(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.30,989/- मिळावेत व या रकमेवर दि.14/05/2010 पासून द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी व आर्थीक त्रासापोटी रु.25,000/- मिळावेत, अर्जाचे खर्चापोटी रु.5000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाला क्र.1 यांना प्रस्तुत तक्रार अर्जाची नोटीस पान क्र.17 चे पोहोच पावतीप्रमाणे बजावण्यात आलेली आहे. परंतु सामनेवाला क्र.1 हे गैरहजर राहील्यामुळे सामनेवाला क्र.1 विरुध्द दि.02/07/2011 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आलेले आहेत. सामनेवाला क्र.2 यांनी या कामी पान क्र.24 लेखी म्हणणे व पान क्र.25 लगत लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. या कामी अर्जदार व सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढील प्रमाणे मुददे विचारात घेतलेले आहेत. 1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय 2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-होय. 3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मेडीक्लेम विमा पॉलीसीपोटी व्याजासह रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. 4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. 5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. विवेचन या कामी अर्जदार यांचेवतीने अँड.ए.बी.शेख यांनी व सामनेवाला यांचेवतीने अँड.पी.पी.पवार यांनी युक्तीवाद केलेला आहे., सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 9(2) मध्ये “त्यांनी मेडीक्लेम विमा पॉलीसी क्र.161700/48/2010/2015 ही पॉलीसी दि.21/10/2009 ते दि.20/07/2010 या कालावधीसाठी प्रत्येक कर्मचा-यासाठी रु.50,000/- करीता दिलेली आहे.” असे मान्य केलेले आहे. तक्रार अर्जातील अर्जदार यांचे कथन व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “तक्रारदार यांनी दि.05/03/2010 रोजी क्लेम दाखल केला. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दि.14/05/2010 रोजी कळवले व पुन्हा दि.07/02/2011 रोजी अर्जदार यांचेकडून क्लेमबाबत पुर्तता करुन मागितली, अर्जदार यांनी उशिरा क्लेम दाखल केलेला आहे व क्लेमबाबत पुर्तता केली नाही, त्यामुळे विमापॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे.” असे म्हटलेले आहे. परंतु अर्जदार यांनी पान क्र.9 नुसार सामनेवाला यांचेकडे नॉन कॅशलेस क्लेम दि.21/10/2010 रोजी संपुर्ण माहितीसह दाखल केलेला आहे हे स्पष्ट होत आहे. सामनेवाला क्र.2 यांचेच पान क्र.7 व 8 चे पत्रव्यवहारानुसार अर्जदार यांचा रु.30,989/- चा क्लेम सामनेवाला क्र.1 यांचेकडे पाठवलेला आहे ही बाब स्पष्ट होत आहे. परंतु अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे किती दिवसांचे आत क्लेम दाखल केला पाहिजे? तसेच कोणकोणत्या कागदपत्रांची पुर्तता अर्जदार यांनी केली पाहिजे? याबाबत विमा पॉलीसीच्या अटी व शर्ती व अन्य कोणतीही कागदपत्रे सामनेवाला यांनी या कामी दाखल केलेली नाहीत. अर्जदार यांचेकडून अँड.ए.बी.शेख यांचेमार्फत दि.05/03/2011 रोजीची नोटीस सामनेवाला क्र.1 व 2 यांना पान क्र.12 व 13 चे पोहोच पावतीप्रमाणे मिळाल्यानंतरही अर्जदार यांचा विमाक्लेम सामनेवाला यांनी योग्य त्या मुदतीत मंजूर केलेला नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार हे दि.05/03/2010 रोजी कंपनीत काम करीत असतांना अचानक चक्कर येवून बेशुध्द पडल्यामुळे अर्जदार यांचेवर दि.13/03/2010 पर्यंत साईबाबा हॉस्पीटल येथे अँडमिट करुन उपचार करण्यात आलेले आहेत व त्यासाठी रु.30,989/- खर्च झाला आहे असा स्पष्ट उल्लेख अर्जदार यांनी त्यांचे तक्रार कलम 2 मध्ये केलेला आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 5 मध्ये अर्जदार यांचे वरील कथन नाकारलेले आहे. परतु सामनेवाला क्र.2 यांचेच पान क्र.7 व 8 चे पत्रानुसार सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे अर्जदार यांचे दि.05/03/2010 ते दि.10/03/2010 या कालावधीचे उपचाराचे खर्चाची रक्कम रु.30,989/- ची मागणी केलेली आहे हे स्पष्ट होत आहे. पान क्र.7 व 8 चे कागदपत्रांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तीकरित्या मेडीक्लेम विमापॉलीसीपोटी रक्कम रु.30,989/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.30,989/- इतकी मोठी रक्कम अर्जदार यांना योग्य त्या वेळेत मिळालेली नाही. यामुळे निश्चितपणे अर्जदार यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागलेले आहे. अर्जदार यांनी पान क्र.9 नुसार सामनेवाला यांचेकडे दि.21/10/2010 रोजी मेडीक्लेमबाबत सर्व पुर्तता केलेली आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तीकरित्या आर्थीक नुकसान भरपाई म्हणून मंजूर रक्कम रु.30,989/- या रकमेवर पान क्र.9 चे क्लेमफॉर्म सामनेवाला यांना मिळाल्याची तारीख दि.21/10/2010 पासून दोन महिन्यानंतर म्हणजेच दि.22/12/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांचेकडून मेडीक्लेम विमापॉलीसीची रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागली आहे यामुळे अर्जदार यांना निश्चितपणे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तीकरित्या मानसिक त्रासापोटी रु.2500/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत. आ दे श 1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 व 2 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा दयाव्यात अ) मेडीक्लेम विमापॉलीसीपोटी रक्कम रु.30,989/- दयावेत व या मंजूर रकमेवर दि.22/12/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज दयावे. ब) मानसिक त्रासापोटी रु.2500/- दयावेत. क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- दयावेत. |