Maharashtra

Nagpur

CC/10/679

Shri Rakesh Shantilal Gandhi - Complainant(s)

Versus

Oriental Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv. Kaushik Mandal

22 Feb 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/679
 
1. Shri Rakesh Shantilal Gandhi
Building No. 6, Block No. 9, Kalamana Bypass, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Oriental Insurance Co.Ltd.
Div.Office No. 3, Chhapru Nagar Chowk, C.A.Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. Kaushik Mandal, Advocate for the Complainant 1
 ADV.A.M.QUAZI, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

श्री नरेश बनसोड, सदस्‍य यांचे कथनांन्‍वये.
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 22/02/2012)
 
1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरुध्‍द दाखल करुन मागणी केली की, वाहनाच्‍या दुरुस्‍तीकरीता खर्च करावी लागलेली रक्‍कम रु.2,15,970/- देण्‍याची निर्देश द्यावे, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- भरपाई व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.25,000/- व विमा दावा निकाली काढण्‍यास झालेल्‍या अपरिमित विलंबाबाबत विमा नियामक आयोगाच्‍या नियमाप्रमाणे 14.50 प्रमाणे व्‍याजाची मागणी केली.
2.          तक्रारकर्ता हा एम पी 22 एच 1088 नोंदणी क्र. असलेल्‍या टाटा एलपीटी 2515 एलएक्‍स 6 एस 2 या वाहनाचा मालक आहे व विमा घोषित मूल्‍य रु.13,00,000/- असून त्‍याने, प्रीमीयमबाबत रु.30,751/- गैरअर्जदारास दिल्‍याने, पॉलिसी क्र. 1813/000/31/2009/867 ही 15.05.2008 ते 14.05.2009 या कालावधीकरीता एका पानाची अटी व शर्तीशिवाय पॉलिसी निर्गमित केली होती. म्‍हणून अटी व शर्ती सदर तक्रारीस लागू होत नाही. तक्रारकर्त्‍याचे वाहन चालक श्री. लखन अहिरवार 28.08.2007 ते 27.08.2010 या कालावधीकरीता वैध असलेला ड्रायव्‍हींग लायसंस 29.08.2004 ला देण्‍यास आले, त्‍याची तक्रारकर्त्‍याने रीतसर तपासणी केल्‍यानंतर व टेस्‍ट ड्राईव्‍ह घेतल्‍यानंतर त्‍यांना वाहन चालक म्‍हणून घेतले. 17.09.2008 रोजी वाहन चालकाने दिल्‍ली येथे उतरविण्‍यात येणारी सी आर शीट कॉईल वाहनात भरले व तेथे जाण्‍यास निघाला. सदर वाहन दिल्‍लीच्‍या मार्गावर 18.09.2008 रोजी पोलिस स्‍टेशन बिलखीरलीया, जि. भोपाळ येथे मागाहून येणा-या त्रयस्‍थ वाहनाने तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाला एकाएकी कट मारला. तक्रारकर्त्‍याच्‍या वाहन चालकाने वाहन वाचविण्‍याच्‍या उद्देशाने वाहन उजवीकडे घेतल्‍याने ते रस्‍ता दुभाजकावर चढले व अतिशय क्षतिग्रस्‍त झाले. तक्रारकर्त्‍याने घटनेची सुचना गैरअर्जदाराकडे दिली व त्‍यांनी श्री. खन्‍ना यांची स्‍पॉट सर्व्‍हेंयर म्‍हणून नियुक्‍ती केली व सर्व्‍हेयरने क्षतिग्रस्‍त वाहनाचे फोटो घेऊन वाहन परवानाचे अवलोकन केले. वाहनाचा अपघात, नुकसानी स्‍वरुप बाबत आपत्‍ती आढळून न आल्‍याने गॅरेजमध्‍ये सदर वाहन दुरुस्‍तीकरीता खेचून नेण्‍यास सांगितले, त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने रु.3,000/- खर्च करुन मे. जैन मोटार पार्टस कळमना, नागपूर येथे ओढून आणले व गैरअर्जदाराकडे विमा दावा अर्ज दाखल केला. तक्रारकर्त्‍याने दुरुस्‍तीचे अंदाजपत्रक, वाहनाचे दस्‍तऐवजासह दावा गैरअर्जदाराकडे दाखल केला व वाहनाचा अंतिम सर्व्‍हे करण्‍याचे सुचविले. गैरअर्जदाराचे सर्व्‍हेयर श्री. पोलके यांनी नुकसानीचे अंतिम मुल्‍यांकन केले व गॅरेजला भेट देऊन क्षतिग्रस्‍त वाहनाचे छायाचित्र घेऊन वाहन डिसमँटल करण्‍यास सांगितले व श्री. पोलके यांनी पुन्‍हा तपासणी केली. रु.2,15,970/- करीता संमती दिली व वाहन दुरुस्‍त करण्‍यास सांगितले. श्री. पोलके यांनी तक्रारकर्त्‍यास संधी न देता अंतिम सर्व्‍हे अहवाल गैरअर्जदारास सादर केला. गैरअर्जदाराने पुर्ननिरीक्षणाकरीता श्री महाजन यांना नियुक्‍त केले, त्‍यांनी वाहन तपासल्‍यानंतर व संपूर्ण समाधानी झाल्‍यावर अहवाल गैरअर्जदाराकडे सादर केला. तक्रारकर्त्‍यानी दूरध्‍वनीद्वारे व वैयक्‍तीरीत्‍या विमा दावा निकाली काढण्‍यास सांगितले. परंतू 23 महिन्‍याचा कालावधी लोटल्‍यानंतर गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यास काहीही कळविले नाही, म्‍हणून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी आहे. गैरअर्जदारांनी 09.09.2010 चे पत्रांन्‍वये कळविले की, अपघातसमयी वाहन चालकाकडे वाहन चालविण्‍याचा वैध परवाना नव्‍हता, यावरुन विमा दावा 03.09.2010 ला खारीज केल्‍याचे कळविले. तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सदर पत्र त्‍यांना प्राप्‍त झाले नाही. त्‍यांचा खरा व न्‍यायोचित दावा 25 महिन्‍यानंतर निकाली काढला व स्‍वतःची उणिव व दिरंगाई लपविण्‍याकरीता पत्र निर्गमित केले. तक्रारकर्त्‍याने वाहन चालकाच्‍या परवान्याची जिल्‍हा परिवहन अधिकारी यांचे रीतसर सही शिक्‍यानिशी आढळून आले व टेस्‍ट ड्राईव्‍ह झाल्‍यानंरत वाहन त्‍यांचे स्‍वाधीन केले होते व वाहन चालकाच्‍या परवानाबाबत जिल्‍हा परिवहन अधिकारी, हैद्राबाद यांचेकडे त्‍याची चौकशी केली व ते वैध असल्‍याचे आढळून आले. त्‍यामुळे सुजाण व्‍यक्‍तीप्रमाणे कार्य बजावल्‍याने अंतिम सर्व्‍हे अहवालाप्रमाणे रक्‍कम मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे असे त्‍याचे म्‍हणणे आहे.
 
