1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. 2. अर्जदार ही मय्यत श्री मधुकर धोंडबा पेंदाम यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पत्नी मय्यत मधुकर धोंडबा पेंदाम यांचे नावाने मौजा रानपरसोडी, तह, नागभीड येथे शेती आहे. गै.अ.2 हयांना सदर पॉलीसीच्या नियमानुसार दावे स्वीकारण्यासाठी नियुक्त केलेले आहे. सदर योजनेमार्फत मृतक यांचा रूपये १,००,००० चा विमा हा महाराष्ट्र सरकारतर्फे काढण्यात आला होता. सदर शासनाच्या विम्याप्रमाणे तक्रारकर्ती ही मय्यत यांची पत्नी असल्यामुळे सदर विम्याची लाभार्थी आहे. अर्जदार हीच्या पतीचा मृत्यु हा दि. 19/07/2008 रोजी गाडी ने जात असतांना ऑटो ने धडक झाल्याने गंभीर दुखापत होऊन दि.21/07/2008 रोजी झाला. अर्जदार हीच्या पतीने वरिल विमा उतरविला असल्याने अर्जदार हीने विहीत नमुन्यात फार्म व दस्तऐवज गै.अ.क्र.2 कडे विमा दावा मिळण्याकरिता पाठविले. परंतु सदर विमा दावा प्राप्त न झाल्यामुळे वकीलामार्फत अर्जदार हीने नोटीस पाठविला तरिही विमा दावा प्राप्त न झाल्यामुळे सदर तक्रार दाखल करून त्याव्दारे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत रू.1,00,000 व त्यावर द.सा.द.शे.18 टक्के व्याज मिळावे व मानसिक शारीरिक त्रासापोटी रू.20,000 व तक्रारीचा खर्च रू.10,000 मिळावा अशी विनंती केली आहे. 3. अर्जदाराची तक्रार स्वीकृत करून गै.अ.1 व 2 ना नोटीस पाठविण्यात आले. गैरअर्जदार क्र. 1 व २ ने हजर होवून त्यांनी आप आपले लेखी उत्तर दाखल केले. 4. गै.अ.क्र.1 विमा कंपनीने आपला लेखी जबाब नि.क्र.6 वर दाखल करून तक्रार अर्जास सक्त विरोध केला आहे व प्राथमीक आक्षेप घेतला की, शेतकरी विमा योजनेअंतर्गत शासनाने नियम व अटी निश्चीत केल्या असून ह्यात महाराष्ट्र शासन तर्फे, कृषी आयुक्त पुणे व इंश्युरंन्स कंपनी आहे. कृषी आयुक्त पुणे ही शेतक-यांसाठी सदर करारात आहे.परंतु अर्जदार हीने कृषी आयुक्त पुणे हयांना तक्रारीस पक्ष केलेले नसल्यामुळे सदर तक्रार आवश्यक पार्टी न केल्यामुळे खारिज होण्यास पात्र आहे. तसेच तक्रारीस कारण दि.11/11/2009 रोजी घडले जेव्हा दावा नाकारला गेला परंतु सदर तक्रार दि.03/01/2018 रोजी दाखल केली. तसेच सदर तक्रार मूदलबाहय असल्यामुळे खारीज करण्यात यावी. तसेच गै.अ.क.2 कडे 90 दिवसाच्या आत क्लेम पेपर दाखल केला याबद्दल कुठेही दस्तऐवज तक्रारीत दाखवणारे कोणतेही दस्तऐवज तक्रारीत दाखल नाही. तसेच तक्रारीत विलंब माफीचा अर्ज ही अर्जदार हीने दाखल केला नाही. सबब गै.अ.क्र.1 हयांनी हयांनी अर्जदारप्रती कोणतेही सेवेत न्युनता न केल्यामुळे सदर तक्रार नामंजुर करण्यात यावी. 5. गै.अ.क्र.2 हयांनी त्याच्या लेखी उत्तरात कथन केले की, अर्जदाराने दि.10/02/2009 ला सादर केलेल्या प्रस्तावाची तपासणी करून पुनश्च प्रस्ताव दि.27/02/2009 ला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांना सादर केला जिल्हा कृषी अधिक्षक हयांनी सदर प्रस्ताव विमा कंपनीला सादर केला.तसेच विमा प्रस्ताव मान्य करणे किंवा नाकारणे हे सर्वस्वी विमा कंपनीच्या बाब आहे. 6. तक्रारकर्ताने त्यांचे कथनाचे पृष्ठर्थ निशाणी क्र.4 वर दस्तऐवज दाखल केले. तसेच गै.अ.क्र.1 हयांनी नि क्र. 6 वर दस्तऐवज दाखल केलेले आहे. अर्जदार व गै.