::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या
१. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदाराची कन्स्ट्रक्शन कंपनी असून त्यांनी कामानिमीत्य माल वाहतुक करण्यासाठी बोलेरो पिकअप मॉडल २०१२ विकत घेतले असुन सदर वाहनाचा विमा गैरअर्जदार कंपनीकडे काढला असून विमा पॉलीसी क्र. १८२५००/३१/२०१५/६३०९ असा असुन वैधता दिनांक १४.१२.२०१४ ते २२.१२.२०१५ पर्यंत आहे. सदर वाहनाचा दिनांक २४.०४.२०१५ रोजी अपघात झाला. त्या अपघाताची सूचना अर्जदाराने ताबडतोब गैरअर्जदार यांना दिली. गैरअर्जदार यांनी घटनास्थळी जाऊन वाहनाची पाहणी करून नुकसानभरपाईचे आश्वासन अर्जदाराला दिले. अर्जदाराने सदर वाहनाचे दुरुस्तीचे काम करुन २५.०५.२०१५ रोजी दुरुस्ती करिता झालेल्या खर्चाच्या बिला सहित दावा रक्कम रु. ६८,०५०/- गैरअर्जदार यांच्याकडे पाठविला. परंतु गैरअर्जदाराने सदर दावा नाकारला. सबब अर्जदाराने दिनांक २१.०९.२०१५ रोजी गैरअर्जदराकडे नुकसान भरपाई बद्दल पत्र पाठविले. परंतु पत्र प्राप्त होवुनही गैरअर्जदाराने उत्तर दिले नाही. सबब अर्जदाराने वकिलामार्फत नोटीस पाठविली व मंचात तक्रार दाखल केली. अर्जदाराने तक्रारीत मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदाराला वाहन दुरुस्तीकरीता आलेला खर्च रक्कम रु. ६८,०५०/- ६ % व्याजासह परत करावे. अबर्जदाराला गैरअर्जदाराकडुन झालेल्या त्रासापोटी शारीरीक, मानसिक, नुकसान भरपाई देण्यात यावी.
३. गैरअर्जदारांनी तक्रारीत उपस्थित होऊन त्यांनी कथन केले की अर्जदाराने तक्रारीत पोलीस पहिली खबर, वाहनचालक परवाना, सुव्यवस्थित प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्र या दस्तऐवजांचा उल्लेखही केलेला नाही. अर्जदाराचे सदर वाहन हे रस्त्यावर चालविण्यात येत होते सदर वाहन व सुव्यवस्थित प्रमाणपत्र शिवाय चालविले गेले ही सत्यता अर्जदाराने मंचापासुन लपवुन ठेवली. तसेच पोलीस पहिली खबर सुध्दा दाखल केली नाही. सबब अर्जदारची तक्रार Non Standard Basis प्रमाणेही मान्य करू शकत नाही. गैरअर्जदार आणि दिनांक १६.०९.२०१५ रोजी अर्जदाराला आवश्यक माहिती पुरविल्याबद्दल पत्र पाठवुनही अर्जदाराने पत्र प्राप्त होऊनही उत्तर न दिल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा दावा नाकारला. सबब अर्जदाराची तक्रार खोटी असल्यामुळे खारीज करण्यात यावी.
४. तक्रारदाराची तक्रार कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, गैरअर्जदार यांचे कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. तक्रारदार गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय
२. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास विमा
कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिद्ध करतात काय ? होय
३. गैरअर्जदार तक्रारदारास नुकसानभरपाई
अदा करण्यास पात्र आहेत काय ? होय
४. आदेश ? अंशत: मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ :-
५. अर्जदाराने तक्रारीत नमूद वाहनाचे विमा गैरअर्जदारकडुन काढलेला असून त्याची वैधता दिनांक १४.१२.२०१४ ते २२.१२.२०१५ पर्यंत आहे. हि बाब गैरअर्जदार यांना मान्य असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे सिद्ध होते. सबब मुद्दा क्र. १ चे उत्तर होकारार्थी नमूद करण्यात येत आहे.
