Maharashtra

Nanded

CC/09/187

Nagnath Ramrao Dudhewad - Complainant(s)

Versus

Oriental Insurance Comp. - Opp.Party(s)

Adv.Mumataz Ali Quadri

16 Dec 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/187
1. Nagnath Ramrao Dudhewad R/o Mukhed Tq.Mukhed Dist.Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Oriental Insurance Comp. Through,Branch Mangar,Branch Office,Shanth Krupa Market,First Flower,GG road,Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 16 Dec 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2009/187
 
                    प्रकरण दाखल तारीख -   31/08/2009     
                    प्रकरण निकाल तारीख    16/12/2009
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
         मा.श्रीमती सुजाता पाटणकर           - सदस्‍या
       
नागनाथ रामराव दूधेवाड,
वय वर्षे 30 धंदा व्‍यापार,                                    अर्जदार.
रा.मुखेड ता.मुखेड जि.नांदेड.
      विरुध्‍द.
ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनीलि,                            गैरअर्जदार.
मार्फत शाखाधिकारी,
शाखा कार्यालय संतकृपा मार्केट,
प‍हिला माळा, जी.जी.रोड, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील        - अड.मु.अ.कादरी.
गैरअर्जदारा तर्फे वकील       - अड.पी.एस.भक्‍कड.
 
निकालपत्र
(द्वारा- मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्‍या)
 
          अर्जदार हा जीप क्रुझर क्र. एमएच- 26/व्‍ही-0368 चा मालक असून सदरील जीप क्रुझर वाहन दळणवळणासाठी उपयोग करीता होता. अर्जदाराने क्रुझर जीपचा विमा गैरअर्जदाराकडे रितसर हप्‍ता भरुन काढलेला आहे. पॉलिसी क्र.182001/31/2008/6482 असा असुन ज्‍याचा कालावधी दि.28/03/2008 ते दि.27/03/2009 असा आहे. सदर वाहन हे अर्जदाराने दि.24/11/2008 रोजी त्‍यांचे मित्र रेणुकादास नरहरी सुपलकर यांना तीर्थयात्रेस जाण्‍यासाठी (तिरुपती दर्शन करण्‍यासाठी) केवळ मैत्रीखातर दिले होते त्‍यात कोणत्‍याही प्रकारचा मोबदला घेतला नव्‍हता किंवा सदर वाहन हे भाडयाने दिले नव्‍हते. सदर वाहन हे दि.26/11/2008 रोजी काटकळंब्‍याहुन तीरुपतीस जात असतांना मदकूर येथे समोरुन येणा-या आंध्रा बस क्र. एपी-282/1400 ने सदरील जीपला धडक दिली ज्‍यामुळे अपघात घडला. सदर अपघातात तीन लोक मृत्‍युमूखी पडले आणि जीपचे अतोनात नुकसान झाले. सदर घटनेची नोंद पोलिस स्‍टेशन मदकूर जि.कडप्‍पा यांनी घेतली असून त्‍याचा एफ.आय.आर. नंबर 286/2008 दि.27/11/2008 मध्‍ये नोंद घेवुन अपघातात झालेल्‍या जीपचे व त्‍यात असलेल्‍या नुकसानाचे संक्षितपणे वर्णन करुन घटनास्‍थळाचा नकाशा नमुद केला आहे व निष्‍काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवुन आणल्‍याचा गुन्‍हा आंध्रप्रदेशच्‍या बस चालका विरुध्‍द नोंदविला आहे. सदर अपघातात जीपचे नुकसान झाल्‍यामुळे त्‍याची दुरुस्‍ती केली. त्‍यास नविन स्‍पेअर पार्टस टाकले त्‍यासाठी त्‍यास एकुण रु.1,79,371/- चा खर्च आला आहे आणि सदरील अपघातग्रस्‍त जीपचे विमा कंपनीने सर्व्‍हे केले व स्‍थळ पाहणी केली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे रितसर नुकसान भरपाई मिळण्‍यासंबंधीचा क्‍लेम फॉर्म भरुन व अत्‍यावश्‍यक सर्व कागदपत्र, फोर्टा इ. दिलेले आहे. गैरअर्जदार यांनी विनाकारण अर्जदाराची मागणी देण्‍याचे टाळाटाळ व चालढकल करत राहीला व शेवटी दि.20/07/2009 रोजी उलट अर्जदारास पत्र दिले की, गैरअर्जदार हा अर्जदाराच्‍या झालेल्‍या नुकसानीस कोणत्‍याही प्रकार जबाबदार नसुन उलटपक्षी अर्जदाराने पॉलीसीच्‍या विरोधात वाहतुक केलेली आहे. करीता मोटार अपघात कायद्यान्‍वये गैरअर्जदार अर्जदारास कोणतीही रक्‍कम देणे लागत नाही म्‍हणुन क्‍लेम फॉर्म बंद केले आहे. अर्जदार हा कोणत्‍याही प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांची प्रवासी वाहतुक केलेली नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराची मागणी फेटाळुन सेवेत त्रुटी केलेली आहे. म्‍हणुन अर्जदाराची माणगी आहे की, विमा क्‍लेमची रक्‍कम रु.2,00,000/- ही 12 टक्‍के व्‍याजासह व खर्चासह मंजुर करावी.
 
