Complaint Case No. CC/278/2023 | ( Date of Filing : 11 May 2023 ) |
| | 1. RAJESHKUMAR BALKRUSHNA PARDHI | R/O. PLOT NO.146, BANK COLONY, BHAGWAN NAGAR, NEAR NIT GARDEN, NAGPUR-440027 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. P.N.O. AXIS BANK, BRANCH NAGPUR | M.G. HOUSE, CIVIL LINES, RAVINDRANATH TAGOR MARG, NAGPUR-440001 | NAGPUR | MAHARASHTRA | 2. CIRCLE NODAL OFFICER MUMBAI | AT, AXIS BANK LTD., NPC 1, 5TH FLOOR, GIGAPEX, PLOT NO.I T -5, MIDC AROLI KNWOLEDGE PARK, AROLI, MUMBAI-400708 | MUMBAI | MAHARASHTRA | 3. NEO CREDIT CARD AXIS BANK OFFICER | M.G. HOUSE, CIVIL LINES, RAVINDRANATH TAGOR MARG, NAGPUR-440001 | NAGPUR | MAHARASHTRA | 4. INDIAN OIL AXIS CREDIT CARD OFFICER | M.G. HOUSE, CIVIL LINES, RAVINDRANATH TAGOR MARG, NAGPUR-440001 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | .आदेश मा. अध्यक्ष, श्री. सचिन शिंपी यांच्या आदेशान्वये- - तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली असून त्यात नमूद केले की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 3 कडून जुलै 2019 मध्ये NEO Credit Card No. 5305 6202 0297 9650 घेतले असून त्याची क्रेडिट लिमिट रुपये 2,85,000/- इतकी आहे. तसेच मार्च 2022 मध्ये विरुध्द पक्ष क्रं. 4 कडून Indian Oil AXIS BANK Credit Card घेतले असून त्याचा नं. 4514 5614 0293 6837 असा आहे. सदरचे दोन्ही क्रेडिट कार्ड घेतांना विरुध्द पक्षाने दिलेल्या माहिती प्रमाणे तक्रारकर्त्याने त्याच्या मोबाईल मध्ये अॅक्सिस बॅंक अॅप देखील सक्रिय करुन घेतले.
- तक्रारकर्त्याला दि. 02.07.2022 रोजी दुपारी 1.44 मिनिटाने मोबाईल क्रं. 08051690667 वरुन फोन आला असता ट्रयु कॉल वर सदरचा मोबाईल क्रं. अॅक्सिस क्रेडिट कार्ड या नावांने दाखवित असल्याने तक्रारकर्त्याला वाटले की, विरुध्द पक्ष क्रं. 4 कडून घेतलेल्या क्रेडिट कार्डच्या अनुषंगाने तो कॉल असावा, परिणामी तक्रारकर्त्याने क्रेडिट कार्ड बंद करावयाचे असल्याबाबत सांगितले असता त्या अज्ञात व्यक्तिने तो अॅक्सिस बॅंकेतून (AXIS BANK) बोलत असून संपूर्ण व्यवहार सुरक्षित व गोपनीय राहिल असे आश्वासन दिले. त्यानुसार अज्ञात व्यक्तीने दिलेल्या सूचनेनुसार अॅक्सिस बॅंक अॅप मध्ये जाण्यास सांगितले, तसेच इंडियन ऑईल क्रेडिट कार्डचा नं. व CVV नं. नमूद करण्यास सांगितले. परंतु पुढील प्रक्रिया होत नसल्यामुळे त्या अज्ञात व्यक्तीने दुस-या नियो क्रेडिट कार्डवर क्लिक करण्यास सांगितले. परंतु तक्रारकर्त्याने इंडियन ऑईल क्रेडिट कार्ड बंद करावयाचे असल्याचे सांगितले असता त्या व्यक्तीने फक्त कार्ड सिलेक्ट करा असे सांगितले व इंडियन ऑईल क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी OTP पाठविले असल्याचे सांगितले. परंतु तक्रारकर्त्याने OTP शेअर केला नाही तो OTP अॅक्सिस बॅंक अॅप मध्ये टाकला परंतु प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यानंतर 02.07.2022 रोजी दुपारी 2.45 वा. व्यवहाराची पृष्ठी करा ( Confirm txn of INR 99000 on 02-07-2022 14:33:40 IST at RAZ*ENTIRE DIGITAL) असा संदेश तक्रारकर्त्याला मोबाईलवर प्राप्त झाला. तसेच ई-मेल वर येणा-या OTP वर क्लिक करा असे सांगितले. तक्रारकर्त्यास त्या अज्ञात व्यक्तीवर संशय आल्याने ओ.टी.पी.वर क्लिक केल्यास तिस-या व्यक्तीला व्यवहार करण्याचे अधिकार देण्यात येईल असे नमूद असल्यामुळे तक्रारकर्त्याने NO हा पर्याय निवडला व बॅकिंग व्यवहार करण्यास नकार दिला. त्यानंतर तक्रारकर्त्यास आलेला संशय खरा ठरला व तो अज्ञात व्यक्ती धोखेबाज असल्याचे लक्षात आले. त्यानंतर दि. 02.07.2022 रोजी दुपारी 2.46 मी. तक्रारकर्त्याला बॅंके मार्फत ई-मेल प्राप्त झाला त्यात असे नमूद होते की, We recently noticed a suspicious activity on your card no. 9650 . Please take note.......and if transaction seems to be in order carried out by you, choose YES ‘ If you don’t recognize then choose NO त्यानुसार तक्रारकर्त्याने सदरच्या व्यवहाराकरिता No हा पर्याय निवडला होता व त्वरित त्या क्रमांकावरुन आलेला फोन कॉल बंद केला व त्यानंतर त्याच दिवशी 3.11 मी. 99,000/- चा व्यवहार संशयित असल्याचा मॅसेज प्राप्त झाला व तक्रारकर्त्याचे कार्ड ब्लॉक करण्यात आले व त्यानंतर पुन्हा दु.3.35 मी. अॅक्सीस बॅंकेकडून Transaction declined due to invalid Card Status त्यानंतर तक्रारकर्त्याने लगेच अॅक्सीस बॅंकेच्या कस्टमर केअर नंबर वर संपर्क करुन संपूर्ण माहिती दिली व तक्रारकर्त्याचे Card Block कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले. त्यानुसार कस्टमर केअर अधिका-यांनी कार्ड ब्लॉक करण्याचे सांगितले. तक्रारकर्त्याने नोंदविलेल्या तक्रारीचा नं. SAK00001080763 असा आहे. परंतु दुस-या दिवशी दि. 03.07.2022 रोजी तक्रारकर्त्याच्या अॅक्सिस बॅंक मध्ये रुपये 99,000/- चा व्यवहार झाल्याचे प्रोसेस दिसून आले. त्यानंतर पुन्हा अॅक्सिस बॅंक क्रेडिट कस्टमर केअर नं. वर संपर्क केला असता त्यांच्याकडे करण्यात आलेली तक्रार ही 90 दिवसात सोडविण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्याने दि. 22.08.2022 रोजी सायबर पोलिस स्टेशन, नागपूर यांच्याकडे तक्रार देण्यात आली. त्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या नियो कार्डवर रुपये 99,000/- जी रक्कम तात्पुरती क्रेडिट करण्यात आली होती ती रिव्हर्स करुन तक्रारकर्त्यास Cash Credit Statement वर ती रक्कम पुन्हा भरणे आहे असे दर्शविले.
