Maharashtra

Nagpur

CC/11/194

Shri Navroj Framoj Bhagwaghar - Complainant(s)

Versus

Oriental Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv.D.C.Daga

03 Mar 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/194
 
1. Shri Navroj Framoj Bhagwaghar
New Basti
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Oriental Insurance Co.Ltd.
15, Mount Road, Sadar
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv.D.C.Daga, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्‍यक्ष )     
                आ दे श
                        ( पारित दिनांक : 03 मार्च 2012 )
 
तक्रारकर्तीने हे प्रकरण ग्राहक सरंक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये या मंचात दाखल केले आहे.
यातील तक्रारदार पती पत्‍नी असुन आपले निवृत्‍त जीवन जगत आहे. तक्रारदार यांची गैरअर्जदार यांचे विरुध्‍द तक्रार अशी आहे की, तक्रारदारांनी गैरअर्जदार विमाकंपनीची मेडीक्‍लेम पॉलीसी घेतली व गैरअर्जदाराचे मागणी नुसार सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. त्‍यानुसार गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याचे नावे रुपये 1,75,000/- ची मेडीक्‍लेम पॉलीसी जारी केली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍यांचे विनंतीनुसार गैरअर्जदाराने वेळोवेळी पॉलीसी पुर्नर्जिवन केले.  पुर्नजीवती केलेल्‍या पॉलीसीचा क्रमांक 181100/48/2010/1732 वैधता कालावधी दिनांक 11.9.2009 ते 11.09.2010 असा होता.
तक्रारदार क्रं.1 कॅन्‍सरचे उपचाराकरिता दिनांक 15.6.2010 रोजी भरती झाला व 16/6/2010 रोजी सुटी मिळाली. पुढे परत दिनांक 13/7/2010 रोजी औषधोपचाराकरिता भरती करण्‍यात आले व 14/7/2010 रोजी सुटी मिळाली. या दोन्‍ही वेळेच्‍या उपचाराकरिता तक्रारदारास रुपये 2,34,590/- रुपये खर्च आला. सदर रक्‍कमेच्‍या विमा पॉलीसीअंतर्गत मिळण्‍याबाबत गैरअर्जदारास दिनांक 17/6/2010 रोजी कळविण्‍यात आले व विमा दावा मिळण्‍याबाबत विनंती करण्‍यात आली त्‍यावर गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 30/8/2010 रोजी पत्र देउुन आवश्‍यक संबंधित कागदपत्रे तपासणीकरिता पुरविण्‍याबाबत कळविले. ती सर्व कागदपत्रे गैरअर्जदारास पुरविण्‍यात आली. तरी देखिल गैरअर्जदाराने दिनांक 14/12/2010 रोजी एक पत्र देऊन तक्रारदाराचा मेडीक्‍लेम तक्रारदारास विमा दावा घेण्‍याचे पूर्वीपासूनच आजारी होता या कारणास्‍तव नाकारण्‍यात आला व पॉलीसीमध्‍ये खंड पडल्‍यामुळे रिअॅम्‍बर्समेंटचा दावा मंजूर करता येत नाही असे कळविण्‍यात आले.
 
तक्रारदार पुढे नमुद करतात की, गैरअर्जदाराने तक्रारदाराचे पॉलीसीचे पुर्नजीवन केले आहे व तक्रारदाराने वेळोवेळी गैरअर्जदाराचे मागणीनुसार कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे. सर्व कागदपत्रांची छाननीक‍रुन गैरअर्जदाराने तक्रारदारास विमा पॉलीसी देय केली व पॉलीसीचे हप्‍ते वेळेत भरणा केलेले असतांना गैरअर्जदाराने तक्रारदाराचा दावा नाकारण्‍याचे कारण अयोग्‍य आहे. कारण गैरअर्जदाराने पॉलीसी देतेवेळेस मागीतलेली सर्व कागदपत्रे तक्रारदाराने कुठलीही कुरबुर न करता गैरअर्जदारास पुरविली असतांना गैरअर्जदाराने आता अयोग्‍य कारणास्‍त तक्रारदारावा विमा दावा नाकारला म्‍हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने सुन 21010-2011 करिता पॉलीसीचे पुर्नजिवन करण्‍याचे आदेश द्यावे. तक्रारदारास झालेल्‍या मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 50,000/-, इतर खर्च रुपये 30,000/- मिळावा अशी मागणी केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्‍यात आली. नोटीस प्राप्‍त होऊन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदाराने आपले लेखी जवाबात तक्रारदाराची पॉलीसीची बाब मान्‍य केली. तक्रारदाराने सुन 2005-2006 हया वर्षापासुन लागोपाठ नवीनीकरण किंवा पुर्नेजीवन करुन तर कधी विमा पत्राचे कालावधी संपल्‍यानंतर प्रिमीयम भरुन नवीन पॉलीसी गैरअर्जदाराने काढलेली आहे. तक्रारदाराचा विमा दावा रुपये 1,75,000/- असल्‍याची बाब मान्‍य केली. तक्रारदार वैद्यकीय उपचाराकरिता भरती असल्‍याची बाब मान्‍य केली. मात्र खर्चाची बाब अमान्‍य केली. तक्रारदाराने विमा पालीसी प्रत्‍येक वेळेस शेवटची तारीख संपल्‍यापासुन दोन दिवसानंतर घेण्‍यात आली म्‍हणजेच त्‍या पॉलीसी नविनीकृत चे सज्ञेमधे बसुन नसुन त्‍या नविन पॉलीसी म्हणुन संबोधतात. त्‍यानुसार तक्रारदाराचा आजार पॉलीसी अगोदरचा असल्‍यामुळे तक्रारदाराचा विमा दावा मान्‍य करु शकत नाही. तक्रारदाराचा विमा दावा पॉलीसीच्‍या अटी व शर्तीनुसार व पॉलीसीत खंड पडल्‍यामुळे नाकारलेला आहे. म्‍हणुन गैरअर्जदाराने आपले सेवेत कुठलीही कमतरता ठेवलेली नाही असा उजर घेतला.
तक्रारदाराने आपली तक्रार शपथपत्रावर दाखल केली असुन दस्‍तऐवज यादी नुसार 09 कागदपत्रे दाखल केली  त्‍यात विमा प्रपत्र, वैद्यकीय अहवाल, डिस्‍चार्ज समरी कार्ड , वैद्यकीय देयक, व इतर कागदपत्रे दाखल केलीत.  गैरअर्जदाराने आपला जवाब शपथपत्रावर दाखल केला.
      ###-    का र ण मि मां सा    -###
      सदर प्रकरणातील तक्रारदाराची विनंती ही गैरअर्जदारास त्‍यांचे पॉलीसीचे नुतनीकरणाकरिता आदेश द्यावे आणि मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम मिळावी अशी आहे. गैरअर्जदाराने पॉलीसी नुतनीकरणाकरिता घेतलेला निर्णय बदलवुन गैरअर्जदाराने पॉलीसीचे नुतनीकरण करावे असा आदेश करणे आमच्‍या अधिकारात येते असे आम्‍हाला वाटत नाही. यासंबंधी निश्‍चीत आधार तक्रारदाराने दिलेला नाही. यास्‍तव तक्रार निकाली काढण्‍यात येते. सबब आदेश.
     
     -// अं ति म आ दे श //-
1.     तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्‍यात येते.

2.    खर्च ज्‍याचा त्‍याने सोसावा.

 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.