          गैरअर्जदार यांना नोटीस देण्‍यात आली त्‍यांनी हजर होऊन आपले लेखी म्‍हणणे सादर केले आहे त्‍यांचे म्‍हणणे असे की, अर्जदार यांना तक्रार दाखल करण्‍याचे कोणतेही कारण नाही, म्‍हणुन तक्रार खारीज करण्‍यात यावी. सदरील प्रकरण संक्षिप्‍त पध्‍दतीने निकाली निघू शकत नाही प्रकरणांमध्‍ये साक्षीदाराची साक्ष घेवुन जिरा करणे आवश्‍यक आहे. सदरील प्रकरण किचकट असल्‍यामुळे मंचास चालविण्‍याचा अधिकार नाही. गैरअर्जदारांना हे मान्‍य आहे की, गाडी क्र.एमएच -26- बी- 0368 या वाहनाचा विमा गैरअर्जदाराकडे काढलेला होता व तो विमा दि.28/03/2008 ते दि.27/03/2009 या मुदतीचा होता. अर्जदार हा सदरची जीप किरायाने दिली होती. अर्जदार सदरील वाहन हे स्‍वतःच्‍या उपयोगाकरीता वापरीत होता हे म्‍हणणे खोटे आहे. अर्जदाराने त्‍यांचे मित्र रेणुकादास सुकळकर यांना तीर्थ यात्रेस जाण्‍यासाठी मैत्री खातर दिली होती हे म्‍हणणे खोटे आहे. गैरअर्जदारास हे मान्‍य आहे की, दि.26/11/2008 रोजी जीप क्र. एमएच 26 व्‍ही 0368 व बसचा अपघात झाला आणि चार लोकांचा मृत्‍यु झाला. सदरील जीपमध्‍ये अपघाताच्‍या वेळी एकुण 13 लोक प्रवास करीत होते. सदरील घटनेची नोंद पोलिस स्‍टेशनमध्‍ये घेण्‍यात आली ही बाब गैरअर्जदारास मान्‍य आहे. अर्जदाराचे हे म्‍हणणे खोटे आहे की, अर्जदाराची गाडी पुर्णतः निकामी झाली. अपघतानंतर गैरअर्जदाराने श्री.वसंत जे.गाडगे सर्व्‍हेअर यांना नुकसानीचा जायजा घेण्‍याकरीता नेमले होते व त्‍यांनी दिलेल्‍या सर्व्‍हे रिपोर्ट प्रमाणे रु.1,35,000/- चे नुकसान झाले होते त्‍याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
अ)   घसारा काढुन स्‍पेअरपार्टची किंमत        रु.1,04,108-56
ब)   लेबर चार्जेस                         रु. 37,039-20
एकुण                               रु.1,41,147-76
वजा अतिरिक्‍त (एक्‍सेस)                        रु.    500-00
एकुण                               रु.1,40,647-76
वजा सॉल्‍व्‍हेज                            रु. 05,647-76
नेट पेयेबल                           रु.1,35,000-00
 
          अर्जदाराचे म्‍हणणे की, त्‍यास रु.1,79,371/- चा खर्च आला हे गैरअर्जदारास अमान्‍य आहे, अर्जदाराचे सदरीच्‍या रक्‍कमेचा तपशिल दिलेला नाही. गैरअर्जदार अर्जदारास रु.1,79,371/- एवढी रक्‍कम देणे लागत नाही. अर्जदाराने सदरच्‍या रक्‍कमेचा तपशिल दिलेला नाही. अर्जदाराने विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटींचे उल्‍लंघन केलेले आहे व म्‍हणुन गैरअर्जदार हे अर्जदारास कोणतीही रक्‍कम देणे लागत नाही. अपघाताच्‍या वेळी जीपमध्‍ये 13 व्‍यक्‍ती प्रवास करीत होते. जीप ही 9 + 1= 10  प्रवाशांसाठी अधिकृत होती. अर्जदाराने सदरील जीपमध्‍ये अधिकृत संख्‍येच्‍या व्‍यतिरिक्‍त लोकांना प्रवास करण्‍यास परवानगी दिली व मोटार वाहन कायदा व विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचे उल्‍लंघन केले व म्‍हणुन गैरअर्जदाराने अर्जदारास दि.20/07/2009 रोजी पत्र लिहुन त्‍यांचे क्‍लेम अमान्‍य केल्‍याचे कळविले आहे. पॉलिसी प्रमाणे व सर्व्‍हे रिपोर्ट प्रमाणे व सर्व्‍हेअरच्‍या रिइन्‍स्‍पेक्‍शन रिपोर्ट प्रमाणे फक्‍त रु.1,34,295/- एवढी रक्‍कम देय होते. परंतु पॉलिसीच्‍या अटींचे उल्‍लंघन झालेले असल्‍यामुळे गैरअर्जदार अर्जदारास रक्‍कम देणे लागत नाही. सदरच्‍या रुपये1,34,295/- चे तपशिल खालील प्रमाणे आहेत.
अ.   स्‍पेअर पाटर्स                             रु. 98,263/-
ब.   लेबर चार्जेस                         रु. 40,682/-
क.   रिइन्‍स्‍युरन्‍स                        रु. 1,495/-
एकुण                               रु.1,40,440/-
वजा
1)   साल्‍व्‍हेज                       रु.5,645/-
2)   एक्‍सेस                        रु.500/-एकुण रु.6,145/-
एकुण                           रु.1,34,295/-
          अर्जदाराने सदरचे वाहन घटनेच्‍या दिवशी किरायाने दिलेले असल्‍यामुळे व परवानगी पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तीस गाडीमध्‍ये बसविल्‍यामुळे विमा कंपनीने दिलेल्‍या पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचे व मोटार वाहन कायदयाचे उल्‍लंघन झालेले आहे म्‍हणुन अर्जदारास रक्‍कम देणे लागत नाही.
    गैरअर्जदार यांनी, अर्जदार यांनी केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा.
 
          अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे, शपथपत्र, युक्‍तीवाद याचा विचार होता, खालील प्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
     मुद्ये.                                    उत्‍तर.
1.   अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय ?         होय 
2.   अर्जदार हे गैरअर्जदार यांचे सेवेतील कमतरता
सिध्‍द करतात काय ?                                होय     
3.   काय आदेश?                                                अंतीम आदेशा प्रमाणे.
                             कारणे
मुद्या क्र -1
 
     अर्जदार यांनी जीप क्रुझर क्र.एमएच 26/व्‍ही-0368 या जीपचा विमा गैरअर्जदार यांचेकडे दि.28/03/2008 ते 27/03/2009 या कालावधी करीता घेतलेला होता.   अर्जदार यांनी अर्जासोबत विमा पॉलिसीची झेरॉक्‍स प्रत दाखल केलेली आहे. सदरची बाब गैरअर्जदार यांनी त्‍याचे लेखी म्‍हणणे व शपथपत्रामध्‍ये नाकारलेले नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र, विमा पॉलिसी याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे.
मुद्या क्र. 2 -
 
    अर्जदार यांचे वाहनास दि.26/11/2008 रोजी अपघात झालेला आहे. सदर अपघातामध्‍ये अपघातग्रस्‍त वाहन चालवणारा ड्रायव्‍हर अपघाताच्‍या वेळीच मरण पावलेला आहे. अपघात घडला त्‍यावेळेला सदर वाहनामध्‍ये 13 प्रवासी होते ही बाब दाखल कागदपत्रावरुन स्‍पष्‍ट होत आहे. विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्ती नुसार 9 + 1 एवढयाच व्‍यक्‍तींना वाहनातुन प्रवास करणे योग्‍य व कायदेशिर असे, असे असतांना प्रत्‍यक्षात अपघात घडला त्‍यावेळेला सदर वाहनामध्‍ये 13 प्रवासी असल्‍याचे निदर्शनास आलेले आहे. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी 1996 एसीजे पान नं.1178 बी.व्‍ही. नागराजु विरुध्‍द ओरीएंटल इंशुरन्‍स कंपनी लि, या वरीष्‍ठ कोर्टाचे निकालपत्र दाखल केलेले आहे. सदर निकालपत्रानुसार 2 ते 3 प्रवासी जास्‍त असताना अपघात झाल्‍यास पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचा भंग झाला असे म्‍हणता येणार नाही.
 
2008 II CPJ 324 (N.C)  नॅशनल इंशुरन्‍स कंपनी विरुध्‍द सुभाचंद कटारीया आणि इतर, या निकालपत्रात….
 
(i)                Consumer Protection Act,1986 – Section 21(b)--- Insurance—Motor accident claim—Loss assessed by Surveyor --- Claim repudiated—Contention, unauthorized persons travelling in goods vehicle in violation of policy--- Complaint allowed by Forum—Loss assessed by Surveyor awarded – Appeal against order dismissed— Hence revision—Persons travelling in vehicle had no nexus with cause of accident—Orders of lower Fora upheld. (pg.326 (paras 8,9)
 
     Case referred : 
 
 
B.V. Nagaraju V   Oriental Insurance Company Ltd. Divisional Officer, Hassan II (1996) CPJ I (SC)= 1 (1997) ACC 123 (SC) = (1996) (4) SCC 647 (Relied)     (Pg.326 para 8 a )
 
 
8.        The second issue is whether on account oftwoadditional persons   travelling in the tempo at the time of accident, the Insurance Company can repudiate the claim of the insured. The Hon’ble Apex Court in B.V. Nagaraju V Oriental Insurance Company Ltd. . Divisional Officer, Hassan II (1996) CPJ I (SC)= 1 (1997) ACC 123 (SC) = (1996) (4) SCC 647, has held :
 
It is plain from the terms of the Insurance Policy that the insured vehicle was entitled to carry 6 workmen, excluding the driver. If those 6 workmen when travelling in the vehicle, are assumed not to have increased any risk from the point of view of the Insurance Company on occurring of an accident, how could those added persons be said to have contributed to the causing of it is the poser, keeping apart the load it was carrying. In the present case the driver of the vehicle was not responsible  for the accident. Merely by lifting a person or two, or even three, by the driver or the cleaner of the vehicle, without the knowledge of the owner, cannot be said to be such a fundamental breach that the owner should, in all event, be denied indemnification.
 
 
 
 
The misuse of the vehicle was somewhat irregular though, but not so fundamental in nature so as to put an end to the contract, unless some factors existed which, by themselves, had gone to the causing of the accident.
 