3.          तक्रारकर्त्‍याने तक्रारीचे परिच्‍छेद क्र. 9 मध्‍ये विमा नियामक आयोगाच्‍या नियमावली नमूद करुन तक्रारकर्ता विमा रकमेवर 14.50 टक्‍के व्‍याज मिळण्‍यास पात्र आहे असे म्‍हटले. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत 11 दस्‍तऐवज दाखल केले, त्‍यामध्‍ये गैरअर्जदारास दिलेली सूचना, वाहन चालक परवाना, टॅक्‍स पावती, राष्‍ट्रीय परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा पॉलिसी इ. पृष्‍ठ क्र. 9 ते 25 वर आहे.
4.          गैरअर्जदाराने लेखी उत्‍तरात नमूद केले की, तक्रारकर्त्‍यास पॉलिसी सोबत अटी व शर्ती निर्गमित करण्‍यात आल्‍या असून तक्रारकर्त्‍यानुसार एका पानाची पॉलिसी निर्गमित करण्‍यात आल्‍याचे नाकारले व इतर तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे नाकारले. गैरअर्जदाराने परिच्‍छेद क्र. 2 नाकारले व वाहन चालकाचे ड्रायव्‍हींग लायसंस 44315104 एचजीव्‍ही 29.08.2004 बद्दल काहीही माहिती उपलब्‍ध नसून सदर लायसंस बनावट आहे. तक्रारकर्त्‍याचे लायसंस तपासणीबाबत व वाहन चालविण्‍याचे टेस्‍ट घेतल्‍याचे, अपघाताचा घटना स्‍थळ हे म्‍हणणे नाकारले. गैरअर्जदारांनी श्री. खन्‍ना यांना स्‍पॉट सर्व्‍हेयर नियुक्‍त केले व नुकसानीचे मुल्‍यांकन करण्‍याकरीता श्री. पोलके व श्री महाजन यांची नियुक्‍ती केल्‍याबाबतचे म्‍हणणे मान्‍य केले. तसेच तक्रारकर्त्‍याचे इतर म्‍हणणे नाकारले. गैरअर्जदाराने त्‍यांनी आपल्‍या इन्‍व्‍हेस्‍टीगेटर द्वारे आ.टी.ओ.कार्यालय, हैद्राबाद यांचेकडून शहानिशा केल्‍यावर श्री लखन अहिरवार, वाहन चालक वैध परवाना नव्‍हता व सदर परवाना निर्गमित केलेला नव्‍हता. पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचा तक्रारकर्त्‍याने भंग केल्‍याने खारीज होण्‍यास पात्र आहे असे नमूद करुन इतर आक्षेप नाकारले. गैरअर्जदाराने वाहन चालक परवाना तपासण्‍याकरीता श्री. जी. रामाकृष्‍णा अधिवक्‍ता/इनव्‍हेस्‍टीगेटर यांची नियुक्‍ती केली होती, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे खोटे आहे. गैरअर्जदाराने अपघातानंतर सदर वाहन चालविण्‍यायोग्‍य स्थितीत आणण्‍याकरीता जो खर्च आला, त्‍यास तक्रारकर्ता स्‍वतः जबाबदार आहे, कारण वाहन चालकास योग्‍य वाहन चालविण्‍याचे योग्‍य ज्ञान नसल्‍यामुळे व वाहन चालक वैध परवाना नसल्‍यामुळे दावा नाकारण्‍यात आला व   रु.2,15,970/- वाहन दुरुस्‍त करीता संमती दिल्‍याचे नाकारले. 03.09.2009 चे पत्र, आ.टी.ओ.कार्यालय, हैद्राबाद यांचे पत्रांन्‍वये दावा नाकारला. गैरअर्जदाराने श्री. पोलके, इंशुरंस सर्व्‍हेयर/लॉस असेसर यांचा मोटार फायनल सर्व्‍हे रीपोर्ट दि.08.11.2008 अनुक्रमे पृष्‍ट क्र. 51 ते 54 वर असून गैरअर्जदाराने इन्‍व्‍हेस्‍टीगेटर श्री. रामकृष्‍णन यांचे शपथपत्र दाखल केले.
 