मुद्दा क्र. २ व ३ :-
६. अर्जदाराच्या उपरोक्त वाहनाचा दिनांक १६.०४.२०१५ रोजी अपघात झाडाला धडक देवुन झाला हि माहिती अर्जदाराने गैरअर्जदाराला दिली व त्यासोबत गाडी दुरुस्तीचे बिलाचा खर्चासोबत दावा गैरअर्जदार कडे दाखल केला. गैरअर्जदार यांनी त्याच्या कथनात असा आक्षेप घेतात की दिनांक १६.०९.२०१५ रोजी दावा नाकारल्याच्या कारणाबद्दल पत्र पाठवून आवश्यक कागदपत्रे दोन आठवड्याच्या आत दाखल करण्याचे पत्र दिले होते. सदर पत्र गैरअर्जदार मी दाखल केले आहे. त्यावर अर्जदाराने गैरअर्जदार दिनांक २१.०९.२०१५ रोजी सर्व कागदपत्र दिल्याचे दस्तऐवज दाखल केले असून त्यावर गैरअर्जदार ला प्राप्त झाल्याचे दिनांक २२.०९.२०१५ अशी आहे. गैरअर्जदार यांने अर्जदारांचा दावा नाकारल्याबाबतचा आक्षेप घेतला आहे की सदर वाहनाचे सुव्यवस्थित प्रमाणपत्र वैध नव्हते आणि वाहन चालकाजवळ वाहन चालविण्याचा परवाना वैध नव्हते परंतु अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन असे सिद्ध होते की वाहनचालका जवळ परवाना असून तो दिनांक ३१.१०.२०२१ पर्यंत वैध आहे. गैरअर्जदार अर्जदाराचा आढावा दुसरा आक्षेप असा आहे की अर्जदारास जवळ वाहनाचे मोटरवाहन कायदा कलम ५६ अन्वये वाहनाचे सुव्यवस्थित प्रमाणपत्र आवश्यक आहे. सबब अर्जदाराच्या वाहनाच्या अपघाताच्या वेळेस गाडीचे सुव्यवस्थित प्रमाणपत्र नव्हते, परंतु गैरअर्जदारकडे अर्जदाराने उपरोक्त गाडीच्या विम्याची रक्कम पूर्णपणे भरलेली असून त्या अवधीमण्ये गाडीचा अपघात झाल्याचे दिसून येते. तसेच गैरअर्जदार कंपनीचा करारामध्ये वाहनाचे सुव्यवस्थित असल्याबाबतचे प्रमाणपत्र वैध असने हि बाब नमूद नसून ती अटी व शर्तीचा भाग नाही किंवा त्या संदर्भात दस्तऐवज दाखल केलेले नाहीत. याउलट अर्जदाराने त्याचे अपघातग्रस्त वाहनाचे दुरुस्तीचे बिलासहित चा खर्च दावा गैरअर्जदार कडे पाठविला परंतु गैरअर्जदाने तो नाकारला. सबब यात गैरअर्जदारची सेवेत त्रुटी व अनुचित व्यापार पद्धती दिसून येते. सबब मुद्दा क्र. २ व ३ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. ३ :-
७. मुद्दा क्र. १ ते ३ च्या विवेचनावरून मंच खालील आदेश पारित करते.
आदेश १. ग्राहक तक्रार क्र. १४१/२०१६ अंशतः मान्य करण्यात येते. २. सामनेवाले यांनी, तक्रारदार यांना विमा दावा कराराप्रमाणे,ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसुर केल्याची बाब जाहीर करण्यात येते. ३. सामनेवाले यांनी विमा दावा रक्कम रुपये ६८,०५०/- दिनांक २७.०५.२०१५ पासून अदा करेपर्यंत द.सा.द.से. ६% व्याजासह तक्रारदार यांना अदा करावी. ४. सामनेवाले यांनी विमा दावा कराराबाबत सेवासुविधा पुरविण्यात कसूर करुन तक्रारदार यांना मानसिक,शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. १०,०००/- या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात तक्रारदार यांना अदा करावे. ५. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. श्रीमत श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती गाडगीळ श्री.उमेश वि. जावळीकर (सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष) | |
|