- तक्रारकर्त्याने कोणताही ओ.टी.पी. शेअर केलेला नसतांना झालेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने तक्रारकर्त्याने पुन्हा दि. 27.08.2022 रोजी अॅक्सिस बॅंकेच्या कस्टमर केअर नंबर वर संपर्क करुन तक्रार केली असता त्याचा तक्रार क्रं. 73578980 असा देण्यात आला. त्या अनुषंगाने विरुध्द पक्षाने कोणतीही कार्यवाही न करता तक्रार बंद करण्यात आली. विरुध्द पक्षाकडे RAZ*ENTIRE DIGITAL यांच्याकडे रक्कम कशी वळती याबाबत विचारणा करुन देखील विरुध्द पक्षाने त्या अनुषंगाने तक्रारकर्त्याला कोणतीही माहिती दिली नाही. त्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास Cash Credit Statement नुसार रुपये 1,03,484.91 इतकी रक्कम भरणे आहे असे दर्शविल्याने त्या रक्कमेवर जास्तीचे व्याज भरावे लागू नये म्हणून तक्रारकर्त्याने त्याची तक्रार कायम ठेवून दि. 30.01.2023 रोजी विरुध्द पक्षाकडे रुपये 1,08,708.31 पै. इतकी रक्कम भरणा केली.
- तक्रारकर्त्याने कोणताही ओ.टी.पी. शेअर केलेला नसतांना विरुध्द पक्ष यांनी बेकायदेशीररित्या झालेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने वसुल केलेली रक्कम रुपये 1,08,708.31 परत मिळण्याकरिता वकिला मार्फत नोटीस पाठवून देखील सदरची रक्कम विरुध्द पक्षाने अद्याप पर्यंत परत केली नाही ही बाब सेवेतील कमतरता आहे. म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन यांच्या खात्यातून ऑनलाईन हॅकिंग फ्रॉड द्वारे वजावट झालेली रक्कम रुपये 1,08,708.31 पै. व्याजासह परत देण्याचा, तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश द्यावा अशी मागणी केली आहे.
- विरुध्द पक्ष 1 ते 4 यांना आयोगा मार्फत पाठविण्यात आलेली नोटीस विरुध्द पक्ष 1 , 3 व 4 यांनी घेण्यास नकार दिल्याच्या पोस्टाच्या शे-यासह परत आल्यामुळे विरुध्द पक्ष 1 ते 4 यांना दि. 12.01.2024 रोजी स्थानिक वृत्तपत्रातून जाहिर नोटीस प्रसिध्द केल्यानंतर सुध्दा विरुध्द पक्ष आयोगा समक्ष हजर झाले नाही. तसेच विरुध्द पक्ष 2 यांना देखील नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्द पक्ष 2 आयोगा समक्ष हजर न झाल्यामुळे दि. 01.03.2024 रोजी विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 4 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेज व त्यांचे वरीलप्रमाणे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
निष्कर्ष - मुद्दा क्रं.1 ते 3 बाबत - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून क्रेडिट कार्ड घेतले असल्याची बाब नि.क्रं. 2(1) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येत असल्याने तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याची बाब स्पष्ट होते.
- तक्रारकर्त्याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याने कधीही ओटीपी (OTP) शेअर केलेला नसतांना त्याच्या क्रेडिट कार्ड द्वारे दि. 02.07.2022 रोजी अनधिकृतरित्या रक्कम रुपये 99,000/- चा व्यवहार झाला. याबाबत विरुध्द पक्षाकडे तक्रार केल्यानंतर क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्यानंतर Transaction declined असा मॅसेज प्राप्त झाल्यानंतर देखील विरुध्द पक्षा मार्फत झालेल्या अनधिकृत व्यवहाराच्या अनुषंगाने योग्य ती चौकशी न करता तसेच झालेल्या अनधिकृत व्यवहाराची रक्कम तक्रारकर्त्याच्या खात्यावर रिव्हर्स (reverse) क्रेडिट न करता विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास रक्कम भरण्यास भाग पाडले, सदरची बाब ही अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी असून सेवेतील कमतरता आहे.
