(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांचे पती कै.अशोक लोटन दैतकार यांचे दि.16/02/2010 रोजी ट्रॅक्टरने जात असतांना अपघातात निधन झाले. अर्जदार यांना शेतकरी अपघात विमा योजनेप्रमाणे सामनेवाले यांनी लाभ न दिल्याने सदरचा अर्ज दाखल करावा लागलेला आहे. सबब अर्जदार यांना सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- दि.11/3/2010 पासून 15% व्याजदराने मिळावे, तसेच मानसिक,शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावेत या मागणीसाठी सदर अर्ज दाखल केलेला आहे.
तक्रार क्र.136/2011
सामनेवाले क्र.2 तर्फे पोष्टाने प्राप्त जबाब पान क्र.17 लगत दाखल आहे. सामनेवाला क्र.1 यांचा जबाब पान क्र.24 लगत व प्रतिज्ञापत्र पान क्र.25 लगत दाखल केलेले आहे.
अर्जदार यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणे तसेच सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र व त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
मुद्देः
1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय
2. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय? -- नाही
3. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहे
विवेचनः
याकामी अर्जदार व सामनेवाले यांचा युक्तीवाद ऐकला.
महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरीता दि.5/8/2009 चे परिपत्रकाप्रमाणे शेतकरी व्यक्तीगत अपघात संरक्षण विमा योजना सुरु केलेली आहे. त्याचा कालावधी दि.15/8/2009 ते दि.14/8/2010 असा होता. सामनेवाले यांनी शेतकरी अपघात विमा योजना प्रस्ताव स्विकारलेला आहे.
सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे पोष्टामार्फत दाखल केले आहे. सदर जबाब पाहता त्यामध्ये सामनेवालेची भूमिका अत्यंत जुजबी आहे, यामध्ये शेतक-यांचा विमादावा अर्ज तहसिलदारांमार्फत आल्यावर दावा अर्ज योग्यपणे भरलेला आहे काय? सोबत जोडलेली कागदपत्रे मागणीप्रमाणे आहेत काय? नसल्यास तहसिलदार यांना कळवून त्यांची पूर्तता करवून घेणे, त्यानंतर विमा कंपनीकडे पाठविणे, विमा कंपनीकडे दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबंधीत वारसांना देणे ही कामे आहेत. यासाठी सामनेवाले हे राज्य शासन वा शेतकरी यांचेकडून कोणताही मोबदला घेत नाही असे नमूद आहे. याचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध्द नामंजूर करणेत यावा असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी जबाबात सदर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना नाकारलेली नाही. सदर पॉलिसी ही शेतक-यांकरीता विमा योजनेंतर्गत घेतलेली होती ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार हे मयत अशोक लोटन दैतकार यांच्या पत्नी आहेत ही बाब सामनेवालेंनी नाकारलेली नाही. सामनेवाले यांचे लेखी
तक्रार क्र.136/2011
म्हणणे व त्यामधील कथनावरुन अर्जदार हे मयत अशोक लोटन दैतकार यांचे वारस म्हणून सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे
सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये घेतलेल्या बचावामध्ये, “मयत अशोक लोटन दैतकार हे शेतकरी नव्हते. सदर अपघाताचेवेळी मयत व्यक्ती हे स्वतः ट्रॅक्टर चालवत होते त्यांचेकडे वाहन चालविण्याचे ड्रायव्हींग लायसेन्स नव्हते व अर्जदाराने कागदपत्राची पुर्तता केलेली नाही. या कारणाने पॉलिसीच्या करारनाम्यातील शर्थीचा भंग झालेला आहे. सबब अर्जदाराचा अर्ज रद्द करावा,” असे नमूद केलेले आहे.
अर्जदार यांनी अपघाताचेबाबत पोलिसांकडील कागदपत्रे दाखल केलेली आहेत. या कागदपत्रांमध्ये पान क्र.5 लगत खबरमध्ये मयत अशोक लोटन दैतकार यांचा मालेगाव आग्रा रोडवर ट्रॅक्टर चालवत असतांना ट्रकने मागून ठोस दिल्याने अपघात झाला त्यात त्यांचा मृत्यु झाला असल्याचे नमूद आहे. मयताचा पोष्ट मार्टेम रिपोर्ट पान क्र.9 लगत दाखल केलेला आहे. त्यामध्ये मयताच्या मृत्युचे कारण यामध्ये मयताचा मृत्यु हा अपघाताने झालेला आहे असे नमूद केलेले आहे. यावरुन मृत्यु मयताचा ट्रॅक्टर चालवित असतांना अपघातात झालेला आहे हे स्पष्ट होत आहे.
याबाबत सामनेवाला यांनी असा बचाव घेतला आहे की अपघाताचे वेळी मयताकडे ट्रॅक्टर चालविण्याचा वैध परवाना नव्हता. याबाबत अर्जदार यांनी पान क्र.10 लगत मयत अशोक लोटन दैतकार यांचेकडील ट्रॅक्टर चालवण्याचा परवान्याची झेरॉक्स प्रमाणीत प्रत सादर केलेली आहे. परंतु त्यात सदर परवान्याचा वैध कालावधी हा दि.12/2/2007 ते 11/2/2010 असा नमूद आहे. यावरुन मयताकडे वाहन चालविण्याचा परवाना होता परंतु सदर परवान्याची वैधता ही दि.11/2/2010 पर्यंत होती व मयताचा मृत्यु हा दि.16/02/2010 रोजी झालेला आहे. म्हणजेच मयताच्या मृत्युच्या दिवशी त्यांचेकडे असलेल्या वाहन चालवण्याच्या परवान्याची मुदत संपलेली होती ही बाब स्पष्ट होते.
शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना महाराष्ट्र शासनाचे दि. 29/5/2009 रोजीचे परिपत्रक कलम 23(इ)(8) मध्ये “जर शेतक-याचा मृत्यू वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी स्वतः वाहन चालवीत असेल तर अशाप्रकरणी वैध वाहन चालविणेचा परवाना सादर करणे आवश्यक राहील”. असा स्पष्ट उल्लेख आहे.
या कलमाचा विचार होता अपघाताचेवेळी मयत व्यक्ती स्वतः वाहन चालवित असल्याने त्यांचा वैध वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे. सदर अर्जाप्रमाणे
तक्रार क्र.136/2011
व पोलिस कागदपत्राप्रमाणे मयत व्यक्ती ही स्वतः वाहन चालवित असतांना अपघात झालेला आहे. अपघाताचे वेळी मयताकडे वैध वाहन चालवण्याचा परवाना नव्हता. त्यामुळे शासन परिपत्रकाच्या अटींचा भंग झालेला आहे. अर्जदार यांची मागणी योग्य व रास्त नाही. सबब सामनेवाले यांचे सेवेत त्रुटी स्प्ष्ट होत नाही.
अर्जदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाले क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे, दाखल केलेली कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद, वर उल्लेख केलेली व आधार घेतलेली वरिष्ठ कोर्टाची निकालपत्रे व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.