिरामदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. सांगली (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्‍या होत्‍या. सर्व मुदत ठेवींच्‍या मुदती पूर्ण झालेल्‍या आहेत.  तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रकमांची पतसंस्‍थेकडे मागणी केली असता पतसंस्‍थेने ती देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्‍याला रकमा देवविण्‍यात याव्‍यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे.  तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.4 अन्‍वये एकूण 12 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
2.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र. 3 ते 13 यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी झाल्‍यानंतर ते प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले. परंतु त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल न केल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द नि.1 वर नो से आदेश करण्‍यात आले.
 
      3.    मंचाच्‍या नोटीशीची बजावणी जाबदारांवर झाल्‍यानंतर जाबदार क्र.1 व 2 यांनी विधिज्ञांमार्फत हजर होवून त्‍यांचे म्‍हणणे प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केले. त्‍यांचे सर्व म्‍हणणे त्‍यांनी जाबदार क्र.1 व 2 ते 13 यांचेवतीने मांडले आहे. परंतु जाबदार क्र.3 ते 13 यांचेविरुध्‍द यापूर्वीच नो से आदेश पारीत झाला असल्‍याकारणाने व सदरहू आदेश संबंधीत जाबदारांनी रद्द करुन न घेतल्‍याने सदरहू म्‍हणणे जाबदार क्र.3 ते 13 यांचेवतीने वाचण्‍यात आलेले नाही. ते केवळ जाबदार क्र.1 व 2 यांचेवतीनेच विचारात घेण्‍यात येत आहे. या जाबदारांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदारांचा तक्रारअर्ज व त्‍यातील कथने अमान्‍य केली आहेत. तसेच जाबदार क्र.2 हे जरी पतसंस्‍थेचे संचालक असले तरी ते तक्रारदारांच्‍या ठेवीस व्‍यक्‍तीश: जबाबदार रहात नाहीत असे नमूद केले आहे. जाबदारांनी पुढे असेही नमूद केले आहे की, संस्‍थेतील सर्व ठेवीदारांनी एकाच वेळी सर्व ठेवींच्‍या रकमा परत मागणेस सुरुवात केल्‍यामुळे व एकाच वेळी रकमा अदा करणे पतसंस्‍थेला अशक्‍य झाले आहे. त्‍याचप्रमाणे ज्‍या सभासदांना कर्जवाटप केले होते त्‍यांच्‍याकडील कर्जाऊ रकमा एकाच वेळी वसुल होऊ शकत नसल्‍यामुळे सर्व ठेवीदारांच्‍या रकमा एका वेळी देणे या जाबदारांना शक्‍य होत नाही. सदरहू जाबदार पुढे असेही कथन करतात की, त्‍यांनी तक्रारदारांना ठेवींच्‍या रकमांवर व्‍याज अदा केले आहे मात्र तक्रारदाराने त्‍याबाबतचा कोणताही उल्‍लेख प्रस्‍तुत कामी केलेला नाही. या सर्व कारणांचा विचार करुन सदरहू जाबदारांनी तक्रारदारांचा तक्रारअर्ज नामंजूर करण्‍याची विनंती त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये केली आहे. म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठयर्थ त्‍यांनी नि.12 अन्‍वये प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
 
4.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार पतसंस्‍थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. 5223/09 सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक 22 डिसेंबर 2010 रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम 88 अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र. 2 ते 13 यांना पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थाने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने पतसंस्‍थाच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो.
     
5.    तक्रारदारांनी तक्रारअर्जामध्‍ये मुदत ठेवींतील रकमांची व्‍याजासह मागणी केली आहे तर जाबदार क्र.1 व 2 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदारांना ठेवीतील रकमांवर व्‍याज अदा केल्‍याचे नमूद केले आहे. तक्रारदारांनी नि.14 अन्‍वये ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रती प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केल्‍या आहेत. या सत्‍यप्रतींचे अवलोकन करता त्‍याच्‍या मागील भागांवर ठेवपावतींतील रकमांवर काही कालावधीपर्यंतचे व्‍याज देण्‍यात आल्‍याची नोंद करण्‍यात आलेली आहे. सबब, या सर्व ठेवींतील रकमा व्‍याज मिळाल्‍याच्‍या दुस-या दिवशीपासून पावतीवर नमूद व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहेत तर बचत खात्‍यातील शेवटच्‍या तारखेस शिल्‍लक असलेली रक्‍कम तक्रारदारांच्‍या मागणीनुसार 5 टक्‍के व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहेत. परंतु प्रस्‍तुत प्रकरणी या बचत खात्‍याच्‍या दाखल करण्‍यात आलेल्‍या सत्‍यप्रतीचे अवलोकन करता रक्‍कम रु.41,790/- इतकी रक्‍कम बचत खात्‍यावरती किती तारखेस शिल्‍लक होती याचा खुलासा होत नाही. या रकमेसमोर कोणतीही तारीख नमूद करण्‍यात आली नाही. सबब, बचत खात्‍यातील शेवटच्‍या तारखेस शिल्‍लक असलेल्‍या रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून व्‍याज मंजूर करणे मंचास क्रमप्राप्‍त ठरते.
 
      तक्रारअर्जामध्‍ये तक्रारदारांनी तक्रारदार क्र.1.1 ते 1.5 हे तक्रारदार क्र.1 पांडुरंग दत्‍तात्रय खोले (मयत) यांचे वारस म्‍हणजेच पत्‍नी, मुले व मुली असल्‍याचे शपथेवर नमूद केले आहे. पांडुरंग दत्‍तात्रय खोले हे मयत असल्‍याचा दाखलाही त्‍यांनी नि.4/10 अन्‍वये प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केला आहे.  सबब बचत खाते व ठेवी या जरी पांडुरंग दत्‍तात्रय खोले यांच्‍या नावावर असल्‍या तरी त्‍यातील रकमा पांडुरंग खोले यांचे वारस तक्रारदार क्र.1.1 ते 1.5 यांना मंजूर करण्‍यात येत आहेत.
 
सबब, मंचाचा आदेश की,
 
दे
 
1. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना बचत खाते क्र.263 मधील रक्‍कम रु.41,790/- (अक्षरी रुपये एक्‍केचाळीस हजार सातशे नव्‍वद फक्‍त) दि.15/4/2011 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.5 टक्‍के व्‍याजदराने अदा करावी.
 
2. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.1110 मधील रक्‍कम रु.2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख फक्‍त) दि.5/9/2009 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.8 टक्‍के व्‍याजदराने अदा करावी.
 
3. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावत्‍या क्र.1113, 1114 व 1116 मधील प्रत्‍येकी रक्‍कम रु.25,000/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार फक्‍त) दि.27/8/2009 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.8 टक्‍के व्‍याजदराने अदा करावी.
 
4. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.1086 मधील रक्‍कम रु.4,000/- (अक्षरी रुपये चार हजार फक्‍त) दि.27/8/2009 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.8 टक्‍के व्‍याजदराने अदा करावी.
 
5. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावत्‍या क्र.1111 व 1112 मधील प्रत्‍येकी रक्‍कम रु.50,000/- (अक्षरी रुपये पन्‍नास हजार फक्‍त) दि.27/8/2009 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.8 टक्‍के व्‍याजदराने अदा करावी.
 
6. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त) अदा करावेत.
 
7. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.26/07/2012 पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
 
सांगली
दिनांक: 11/06/2012    
 
                  (गीता सु.घाटगे)                               (अनिल य.गोडसे)
                        सदस्‍या                                             अध्‍यक्ष           
                              जिल्‍हा मंच, सांगली                          जिल्‍हा मंच, सांगली.  
 
 
 
 
[HON'ABLE MR. A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.