5.          मंचाने दोन्‍ही पक्षांचा युक्‍तीवाद ऐकला व सर्व दस्‍तऐवजांचे अवलोकन केले.
-निष्‍कर्ष-
6.          तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहनाकरीता गैरअर्जदाराकडून विमा काढल्‍याने तो गैरअर्जदारांचा ग्राहक ठरतो. सदर तक्रारीत वाहनाचा अपघात झाला याबाबत उभय पक्षात वाद नाही. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारतेवेळी नमूद केले की, तक्रारकर्त्‍याचा विमा दावा हा नाकारण्‍यात आलेला आहे, कारण वाहन चालकाजवळ अपघाताचेवेळी इफेक्‍टीव्‍ह व व्‍हॅलीड ड्रायव्‍हींग लायसंस नव्‍हते, त्‍यामुळे विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा भंग झालेला आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍यांना एका पानाची पॉलिसी देण्‍यात आली होती व अटी शर्ती न पुरविल्‍याने त्‍या त्‍यांना लागू नाही. परंतू तक्रारकर्त्‍याने पृष्‍ट क्र. 23 वरील पॉलिसी पत्रात ड्रायव्‍हरस क्‍लॉजमध्‍ये अपघाताचेवेळी इफेक्‍टीव्‍ह व व्‍हॅलीड लायसंस असणे आवश्‍यक आहे असे स्‍पष्‍ट नमूद आहे. गैरअर्जदाराने पृष्‍ट क्र. 42, 43, 58, 59 व मंचाने प्राप्‍त केलेल्‍या पृष्‍ट क्र. 93 वरील दस्‍तऐवजावरुन हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याचे वाहन चालकाजवळ अपघाताचेवेळी इफेक्‍टीव्‍ह व व्‍हॅलीड ड्रायव्‍हींग लायसंस नव्‍हते. त्‍याच कारणामुळे तक्रारकर्त्‍याचा विमा दावा हा नाकारण्‍यात आलेला आहे.
 
