Maharashtra

Nanded

CC/10/72

Prkash Ramji Lungare - Complainant(s)

Versus

Oriental Insurance Com. Ltd. - Opp.Party(s)

Adv. B.V. Bhure

31 Aug 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/72
1. Prkash Ramji Lungare Panbhosi,Tq. Kandhar, Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Oriental Insurance Com. Ltd. G.G. Road, Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,PRESIDING MEMBER
PRESENT :Adv. B.V. Bhure , Advocate for Complainant

Dated : 31 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/72.
                          प्रकरण दाखल तारीख - 03/03/2010
                          प्रकरण निकाल तारीख 31/08/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्री.सतीश सामते,                 -   सदस्‍य.
प्रकाश रामजी लूंगारे
वय सज्ञान, धंदा शेती                                   अर्जदार
रा.पाणभोसी ता.कंधार,जि. नांदेड
     विरुध्‍द.
ओरिएन्‍टल इन्‍शूरंन्‍स कंपनी लि.
तर्फे शाखाधिकारी/ब्रॅच मॅनेजर                             गैरअर्जदार 
शाखा संतकृपा मार्केट, जी.जी.रोड.,नांदेड
अर्जदारा तर्फे वकील             - अड.भूरे.बी.व्‍ही.
गैरअर्जदारा तर्फे वकील              -  अड.एस.व्‍ही.राहेरकर.
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
 
             गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्‍हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
              अर्जदाराची थोडक्‍यात तक्रार अशी की, अर्जदार यांनी महिंद्रा मॅक्‍स जीप क्र.एम.एच.-21-सी-0772 घेतली होती. सदर जिपचा गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा काढलेला आहे त्‍यांचा कालावधी दि.21.5.2007 ते 20.05.2008 असा आहे. विमा पॉलिसीचा नंबर 161502/31/2008/666 असा आहे. अर्जदाराचा ड्रायव्‍हर नामे दशरथ शंकरराव गायकवाड हा लोहा येथून अर्जदाराच्‍या मिञ परिवारास घेऊन तिरुपती येथे जात असताना रस्‍त्‍यामध्‍ये श्रीशैलम (आंध्रप्रदेश) जवळ एका खाजगी बसने अर्जदाराचे जिपला धडक दिल्‍यामूळै जीप मधील पाच व्‍यक्‍ती जागेवरच मरण पावले व अर्जदाराचे जीपचे जवळपास दिड ते दोन लाखांचे नूकसान झाले. पोलिस स्‍टेशन धिरडी येथे गून्‍हा नंबर 87/2007 अन्‍वये बस चालकाविरुध्‍द गून्‍हा नोंदविण्‍यात आला व घटनास्‍थळ पंचनामा करण्‍यात आला. सदर घटनेची माहीती अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीला दिली. गैरअर्जदार यांनी सर्व्‍हेअरची नियूक्‍ती केली, सर्व्‍हेअरने व लॉस असेंसर यांनी अर्जदाराच्‍या वाहनाचे किती नूकसान झाले यांची पाहणी करण्‍यासाठी घटनास्‍थळी भेट दिली व त्‍यांचा अहवाल गैरअर्जदाराकडे जमा केला. अर्जदाराने सदरील वाहन घटनास्‍थळापासून काढून वाहनाची दूरुस्‍ती केली. सर्व्‍हेअर यांनी रु.67,000/- चा फायनल अवार्ड गैरअर्जदार यांचेकडे दाखल केला. अर्जदारास क्षतीग्रस्‍त वाहन घटनास्‍थळावरुन नांदेड येथे टोचन करुन आणण्‍यासाठी   रु.40,000/-खर्च आला.अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे नूकसान भरपाईची वेळोवेळी मागणी केली पंरतु गैरअर्जदारयांनी या ना त्‍या कारणावरुन नूकसान भरपाई देण्‍यास टाळाटाळ केली व शेवटी दि.22.04.2009रोजी गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराचे वाहन हे भाडयाने जात होते असे कारण पूढे करुन चूकीने व बेकायदेशीरपणे अर्जदाराचा क्‍लेम नामंजूर केला. अर्जदाराचा क्‍लेम मूदतीत मान्‍य न केल्‍यामूळे अर्जदारास अपघाताच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.18.12.2007 पासून नूकसान भरपाई रक्‍कम रु.1,31,035/- व त्‍यावर  18 टक्‍के व्‍याज देण्‍याचा आदेश करावा.तसेच मानसिक ञासापोटी रु.10,000/- व दावा खर्च रु.5,000/- मिळावेत,अशी मागणी केली.
              गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अपघातग्रस्‍त वाहन हे जीप असून सदर वाहन हे व्‍यक्‍तीगत वापरासाठी म्‍हणून विमाकृत केलेले आहे. तसेच सदरील वाहनाची क्षमता ही 9 + 1 अशी आहे. सदर वाहन हे देवदर्शनासाठी किरायाने घेतलेले आहे. सदरील बाब ही पोलिसांनी नोंदवलेल्‍या लाभशेटवार जोरोपेथी यांचे जवाबामध्‍ये स्‍पष्‍टपणे आलेली आहे. तसेच पोलिस स्‍टेशन डोरनाला यांच्‍या गून्‍हा नंबर 87/07 मध्‍ये ही बाब आली आहे. पॉलिसीच्‍या मूलभूत अटीचा भंग झालेला आहे. अर्जदाराचा चालक नामे दशरथ गायकवाड हा अर्जदाराचे मिञपरिवार यांना घेऊन देवदर्शनासाठी जात होता. संबंधीत पोलिसांनी जो तपास केला त्‍या तपासामध्‍ये लापशेटवार यांचे बयान नोंदवले त्‍यामध्‍ये प्रवाशांनी अपघातग्रस्‍त वाहन हे किरायाने नेल्‍याचे सांगितले आहे. गैरअर्जदाराचे सर्व्‍हेअर यांनी अंतीम अहवालाप्रमाणे बिल चेक प्रमाणे रु.67,140/- एवढेच नूकसान सांगितले आहे.गैरअर्जदार यांना मान्‍य नाही की, अपघातग्रस्‍त वाहन घटनास्‍थळावरुन हलविण्‍यासाठी रु.40,000/- खर्च आला.अर्जदाराला ते काही नूकसान भरपाई देणे लागत नाहीत.सबब अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                                       उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?         होय.
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
 
