निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 02/01/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 04/01/2012
तक्रार निकाल दिनांकः- 15/07/2013
कालावधी 01वर्ष.06महिने.11 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
कृष्णा पिता गणेशराव चापके. अर्जदार
वय 9 वर्षे.अज्ञान.अ.पा.क.सख्खे वडील अड.ज्ञानेश्वर घुले पाटील.
गणेश चंद्रकांतराव चापके,
वय 38 वर्षे.धंदा.शेती.
रा.कात्नेश्वर ता.पूर्णा
सध्या रा.मगर दवाखान्याच्या पाठीमागे.धनुबाई प्लॉट.परभणी.
विरुध्द
1 ओरीएंन्टल इंन्शुरन्स कं लि गैरअर्जदार.
भारत सरकार उपक्रम पंजिकृत एव.
मुख्य कार्यालय,ए -25/27 असफ अली रोड,नई दिल्ली. 110002.
2 दि.ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि. अड.बी.ए.मोदाणी.
तर्फे शाखा अधिकारी,
शाखा कार्यालय,दौलत बिल्डींग,शिवाजी चौक,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचे मेडीक्लेम पॉलिसी अंतर्गत अर्जदारास त्याचा खर्च देण्याचे नाकारुन सेवेतत्रुटी दिली आहे.या बद्दल अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार पुढील प्रमाणे आहे. अर्जदार हा शेतकरी असून परभणीचा रहिवाशी आहे.व त्याच्या मुलाच्या वतीने मंचात अर्ज केला आहे, अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून मेडीक्लेम विमा पॉलिसी घेतली होती. ज्याचा पॉलिसी क्रमांक 182003/48/2011/436 असा आहे.त्या पॉलिसी अंतर्गत अर्जदाराच्या मुलाला देखील संरक्षण दिलेले आहे, म्हणून या नात्याने तो गैरअर्जदाराचा ग्राहक आहे.अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदाराच्या मुलाला अंकुर रुग्णालयात दिनांक 13/11/2011 रोजी शरीक केले होते व त्यास दिनांक 15/11/2011 रोजी डिस्चार्ज देण्यांत आले.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्या ट्रीटमेंटच्या खर्चा बद्दल अर्जदाराने गैरअर्जदाराकडे क्लेम (दावा) दाखल केला व गैरअर्जदाराने मुदतीत दावा दाखल केला नाही म्हणून सदरचा दावा निकाली काढला. अर्जदारास अंकुर हॉस्पीटल मध्ये शरीक असतांना एकुण 7,426/- रुपये खर्च आला.अर्जदाराने सदरील खर्चाच्या तपशिलासह इतर कागदपत्रांसह गैरअर्जदाराकडे दावा दाखल केला होता.तरीपण गैरअर्जदाराने अर्जदाराकडून वारंवार विनंती करुन देखील दावा देण्याचे नाकारले,म्हणून अर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की, अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरीकत्रास बद्दल गैरअर्जदार यांच्याकडून रुपये 15,000/- व वैद्यकीय खर्च रु. 7,426/- व इतर खर्चापोटी 5,000/- रुपये व तक्रार खर्चाच्या पोटी रु.3,000/- 18 टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावा, अशी विनंती केली आहे.
अर्जदाराने आपल्या तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे.तसेच नि.क्रमांक 6 वर 11 कागदपत्रांच्या यादीसह 11 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्यात मेडीक्लेम पॉलिसी, क्लेमफॉर्म, मेडील रिपोर्ट, पॅथॉलॉजी लॅब रिपोर्ट, अंकुर बाल रुग्णालयाचे रसीद, भारत पॅथॉलॉजी लॅबचे 200/- रुपयेची रसीद, ओरिएन्टल इंन्शुरन्स कंपनीचे ओळखपत्र, इत्यादींचा समावेश आहे.
गैरअर्जदाराला त्याचे म्हणणे मांडण्याकरीता मंचातर्फे नोटीसा काढण्यांत आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर होवुन नि.क्रमांक 18 वर आपला लेखी जबाब दाखल केला.त्यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
अर्जदाराची तक्रार खोटी व बनावटी आहे व खारीज करण्या योग्य आहे.गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराच्या मेडीक्लेम दाव्यापोटी गैरअर्जदाराने अर्जदारास 5,526/- रुपयांचा दिनांक 09/01/2012 रोजीचा धनादेश क्रमांक 967793 अन्वये रक्कम दिली आहे. अर्जदाराने सदरची रक्कम ही विमा कंपनी कार्यालयांत येवुन स्वीकारली नाही, म्हणून ह्या रक्कमेचा धनादेश गणेश चापके यांच्या नावाने काढुन त्याच्या राहात्या घरी आर.पी.ए.डी.व्दारा पाठवण्यात आले व सदरचा धनादेश अर्जदारास 21/03/2012 रोजी मिळाला.म्हणून गैरअर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की, सदरची तक्रार रुपये 10,000/- दंड आकारुन खारीज करावी.
गैरअर्जदाराने आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 19 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.तसेच गैरअर्जदाराने नि.क्रमांक 21 वर 4 कागदपत्रांच्या यादीसह 4 कागदपत्रे दाखल केली आहेत.ज्यामध्ये गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेला 5,526/- रुपयाचा धनादेशाची झेरॉक्स प्रत, गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले पत्र, गैरअर्जदाराने पोस्ट मास्टर परभणी यांना पाठवलेले पत्र, व पोस्ट ऑफीस परभणी यांनी गैरअर्जदाराला पाठवलेले पत्र इत्यादीचा समावेश आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 अर्जदार हा मेडीक्लेम पॉलिसी अंतर्गत गैरअर्जदाराकडून रक्कम
मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेतत्रुटी दिली आहे काय ? होय.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून Individual Mediclaim Policy घेतली होती हि बाब नि.क्रमांक 6/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.तसेच अर्जदार कृष्णा चापके अंकुर बाल रुग्णालय परभणी येथे दिनांक 13/11/2011 पासून 15/11/2011 पर्यंत उपचारासाठी शरीक केले होते हि बाब नि.क्रमांक 6/4 वरील डिस्चार्ज कार्ड वरुन सिध्द होते.तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडे रुपये 7,425/- रुपयांचा क्लेम दाखल केला होता व गैरअर्जदाराने त्यास 5,526/- रुपये धनादेशाव्दारे दिले हाते ही बाब नि.क्रमांक 6/2 व 21/1 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते.सदरच्या मेडीक्लेम पॉलिसी मध्ये मुलाच्या हॉस्पीटलच्या खर्चासंबंधी किती खर्च,कोणताखर्च व कशाबद्दल द्यावयाचा असतो या विषयी अर्जदाराने कोठलेही माहिती असलेले कागदपत्र अथवा त्या बद्दलचा पुरावा मंचासमोर आणला नाही. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेली रक्कम पुरेसी आहे, असे मंचास वाटते, परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराचा मुलगा 15/11/2011 रोजी हॉस्पीटल मधून डिस्चार्ज झाल्यावर जवळपास 4 महिन्याने सदरच्या क्लेमबद्दल धनादेश दिला.त्यामुळे अर्जदारास मंचात तक्रार दाखल करणे भाग पडले.यास केवळ गैरअर्जदार जबाबदार आहे.म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे असे मंचास वाटते.अर्जदार हा तक्रार अर्जाचा खर्च मिळण्यासाठी पात्र आहे. असे मंचास वाटते.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी व मुद्दा क्रमांक 2 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रुपये.2,500/- फक्त (अक्षरी
रु.दोनहजार पाचशे फक्त) निकाल कळाल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आंत
द्यावे.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष