::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 15.04.2017 )
आदरणीय अध्यक्षा श्रीमती एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार
1. तक्रारदार यांनी सदरहु तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये, विरुध्दपक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार, दाखल सर्व दस्तऐवज व तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलेाकन मंचाने करुन खालील प्रमाणे निर्णय पारीत केला, कारण विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांना मंचाच्या नोटीसची माहीती प्राप्त झाली होती, तरी त्यांनी नोटीस स्विकारली नाही. असे दस्तांवरुन दिसते, म्हणून विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश दि. 16/2/2017 रोजी मंचाने पारीत केले होते.
तक्रारकर्ते क्र. 1 यांनी दाखल केलेले दस्त, विरुध्दपक्षाकडील उपनोंदणी पावती, यावरुन असे दिसते की, त्यांना साडेपाच वर्षाच्या मुदतीची पेमेंट योजना रक्कम रु. 22,500/- यामध्ये दि. 1/10/2010 पासून प्रतिमहा किस्त रक्कम रु. 1050/- प्रमाणे मुदत दि. 1/4/2016 पर्यंत भरावयाची होती व मुदतीनंतर रक्कम रु. 32,730/- देय होती. सदर पावतीवर विरुध्दपक्षातर्फे 450 चौ. यार्डचा एक प्लॉट सुध्दा तक्रारकर्ते क्र. 1 यांना देण्यात येईल, असे नमुद आहे. तक्रारकर्ते क्र. 1 चे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्षाद्वारे तक्रारकर्ते क्र. 1 कडून किश्तीची रक्कम दि. 1/10/2014 पासून घेण्यात आलेली नाही व व्यवसाय बंद केला असे सांगण्यात आले. तक्रारकर्ते क्र. 2 यांनी दाखल केलेले दस्त, विरुध्दपक्षाकडील उपनोंदणी पावती, यावरुन असे दिसते की, त्यांना साडेपाच वर्षाच्या मुदतीची पेमेंट योजना रक्कम रु. 15,000/- यामध्ये दि. 16/01/2011 पासून प्रतिमहा किस्त रक्कम रु. 240/- प्रमाणे मुदत दि. 16/07/2016 पर्यंत भरावयाची होती व मुदतीनंतर रक्कम रु. 21,820/- देय होती. सदर पावतीवर विरुध्दपक्षातर्फे 300 चौ. यार्डचा एक प्लॉट सुध्दा तक्रारकर्ते क्र. 2 यांना देण्यात येईल, असे नमुद आहे. तक्रारकर्ते क्र. 3 यांनी दाखल केलेले दस्त, विरुध्दपक्षाकडील उपनोंदणी पावती, यावरुन असे दिसते की, त्यांना साडेपाच वर्षाच्या मुदतीची पेमेंट योजना रक्कम रु. 15,000/- यामध्ये दि. 11/10/2010 पासून प्रतिमहा किस्त रक्कम रु. 240/- प्रमाणे मुदत दि. 11/4/2016 पर्यंत भरावयाची होती व मुदतीनंतर रक्कम रु. 21,820/- देय होती. सदर पावतीवर विरुध्दपक्षातर्फे 300 चौ. यार्डचा एक प्लॉट सुध्दा तक्रारकर्ते क्र. 3 यांना देण्यात येईल, असे नमुद आहे.
दाखल दस्तांवरुन असे दिसते की, तक्रारकर्ते क्र. 1 यांनी दि. 1/10/2010 ते 1/10/2014 पावेतो प्रतिमाह रु. 1050/- प्रमाणे रु. 12,600/- इतकी रक्कम विरुध्दपक्षाकडे जमा केलेली आहे. तक्रारकर्ते क्र. 2 यांनी दि. 1/11/2011 पासून दि. 1/10/2014 पर्यंत रु. 7900/-, प्रतिमाह रक्कम रु. 240/- प्रमाणे जमा केली आहे, तर तक्रारकर्ते क्र. 3 यांनी सुध्दा दि. 11/10/2010 पासून दि. 1/10/2014 पर्यंत रक्कम रु. 8640/-, प्रतिमाह रक्कम रु. 240 प्रमाणे जमा केली आहे. सदर रकमेची अंतीम देय मुदत संपलेली आहे.
तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की, तक्रारकर्ते क्र. 1 ते 3 अशारितीने विरुध्दपक्षाचे ग्राहक आहेत. विरुध्दपक्षास कायदेशिर मागणी करुनही मुदती नंतरची रक्कम सर्व तक्रारकर्त्यांना दिलेली नाही, ही सेवा न्युनता आहे म्हणून तक्रार प्रार्थनेनुसार मंजुर करावी.
यावर, विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 तर्फे कोणतेही नकारार्थी कथन रेकॉर्डवर उपलब्ध नाही व दाखल पावतीवरुन असा निष्कर्ष निघतो की, अशा प्रकारच्या व्यवहारात गुंतवणुकदार / ठेवीदार हा ग्राहक ठरतो व तशा वित्तीय सेवा विरुध्दपक्ष हे गुंतवणुकदारांना देत असतात. सदर पावतीवर नमुद असलेल्या मजकुरानुसार ग्राहकांना मुदतीनंतरची रक्कम परत न करणे किंवा तशी कायदेशिर नोटीस पाठवूनही रक्कम न देणे, ही कृती ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत त्रुटीपुर्ण सेवा, निष्काळजीपणा व अनुचित व्यापार व्यवहार, यामध्ये मोडते. त्यामुळे तक्रारकर्ते / ग्राहक सर्व प्रकारची दंडात्मक स्वरुपाची नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतात, अशी Settle Legal Position आहे. म्हणून तक्रारकर्ते क्र. 1,2 व 3 हे विरुध्दपक्ष क्र. 1,2 व 3 कडून क्रमशः रक्कम रु. 12,600/- रु. 7900/- व रु. 8640/- एकूण रक्कम रु. 29,140/- सव्याज, इतर नुकसान भरपाई व प्रकरण खर्चासह मिळण्यास पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे, म्हणून अंतीम आदेश खालील प्रमाणे...
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्र. 1,2 व 3 यांनी संयुक्तपणे वा वेगवेगळे, तक्रारकर्ते क्र. 1,2 व 3 यांना क्रमशः गुंतवणुक रक्कम रु. 12,600/-,( रुपये बारा हजार सहाशे) रु. 7900/- ( रुपये सात हजार नऊशे ) व रु. 8640/- (रुपये आठ हजार सहाशे चाळीस ) एकूण रक्कम रु. 29,140/-( एकोणतिस हजार एकशे चाळीस ) द.सा.द.शे 8 टक्के व्याज दराने, दि. 5/12/2016 ( प्रकरण दाखल तारीख ) पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदाई पर्यंत व्याजासहीत द्यावे, तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 5000/-( रुपये पांच हजार ) व प्रकरण खर्च रु. 3000/- (रुपये तिन हजार ) इतकी रक्कम द्यावी.
- सदर आदेशाचे पालन, निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावे.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.