                   The exclusion term of the insurance policy must be read down
                   so as to serve the main purpose of the policy that is to indemnify
                   the damage caused to the vehicle.
 
         
          या निकालपञानुसार गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना विमा क्‍लेम ची रक्‍कम देणे योग्‍य व कायदेशीर असेच होते. परंतु गैरअर्जदार यांनी दि.20.07.2009 रोजी अर्जदार यांना 9 + 1पॅसेजर वाहतूक करण्‍याची क्षमता असताना अपघाताचे वेळी सदर वाहनामध्‍ये 13 प्रवासी असल्‍याने पॉलिसीचा अटी व शर्तीचा भंग केल्‍याने अर्जदाराचा क्‍लेम नाकारुन अर्जदाराचा क्‍लेम देण्‍यामध्‍ये कमतरता केलेली आहे.
 
              अर्जदार यांच्‍या वाहनाचा अपघात दि.26.11.2008 रोजी झालेला आहे. अर्जदार यांचे अपघातग्रस्‍त वाहनाचा सर्व्‍हे गैरअर्जदार यांनी त्‍यांचे सर्व्‍हेअर श्री. वसंत घाटगे यांचे मार्फत केलेला आहे. त्‍यांचा सर्व्‍हे रिपोर्ट दि.13.01.2009 चा गैरअर्जदार यांनी या अर्जाचे कामी दाखल केलेला आहे.  सदर सव्‍हे रिपोर्ट पासून दोन महिन्‍यानी म्‍हणजे दि.14.03.2009 पासून अर्जदार हे सदर विमा क्‍लेम रक्‍कमेवर व्‍याज मिळण्‍यास पाञ आहेत. सदरची बाब 2006 (4) सीपीजे पान नंबर 84 राष्‍ट्रीय आयोग न्‍यू इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी विरुध्‍द कमलनयन  Complainant entitled interest from two months of survey report.  या निकालपञात नमूद केलेली आहे.
 
 
              गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा विमा क्‍लेम कोणतेही योग्‍य व संयूक्‍तीक कारण नसताना नाकारलेला आहे. सर्व्‍हे रिपोर्ट आल्‍यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सर्व्‍हे रिपोर्ट प्रमाणे रक्‍कम दिलेली नाही त्‍यामूळे अर्जदार यांना विमा क्‍लेम ची रक्‍कम मिळणेसाठी या मंचामध्‍ये अर्ज करावा लागलेला आहे व त्‍या अनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून अर्जाचे खर्चापोटी व मानसिक ञासापोटी रक्‍कम वसूल होऊन मिळण्‍यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे.
 
 
              अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र व गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे व त्‍यांनी दाखल केलेले शपथपत्र व दोन्‍ही पक्षाचा युक्‍तीवाद व वरीष्‍ठ कोर्टाचे निकालपञ यांचा विचार होता, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो.
                             आदेश
            गैरअर्जदार यांनी 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना  
            खालील प्रमाणे रक्‍कमा दयाव्‍यात.
 
1.                                         वाहनाचे विमा क्‍लेमची रक्‍कम बिल चेक रिपोर्ट प्रमाणे रक्‍क्‍म रु.1,32,800/- दयावी, सदर रक्‍कमेवर सर्व्‍हे रिपोर्ट नंतर दोन महिन्‍यानी म्‍हणजे दि.14.03.2009 पासून प्रत्‍यक्ष रक्‍कम पदरी पडेपर्यत 9 टक्‍के व्‍याजासह होणारी रक्‍कम दयावी.
1.
2.                                         मानसिक ञासाबददल रु.5000/- व दावा खर्च रु.1000/- दयावेत.
 
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे पाटील)                   (श्रीमती.सुजाता पाटणकर)   
       अध्‍यक्ष                                                   सदस्‍या     
 
 
 
 
गो.प.निलमवार.लघूलेखक.