जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 319/2008. प्रकरण दाखल दिनांक – 25/09/2009. प्रकरण निकाल दिनांक –06/06/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. नामदेव पि. श्रीकृष्ण इंद्राळे वय वर्षे 7, व्यवसाय शिक्षण, रा. शेकापूर वाडी ता.उदगीर, जि. लातूर. अज्ञान पालनकर्ता उत्तम बळीराम कासले अर्जदार वय,50 वर्षे, धंदा शेती व व्यापार रा. कासले ट्रेडींग कंपनी. मार्केट यार्ड, उदगीर ता. उदगीर जि. लातूर विरुध्द व्यवस्थापक, पसल इंडिया लिमीटेड, शाखा नांदेड, गुरुकृपा मार्केट, पहिला मजला, गैरअर्जदार महावीर चौक, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.व्ही.ए.कूंभार गैरअर्जदारा तर्फे - अड.कांबळे वाय.सी. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार पसल इंडिया लि. यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदाराचे वडील श्रीकृष्ण गंपू इंद्राळे यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रिमियम भरुन एक पॉलिसी घेतली. या पॉलिसीमध्ये तक्रारदाराची आई यांना नॉमिनी दाखवलेले आहे. परंतु दूर्देवाने अर्जदाराचे वडील व आई अपघातामध्ये दि.26.05.2006 रोजी मरण पावले. अर्जदार हा सध्या अज्ञान पालनकर्ता उत्तम बळीराम कासले यांचेकडे राहण्यास आहेत व तेच त्यांची काळजी घेतात. अपघातात मरण पावल्यानंतर त्यांचे वारस अर्जदार नामदेव श्रीकृष्ण इंद्राळे व वैष्णवी श्रीकृष्ण इंद्राळे असे आहेत. गैरअर्जदार यांचेकडे पॉलिसीची रक्कम रु.32,730/- व त्यावरील फायदे मागितले असता फाईल मंजूरीसाठी पाठविली आहे, मंजूरी मिळाल्याबरोबर आपल्याला रक्कम मिळेल असे वेळोवेळी सांगण्यात आले परंतु अद्यापपर्यत अर्जदारास रक्कम मिळाली नाही. दि.20.07.2008 रोजी परत अर्जदारातर्फे अज्ञानपालनकर्ता यांनी कार्यालयामध्ये जाऊन मागणी केली असता त्यांनी रक्कम देण्यास नकार दिला. अर्जदाराने दि. 03.06.2006 रोजी सर्व कागदपञे गैरअर्जदार यांचेकडे दिलेली आहेत परंतु त्यांनी पावती दिलेली नाही. अर्जदार व त्यांची बहीण हे दोघेही त्यांचे आईचे वडीलाकडे म्हणजे आजोळी अज्ञानपालनकर्ते यांचकडे राहत आहेत. अपघातातील फायदयासह पॉलिसीची रक्कम अर्जदारास मिळावी, तसेच मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- गैरअर्जदाराकडून मिळण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.प्रस्तूतची तक्रार ही मूदतीत नाही. गैरअर्जदाराकडून सेवेत कोणतीही ञूटी करण्यात आलेली नाही. गैरअर्जदार कंपनी ही जमीन खरेदी व विक्री तसेच अलाऊटमेंन्टचे काम करतात. त्यांची ग्राहक व पॉलिसी होल्डरने जमीन अलाऊट करतात व त्याप्रमाणे योजना राबवते. अर्जदार हे या योजनेसाठी पाञ नाहीत. अर्जदाराच्या वडीलांनी काही रक्कम या स्कीममध्ये गूंतवली व त्यांना अलाऊटेमेट प्रमाणपञ देण्यात आले व यात मयत श्रीकृष्ण यांनी त्यांचे पत्नीस नॉमिनी म्हणून दाखवलेले आहे. अर्जदाराच्या मागणीप्रमाणे ते रु.32,730/- मिळण्यास अपाञ आहेत