Maharashtra

Chandrapur

CC/12/95

Smt Sundarabai Sadashiv Sonavane - Complainant(s)

Versus

Oriental Insurance Company Limited Regional Branch Maneger - Opp.Party(s)

D.P.Shinde

30 Apr 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/95
 
1. Smt Sundarabai Sadashiv Sonavane
At-Murmadi Tah- sindevahi
CHandrapur
Maharshtra
...........Complainant(s)
Versus
1. Oriental InsuranceCompany Limited Regional Branch Maneger
Dhanraj Plaza Main Road Near L.T.V. School Chandrapur
Chandrapur
Maharashtra
2. Branch Maneger Kabla Genral Insurance Company Private Limited
11,Dag Layout North Aambazari Nagpur
Nagpur
Maharshtra
3. Tahsildar Sindevahi
Sindevahi
Chandrapur
Maharshtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. SHRI. MILIND B. PAWAR (HIRGUDE) PRESIDENT
 HON'ABLE MR. SHRI R.L.BOMIDWAR MEMBER
 HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

             ::: नि का ल  प ञ   :::

(मंचाचे निर्णयान्वये, मिलिंद बी. पवार (हिरुगडे), मा.अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक : 30/04/2013)

 

            1     अर्जदारानी, गैरअर्जदाराविरुद्ध सरंक्षण कायद्याचे कलम 12 अन्‍वये दाखल केलेली आहेत व ती तक्रार दाखल करण्‍यास विलंब झालेला आहे म्‍हणुन अर्जदारांनी प्रस्‍तुत प्रकरणात विलंब माफीचा अर्ज दाखल केला आहे सदर विलंब माफी अर्जाचा थोडक्‍यात आशय खालीलप्रमाणे.

     अर्जदार यांचा मुलगा देविदास सदाशिव सोनवने यांचा दिनांक 19/12/2007 रोजी रस्‍ता अपघातात मृत्‍यु झाला आहे. मयत हे शेतकरी होते.  महाराष्‍ट्र शासनाचे शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात योजनेअंतर्गत रक्‍कम मिळणेसाठी तहसिलदार यांचे मार्फत प्रस्‍ताव सादर केला आहे.  सदर शासकीय योजनेची माहिती अर्जदाराला नव्‍हती.  तहसिल कार्यालयात वारंवार चौकशी करुनही माहिती मिळाली नाही.  अर्जदार ग्रामिण भागातील शेतकरी कुटुंबातील आहेत. अर्जदाराला ग्राहक मंचात न्‍याय मिळतो याची माहिती नाही.  अर्जदाराने गै.अ. 1 यांना दिनांक 23/05/2012 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवुन विमा रकमेची मागणी केली, शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती नसल्‍यामुळे तक्रार दाखल करणेस 29 महिने 27 दिवस उशीर झाला आहे तो उशीर माफ व्‍हावा.

2           सदर विलंब अर्ज नोंदनी करुन गै.अ. यांना नोटीस काढण्‍यात आल्‍या.  गै.अ. 2 यांना सदर नोटीस न बजावता परत आली परंतु अर्जदार यांनी गै.अ.2 यांना नोटीस बजावणी बाबत कोणतीही पुर्तता केली नाही.  गै.अ. 2 यांना नोटीसची बजावणी झाली त्‍याप्रमाणे गै.अ. 2 हे मंचासमक्ष हजर झाले परंतु त्‍यानी विलंब माफीचे अर्जावर म्‍हणणे दाखल केले नाही.   गै.अ. 1 यांना नोटीस बजावणी झाली व त्‍यांनी विलंब माफीचा अर्जावर म्‍हणणे दाखल केले.  गै.अ. 1 यांनी सदर विलंब माफी अर्जास प्रखर विरोध केला.  गै.अ. 1 यांचे नुसार विलंब माफी अर्जात विलंब माफीसाठी कोणतेही सबळ कारण दिलेले नाही.  अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. विलंब माफीचे अर्जात अर्जदारांनी प्रस्‍तुत मुदतीत पाठविलेले कथन केले आहे तर दुसरीकडे प्रस्‍तावाची माहिती नव्‍हती अशी परस्‍पर विरोधात्‍मक कथने केलेली आहे त्‍यामुळे ती ग्राहय धरण्‍यास पाञ नाही.  झालेला विलंब योग्‍यरित्‍या मोजलेला नाही, अर्जदाराने प्रत्‍येक दिवसाचे विलंबाचे कारणअर्जात नमुद केलेले नाही, विमा योजनांची माहिती नव्‍हती हे विलंब माफीसाठी कारण होऊ शकत नाही अशा प्रकारे कथने करुन गै.अ. 1 यांनी विलंब माफीचे अर्जास विरोध केला आहे.