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
 
                  अर्जदाराची जिप महिद्रा मॅक्‍स नंबर एम.एच. 21-सी-0772 या वाहनाचे दि.18.12.2007 रोजी अपघात झाल्‍याबददल कागदपञ एफ.आय.आर., पोलिस पंचनामा, या प्रकरणात दाखल केलेले आहे. तसेच अपघात वाहनाचा चालक दशरथ गायकवाड यांचे लायसन्‍स देखील या प्रकरणात दाखल केलेले ओ. परंतु यावीषयी वाद नाही. या अपघातात जवळपास पाच व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झालेला आहे. वाहनाचे अतोनात नूकसान झालेले आहे. अर्जदाराने न्‍यू स्‍टार अटो वॅर्क शॉप या खाजगी गॅरेजचे इस्‍टीमेंट दाखल केलेले आहे. यावर कोणत्‍याही प्रकारची दिनांक नाही. यानंतर परफेक्‍ट मोटार्स यांचे दि.16.2.2008 रोजीचे, श्रीभवानी अटोमोबाईल्‍स चे दि.22.2.2008 चे, श्री बालाजी मोटार गॅरेज यांचे दि.12.3.2008 चे,भारत रिडीऐटर सर्व्‍हीस सेंटर यांचे दि.5.3.2008 चे,श्री बालाजी बॉडी रिपेरिंग सेंटर यांचे दि.5.3.2008 चे,इत्‍यादी वेगवेगळे रिपेरिंग बददल बिले दाखल केलेली आहेत.  यात गैरअर्जदार यांनी दि.22.4.2009 रोजी अर्जदार यांचे नांवे एक पञ लिहून दाखल केलेल्‍या कागदपञाच्‍या आधारे Violation and Breach of policy contract  या सबबीवर तक्रार खारीज केलेली आहे. यात त्‍यांनी जेव्‍हा वादग्रस्‍त वाहनाचा अपघात झाला त्‍यावेळी वाहनामध्‍ये 12 प्रवासी प्रवास करीत होते असे कारण दिलेले आहे. गैरअर्जदाराने वाहनाचा सर्व्‍हे करुन तपशिलवार सर्व्‍हे रिपोर्ट व सर्व्‍हेअर गोविंद रामराव उत्‍तरवार यांचे शपथपञ दाखल केलेले आहे. यात त्‍यांनी महिद्रा जिप मॅक्‍स नंबर एम.एच.-21-सी-0772 या वाहनाचे लॉस असेंस करुन रु.35,440/- + व रु.34,440/- असे एकूण रु.69,840/- यातून साल्‍व्‍हेज रु.2200/- व पॉलिसी एक्‍सेसचे रु.500/- वजा करुन त्‍यांची नेट जबाबदारी ही रु.67,140/-  ठरविलेली आहे. यात मूख्‍य अपघाताचे कारण काय होते ?  हे बघणे अतीशय आवश्‍यक आहे व यासाठी पोलिस पंचनामा व एफ.आय.आर., यांचे अवलोकन केले असता एम.एच.-21-सी-0772 हे वाहन श्रीशैल्‍याम वरुन तिरुपती येथे जात असताना डौरनाल रोड जवळ चिंताला या गांवी समोरुन येणारे एक मोठे वाहन बस क्र.ऐपी-5-व्‍ही-4489 यांनी अती वेगाने व निष्‍काळजीपणे वाहन चालवून समोरुन अर्जदाराच्‍या वाहनास धडक दिली. या जिपमधील बरेच लोक जखमी झाले व पाच लोक मरण पावले व वाहनाचे जबरदस्‍त नूकसान झाले. यांला कारण वाहनात बसलेले लोक होते काय की ज्‍यामूळे हा अपघात झाला, परंतु बारकाईने पाहिले असता असे लक्षात येते की, समोरुन येणा-या बस सारख्‍या येणा-या मोठया वाहनाने समोरुन अर्जदाराच्‍या वाहनास धडक दिली. गैरअर्जदाराने जो क्‍लेम नाकारलेला आहे तो वाहनामध्‍ये जास्‍तीचे प्रवासी बसलेले होते त्‍यामूळे अपघात झाला आहे असे म्‍हटले आहे.