Maharashtra

Nanded

CC/08/336

Jamkar Lxmikanth Digumbar - Complainant(s)

Versus

Pacific Incorporation - Opp.Party(s)

ADV.Kiran R.Viduls

20 May 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/336
1. Jamkar Lxmikanth Digumbar NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Pacific Incorporation Mayur Apartment D-wing Opp.NMC Bank Kailash nagar NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 20 May 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

 जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नंदेड
 
प्रकरण क्र.336/2008.
                                                     प्रकरण दाखल दिनांक  15/10/2008.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 06/03/2009.
                                                   
समक्ष         -    मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील        अध्‍यक्ष.
                     मा.श्रीमती. सुजाता पाटणकर.         सदस्‍या.
                 मा. श्री.सतीश सामते.                सदस्‍य.
                
 
लक्ष्‍मीकांत पि. दिगंबरराव जामकर                                
वय वर्षे 36, व्‍यवसाय नौकरी,
रा. नांदेड.                                          अर्जदार
 
विरुध्‍द
 
1.    पॅसिफिक इनकॉरपरेशन,
     डि-विंग, कैलाशनगर, नांदेड                       गैरअर्जदार
2.   हेवल्‍ट-पँकर्ड इंडिया सेल्‍स प्रा.लि.
     ग्रेट इस्‍टर्न प्‍लाझा, ऑफिस नं.2,
     फर्स्‍ट फलोअर, एअरपोर्ट रोड,
     यरवडा, पुणे.
 
अर्जदारा तर्फे.           - अड.किरण आर. विडूळे
गैरअर्जदार क्र.1 तर्फे      - अड.वाय.एस. अर्धापूरकर
गैरअर्जदार क्र.2 तर्फे     -   अड.थमन्‍ना गोंडा.
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्‍या)
 