7.          तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद केले आहे की, त्‍याने वाहन चालक श्री लखन अहिरवार यांचे 28.08.2007 ते 27.08.2010 या कालावधीकरीता वैध असलेला ड्रायव्‍हींग लायसंस4431514 एचजीव्‍ही हा 29.08.2004 ला निर्गमित करण्‍यात आला होता व त्‍याची तपासणी व टेस्‍ट घेतल्‍यानंतर त्‍याला वाहन चालक म्‍हणून नियुक्‍त केले. गैरअर्जदार हे सिध्‍द करण्‍यास अपयशी ठरले की, तक्रारकर्त्‍याने वाहन चालकाची नियुक्‍ती करतेवेळी त्‍याची टेस्‍ट ड्राईव्‍ह घेतली नाही व वाहन चालक परवान्‍याची तपासणी केली नाही. तक्रारकर्त्‍याने आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ सर्वोच्‍च न्‍यायालयाचे प्रेमकुमारी आणि इ. वि. प्रल्‍हादकुमार आणि इ. कंझुमर प्रोटेक्शन केसेस 2008 (2) 438 याकडे मंचाचे लक्ष आकर्षीत केले. त्‍यामध्‍ये खालीलप्रमाणे प्रमाणित केले आहे.
 
Held, even if the license is faked, the insurer will be liable, unless it is proved that insured was aware of the faked license. 
 
मंचाने राष्‍ट्रीय आयोगाच्‍या न्‍यु इंडिया एशूरंस कं.लि. वि. रीना रानी बेहेरा 2007 (3) सीपीजे 478 या निकालप्रत्रात खालीलप्रमाणे ....
त्‍याच निकालपत्रात युनायटेड इं.कं.लि. वि. लेहरु 2003 (1) ए सी सी 611 (एस.सी.) या निकालपत्राचा उहापोह केलेला आहे. सदर निकालपत्र व या तक्रारीतील वस्‍तूस्थितीत साम्‍य असल्‍यामुळे राष्‍ट्रीय आयोगाचे निकाल पत्र व सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निकालपत्र लागू पडते व त्‍यामध्‍ये खालीलप्रमाणे प्रमाणित करण्‍यात आले आहे.
“Accident claim –vehicle met with accident-assessment of loss-repudiation of claim-ground..faked driving license- complaint allowed y state commission-O.P.liable to 3 lakhs with interest @ 17.5 % . Hence appeal- If driver produces the driving license which looks genuine, owner not expected to verify whether license issued by competent authority or not-no evidence to substantiate factum of alleged faked license was within the knowledge of owner of vehicle-impugned order upheld-interest reduced to 12 %-order modify.
 
गैरअर्जदाराने 08.11.2008 चे सर्वेयर रीपोर्टनुसार त्‍वरितच विमा दावा निकाली काढणे बंधनकारक असतांना विलंबाने दावा निकाली काढल्‍याने त्‍याचे सेवेत त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्‍याने अपघातग्रस्‍त वाहन दुरुस्‍तीकरीता रु.2,15,970/- खर्च आल्‍याचे म्‍हटले. गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या मोटार फायनल सर्वे रीपोर्ट दि.08.11.2008 नुसार ईस्‍टीमेटेड लॉस रु.2,17,470/- नमूद आहे. परंतू असेस लॉस रु.1,33,355/- म्‍हणून नोंद असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसते. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे की, सर्वेयर अहवालानुसार व विमा नियामक आयोगाचे नियमावलीनुसार असेस लॉस रक्‍कम रु.1,33,355/- सर्वे रीपोर्ट 08.11.2008 पासून तक्रारकर्त्‍याचे हाती रक्‍कम पडेपर्यंत 12 टक्‍केप्रमाणे व्‍याज देण्‍यास गैरअर्जदार बाध्‍य आहे. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याचा दावा विलंबाने दावा निकाली काढल्‍याने, तक्रारकर्त्‍यास निश्चितच मानसिक त्रास सहन करावा लागला, म्‍हणून रु.10,000/- भरपाई व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.3,000/- द्यावे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. म्‍हणून खालील आदेश.
 
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी मोटार फायनल सर्वे रीपोर्ट 08.11.2008 नुसार असेस लॉसची रक्‍कम रु.1,33,355/- तक्रारकर्त्‍याला द्यावे. विमा नियामक आयोगाचे नियमावलीनुसार असेस रक्‍कम रु.1,33,355/- सर्वे  रीपोर्ट 08.11.2008 पासून तक्रारकर्त्‍याचे हाती रक्‍कम पडेपर्यंत द.सा.द.शे.12  टक्‍केप्रमाणे व्‍याज गैरअर्जदाराने या रकमेवर द्यावे.
3)    गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला मानसिक त्रासाच्‍या भरपाईकरीता रु.10,000/- भरपाई     व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.3,000/- द्यावे.
4)    सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30  दिवसाचे आत करावे अन्‍य‍था गैरअर्जदार 12 टक्‍केऐवजी 14 टक्‍के व्‍याज देण्‍यास      बाध्‍य राहील.
 
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.