- विरुध्द पक्षाला आयोगा मार्फत नोटीसची बजावणी झाल्यानंतर सुध्दा ते गैरहजर असल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित झालेला असल्यामुळे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेजांच्या आधारावर सदरची तक्रार निर्णयित करणे न्यायोचित ठरते.
- तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर दि. 02.07.2022 रोजी अज्ञात व्यक्ती द्वारे आलेला कॉल व त्या अनुषंगाने झालेल्या संपूर्ण व्यवहाराबाबतची माहिती तक्रारकर्त्याने तक्रार अर्जात नमूद केली आहे. तक्रारकर्त्याच्या क्रेडिट कार्ड द्वारे अनधिकृत व्यवहार झाल्याबाबत विरुध्द पक्षाला दि.02.07.2022 रोजीच कळविल्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला एस.एम.एस. द्वारे कार्ड ब्लॉक केल्याबाबत मॅसेज पाठविल्याचे नि.क्रं. 2 सोबत दाखल मॅसेजेवरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याला ज्या दिवशी व्यवहार झाला त्याच दिवशी म्हणजेच दि 02.07.2022 रोजी दुपारी 2.45 वा. व्यवहाराची पृष्ठी करा ( Confirm txn of INR 99000 on 02-07-2022 14:33:40 IST at RAZ*ENTIRE DIGITAL) असा संदेश तक्रारकर्त्याला मोबाईलवर प्राप्त झाला. म्हणजेच झालेल्या अनधिकृत व्यवहाराबाबत त्याच दिवशी विरुध्द पक्षाला माहिती देण्यात आल्याची बाब या मॅसेजवरुन स्पष्ट होते.
- तक्रारकर्त्याने त्याच्या युक्तिवादा सोबत दाखल केलेल्या ऑनलाईन बॅंकिंग फ्रॉडच्या अनुषंगाने बॅंक व ग्राहक यांची जबाबदारी निश्चित करण्याच्या अनुषंगाने रिझर्व्ह बॅंके मार्फत दि. 06.07.2017 रोजी सर्क्युलर काढण्यात आलेले आहे. त्यानुसार मुद्दा क्रं. 4 मध्ये खालीलप्रमाणे मजकूर नमूद असून बॅंकावर काही जबाबदारी निश्चित करण्यात आली होती.
The systems and procedures in banks must be designed to make customers feel safe about carrying out electronic banking transactions. To achieve this, banks must put in place: - appropriate systems and procedures to ensure safety and
security of electronic banking transactions carried out by customers; - robust and dynamic fraud detection and prevention mechanism;
- mechanism to assess the risks (for example, gaps in the bank’s
existing systems) resulting from unauthorised transactions and measure the liabilities arising out of such events; - appropriate measures to mitigate the risks and protect
themselves against the liabilities arising there from; and - a system of continually and repeatedly advising customers on
how to protect themselves from electronic banking and payments related fraud. यानुसार ग्राहकाच्या बॅंक खात्याची सुरक्षितता ठेवण्याची जबाबदारी ही बॅंकेवर असून फ्रॉड झाल्यास त्या अनुषंगाने शोध घेण्यासाठी व्यवस्था करण्याची जबाबदारी देखील बॅंकेचीच आहे. - तक्रारकर्त्याच्या वकिलांचा असा युक्तिवाद आहे की, दि. 02.07.2022 रोजी प्रथमतः एका अज्ञात व्यक्तीचा 08051690667 या मोबाईल क्रमांकावरुन फोन आल्यानंतर तक्रारकर्त्याने कोणताही ओटीपी शेअर केलेला नसतांना रक्कम रुपये 99,000/- चा व्यवहार झाला आहे. तक्रारकर्त्यास जरी ही अज्ञात व्यक्तीचा फोन आला असला तरी ही तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याकडून क्रेडिट कार्ड घेतांना त्याचे नांव व मोबाईल नंबर हे विरुध्द पक्ष यांच्याकडे नमूद केले होते ही माहिती गोपनीय ठेवण्याची जबाबदारी विरुध्द पक्षाची असतांना ति-हाईत व्यक्तीकडे तक्रारकर्त्याचे