गैरअर्जदारांनी ञूटीची सेवा दिली यामूळे अर्जदाराने नूकसान भरपाई मिळावी म्‍हणून ही तक्रार दाखल केली आहे.
     थोडक्‍यात अर्जदाराची तक्रार अशी आहे की, अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांच्‍या दूकानातून दि.05.09.2007 रोजी एच.पी. कंपनीचा लॅपटॉप HP520 LAPTOP S/N ; CND 72415F9 रु.40,000/- देऊन विकत घेतला. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास सदर बँटरीचे खरेदी बील नंबर 1166 दिले.लॅपटॉप व बँटरी काही दिवस चांगले चालले पण काही दिवसांनी लॅपटॉपची बँटरी ही संपूर्ण चार्ज केल्‍यानंतर 20 ते 25 मिनिटेच चालू लागली. बँटरी खरेदी करते वेळेस गैरअर्जदारांनी बँटरी चार्ज केल्‍यावर 2.00 ते 2.30 तास चालते असे सांगितले होते परंतु प्रत्‍यक्षात 20 ते 25 मिनिटच चालत आहे. दि.09.08.2008 रोजी अर्जदार यांनी सदर लॅपटॉप व बँटरी दूरुस्‍तीसाठी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे टाकली. त्‍यावर गैरअर्जदार क्र.1 यांनी बँटरी चेकींगसाठी घेऊन रितसर पावती नंबर 157 दिले. बँटरी आठ दिवसांत दूरुस्‍त करुन मिळेल असे सांगितले. लॅपटॉप व बँटरी दूरुस्‍त करुन संपूर्ण चार्ज केल्‍यानंतर 50 मिनिटे चालते असे सांगितले परंतु दूकानात प्रत्‍यक्ष बँटरी 27 मिनिटेच चालली व ती बँटरी स्‍वतःकडेच ठेऊन घेतली. नंतर अर्जदाराने विचारणा केली असता बँटरी कंपनीकडे पाठविली आहे असे सांगितले. दि.29.08.2008 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास लॅपटॉप व बॅटरी परत केली. नंतर सूध्‍दा लॅपटॉप व बँटरी संपूर्ण चार्ज झाल्‍यानंतर 20 ते 25 मिनिटेच चालत आहे. गैरअर्जदाराने वॉरंटी कार्ड दिले नाही पण टॅक्‍स इन्‍व्‍हाईस वर एक वर्षाची वॉरंटी लिहून दिली आहे व आजही लॅपटॉप व बँटरी वॉरंटीमध्‍ये आहे. दोषयूक्‍त लॅपटॉप व बँटरी देऊन गैरअर्जदारानी ञूटीची सेवा दिली आहे म्‍हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे अशी मागणी केली आहे की, लॅपटॉपची किंमत रु.40,000/-, मानसिक ञासापोटी रु.10,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.1,000/- असे एकूण रु.51,000/- मिळावेत.
     गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार ही चूकीची असून खोटी आहे. लॅपटॉपची बँटरी ही संपूर्ण चार्ज केल्‍यावर 1.5 तास चालते. अर्जदारास दि.5.9.2007 रोजी लॅपटॉप विकण्‍यात आला आहे व दि.09.08.2008 पर्यत अर्जदाराने कूठलीही तक्रार केलेली नाही. हे म्‍हणणे चूकीचे आहे की, अर्जदाराचे लॅपटॉप चार्ज केल्‍यानंतर 25 मि. चालते. अर्जदार यांनी लॅपटॉप दिल्‍यानंतर तो कंपनी म्‍हणजे गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे पाठविले होते, पण लॅपटॉप गॅरंटी टर्मस प्रमाणे चालत असल्‍याचे नमूद करुन वापस पाठविले. अर्जदाराने दिलेली नोटीस मिळाली परंतु नोटीसीस उत्‍तर देणे आवश्‍यक नव्‍हते म्‍हणून ते दिले नाही. अर्जदाराची रु.51,000/- ची मागणी गैरअर्जदारास मान्‍य नाही. अर्जदाराने सतत अकरा महिने लॅपटॉप चा संपूर्ण वापर केला आहे. त्‍यावेळेस त्‍यांस कोणतीही अडचण आली नाही. लॅपटॉप वापरण्‍यावर त्‍यांचे बॅंटरीचे लाईफ स्‍पेन असते. लॅपटॉपचा वापर जास्‍त झाला तर, वापराप्रमाणे बँटरी नवीन टाकावी लागते. तसेच लॅपटॉप चालू असताना सततचे इलेक्‍ट्रीक कनेक्‍शन दिल्‍यास ही बँटरी लवकर विक होते. गैरअर्जदार क्र. 1 हे लॅपटॉपचे उत्‍पादक नाहीत म्‍हणून त्‍यांचेही कोणतीही जबाबदारी येत नाही. म्‍हणून गैरअर्जदार क्र.1 ने सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही म्‍हणून सदर तक्रार खर्चासहीत फेटाळावी अशी मागणी केली आहे.
 
