(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांचे पती कै.बन्सीलाल धोंडु बागल यांचे दि.11/06/2010 रोजी मोटार अपघातात निधन झाले. अर्जदार यांना शेतकरी अपघात विमा योजनेप्रमाणे सामनेवाले यांनी लाभ न दिल्याने सदरचा अर्ज दाखल करावा लागलेला आहे. सबब अर्जदार यांना सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- जून 2010 पासून 15% व्याजदराने मिळावे, तसेच मानसिक,शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावेत या मागणीसाठी सदर अर्ज दाखल केलेला आहे.
तक्रार क्र.128/2011
सामनेवाले क्र.2 तर्फे पोष्टाने प्राप्त जबाब पान क्र.18 लगत दाखल आहे. सामनेवाला क्र.1 यांचा जबाब पान क्र.24 लगत व प्रतिज्ञापत्र पान क्र.25 लगत दाखल केलेले आहे.
अर्जदार यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणे तसेच सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र व त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
मुद्देः
1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय
2. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?-नाही.
3. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचनः
याकामी अर्जदार व सामनेवाले यांचा युक्तीवाद ऐकला.
महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरीता दि.5/8/2009 चे परिपत्रकाप्रमाणे शेतकरी व्यक्तीगत अपघात संरक्षण विमा योजना सुरु केलेली आहे. त्याचा कालावधी दि.15/8/2009 ते दि.14/8/2010 असा होता. सामनेवाले यांनी शेतकरी अपघात विमा योजना प्रस्ताव स्विकारलेला आहे.
सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे पोष्टामार्फत दाखल केले आहे. सदर जबाब पाहता त्यामध्ये सामनेवालेची भूमिका अत्यंत जुजबी आहे, यामध्ये शेतक-यांचा विमादावा अर्ज तहसिलदारांमार्फत आल्यावर दावा अर्ज योग्यपणे भरलेला आहे काय? सोबत जोडलेली कागदपत्रे मागणीप्रमाणे आहेत काय? नसल्यास तहसिलदार यांना कळवून त्यांची पूर्तता करवून घेणे, त्यानंतर विमा कंपनीकडे पाठविणे, विमा कंपनीकडे दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबंधीत वारसांना देणे ही कामे आहेत. यासाठी सामनेवाले हे राज्य शासन वा शेतकरी यांचेकडून कोणताही मोबदला घेत नाही असे नमूद आहे. याचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध्द नामंजूर करणेत यावा असे या मंचाचे मत आहे.
तक्रार क्र.128/2011
सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी जबाबात सदर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना नाकारलेली नाही. सदर पॉलिसी ही शेतक-यांकरीता विमा योजनेंतर्गत घेतलेली होती ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार हे मयत बन्सीलाल धोंडु बागल
यांच्या पत्नी आहेत ही बाब सामनेवालेंनी नाकारलेली नाही. सामनेवाले यांचे लेखी म्हणणे व त्यामधील कथनावरुन अर्जदार हे मयत बन्सीलाल धोंडु बागल यांचे वारस म्हणून सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे
सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये “अर्जदारास दि.27/6/2011 रोजी विमा क्लेमची रक्कम चेकने अदा केलेली आहे. अर्जदाराने सदरची रक्कम हक्क राखून जरी स्विकारलेली असली तरी अर्जदारास रक्कम मिळाल्याने सदर अर्ज कायद्याने चालु शकत नाही. अर्जदाराने सदरचा अर्ज प्रिमॅच्युअर असा दाखल केलेला आहे. सबब अर्जदाराचा अर्ज रद्द करावा,” असे नमूद केलेले आहे.
मयताचा मृत्यू हा अपघातात झालेला आहे तो सामनेवाले यांनी नाकारलेला नाही, त्याबाबत वाद नाही. सामनेवाले यांनी अर्जदार यांना विमा क्लेमची रक्कम रु. 1,00,000/- चेक नं.276553 दि.27/6/2011 रोजी अदा केलेली आहे. सदर चेक अर्जदार यांनी व्याज, नुकसान भरपाई व सदर अर्जाचा खर्च याबाबत हक्क राखून स्विकालेला आहे. यावरुन अर्जदारास सदरची रक्कम मिळालेली आहे व इतर खर्चाच्या मागणीकरीता सदर अर्ज दाखल आहे असे स्पष्ट होत आहे.
अर्जदार यांनी सदरचा तक्रार अर्ज हा दि.01/6/2011 रोजी दाखल केलेला आहे व त्यानंतर दि.27/6/2011 रोजी विमा रकमेचा चेक सामनेवालाकडून स्विकारलेला आहे. यावरुन असे दिसते की, तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर सदर तक्रार अर्जाची नोटीस लागल्याबरोबर सामनेवाला यांनी विमा क्लेमच्या रकमेचा चेक अर्जदार यांना अदा केलेला आहे व सदर चेक अर्जदार यांना मिळालेला आहे. असे असले तरी अर्जदार यांनी सदरचा चेक हक्क राखून स्विकालेला आहे व मानसिक त्रास व खर्चाची मागणी केलेली आहे परंतु सामनेवाला यांनी सदरचा चेक देण्यास दिरंगाई न करता ताबडतोब दिलेला आहे. यावरुन सामनेवाला यांची सेवा देण्याची तत्परता दिसून येत आहे. सामनेवाला यांचे सेवेत त्रुटी स्पष्ट होत नाही. त्यामुळे सदरचा तक्रार अर्जाचा खर्च व मानसिक त्रास मागण्यास अर्जदार हे पात्र ठरत नाहीत असे या मंचाचे मत आहे.
सबब वरील कारणांचा विचार होता सामनेवाले यांचे सेवेत कमतरता स्पष्ट होत नाही. या मुद्यावर सदरची तक्रार नामंजूर करावी असे मंचाचे मत आहे.
अर्जदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, दाखल केलेली कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.