संबंधित क्रेडिट कार्ड असल्याबाबतची माहिती विरुध्द पक्षाने गोपनीय न ठेवल्यामुळेच ती माहिती अज्ञात व्यक्तीकडे गेली असल्याचे स्पष्ट होते. तसेच रिझर्व्ह बॅंकेच्या सर्क्युलरनुसार अनधिकृत व्यवहाराबाबत बॅंकेस कळविल्यानंतर बॅंकेने त्या व्यवहाराच्या अनुषंगाने अनधिकृतरित्या ट्रान्स्फर झालेली रक्कम तक्रारकर्त्याच्या खात्यात (Reverse) रिव्हर्स करणे बंधनकारक आहे. तसेच झालेल्या अनधिकृत व्यवहाराच्या अनुषंगाने robust and dynamic fraud detection and prevention mechanism; यंत्रणा उभारणे वरील सक्युर्लरनुसार बॅंक यांना बंधनकारक आहे. तक्रारकर्त्याच्या क्रेडिट कार्डवरुन RAZ*ENTIRE DIGITAL या खात्यावर दि. 02.07.2022 रोजी व्यवहार झाल्याचे नि.क्रं. 2 वर दाखल क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवरुन स्पष्ट होते. हा व्यवहार अनधिकृतरित्या झाल्याचे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला कळविल्यानंतर ती रक्कम तातडीने विरुध्द पक्षाने रिव्हर्स करणे बंधनकारक होते. तसेच अनधिकृत व्यवहाराच्या अनुषंगाने योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष यांचीच असल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या सक्युर्लरप्रमाणे स्पष्ट होत असतांना ती जबाबदारी विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी योग्यरित्या पार न पाडता अज्ञात व्यक्तीने बेकायदेशीररित्या केलेल्या अनधिकृत व्यवहाराची रक्कम तक्रारकर्त्याकडून वसूल करुन सेवा देण्यात कमतरता केली आहे असे दिसून येते. यास्तव मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर त्याप्रमाणे होकारार्थी नोंदवित आहोत.
13 मुद्दा क्रमांक 3 बाबत - मुद्दा क्रमांक 1 व 2 च्या निष्कर्षावरुन विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 ने दोषपूर्ण सेवा दिली असल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने त्याच्या क्रेडिट कार्ड द्वारे बेकायदेशीररित्या वजावट झालेली रक्कम रुपये 99,000/- व्याजासह विरुध्द पक्षाकडे दि. 30.01.2023 रोजी रुपये 1,08,608/- भरल्याबाबतची पावती नि.क्रं. 2(47) वर दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने सदरची रक्कम परत मिळण्याची मागणी केली आहे. परिणामी तक्रारकर्ता विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांच्याकडून रक्कम रुपये 1,08,608/- व त्यावर दि. 30.01.2023 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह रक्कम मिळण्यास पात्र आहे. तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 कडून मिळण्यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे. 14 विरुध्द पक्ष क्रं. 4 यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याचे दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. यास्तव विरुध्द पक्ष क्रं. 4 विरुध्दची तक्रार फेटाळण्यात येते. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याच्या क्रेडिट कार्ड द्वारे बेकायदेशीररित्या वजावट झालेली रक्कम रुपये 1,08,608/- व त्यावर दि. 30.01.2023 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजसह रक्कम तक्रारकर्त्यास अदा करावी.
- विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- व तक्रारीच्या खर्चाकरिता रुपये 10,000/- द्यावे.
- विरुध्द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आत करावी
- विरुध्द पक्ष क्रं. 4 विरुध्दची तक्रार फेटाळण्यात येते.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
| |