याशिवाय आसन क्षमता हि 10 आहे व प्रवासी 12 असे यादी आहे. यात 8 वर्ष वयाचा अमृता व रचनमा हया दोन लहान मुली आहेत. लहान मुले तंतोतंत आसन क्षमतेत Adjust होऊ शकतात. परंतु असे म्‍हणून त्‍यांची जबाबदारी टळणार नाही. त्‍यासाठी त्‍यांना वाहनात बसलेल्‍या लोकामूळे अपघात झाला हे सिध्‍द करावे लागेल, व ते सिध्‍द करु शकत नाहीत. एखादया उभ्‍या वाहनाला एका समोरील वाहनाने धडक मारली तर   मध्‍ये बसलेल्‍या लोकामूळे अपघात झाला असे कसे म्‍हणता येईल. यावरुन अपघात हा समोरुन येणा-या वाहनाने धडक मारल्‍यामूळे झालेला आहे. म्‍हणून तेच कारण मूख्‍य मानले पाहिजे. यासाठी गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहनाचे झालेले नूकसान देणे कराराप्रमाणे आवश्‍यक आहे. गैरअर्जदार यांनी सर्व्‍हे रिपोर्ट दाखल करुन पारदर्शकता ठेवली आहे व  त्‍यांने सर्व्‍हेअरचे शपथपञ दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी खाजगी गॅरेजचे भरपूर बिले दाखल केलेली आहेत त्‍यांला योग्‍य असा पूरावा म्‍हणता येणार नाही. म्‍हणून अर्जदार मागत असलेली रक्‍कम मान्‍य करण्‍याजोगी नाही. यात तक्रार अर्जात अर्जदाराने जी मागणी केलेली रक्‍कम जी मोठी दर्शवलेली आहे ते अपघातग्रस्‍त वाहन घटनास्‍थळावरुन टोचन करुन आणण्‍यासाठी रु.40,000/- खर्च आला असे म्‍हटले आहे. त्‍यामूळे टोचन करुन आणण्‍यासाठी विमा कंपनीच्‍या नियमाप्रमाणे जास्‍तीत जास्‍त रु.2500/- खर्च देता येतो. त्‍यामूळे हा रु.40,000/- चा खर्च मान्‍य करता येणार नाही. सर्व्‍हेअर यांचे शपथपञ  मान्‍य करता येईल. यात सर्व्‍हेअरने टोचनाची रक्‍कम धरलेली दिसत नाही. म्‍हणून त्‍यांनी बिल चेक रिपोर्ट दि.26.02.2008 याप्रमाणे काढलेली रक्‍कम रु.67,140/- व टोचनची रक्‍कम रु.2500/- असे एकूण रु.69,640/- रक्‍कम मिळण्‍यास अर्जदार पाञ आहेत. ही रक्‍कम गैरअर्जदाराने न देऊन सेवेत ञूटी केलेली आहे. अजुन मुद्या त्‍यांने व्‍यावसायीक वापरासाठी वाहन वापरले होते व पोलिसांनी नोंदविलेल्‍या लाभशेटवार जोरोपथी यांचे जवाब प्रमाणे वाहन किरायाने घेतले होतेअसा उल्‍लेख केलेला आहे, परंतु केवळ असा जवाब सिध्‍द करण्‍यासाठी पोलिस रेकार्डला लाभशेटवार यांचे शपथपञ दाखल करणे आवश्‍यक होते ते दाखल न केल्‍यामूळे यांला पूरावा असे म्‍हणता येणार नाही. जेणे करुन वाहनाचा व्‍यावसायीक वापर सिध्‍द होणार नाही.
 
              यासाठी आधार म्‍हणून मा. राष्‍ट्रीय आयोग यात नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी लि. विरुध्‍द श्रीमती जसोदाबीन व इतर 2009(2) सीपीआर 307 (एनसी) यांचा आधार घेता येईल. तसेच पोलिसाच्‍या रेकार्ड बददल मा. राज्‍य आयोग मूंबई खंडपीठ नागपूर यांनी नरेंद्र विरुध्‍द डीव्‍हीजनल मॅनेजर, नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी व इतर यात 2006 (3) सीपीआर 320 यात पोलिसांचे रेकार्ड ग्राहय धरता येणार नाही म्‍हणून यांचाही आधार घेता येईल. तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी बी.व्‍ही. नागार्जून विरुध्‍द ओरिएन्‍टल इन्‍शूरन्‍स कंपनी ऐआयआर 1996 पान 2054 यात पॉलिसीचा मूख्‍य उददेश हाच पाहावा  व नूकसान भरपाई दयावी असे म्‍हटले आहे.
 
     I (2007) CPJ 329 9(NC) B.M.Rajashekaraiah v/s Oriental insurance co. Ltd., Consumer Protection Act, 1986—Section 2(1)(g)—Insurance—vehicle damaged in accident- Claim repudiated on ground of having violated policy conditions by carrying unauthorized passengers in lorry at relevant time—in view of Apex court decisions, carrying of 4/5 passengers cannot be said to be cause of accident—Repudiation unjustified—Loss assessed by Surveyor payable.
              वरील सर्व बाबी वरुन गैरअर्जदार यांचे सेवेत ञूटी झालेली आहे त्‍यांनी संशयाच्‍या आधारे जी कारवाई करुन चौकशी करणे अपेक्षीत होते ते त्‍यांनी केलेले आहे. म्‍हणून मानसिक ञास अर्जदारांना देय नाही.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                        आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
1.
2.                                         गैरअर्जदार कंपनीने हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना एम.एच.-21-सी-0772 या वाहनाचे नूकसानी बददल सर्व्‍हे रिपोर्ट प्रमाणे रु.69,640/- व त्‍यावर त्‍यांनी क्‍लेम नाकारल्‍याची दिनांक 22.04.2009 पासून 9 टक्‍के व्‍याजाने पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासहीत दयावेत, असे न केल्‍यास यानंतर दंडणीय व्‍याज म्‍हणून 12 टक्‍के व्‍याजाने पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासहीत दयावेत.
3.                                         दावा खर्च रु.2,000/- मंजुर करण्‍यात येतो.
4.                                         पक्षकाराना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                                      श्री.सतीश सामते   
   अध्‍यक्ष                                                                                    सदस्‍य.
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक
 

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER