::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या) (पारीत दिनांक :- 24 /04 /2019)
1. अर्जदार हिने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
2. अर्जदार ही वरील पत्त्यावर राहत असून अर्जदाराचे पती श्री दौलत नेवाजी प्रधान हे दिनांक 10.5.2008 रोजी विहीरीच्या पाण्याचा उपसा करीत असताना विषारी वायूमुळे गुदमरून बुडून म्हणजे अपघातात मरण पावले. तिचे पती शेतीचा व्यवसाय करीत होते व त्यांची शेती मौजा कुर्जा तहसील ब्रह्मपुरी येथे भूमापन क्र. 461 ही होती. अर्जदाराचा पती शेतकरी होता व शेतीचे उत्पन्नावर कुटुंबाचे पालन पोषण करीत होता. अर्जदाराचे पती शेतकरी असल्यामुळे अर्जदाराच्या पतीचा महाराष्ट्र सरकारतर्फे रुपये एक लाख चा अपघात विमा काढण्यात आला होता. अर्जदार हि विमाधारकाची पत्नी असून सदर विम्याची लाभार्थी आहे. विमाधारक पतीचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 कडे विमालाभ मिळण्याकरिता अर्ज केला होता. गैरअर्जदार क्र. 2 सदर विम्याच्या नियमानुसार दावे स्वीकारण्या करिता नियुक्त केलेले आहे. विम्याच्या नियमानुसार गैरअर्जदार क्र. 2 हे कागदपत्रांची शहानिशा करून दावे स्वीकारतात व ते पुढे इन्शुरन्स ॲडव्हायझर यांच्याकडे पाठवतात व इन्शुरन्स ॲडव्हायझर सदर दावा गैरअर्जदार क्र. एक यांच्याकडे पाठवतात अर्जदाराने सर्व कागदपत्रे आपल्या दाव्यासोबत गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे दाखल केलेली आहेत, तिने नियमानुसार सर्व कागदपत्रे दाखल करून सुद्धा अर्जदार हिला तिच्या दाव्यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. गैरअर्जदार क्रमाक. 2 कडूनही कोणतीही माहिती अर्जदार हिला मिळाली नाही. अर्जदाराचा दावा हा प्रलंबित ठेवून गैरअर्जदाराने अर्जदाराची फसवणूक केली आहे. अर्जदाराला हाल-अपेष्टा सहन करावा लागत आहे अशिक्षित असून खेड्यात राहत असल्यामुळे तिला सदर योजने बद्दल काही माहिती नव्हती सर्व कागदपत्रे गोळा करून रीतसर अर्ज अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दावा दाखल केलेला आहे वारंवार विचारणा करून सुद्धा गैरअर्जदाराने काही दाखल न घेतल्यामुळे दिनांक 5. 12 .2017 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवला .परंतु गैरअर्जदाराकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.सबब अर्जदार बाईने सदर तक्रार मंच समक्ष दाखल केलेली आहे
अर्जदार हिने तक्रारीत मागणी अशी आहे की गैरअर्जदाराणे अर्जदार बाईला विमा दाव्याची रक्कम एक लाख गैरअर्जदाराकडे प्रस्ताव दाखल केल्यापासून दसादशे 18 टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावेत तसेच शारीरिक व आर्थिक त्रासापोटी20,०००/-व तक्रारीचा खर्च १०,००० देण्यात यावा.