           गै.अ. 2 यांना नोटीस बजावणी करीता तक्रारदार यांनी कोणतीही पुर्तता केली नाही तसेच अर्जदार व त्‍यांचे विधिज्ञ ब-याच तारखांना मे. मंचासमक्ष प्रस्‍तुत प्रकरणात हजर राहिले नाहीत व विलंब माफीचे अर्जावर युक्‍तीवाद ही केला नाही त्‍यामुळे सदर विलंब माफीचा अर्ज गुणदोषावर निकाली काढणेसाठी ठेवण्‍यात आले.

3        प्रस्‍तुत प्रकरणातील अर्जदार यांनी तक्रार दाखल करण्‍यास झालेला विलंबाचे कारण सदर शासकीय विमा प्रस्‍तावाची माहिती नव्‍हती.  अर्जदार यांना मयताचे निधनामुळे मानसिक धक्‍का बसला.  विमा प्रस्‍ताव शासनाकडेच दाखल केला परंतु त्‍यानंतर त्‍यांना कोणतीही माहिती मिळु शकली नाही.  अर्जदार हे ग्रामिण भागातील शेतकरी कुटुंबातील आहेत.  ग्राहक मंचात न्‍याय मिळतो यांची ही माहिती नव्‍हती अशा प्रकारे कथने करुन झालेला विलंब माफ करणेची विनंती केली आहे.  अर्जदारांनी आपले वकिलामार्फत नोटीस पाठवुन विमा रकमेची मागणी केली आहे परंतु अर्जदारानी विलंब माफीचे अर्जात दिलेली कोणतीही कारणे समर्पक व योग्‍य वाटत नाही.  अर्जदार हे अज्ञान आहेत, गरीब आहेत इत्‍यादी कारणे विलंब माफीकरीता न्‍यायदानाचे दृष्‍टीने ग्राहय धरण्‍यायोग्‍य नाहीत. 

     अर्जदाराचे वकीलांनीही सदर विलंब माफीचे अर्जावर युक्‍तीवाद केला नाही तसेच आवश्‍यक अशा सर्व पुर्तता केल्‍या नाहीत. विलंब माफीसाठी आवश्‍यक असे कागदपञे पुरावेची कामी दाखल केले नाहीत.  गै.अ 2 यांनी ही विलंब माफी अर्जावर कोणतेही म्‍हणणे दिले नाही. गै.अ. 1 यांचे वकीलांनी युक्‍तीवाद करुन विलंब माफीसाठी कोणतेही कारण घडलेले नाही, अर्जदारांनी अर्जात परस्‍पर विरोधात्‍मक विधाने केलेली आहेत त्‍यामुळे ती ग्राहय धरण्‍यास पाञ नाहीत.  विलंब माफीचे कारणापृष्‍ठर्थ कोणतेही पुरावा दिलेला नाही.  अवाढव्‍य झालेला विलंब माफ करणेस पाञ नाही त्‍यामुळे विलंब माफी अर्ज खर्चासह रद्द करणेची मागणी केली.

     

     अर्जदारांनी, गै.अ. 1 यांना शेतक-यांचे मृत्‍युनंतर 4 ते 5 वर्षांनी वकिलामार्फत नोटीस पाठवुन तक्रार मुदतीत आणण्‍याचा प्रयत्‍न केला आहे परंतु मुदतबाहय वाद कायदेशीर नोटीस पाठवुन मुदतीत आहे असे म्‍हणता येणार नाही त्‍याबाबत.....