व गैरअर्जदार यांचेकडे अर्जदाराचे अज्ञान पालनकर्ते उत्तम बळीराम कासले हे कधीच आले नाहीत. अर्जदाराने जे पञ पाठविले ते दि.14.03.2008 चे आहे. अर्जदाराचे आईवडील हे दि.26.05.2008 रोजी मरण पावले व यानंतर दि.14.03.2008 रोजी म्हणजे जवळपास 20 महिन्या नंतर गैरअर्जदाराकडे पञ पाठविण्यात आले. त्यामूळे अशी मागणी ही खोटी व फसवणूक करणारी आहे व यासाठी अर्जदार पाञ नाहीत. गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी न केल्यामूळे अर्जदाराची मानसिक ञास व दावा खर्चाची मागणी चूक आहे. त्यामूळे अर्जदाराची तक्रार फेटाळावी अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. प्रकरण मूदतीत येते काय होय. 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होत काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदाराचे अज्ञानपालनकर्ते यांनी वर्ष 2006 रोजी अपघातानंतर गैरअर्जदार यांना सूचना दिली व आवश्यक त्या कागदपञासह दि.03.06.2006 रोजी मिळणा-या रक्कमेची मागणी ही केली. गैरअर्जदार यांनी नकार दिला आहे व आक्षेप घेतला आहे की, त्यांचेकडे सूचना व प्रपोजल दिलेले नाही. अपघात हा दि.26.05.2006 रोजी झालेला आहे व या अपघातात अर्जदार यांचे आई व वडील दोघाचाही मृत्यू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मयत श्रीकृष्ण इंद्राळे यांनी कोणासंबंधी काय काय व्यवहार केलेला आहे हे अर्जदाराचे आजोबा यांना कसे माहीती असणार ? व ही सर्व माहीती त्यांना मिळण्यासाठी व मागणी करण्यासाठी किमान सहा महिन्याचा अवधी निश्चित लागणार यात वाद नाही. म्हणून दि.26.05.2006 रोजी नंतर सहा महिने म्हणजे 2007 हे वर्ष उजडणार व अर्जदार यांनी आपली तक्रार दि.25.09.2008 रोजी दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांचा या प्रस्तावास होकार ही नाही व नकार ही नाही. त्यामूळे कॉज ऑफ अक्शनची तारीख घेता येणार नाही. परंतु आम्ही उल्लेखीत दिनांकापासून दोन वर्षाचा कालावधी कमीअधीक वेळेत अर्जदार यांना तक्रार दाखल करता येईल. त्यामूळे जो काही विलंब झाला असेल तो योग्य कारणामूळे आम्ही माफ करीत आहोत. त्यामूळे तक्रारदार यांचा अर्ज मूदतीत येतो. मूददा क्र.2 ः- पसल इंडिया लिमिटेड यांचेकडून अर्जदाराचे वडील मयत श्रीकृष्ण यांनी दि.22.12.2005 रोजी पॉलिसी घेतली हे गैरअर्जदार यांना मान्य आहे व या पॉलिसी द्वारे त्यांनी प्लॅन नंबर 2 याप्रमाणे पाच वर्ष सहा महिने यासाठी 450 स्क्वेअर यार्डचा प्लॉट त्यांची किंमत रु.22,500/- आहे असे अलाऊटमेट केले व करारनामा केला. हा करारनामा दि.22.06.2011 पर्यत अस्त्तित्वात आहे. यासाठी मयत श्रीकृष्ण यांनी रु.2070/- रक्कम गैरअर्जदाराकडे भरलेले आहे. यानंतर मयत श्रीकृष्ण व त्यांची पत्नी दोघेही दि.26.05.2006 रोजी अपघातात मरण पावले. याबददल पोलिस स्टेशन डोरनाला (आंध्रा प्रदेश) यांचे एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, इत्यादी कागदपञे अर्जदाराने दाखल केलेली