3. मंचातर्फे गैरअर्जदार क्र. एक व 2 यांना नोटीस काढण्यात आले
गैरअर्जदार क्र. एक उपस्थित राहून त्यांचा प्राथमिक आक्षेप दाखल केला की अर्जदार च्या पतीचा तथाकथित अपघात हा दिनांक 10.5.2008 रोजी होऊन अर्जदाराचे पती दौलत हे मृत्यू पावले व अशा परिस्थितीत 2008 मध्ये घडलेल्या कारणाकरता दिनांक 5.12. 2017 रोजी काही ग्राहक वाद दाखल करण्याकरता कारण होऊ शकणार नाही. सर्व सदर तक्रार प्राथमिकदृष्ट्या मुदतबाह्य आहे तसेच अर्जदाराने विमा दावा दाखल केल्यानंतर या गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे लक्षात आले की स्वतः दौलत प्रधान यांच्या नावे दिनांक 10.5.2008 रोजी कोणतीही शेती महाराष्ट्र राज्यात नव्हती. मात्र त्यांचा मृत्यू झाल्यानंतर दिनांक 9.6.2008 रोजी देवाजी विस्तारी प्रधान या व्यक्तीचे नावे कुर्जा येथील सर्वे क्र. 461 जमिनीवरील नाव कमी करून मयत दौलत प्रधान यांचे नाव मुलगा म्हणून चढवले व त्यानंतर त्याच दिवशी ते नाव कमी करून इतर लोकांचे नाव चढवले या बाबीची शहानिशा झाल्यावर या गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 11 .12. 2008 रोजी चे पत्र पाठवून विमा दावा अस्वीकृत केल्याचे अर्जदारास कळविले आहे अशा परिस्थितीत अर्जदाराने आता दिनांक तीन अठरा रोजी तब्बल दहा वर्षांनंतर पूर्णपणे मुदतबाह्य झालेला असून त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे गैरअर्जदार क्र. 1 यांनी 11 .12. 2008 चे विमा दावा खारिज केल्या बाबतचे पत्र अर्जदार ने त्यांनी जाणीव पूर्वक न्यायलयपासून लपवून ठेवलेले आहेत. सबब अर्जदार स्वच्छ हाताने मंचासमोर आलेली नाही. अर्जदाराचा दावा पूर्णपणे मुदतीत नसून सन 2008 मध्ये विमा दावाखारीज झाल्यानंतर अर्जदारास आता या गैर अर्जदार विरुद्ध ग्राहक न्यायालयात वाद मागण्याचा अधिकार नाही. अशा परिस्थितीत विमा पॉलिसी अटी करारातील तरतुदीनुसार या गैरअर्जदार विमा कंपनीचे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी नाही. सबब तक्रार खारीज करण्यात यावी.
4.गैरअर्जदार क्र.2 हयांनी त्यांचे उत्तर दाखल करून नमूद केले की, दौलत नेवाजी प्रधान यांची माहिती तालूका कृषि अधिकारी, ब्रम्हपूरी कार्यालयात उपलब्ध नाही.
5. तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे, गैरअर्जदार क्र. 1 यांचे पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प क्र. 1 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारकर्तीची तक्रार मुदतीत आहे काय ? नाही
4. आदेश काय ? आदेशप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 बाबत
5. तक्रारीतील दोन्ही पक्षाचे उपरोक्त कथन व दस्तेवज वरून असे
दिसून येत की अर्जदाराचे पतीचा मृत्यु दि. १०.०५.२००८ रोजी विहिरीच्या पाण्याचा उपसा करताना विषारी वायुमुळे गुदुमुरून व बुडून झाला. अर्जदार हिच्या पतीचा गैरअर्जदार क्र. १ कडून विमा दावा काढलेला असून अर्जदार हिने लाभार्थी म्हणून विमा दावा मिळण्याकरिता अर्ज २००८ मध्ये केला. गैरअर्जदाराच्या उत्तरात नमूद असल्याप्रमाणे दि. ११.१२.२००८ रोजी शहानिशा करून अर्जदाराचा पती हा शेतकरी नव्हता या आधारावर तिचा विमादावा खारीज केला. परंतु अर्जदाराचे म्हणणे आहे कि गैर अर्जदारांनी पाठविलेले दावा नाकारण्याचे पत्र अर्जदाराला मिळाले नाही. सबब अर्जदाराचे तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे. परंतु मंचाच्या मते एखाद्या व्यक्तीने विमा दावा दाखल केल्यानंतर दावा प्राप्त करण्यासाठी तो ९ ते १० वर्ष वाट पाहणार नाही व दावा मिळण्याकरिता त्याचे प्रयत्न सतत चालू राहतील. परंतु प्रस्तूत प्रकरणात असा कोणताही पत्रव्यवहार किंवा पाठपूरावा केल्याचे तक्रारकर्तीने कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल करून सिध्द केलेले नाही. त्यामुळे दावा दाखल केल्यानंतर केवळ दावा नाकारण्याचे पत्र गैरअर्जदाराकडून प्राप्त झाले नाही म्हणून तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे हि बाब ग्राह्य धरण्यासारखी नाही. सबब सदर तक्रार मुदतीत नाही हि बाब सिद्ध होत असल्यामुळे मुद्दा क्र. १ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.०८/२०१८ खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.