Maharashtra

Kolhapur

CC/14/71

Sau. Sonabai Shripati Chavan - Complainant(s)

Versus

Oriental Insurance Company through Br.Manager - Opp.Party(s)

R.G.Shelke/A J Sawant

04 Feb 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/14/71
 
1. Sau. Sonabai Shripati Chavan
Kasarputale, Tal.Radhanagari.
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Oriental Insurance Company through Br.Manager
'Kanchanganga' 204, E Station Road, Kolhapur
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:
Adv.R.G.Shelke/A J Sawant, Present
 
For the Opp. Party:
Adv.A.R.Kadam, Present
 
ORDER

      निकालपत्र (दि.04.02.2014द्वारा:- मा. सदस्‍य श्री दिनेश एस.गवळी            

 

1           सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा पशु विमा दावा नाकारुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम-12 अन्‍वये सेवेत‍ त्रुटी ठेवलेने तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.

 

2           प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाले विमा कंपनी ओरीएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे व सामनेवाले तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्‍तीवाद ऐकला.

 

3     तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी :-

            तक्रारदार ही मजकूर गावची कायमची रहिवाशी असून त्‍यांची स्‍थावर व जंगम मालमत्‍ता आहे.  तक्रारदारांचा मुख्‍य व्‍यवसाय शेती असून शेतीलापूरक म्‍हणून दुग्‍ध व्‍यवसायसुध्‍दा करत होते व आहेत. सामनेवाले ही विमा कंपनी असून तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून किसान पॅकेज पॉलीसी अंतर्गत गोकूळ दूध संघ यांचे माध्‍यमातून त्‍यांचे गायीचा विमा उतरविलेला होता व आहे. सदर पॉलीसीचा हप्‍ता सामनेवाले विमा कंपनीकडे तक्रारदारांनी अनंतराव खाडे महिला सहाकरी संस्‍था, मौजे कासारपुतळे, ता.राधानगरी, जि.कोल्‍हापूर यांचेमार्फत अदा केलेला होता.  तक्रारदारांची गाय ही दि.02.04.2012 रोजी अचानकपणे आजारी पडली होती.  त्‍यावेळी तिचेवर दि.02.04.2012 पासून ते दि.16.04.2012 पर्यंत उपचार केलेले होते तथापि दि.16.04.2012 रोजी गाय मरण पावली. तक्रारदारांचे गायीचे शवविच्‍छेदन हा कोल्‍हापूर जिल्‍हा दूध उत्‍पादक सहकारी संघ लि., कोल्‍हापूर यांचेकडील पशुवैदयकीय अधिकारी श्री.पी.एम.पाटील यांनी केलेला होता व आहे. तक्रारदारांची गाय अचानकपणे मयत झालेबाबतचा दाखला, मा.पोलीस पाटील व सरपंच ग्रामपंचायत कासारपुतळे, ता.राधानगरी यांनी दिलेला आहे. तक्रारदारांची गाय मयत झालेनंतर त्‍याची विल्‍हेवाटही गट क्र.760 च्‍या उजव्‍या कालव्‍यावर लावणेत आली. पंचनामाही करणेत आला. तक्रारदारांची गाय अचानक मयत झालेने तक्रारदारांनी किसान पॅकेजच्‍या पॉलीसी अंतर्गत विमा रक्‍कम मिळणेसाठी सामनेवाले यांचेकडे आवश्‍यक ती सर्व कागदपत्रांची पुर्तता ही मुदतीत करुन विमा क्‍लेमच्‍या रक्‍कमेची मागणी केली. दि.04.07.2012 रोजीचे पत्राने सामनेवाले यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नाकारलेला आहे. तथापि तक्रारदारांचा सदरचा क्‍लेम मंजूरीस पात्र आहे. तक्रारदार हे सामनेवाले कंपनीचे ग्राहक असून त्‍यांनी तक्रारदारांना विनाविलंब, सुलभ व तात्‍काळ सेवा देणेची कायदेशीर जबाबदारी कंपनीवर असतानासुध्‍दा तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला असल्‍याने सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. तक्रारदारांनी सदरहू अर्ज या मंचात दाखल करुन गायीचे विमा क्‍लेमची रक्‍कम रु.20,000/- द.सा.द.शे.18टक्‍के व्‍याजदराने व शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- सामनेवाले यांचेकडे वसुल होऊन मिळण्‍याची विनंती केली आहे.

 

4           तक्रारदारांनी तक्रारीच्‍या अनुषंगाने तक्रारीसोबत एकूण 8 कागदपत्रे दाखल केली आहेत.  त्‍यामध्‍ये, विमा कंपनीला भरुन दिलेला विमा प्रस्‍ताव, तक्रारदारांचे पशुचा पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, व्‍हॅल्‍युएशन सर्टिफिकेट, जनावरावर केलेले उपचार प्रमाणपत्र, दूध संस्‍था यांनी दिलेला दाखला, मयत जनावाराचा पंचनामा, विमा पॉलीसी प्रत, व विमा प्रस्‍ताव नाकारले पत्र, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

 

5           सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍या तक्रारीस लेखी म्‍हणणे दाखल केले असून त्‍यामध्‍ये प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदयाखाली चालणेस पात्र नाही आणि त्‍यामुळे तो या मंचात चालणेस पात्र नाही. सामनेवाले यांना तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कलम-1 मधील मजकूर मान्‍य नाही. सामनेवाले त्‍याचे म्‍हणणेत पुढे असे कथन करतात की, सामनेवाले यांनी किसान पॅकेज पॉलीसी ही गोकूळ दुध संघ, कोल्‍हापूर तर्फे अनंतराव खाडे महिला सह.संस्‍था कासारपुतळे यांना दिलेचे मान्‍य आहे. सामनेवाले यांनी त्‍यांचे म्‍हणणेमध्‍ये तक्रारदाराचे गायीस औषधोपचार केला आणि ती दि.16.04.2012 रोजी मयत झाली.  पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट हा पी.एम.पाटील यांनी केला त्‍याच्‍याप्रमाणे गट नं.760 मध्‍ये पंचनामा केला, इ.मजकूर नाकारला आहे.

 

6           सामनेवाले त्‍याचे म्‍हणणेमध्‍ये पुढे असे कथन करतात की, तक्रारदाराने क्‍लेम दाखल केल्‍यानंतर त्‍याची पडताळणी केली असता असे दिसून आले की, त्‍यामध्‍ये क्‍लेम निर्णीत करण्‍यासाठी आवश्‍यक ती कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केलेली नाहीत. त्‍यामध्‍ये गायीच्‍या कानामध्‍ये बसविलेला बिल्‍ला त्‍यांनी क्‍लेम फॉर्म दाखल करताना परत केलेला नाही.  सदरची बाब सामनेवाले कंपनीने दि.04.07.2012 चे पत्राने तक्रारदारांना मयत गाय कानातील बिल्‍ला दिलेला नाही. याबाबत कळविलेले आहे. त्‍यामुळे तक्रारदारांचा क्‍लेम बंद करणेत आला आहे. तदनंतर देखील मागणी करुन देखील तक्रारदाराने कागदपत्रे किंवा बिल्‍ला पाठविलेला नाही.  त्‍यामुळे क्‍लेम देय होत नाही. म्‍हणून योग्‍य कारणाकरीता सामनेवाले यांनी क्‍लेम नाकारलेला आहे.  सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासहीत नामंजूर करणेत यावी.

       

7          तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे व सामनेवाले यांच्या कैफियती/म्‍हणणे, तसेच अनुषांगिक कागदपत्रे व उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद याचा विचार होता, तक्रारीच्‍या न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

     

अ.क्र.

मुद्दे

    उत्‍तर

1

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?

होय

2

आदेश काय ?

अंतिम निर्णयाप्रमाणे

 

कारणमिमांसाः-

मुद्दा क्र.1:- तक्रारदार हे कासारपुतळे, ता.राधानगरी येथील कायमस्‍वरुपी रहिवासी असून त्‍यांची गाय आजारी पडली असल्‍याने औ‍षधोपचार सुरु असताना दि.16.04.2012 रोजी मयत झाली तदनंतर सामनवेाले यांचेकडे क्‍लेम रक्‍कमांची मागणी केली असताना सामनेवाले दि.04.07.2012  रोजीचे पत्राने तक्रारदारानी गायीचे कानातील टॅग आमचेकडे सादर केला नाही व आवश्‍यक ती कागदपत्रे दाखल केली नाहीत म्‍हणून तक्रारदारांचा विमा नाकारला.  सबब, प्रस्‍तुत कामी तक्रारदारांनी आवश्‍यक ती कागदपत्रे व गायीचे कानातील बिल्‍ला सामनेवाले विमा कपंनीकडे सादर केला का ? व त्‍यामुळे सेवेत त्रुटी निर्माण झाली का ? हा वादाचा मुद्दा निघतो. 

 

            सदर मुद्दयाचे अनुषंगाने या मंचाने तक्रारदाराने तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदाराने कागदयादीसोबत अ.क्र.1 कडील विमा प्रस्‍ताव, अ.क्र.2 कडील पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, अ.क्र.3 कडील व्‍हॅल्‍यूएशन रिपोर्ट, अ.क्र.4 कडील उपचार दाखला, अ.क्र.5 कडील दूध संस्‍था यांचा दाखला, अ.क्र.6 कडील पंचनामा, इत्‍यादी कागदपत्रे पाहता, पोस्‍ट मार्टेम रिपोर्टवरून गाय टॅग नं.OIC/161600/98405 ही गाय मयत झालेचे दिसून येते.  त्‍याचप्रमाणे व्‍हॅल्‍युएशन रिपोर्टवरुन सदरचे गाय तक्रारदाराची होती.  त्‍यांची किंमत रक्‍कम रु.20,000/- होती.   तयाचप्रमाणे ट्रीटमेंट रिपोर्टवरुन तक्रारदाराचे गायीवरती दि.02.04.2012 पासून उपचार चालू होते व ती मयत झाली हे शाबीत होते.  त्‍याचप्रमाणे तक्रारदाराने दि.16.04.2012 रोजीचा पंचानामा दाखल केलेला आहे. सदर पंचनाम्‍यामध्‍ये गायीचे वर्णन नमूद असून मयत गायीचे डाव्‍या कानात बिल्‍ला होता असे नमुद केले आहे.  वर उल्‍लेख केलेल्‍या सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांची गाय मयत झाली होती हे स्‍पष्‍ट होते.  सबब, तक्रारदाराने केवळ क्लेम फॉर्म भरतेवेळी गायीचे कानातील बिल्‍ला दिलेला नाही.  या कारणास्‍तव क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे असे या मंचाचे मत आहे.

 

            तक्रारदाराने आपले तक्रारीचे पृष्‍ठर्थ या मंचात मा.राज्‍य ग्राहक आयोग, चंदीगड यांचा न्‍यायनिवाडा दाखल केला असून तो खालीलप्रमाणे आहे.

 

      2008 (2) CPR 195 -Hon’ble Punjab State Consumer Distputes Redressal Commission, Chandigraph

 

National Insurance Co.Ltd.                           …Appellant

Versus

Amolak Dass and Anr.                                  …Respondent

 

Consumer Protection Act, 1986-Sections12 and 17- Insurance claim –Insured buffalo of complainant died Claim repudiated on ground that information about death was not given in time and that tag was not returned- District Forum allowed complaint-Appeal-Letter-by which claim was repudiated did not mention that information was not given in time-Post mortem report mentioned the tag number and description of buffalo was given-No ground to interfere with order impugned.

 

Results:-Appeal dismissed.

 

 सदरचे न्‍यायनिवाडयामध्‍ये व्‍यक्‍त केलेले मत या तक्रारीतील वस्‍तुस्थितीशी साम्‍य दर्शवितात.  त्‍यामुळे सदरचा न्‍याय निवाडा या ठिकाणी हे मंच विचारात घेत आहे.

 

            वरील सर्व बाबींचा विचार करीता, तक्रारदारांचा क्‍लेम नाकारुन सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे.  या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2:-  तक्रारदार पॉलीसीप्रमाणे विमा रक्‍कम रु.20,000/- व त्‍यावर तक्रार दाखल तारखेपासून 9% प्रमाणे व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत.  तसेच सामनेवाले यांनी सेवेत ठेवलेल्‍या त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.500/- इतका मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

 

आदेश

      1     तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

2     सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली   

      रक्‍कम रु.20,000/- अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.07.03.2014 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9% प्रमाणे व्‍याज अदा करावे.

      3     तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,000/- व तक्रारीच्‍या  

            खर्चापोटी रक्‍कम रु.500/- अदा करावेत.

      4     आदेशाच्‍या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात  

            याव्‍यात.

 

 

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.