     गैरअर्जदार क्र. 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे शपथेवर दिलेले आहे. अर्जदारास तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नाही. गैरअर्जदारांनी उत्‍पादीत केलेली बँटरी ही चांगली असून ती 2 ते 2.5 तास चालते. बँटरी कमी वेळे चालते या बाबत कोणताही पूरावा दिलेला नाही. वरील तक्रारी बाबत गैरअर्जदार क्र. 2 यांना काहीही माहीती नाही. गैरअर्जदार क्र. 1 हे गैरअर्जदार क्र.2 चे अधिकृत विक्रेते नाहीत. गैरअर्जदार क्र. 1 हे  गैरअर्जदार क्र. 2 चे अधिकृत विक्रेते, पार्टनर किंवा सर्व्‍हीस प्रोव्‍हायडर नाहीत. गैरअर्जदार क्र. 2 ही कंपनी 24 तास ग्राहकाना सेवा देते. त्‍यामूळे अर्जदार हे कधीही गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे आलेले नाहीत त्‍यामूळे त्‍यांचे सेवेत कोणतीही ञूटी नाही. गैरअर्जदार क्र. 1 हे गैरअर्जदार क्र. 2 कंपनीचे अधिकृत विक्रेते नसल्‍यामूळे तसेच दोघामध्‍ये कोणताही खरेदी-विक्री बाबत करार झालेला नाही. त्‍यामूळे त्‍यांनी विक्री केलेल्‍या लॅपटॉपची व बँटरीची गैरअर्जदार क्र. 2 वर जबाबदारी येत नाही. त्‍यामूळे तक्रारी बाबत गैरअर्जदार क्र.1 हेच जबाबदार आहेत. म्‍हणून गैरअर्जदार क्र. 2 यांचे विरुध्‍दची तक्रार फेटाळावी अशी विनंती केली आहे.
     अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच लॅपटॉप खरेदी बिल (टॅक्‍स इन्‍व्‍हाईस) नंबर 1166, व खरेदी बील नंबर 389,  लॅपटॉप दूरुस्‍ती बिल क्र.157, लॅपटॉप दूरुस्‍ती बिल नंबर 112, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, नोटीसची पोहच पावती इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्‍हणून आपआपले शपथपञ दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार क्र. 1 यांनी इमेल कॉपीज, बँटरीचे रिझल्‍ट बाबत गैरअर्जदार क्र. 2 चे पञ, डिलेव्‍हरी चालन, प्रमाणपञ इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहेत.
              दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                        उत्‍तर
1.   अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ?             होय.
2.   गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
     ञूटी केली आहे काय ?                               नाही.
3.   काय आदेश ?                            अंतिम आदेशाप्रमाणे.     
                                                कारणे
मूददा क्र.1 ः-
              अर्जदार यांनी अर्जासोबत गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून लॅपटॉप खरेदी केल्‍या बाबतची डिलेव्‍हरी चॅलन नंबर 389 दि.5.09.2007 चे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी त्‍यांची लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये व शपथपञामध्‍ये सदरची बाब नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ त्‍यांनी दाखल केलेले डिलेव्‍हरी चॅलन यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात आले.
मूददा क्र.2 ः-
              अर्जदार यांच्‍या अर्जातील कथनाप्रमाणे व त्‍यांनी दाखल केलेलया डिलेव्‍हरी चॅलन वरुन अर्जदार यांनी दि.5.9.2007 रोजी HP 520 LAPTOP हा रक्‍कम रु.40,000/- एवढया रक्‍कमेस खरेदी केल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. अर्जदार यांनी लॅपटॉप खरेदी केल्‍यानंतर म्‍हणजे दि.5.9.2007 रोजी नंतर दि.9.8.2008 रोजी लॅपटॉप बॅटरी प्रॉब्‍लेमसाठी गैरअर्जदार क्र.1 कडे पहिल्‍यांदा तक्रार केल्‍याचे त्‍यांनी दाखल केलेल्‍या रिप्‍लेसमेंट चॅलन नंबर 170 दि.9.8.2008 रोजीचे अवलोकन केले असता स्‍पष्‍ट होत आहे. अर्जदार यांनी लॅपटॉप बॅटरी चे प्रॉब्‍लेम करता गैरअर्जदार क्र.1 कडे लॅपटॉप दिल्‍यानंतर गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर लॅपटॉप मध्‍ये दूरुस्‍ती करुन दिल्‍याचे अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या रिप्‍लेसंमेट चॅलन नंबर 112 दि.29.8.2008 रोजीचे चॅलनवरुन स्‍पष्‍ट होत आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या रिप्‍लेसमेंट  चॅलन वरील   As laptop is sent to company. company has returned   the laptop with the reason of as per warranty terms laptop. Battary is working. असे नमूद करण्‍यात आलेले आहे. सदर रिप्‍लेसमेंट चॅलनवर अर्जदार यांची सही आहे. म्‍हणजेच अर्जदार यांना वॉरंटी कालावधीमध्‍ये लॅपटॉप दूरुस्‍त करुन मिळालेले आहे. याचा विचार होता, गैरअर्जदार नं.1 यांनी अर्जदार यांना सेवा दिलेली आहे, ही बाब स्‍पष्‍ट होत आहे. त्‍यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दि.4.9.2008 रोजी नोटीस पाठवून लॅपटॉप व बॅटरी योग्‍य पध्‍दतीने दूरुस्‍त करुन दयावी अगर लॅपटॉप व बॅटरीचे मूल्‍य रु.40,000/- इतके दयावे अशी आशयाची नोटीस पाठविली आहे. अर्जदार यांनी दि.29.8.2008 रोजी सदरचा लॅपटॉप गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून दूरुस्‍त करुन घेतलेला आहे व त्‍यावेळी बॅटरी सूध्‍दा Working Condition  मध्‍ये आहे असे म्‍हणून अर्जदार यांनी सही करुन सदरचे लॅपटॉप स्‍वतःचे ताब्‍यात घेतलेले आहे. अर्जदार यांचा लॅपटॉप खरेदीची पावती ही दि.5.9.2007 रोजीची आहे व अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना पाठविलेली नोटीस दि.4.9.2008 रोजीची आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपञामध्‍हये कूठेही गॅरंटी आणि वॉरंटी कार्डचा समावेश नाही. अर्जदार याचे अर्जातील कथनानुसार अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या टॅक्‍स इनव्‍हाईस वर  One year on site warranty   असे हाताने लिहीलेले आहे. म्‍हणून अर्जदार यांना एक वर्षाची वॉरंटी आहे असे म्‍हणता येणार नाही. असे असताना सूध्‍दा गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडून लॅपटॉप स्विकारुन त्‍यामध्‍ये दूरुस्‍ती करुन अर्जदार यांना दिलेली आहे. त्‍यानंतरही अर्जदार यांचे लॅपटॉपच्‍या बॅटरीमध्‍ये काही दोष निर्माण झाला आहे या बाबत अर्जदार यांनी कोणत्‍याही तज्ञ व्‍यक्‍तीचा अहवाल या मंचासमोर दाखल केलेला नाही अगर अर्जदार यांचे लॅपटॉपची बॅटरी सत्‍य परिस्थिती  Working Condition  मध्‍ये नाही असे दर्शवीणारा कोणताही कागदोपञी पूरावा, शपथपञ याकामी दाखल केलेले नाही. अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपञाचे अवलोकन केले असता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना लॅपटॉपची बॅटरी दूरुस्‍त करुन दिलेली आहे. अर्जदार हे गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्‍द तक्रार घेऊन आले असतील तर त्‍यांनी खरेदी केलेल्‍या वस्‍तूमध्‍ये कोणताही उत्‍पादीत दोष आहे हे सिध्‍द करण्‍याची अर्जदार यांची जबाबदारी आहे. ही गोष्‍ट अर्जदार सिध्‍द करु शकलेले नाहीत. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्‍द उत्‍पादीत दोषा बाबत तक्रार केलेली असेल तर उत्‍पादीत दोष आहे असे दर्शवीणारा तज्ञ व्‍यक्‍तीचा अहवाल, शपथपञ सदर कामी दाखल केलेले नाही. म्‍हणून उत्‍पादीत कंपनी म्‍हणजे गैरअर्जदार क्र.2 यांना जबाबदार धरता येणार नाही असे या मंचाचे मत आहे.
              अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ आणि गैरअर्जदार यांनी दाखल केलेला जवाब, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
               अर्जदाराचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद आणि गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेला लेखी जवाब, शपथपञ तसेच दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद यांचा सर्वाचा विचार होता आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
 
                                      आदेश
1.                 अर्जदाराची तक्रार फेटाळण्‍यात येते.
          पक्षकारानी आपआपला खर्च सोसावा.
2.                 पक्षकाराना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)      (श्रीमती.सुजाता पाटणकर)      (सतीश सामते)    
           अध्यक्ष.                               सदस्या                   सदस्‍य
 
जे.यु, पारवेकर
लघुलेखक.