नि. २३
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष : श्री.अनिल य.गोडसे
मा.सदस्या : श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१२२/२०११
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २६/४/२०११
तक्रार दाखल तारीख : ०३/०५/२०११
निकाल तारीख : ०९/०२/२०१२
-----------------------------------------------------------
१. सौ सुमंगला यल्लाप्पा पुजारी
वय ५६ वर्षे, व्यवसाय – घरकाम
२. श्री विजय यल्लाप्पा पुजारी
वय २३ वर्षे, व्यवसाय – नोकरी
उभयंता रा.मु.पो. सोन्याळ, ता.जत जि.सांगली ..... तक्रारदारú
विरुध्द
१. पै.जोतीराम दादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था
मर्या. सांगली
पद्मप्रभा प्लाझा, आंबेडकर रोड, सांगली ४१६४१६
२. श्री दत्ताजीराव कृष्णाजी पाटील
वय ६७ वर्षे, धंदा – शेती
कृष्णाकदिन, क्रांतीनगर, सांगली ४१६ ४१६
(मंचाच्या दि.६/२/१२ चे आदेशान्वये वगळले)
३. श्री कल्लू आबा कांबळे
वय वर्षे सज्ञान, धंदा – व्हा.चेअरमन
रा.हिरवळ, पंचायत ऑफिसजवळ, इस्लामपूर
ता.वाळवा जि.सांगली
४. श्री अरुण रामचंद्र कुलकर्णी,
वय वर्षे सज्ञान, धंदा – संचालक
रा.द्वारा रयत बॅंक एम्प्लॉईज को-ऑप.क्रेडीट सोसायटी
लि. सांगली, खणभाग, रिसाला रोड, सांगली
५. श्री आप्पासाहेब आनंदराव पवार
वय वर्षे सज्ञान, धंदा – संचालक
रा.मु.पो. कवठे एकंद, ता.तासगांव जि.सांगली
६. श्री बाळासाहेब आप्पासाहेब डोंबे
वय वर्षे ५८, धंदा – नोकरी
रा. मंगळवार पेठ, मारुती देवळाजवळ,
जत ता.जत जि.सांगली
७. श्री गुरुपाद शंकर आरळी
वय वर्षे ६७, धंदा – सेवानिवृत्त
रा.चाटी गल्ली, जत ता.जत जि.सांगली
८. श्री अशोक भगवान पाटील
वय वर्षे सज्ञान, धंदा – संचालक
रा.मु.पो.चिंचणी, ता.तासगांव जि.सांगली
९. श्री सुरेश व्यंकटराव इनामदार,
वय वर्षे सज्ञान, धंदा – संचालक
रा.सुविधा, सुभाषनगर, सावर्डेकर प्लॉट सांगली
१०. श्री नारायण शिवाप्पा पुजारी
वय वर्षे सज्ञान, धंदा – संचालक
रा.हॉटेल शिवप्रसाद, शंभर फुटी रोड,
सांगली
११. श्री मुन्नाशेठ इब्राहिम तांबोळी
वय वर्षे सज्ञान, धंदा – संचालक
रा.दादाभाई मंजिल, हॉटेल बार्बीच्या मागे,
कुपवाड रोड, सांगली
१२. श्री शंकरराव पांडुरंग शिंदे
वय वर्षे सज्ञान, धंदा – संचालक
रा.भवानीनगर, ता.वाळवा जि.सांगली
१३. सौ पल्लवी सुनिल भाटे,
वय वर्षे सज्ञान, धंदा – संचालिका
रा.रतनशी नगर, पी/९, प्लॉट नं.६, सांगली
(मंचाच्या दि.६/२/१२ चे आदेशान्वये वगळले) ..... जाबदार
तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री एम.ए.मुतवल्ली
जाबदार क्र.१ तर्फे –+ìb÷. श्री आर.आर.पाटील (नो से)
जाबदार क्र.३ ते १२ – एकतर्फा
जाबदार क्र.२ व १३ – वगळले
नि का ल प त्र
द्वारा- मा.सदस्या - श्रीमती सुरेखा बिचकर
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने दामदुप्पट ठेवी अन्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार पै.जोतिरामदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे रक्कम गुंतविलेली होती. ठेवींच्या मुदती पूर्ण झालेल्या आहेत. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमांची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रकमा देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.४ अन्वये एकूण ४ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र.१ यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी झाल्यानंतर ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले. परंतु त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द नि.१ वर “ नो से ” आदेश करण्यात आले.
३. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. ३ ते १२ यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी होऊनसुध्दा ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्यात आले. जाबदार क्र.२ व १३ यांना मे.मंचाचे दि.६/२/१२ चे आदेशानुसार प्रस्तुत प्रकरणातून वगळणेत आले.
४. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. ३ ते १२ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो. पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने ज्या पतसंस्थेमध्ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
४. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी नि.४ सोबत दाखल केलेल्या ठेवपावत्यांच्या सत्यप्रतींचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी दामदुप्पट ठेव योजनेअंतर्गत रकमा गुंतविलेल्या आहेत. सदरच्या ठेव पावत्यांची मुदतही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या ठेवींमधील मुदतीनंतर मिळणारी ठेवीची मुदत संपल्याचे दुसरे दिवशीपासून द.सा.द.शे. १० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.४४३ मधील रक्कम रु.२,००,०००/- (रुपये दोन लाख फक्त) व या रकमेवर दि.३१/१२/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के दराने व्याज अदा करावे.
२. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.४४४ मधील रक्कम रु.१,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) व या रकमेवर दि.३१/१२/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के दराने व्याज अदा करावे.
३. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- (दोन हजार फक्त) अदा करावेत.
४. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.२४/३/२०१२ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांक:०९/०३/२०१२
(सुरेखा बिचकर) (अनिलय.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.