 

IV (2012) CPJ 343 NC

Ambe Rice Mill V. Oriental Insurance Co. Ltd.

(Consumer Protection Act, 1986- Sections 24A, 21B,------ Limitation------Condonation of delay----- Cause of action has arisen on 23/02/2005 when theft of 37 bags of rice from truck has taken place ----- Complaint was filed in year 2010----- Provision under Section 24-----A is peremptory in nature ----- By serving the legal notice or by making representation, the period of limitation cannot be extended by petitioner----- District Forum rightly dismissed complaint being barred by limitation----- Costs@ 5000, awarded)

           

     यामध्‍ये राष्‍ट्रीय आयोगाने मुदतबाहय वाद नोटीस पाठवुन मुदतीत आहे असे म्‍हणता येणार नाही असे स्‍पष्‍ट केले आहे यावरुनही विलंब माफीचा अर्ज मंजुर करण्‍यास पाञ नाही असे दिसुन येते.

      तसेच मा. राष्‍ट्रीये आयोगाने –

 

 

 

 

 

 

     I (2013) CPJ 147 NC

VEERPRABHU MARKETING LIMITED V. BARDI LAL JAT & ORS.

( Consumer Protection Act, 1986 Sections 24A, 21B----- Limitation-----Delay of 274 days----- Condonation----- There must be some reasonable and good ground which must constitute sufficient cause- Petition barred by time

 

i)                   I (2013) CPJ 13B NC

UHBVNL & ORS V. SALAMUDEEN

( Consumer Protection Act, 1986 Sections 24A, 21B----- Limitation----- Condonation of delay----- Ex facie application for Condonation does not contain sufficient cause and has no legal basis----- Gross negligence, deliberate inaction and lack of bona fides imputable to petitioners- Delay not condoned.)

 

ii)                (2013) I CPR 324B NC

M/s Karuna Sagar Tractor Sales & Service V. Jagrut Nagrik’s Managing Trusty and Ors.

( Consumer Protection Act, 1986 Sections 15,17,19 and 21----- Revision –---Delay –---- Delay of 91 days in filing of revision petition----- Petitioner was checked by Doctor after a gap of one month every time-----Merely because petitioner was checked up by physician after a month every time, it cannot be inferred that petitioner was not in a position to file revision petition----- No reasonable explanation has been given for Condonation of delay of 91 days-----unless there is reasonable explanation ,delay cannot be condoned ---- revision petition filed by petitioner dismissed on count of delay.)

     वर सर्व नमुद केसेसमध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे योग्‍य व समर्पक कारण व कायदेशीर आधाराशिवाय विलंब माफ करता येऊ शकत नाही.  विलंब माफी साठी योग्‍य कायदेशीर पुरावा देणे आवश्‍यक आहे असे स्‍पष्‍ट केले आहे.

     वरील विेवेचनावरुन एकंदरीत अर्जदार व त्‍यांचे वकील सलग अनेक तारखांना विद्यमान मंचात हजर नाहीत, आवश्‍यक बाबींची पुर्तता/स्‍टेप्‍स नाहीत.  विलंब माफी अर्जात नमुद केल्‍याप्रमाणे 29 महिने 27 दिवस झालेल्‍या विलंबास पुरावा दिलेला नाही, युक्‍तीवाद केला नाही त्‍यामुळे उपरोक्‍त नमुद केसेसचा निकालाचा आधार घेता अर्जदाराने दाखल केलेला विलंब माफीचा अर्ज मंजुर करणेस पाञ नाही या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍याने खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येते.

 

// अंतिम आदेश //

1.   अर्जदाराचा विलंब माफीचा अर्ज नामंजुर करण्‍यात येत आहेत.

2.  विलंब अर्जासोबत मुळ दस्‍तऐवज असल्‍यास ते अर्जदाराने परत करण्‍यात यावेत.

3.  अर्जदार व गैरअर्जदार यांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.

चंद्रपूर

दिनांक -  30 /04/2013

 

 
 
[HON'ABLE MR. SHRI. MILIND B. PAWAR (HIRGUDE)]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. SHRI R.L.BOMIDWAR]
MEMBER
 
[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.