Maharashtra

Nagpur

CC/14/572

Rajesh Vasantrao Shirbhate - Complainant(s)

Versus

Oriental Insurance Company - Opp.Party(s)

A. T. Sawal

20 Dec 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/14/572
 
1. Rajesh Vasantrao Shirbhate
Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Oriental Insurance Company
Mount Road Nagpur
Nagpur
Maharastra
2. Nagpur Gas Domestic Appliance
Dhantoli Nagpur
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 20 Dec 2016
Final Order / Judgement

(मंचाचा निर्णय : श्री. प्रदीप पाटील  - मा. सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)

 

                       -//  आ दे श  //-

                (पारित दिनांकः  20/12/2016)

 

1.         तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील कथन असे आहे की, तक्रारकर्ता हा अनेक वर्षांपासुन दिलेल्‍या पत्‍त्‍यावर राहत असुन तो विरुध्‍द  पक्ष क्र. 2चा ग्राहक आहे. तक्रारकर्त्‍याचा ग्राहक क्रमांक 158198 असुन तो विरुध्‍द पक्ष क्र.2 यांचेकडून नियमीत सिलेंडर घेत असतो. नियमाप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्र.2 आपल्‍या सर्व ग्राहकांचा विमा काढीत असतात आणि ते ग्राहकांचा विमा ते विरुध्‍द पक्ष क्र.1 कडे काढतात. विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी विरुध्‍द पक्ष क्र.2 ला एल.पी.जी. डिलर पॅकेजिंग नं.181100/48/2014/22 या पॉलिसीव्‍दारे विरुध्‍द पक्ष क्र.1 च्‍या सर्व ग्राहकांना संरक्षण प्राप्‍त झाले होते.

 

2.         दि.12.09.2013 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या घरी असलेल्‍या सिलेंडरच्‍या पाईपमध्‍ये लिकेज झाल्‍यामुळे व रेग्‍युलेटरमध्‍ये बिघाड झाल्‍यामुळे घरामध्‍ये आग लागली व त्‍या आगीमुळे तक्रारकर्त्‍याचे रु.12,00,000/- चे नुकसान झाले. तक्रारकर्त्‍याने आगीची सुचना अग्‍नीशमन कक्ष व सिताबर्डी पोलिस स्‍टेशनला दिली. तेव्‍हा पोलिसांनी अपराध क्र.7/2013 दर्ज केला आणि पंचनामा केला. तसेच नागपूर महानगर पालिकेच्‍या अग्‍नीशमन विभागाने आग लागल्‍याचा रिपोर्ट क्र.जी/ए/1100/एफ.डी. दि. 27.09..2013 ला दिली. तक्रारकर्त्‍याने सर्व कारवाई पूर्ण केल्‍यानंतर कागदपत्रांसहीत विरुध्‍द पक्ष क्र.2 मार्फत विरुध्‍द पक्ष क्र.1 यांचेकडे विमा दावा दाखल केला. परंतु विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी वर्षभर विमा दाव्‍यावर कोणताही निर्णय घेतला नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांना दि.01.09.2014 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी दि.08.11.2014 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या नोटीसचे उत्‍तर दिले. विरुध्‍द पक्षांनी आपल्‍या उत्‍तरामध्‍ये म्‍हटले आहे की, तक्रारकर्ता रेग्‍युलेटरचा उपयोग कमर्शियल/व्‍यापारी भट्टीकरीता करीत होता आणि तक्रारकर्त्‍याने गॅसला लावलेला पाईप लोकल कंपनीचा होता आणि म्‍हणून गॅसच्‍या दबावामुळे तक्रारकर्त्‍याचे घराला आग लागली. तक्रारकर्त्‍याने आय.एस.आय. मार्क असलेल्‍या पाईपचा उपयोग केला नाही. म्‍हणून विमा पॉलिसीच्‍या नियम क्र.10 चा भंग झालेला आहे आणि म्‍हणून तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर करण्‍यांत आला. तक्रारकर्त्‍याकडे झालेल्‍या घटने  नंतर त्‍याचे घरातील सर्व सामान व पाईप जळालेले होते आणि त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी गॅसचा रेग्‍युलेटर बदलवुन दिला. तक्रारकर्त्‍याच्‍या विमा दाव्‍याचा विरुध्‍द पक्षांनी कोणताही विचार न करता अयोग्‍यरित्‍या नामंजूर केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदर्हू तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.   

 

3.         तक्रारकर्त्‍याची तक्रार दाखल झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षांना नोटीस पाठविण्‍यांत आली असता नोटीस मिळूनही विरुध्‍द पक्ष क्र.2 हजर झाले नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द विना लेखीउत्‍तराशिवाय तक्रार पुढे चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यांत आला. विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी आपल्‍या उत्‍तरामध्‍ये तक्रारकर्त्‍याचे सर्व आक्षेप नामंजूर केलेले आहेत. विरुध्‍द पक्ष क्र.2 हे हिन्‍दुस्‍थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि.चे अधिकृत विक्रेते असल्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष क्र.1 यांचा ग्राहक ठरु शकत नाही. आणि विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्‍याकडून कोणतीही रक्‍कम स्विकारलेली नसल्‍यामुळे कोणतीही सेवा देण्‍याचे मान्‍य केलेले नव्‍हते. तसेच तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष क्र.1 यांचेमध्‍ये कोणताही करार झालेला नसल्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष क्र.1 चा ग्राहक ठरु शकत नाही. तक्रारकर्त्‍याकडे लागलेल्‍या आगीचे कारण म्‍हणजे त्‍यानी भट्टीला लावलेले गॅस कनेक्‍शन व हिन्‍दुस्‍थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. ने मान्‍य केलेली गॅस उपकरणे व साहित्‍य न वापरल्‍यामुळे लागलेली आहे. तक्रारकर्त्‍याने नियमांचा भंग केल्‍यामुळे तो विमा दावा मिळण्‍यांस पात्र नाही. तक्रारकर्त्‍याकडे लागलेल्‍या आगीचे निरीक्षण करण्‍याकरीता नेमलेल्‍या सर्वेअरने मागणी केल्‍यानंतर आवश्‍यक ती माहिती कागदपत्रे, रेग्‍युलेटर, रबरी टयुब उपलब्‍ध करुन देण्‍यांस तक्रारकर्ता अपयशी ठरल्‍यामुळे त्‍याचा विमा दावा नामंजूर करण्‍यांत आला. सदर्हू प्रकरण हे तांत्रिक स्‍वरुपाचे असल्‍यामुळे आणि त्‍यामध्‍ये साक्ष पुराव्‍याची गरज असल्‍यामुळे या मंचाला ते चालविण्‍याचा अधिकार नाही. आणि म्‍हणून सदरची तक्रार खारिज करण्‍यांत यावी असे त्‍यांनी आपल्‍या उत्‍तरात म्‍हटले आहे.

 

4.         तक्रारकर्त्‍याची तक्रार व विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांचे मार्फत दाखल लेखीउत्‍तर, लेखी-तोंडी युक्तिवाद, तसेच तक्रारीसोबत दाखल कागदपत्रांचे अवलोकन केल असता मंचाच्‍या असे निदर्शनास आले की, 

                   मुद्दे                                निष्‍कर्ष

1.    तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षांचा ग्राहक आहे काय ?              होय.

2.    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे काय ?  नाही.

3.    आदेश ?                                अंतिम आदेशाप्रमाणे.

 

                     -// कारणमिमांसा //-

 

5.         तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांचेकडून नियमीतपणे गॅस सिलेंडर घेत होता आणि त्‍याचा वापर करीत होता. तक्रारकर्त्‍याचा ग्राहक कंमांक 158198 असा असुन तो नियमीतपणे विरुध्‍द पक्ष क्र.2 कडून गॅस सिलेंडर घेत असतो. दि.12.09.2013 रोजी गॅस सिलेंडरच्‍या पाईपमध्‍ये लिकेज झाल्‍यामुळे व रेग्‍युलेटरमध्‍ये बिघाड झाल्‍यामुळे घराला आग लागली आणि त्‍याचे नुकसान झाले. तसेच या संबंधीची सुचना तक्रारकर्त्‍याने पोलिस स्‍टेशन व विरुध्‍द पक्षांना दिलेली आहे. म्‍हणजेच तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षांचा ग्राहक आहे यात दुमत नाही व सदर बाब विरुध्‍द पक्ष क्र. 2 ने मान्‍य केलेली आहे. विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी सर्व ग्राहकांचा विमा विरुध्‍द पक्ष क्र.1 यांचेकडे केलेला आहे आणि त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याचा सुध्‍दा ग्राहक या नात्‍याने समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत त्‍याला विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी दिलेल्‍या ग्राहक पत्रिकेची प्रत लावलेली आहे त्‍या शिवाय तक्रारकर्त्‍याने झालेल्‍या घटने संबंधी पोलिसांना दिलेल्‍या तक्रारीची प्रत लावलेली आहे. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांना दिलेल्‍या नोटीसची प्रत व विरुध्‍द पक्ष क्र. 2 ने विरुध्‍द पक्ष क्र. 1 ला पाठविलेल्‍या पत्राची प्रत, त्‍यानंता विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी विरुध्‍द पक्ष क्र.2 यांना पाठविलेल्‍या दि.13.10.2014 चे पत्राची प्रत लावलेली आहे ज्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याचा दावा खारिज केलेला आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍यानंतर त्‍याच्‍या म्‍हणण्‍याचे समर्थनार्थ घटनास्‍थळाचे व झालेल्‍या घटनेचे फोटो दाखल केले आहेत त्‍या शिवाय तक्रारकर्त्‍याने आपल्‍या दोन व्‍यक्तिंचे शपथपत्र दाखल केलेले आहे. ज्‍यामध्‍ये तकारकर्त्‍याने 12.09.2013 रोजी हॉल व किचन बुक केल्‍या संबंधीचे प्रतिज्ञापत्र आहे आणि दुस-या शपथपत्रात तक्रारकर्त्‍याकडे स्‍वयंपाकाकरीता आणि इतर सोयी सुविधा देण्‍याकरीता बोलविले होते या संबंधी आहे. तसेच तक्रारकर्ता त्‍याचे घरी होणा-या कार्यक्रमाकरीता बुक केलेल्‍या हॉलच्‍या रशिदा दाखल केलेल्‍या आहेत. विरुध्‍द पक्षांनी दाखल केलेल्‍या सर्वेअरच्‍या अंतिम अहवालामध्‍ये तक्रारकर्त्‍याकडे स्‍वयंपाक करण्‍याकरीता ‘हाय प्रेशर स्‍टोव्‍ह रेग्‍युलेटर’, आणि ‘व्‍यापारी भट्टीचा उपयोग करण्‍यांत आलेला होता व त्‍यामुळे आग लागली असे म्‍हटले आहे, त्‍या कारणासाठी तक्रारकर्त्‍याचा दावा देऊ नये असे म्‍हटले आहे विरुध्‍द पक्ष क्र. 1 ने दाखल केलेल्‍या फोटोवरुन असे लक्षात येते की, तक्रारकर्त्‍याकडे व्‍यापारी स्‍वरुपाच्‍या भट्टीचा उपयोग करण्‍यांत येत होता. आणि त्‍याला लावण्‍यांत आलेले रेग्‍युलेटर हे मान्‍यताप्राप्‍त नव्‍हते. तक्रारकर्त्‍याने स्‍वतः आपल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, त्‍या दिवशी त्‍याने जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता व त्‍यावेळी अनेक लोक येणार होते त्‍यामुळे त्‍याल मोठ्या प्रमाणात स्‍वयपाक करावयाचा होता व त्‍यासाठी त्‍याला मान्‍यता प्राप्‍त शेगडीवर प्रमाणीत रेग्‍युलेटरव्‍दारे स्‍वयंपाक करणे शक्‍य नव्‍हते. म्‍हणून त्‍या ठिकाणी माठ्या अनधिकृत शेगडी, मान्‍यताप्राप्‍त रेग्‍युलेटरचा उपयोग केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. अश्‍या परिस्थितीत विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी दाखल केलेल्‍या मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या न्‍याय निवाडयात स्‍पष्ट करण्‍यांत आलेले आहे की, विमा कंपनीने नियुक्‍त केलेल्‍या सर्वेअरने दिलेल्‍या रिपोर्टकडे योग्‍य कारणाशिवाय दूर्लक्ष करण्‍यांत येऊ नये व त्‍याची योग्‍य ती दखल घेण्‍यांत यावी. सदर्हू प्रकरणात विमा कंपनीच्‍या सर्वेअरने वस्‍तुनिष्‍ठ अहवाल दिलेला असुन त्‍यांनी झालेल्‍या नुकसानाबद्दल अंदाज सांगितलेला आहे. परंतु विमा दावा देण्‍या संबंधीचा निर्णय विमा कंपनीवर सोपविलेला आहे. तक्रारकर्त्‍याने आपल्‍या तक्रारीत विमा कंपनीव्‍दारे नियुक्‍त केलेल्‍या सर्वेअरच्‍या रिपोर्टवर कोणतेही भाष्‍य केलेले नाही किंवा त्‍यांचे म्‍हणणे खोडून काढलेले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार मान्‍य करणे उचित होणार नाही असे मंचाचे मत आहे. सबब पुढील प्रमाणे आदेश  करण्‍यांत येत आहे.

 

                      -//  आ दे श  //-

                 

1.    तक्रारकर्त्‍याची विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांचे विरुध्‍दची तक्रार खारिज     करण्‍यांत येते.

2.    दोन्‍ही पक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

3.    उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

4.    तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.