अ. याचे परस्पर विरोधी विधानावरून खालील मूद्दे मंचासमोर विचारार्थ येऊन त्यावरिल कारणमिमांसा पूढील प्रमाणे आहे. 1) गै.अ.क्र.1 हयांनी अर्जदार हयांचा विमा दावा नाकारून सेवेत त्रुटीपुर्ण : होय. व्यवहाराचा अवलंब केला आहे काय. 2) अर्जदार तक्रारीत मागणी प्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय. : होय. ३)आदेश अंतिम आदेशाप्रमाणे . मुद्दा क्र. 1 व 2 बाबत 7. अर्जदार हीचे पती श्री. मधुकर धोंडबा पेंदाम हयाचे नावाने भुमापन क्र. 293 शेती ही मौजा रानपरसोडी तह.नागभीड इतकी शेतजमीन आहे यात वाद नाही. अर्जदार हीचे पती श्री.मधुकर धोंडबा पेंदाम हयाचे दि.19/07/2018 ला गाडीने जात असतांना ऑटो ने धडक दिल्याने गंभीर दुखापत होऊन दि.21/07/2008 ला मृत्यु झाला, त्यामुळे ऑटोचालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला व शवविच्छेदन अहवालावरून हे दिसुन येत आहे की ऑटो अपघातात श्री.मधुकर धोंडबा पेंदाम हयाच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यु झाला. तसेच अर्जदाराचे पतीचा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता याबद्दलही वाद नाही व योजनेअंतर्गत अपघात झाल्यास त्याच्या लाभार्थीला एक लाख रूपये देण्याची हमी गै.अ.क्र1 ने घेतली हयातही वाद नाही. गै.अ. नी हयाच्या लेखी उत्तरात तक्रारीस कारण 21/07/2008 शेती घडले असे नमुद करून 11/11/2009 रोजी दावा नाकारण्यात आला असे कथन केलेले आहे. परंतू अर्जदाराने शासनाच्या परिपत्राप्रमाणे ज्या दिवशी तालुका कृषी अधिकारी यांचे कडे प्रस्ताव दस्तऐवजासहीत ज्या तारखेला सादर केला तीच तारिख विमा केपनीला विमा प्रस्ताव सादर झाल्याची तारिख राखण्यात यावी अशी तरतुद परिपत्राकामध्ये आहे. तसेच गै.अ.ने त्याच्या उत्तरात कथन केल्याप्रमाणे दि.11/11/2009 रोजी दावा नाकारल्याचे पत्र अर्जदाराला प्राप्त झाले त्याबद्दलची पोचपावती गै.अ.ने तक्रारीत दाखल केलेली नाही, इतकेच नव्हे तर संयुक्तीक कारणावरून 90 दिवसानंतर विमा प्रस्ताव दाखल करण्यात आला असेलतर विमा प्रस्ताव मुदतीत दाखल करण्यात आला नाही. या कारणावरून गै.अ.क्र.1 हयांना विमा दावा नाकारता येत नाही. म्हणून मंच या निष्कर्षाप्रत येते की, गै.अ.क्र.1 हयांनी अर्जदाराचा विमा दावा संयुक्तीक कारणाशिवाय नामंजूर केलेला आहे. व ही निश्चीतच सेवेत त्रुटी व अनुचीत व्यापार पद्धतीचा अवलंब आहे. सबब अर्जदार बाईचा विमा प्रस्ताव योग्य असुन गै.अ.क्र.1 हयांनी नाकारल्यामुळे अर्जदाराला मिळणा-या लाभापासुन वंचीत राहावे लागले. सबब सदर 1,00,000 रकमेवर अर्जदाराने मंचात तक्रार दाखल तारखेपासून म्हणजेच दि.03/01/2018 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने त्याज मिळण्यास अर्जदार पात्र आहे. तसेच मानसिक शारीरिक त्रासापोटी रू. 10,000 व तक्रारीचा खर्च 5,000 मिळण्यास अर्जदार हक्कदार आहे. गै.अ.क्र.2 हयांनी शासनाने दिलेले कर्तव्य व्यवस्थीतरीत्या पार पाडले असल्यामुळे त्यांचेकडून कोणतीही सेवेत त्रुटीपूर्ण व्यवहार झाल्याचे दिसून येत नाही. सबब गै.अ.क्र.2 विरूध्द कोणताही आदेश नाही. मुद्दा क्र. 3 बाबत 8. वरील मुद्दा क्र.1 व 2 च्या विवेचनावरून खालील आदेश पारीत करण्यांत येतो. |