Maharashtra

Nashik

CC/125/2011

Chhabu Govind Gavid - Complainant(s)

Versus

Oriental Insurance Company - Opp.Party(s)

D.P.Shinde

24 Nov 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/125/2011
 
1. Chhabu Govind Gavid
Devlicha pada Dindori,Nashik
...........Complainant(s)
Versus
1. Oriental Insurance Company
Gangapur road,Nahsik-422002
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:D.P.Shinde, Advocate for the Complainant 1
 
ORDER

(मा.अध्‍यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)

                      नि  का      त्र                             

                        अर्जदार यांचा मुलगा माणिक छबु गावित यांचे दि.02/06/2010 रोजी रस्‍ता अपघातात निधन झाले. अर्जदार यांना विमा योजनेप्रमाणे सामनेवाले यांनी लाभ दिल्याने सदरचा अर्ज दाखल करावा लागलेला आहे. सबब अर्जदार यांना सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम  रु.1,00,000/- दि.22/07/2010 पासून 18% व्याजदराने मिळावे, तसेच मानसिक,आर्थिक शारिरीक त्रासापोटी रु.50,000/- मिळावे, तक्रार अर्जाचा खर्च  रु.5,000/- मिळावेत या मागणीसाठी सदर अर्ज दाखल केलेला आहे.

         सामनेवाले क्र.1 यांचा जबाब पान क्र.20 लगत पान क्र.21 लगत प्रतिज्ञापत्र दाखल आहे. सामनेवाले क्र.2 तर्फे पोष्टाने प्राप् जबाब पान   क्र.15 लगत दाखल आहे.

           अर्जदार यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः

मुद्देः

1.         अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय

                                                    तक्रार क्र.125/2011

2.         सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?-नाही.

3.         अंतीम आदेश?  -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज  नामंजूर करण्यात येत आहे.       

  

विवेचनः

याकामी अर्जदार सामनेवाले यांचा युक्तीवाद ऐकला.                          

 महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरीता 12/8/2009 चे परिपत्रकाप्रमाणे व्यक्तीगत अपघात संरक्षण विमा सुरु केलेला आहे. त्याचा कालावधी 15/8/2009 ते 14/8/2010 असा होता.  सामनेवाले क्र.1 यांनी शेतकरी अपघात विमा योजना प्रस्ताव स्विकारलेला आहे.

         सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे पोष्टामार्फत दाखल केले आहे.  सदर जबाब पाहता त्यामध्ये सामनेवालेची भूमिका अत्यंत जुजबी आहे, यामध्ये शेतक-यांचा विमादावा अर्ज तहसिलदारांमार्फत आल्यावर दावा अर्ज योग्यपणे भरलेला आहे काय?  सोबत जोडलेली कागदपत्रे मागणीप्रमाणे आहेत काय? नसल्यास तहसिलदार यांना कळवून त्यांची पूर्तता करवून घेणे, त्यानंतर विमा कंपनीकडे पाठविणे, विमा कंपनीकडे दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबंधीत वारसांना देणे ही कामे आहेत.  यासाठी सामनेवाले हे राज् शासन वा शेतकरी यांचेकडून कोणताही मोबदला घेत नाही असे नमूद  आहे.  याचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध् नामंजूर करणेत यावा असे या मंचाचे मत आहे.

            सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी जबाबात सदर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना नाकारलेली नाही. सदर पॉलिसी ही शेतक-यांकरीता विमा योजना घेतलेली होती ही बाब मान् केलेली आहे. सामनेवाले यांचे लेखी म्हणणे त्यामधील कथनावरुन अर्जदार हया मयत युवराज वामन गायकवाड यांचे वारस म्हणून सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

          सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे प्रतिज्ञापत्रामध्ये, मयत बेकायदेशीरपणे टेम्‍पोमध्‍ये पिकअपमध्‍ये प्रवास करीत होता व त्‍याचेकडे कोणताही भाजीपाला नव्‍हता, अपघाताचे वेळी मयताचे नावाने कोणत्‍याही शेतजमीनी नव्‍हत्‍या, म्‍हणून मयत शेतकरी नव्‍हता, त्‍यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाही.  त्यामुळे सदरचा अर्ज रद्द करावा, असे नमूद केलेले आहे.

अर्जदार यांनी पान क्र.22 लगत पुरसीस दाखल केली आहे  त्‍यामध्‍येअर्जदार यांनी सामनेवाला नं.2 यांच्‍या कार्यालयात जावून दि.26/07/2011 दिनांक असलेला रक्‍कम रु.1,00,000/- चेक घेतलेला आहे. परंतु शेतकरी अपघात विमाबाबतची केस मे.कोर्टात चालु आहे. सामनेवाला यांनी रक्‍कम देण्‍यास उशिर केलेला आहे. सदर

 

                                                    तक्रार क्र.125/2011

रकमेवर व्‍याज व अर्जाचा खर्च यांची रक्‍कम मिळण्‍यासाठी सदरचा अर्ज मंचात चालु ठेवत आहे असे नमूद केलेले आहे.

            मयताचा मृत्‍यू हा अपघातात झालेला आहे ही बाब सामनेवाले यांनी जबाबात नाकारलेली आहे. परंतु त्‍यानंतर सदर बाब मान्‍य करुन, सामनेवाले यांनी अर्जदार यांना विमा क्‍लेमची रक्‍कम रु.1,00,000/- दि.06/08/2011 रोजी अदा केलेली आहे.  अर्जदारास सदरची रक्‍कम मिळालेली आहे व इतर खर्चाच्‍या मागणीकरीता सदर अर्ज दाखल आहे, परंतु अर्जदार यांनी सदर रक्‍कम हक्‍क राखून स्विकारली असल्‍याबाबत कोर्टासमोर पुरावा सादर केलेला नाही.             अर्जदार यांनी दि.06/8/2011 रोजी विमा रकमेचा चेक सामनेवालाकडून स्विकारलेला आहे.  सदर तक्रार अर्ज दि.23/5/2011 रोजी दाखल केल्‍यानंतर सामनेवाला यांनी विमा क्‍लेमच्‍या रकमेचा चेक अर्जदार यांना अदा केलेला आहे व सदर चेक अर्जदार यांना मिळालेला आहे. यावरुन सामनेवाला यांची सेवा देण्‍याची तत्‍परता दिसून येत आहे. सामनेवाला यांचे सेवेत त्रुटी स्‍पष्‍ट होत नाही.  त्‍यामुळे व्‍याज, तक्रार अर्जाचा खर्च व मानसिक त्रास मागण्‍यास अर्जदार हे पात्र ठरत नाहीत असे या मंचाचे मत आहे.

            सबब वरील कारणांचा विचार होता सामनेवाले यांचे सेवेत कमतरता स्‍पष्‍ट होत नाही. या मुद्यावर सदरची तक्रार नामंजूर करावी असे मंचाचे मत आहे.

        अर्जदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्‍तीवाद तसेच सामनेवाले यांचे लेखी म्‍हणणे, दाखल केलेली कागदपत्रे, वकीलांचा युक्‍तीवाद व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेः

                                          आ दे श

 

      अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येत आहे.

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.