आहेत. पसल इंडिया लि. यांचे टेबल प्रमाणे प्लॅन नंबर सी-2 हा सहा वर्ष तिन महिन्याचा आहे व पॉलिसीमध्ये प्लॅन नंबर 2 पाच वर्ष तिन महिने असा लिहीलेला आहे. त्यामूळे प्लॅन नंबर 1 जर गृहीत धरला तर तो पाच वर्ष तिन महिन्याचा आहे. नंबर ऑफ प्लॉट 3 x 450 स्क्वेअर यार्ड याप्रमाणे कंन्सीडरेशन 22500 याप्रमाणे शेवटी अपघात बेनिफीट रु.33,750/- दाखवलेले आहेत. ही रक्कम मिळण्यास अर्जदार पाञ आहेत व प्लॅन नंबर 1 प्रमाणे सी-1, सी-2,सी-3, सी-4 याप्रमाणे असेंसमेट रियलॉजेशन व्हॅल्यू त्यांचा एंड ऑफ ट्रीटमेंट असे म्हटले आहे. परंतु इथे लाभार्थी हा अपघातामध्ये मरण पावलेला आहे. त्यामूळे हा फायदा त्यांना होणार नाही व डबल बेनिफीट अर्जदार यांना देता येत नाही. आता प्रश्न असा आहे की, मयत श्रीकृष्ण यांचे दोन मूले नामदेव व वैष्णवी असे आहेत. या बददल वारसा प्रमाणपञ सरपंच ग्रामपंचायत शेकापुर यांनी दिलेले आहे. तसेच ही दोन्ही मुले अज्ञान असल्याकारणाने त्यांचा संभाळ व पालनपोषण उत्तम बळीराम कासले हे करतात म्हणून प्रमाणपञ दिले आहे. हे प्रमाणपञ ग्राहय धरुन हे दोघेही अधीअर्धी रक्कम मिळण्यास पाञ आहेत. यात मा. न्यायालय उदगीर यांचेकडे अज्ञानपालनकर्ते कोण असावे याबददल न्यायालयाने आदेश करुन उत्तम बळीराम कासले रा. शेकापूर ता. उदगीर यांना नामदेव श्रीकृष्ण इंद्राळे व वैष्णवी श्रीकृष्ण इंद्राळे यांचे गारडीयन म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. या निकालपञात अनावधानाने काही स्पेलिंग मिसटेक व नोंदी बददल अशी चूक झालेल्या आहेत परंतु त्यांला पूरक अशी पूराव्यावरुन वारसाचे नांव नामदेव श्रीकृष्ण इंद्राळे व वैष्णवी श्रीकृष्ण इंद्राळे व त्यांचे पालनकर्ते म्हणून उत्तम बळीराम कासले हेच आहेत. हे अगदी स्पष्ट आहे. त्यामूळे अज्ञानपालनकर्ता म्हणून नामदेव इंद्राळे व वैष्णवी इंद्राळे हे गैरअर्जदार यांचेकडून रु.32,750/- ही रक्कम मिळण्यास पाञ असतानाही रक्कम न देऊन सेवेत ञूटी केलेली आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. नामदेव श्रीकृष्ण इंद्राळे व वैष्णवी इंद्राळे यांना गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत रु.32,730/- व त्यावर दि.25.09.2008 पासून 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजसह व ही रक्कम अज्ञानपालनकर्ते उत्तम बळीराम कासले यांनी स्विकारुन यापैकी अर्धी रक्कम नामदेव व अर्धी रक्कम वैष्णवी यांचे नांवे राष्ट्रीय बँकेत स्वःतचे नांवाने खाते उघडून ठेवावी व दोन्ही मूलाच्या आवश्यकतेनुसार त्या रक्कमेतून त्यांनी खर्च करावा. 3. अर्जदार यांचेकडे प्रपोजल व क्लेम मागितल्या बददलचा पूरावा नसल्यामूळे त्यांना मानसिक ञास देय नाही. 4. दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 5. गैरअर्जदार यांनी प्रपोजल व आवश्यक कागदपञे जर त्यांचेकडे उपलब्ध नसतील तर अर्जदार यांचेकडून घ्यावीत व आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |