Maharashtra

Bhandara

CC/18/84

ANUSAYA DURYODHAN BUDDHE. - Complainant(s)

Versus

ORIENTAL INSURANCE CO.LTD THROUGH MANAGER - Opp.Party(s)

MR. DEVENDRA HATKAR

21 Sep 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/18/84
( Date of Filing : 20 Dec 2018 )
 
1. ANUSAYA DURYODHAN BUDDHE.
R/O POST MADGI. TAH. TUMSAR. BHANDARA
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. ORIENTAL INSURANCE CO.LTD THROUGH MANAGER
DIVISIONAL OFFICE NO. 2.8. HINDUSTAN COLONY. NEAR AJNI CHOWK. WARDHA ROAD. NAGPUR 440015
Nagpur
Maharashtra
2. Taluka Agricultural Officer
TAH. LAKHANI. BHANDARA
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:MR. DEVENDRA HATKAR , Advocate
For the Opp. Party:
Dated : 21 Sep 2019
Final Order / Judgement

       (पारीत व्‍दारा  श्रीमती वृषाली गौ.जागीरदार, सदस्‍या)

                                              (पारीत दिनांक– 21 सप्‍टेंबर, 2019)

 01.  तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं- 1 ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी आणि इतर विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्‍याचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्ती ही उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून, तिचे पती मृतक दुर्योधन चिंधू बुध्‍दे हे व्‍यवसायाने शेतकरी होते व त्‍याचे मालकीची शेत जमिन ही मौजा- माडगी, तहसिल तुमसर, जिल्‍हा भंडारा, येथे भुमापन क्रं 438/1  या वर्णनाची शेत जमीन होती.

    तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचा पती नामे दुर्योधन चिंधू बुध्‍दे  यांचा दिनांक-18.04.2008 रोजी रेल्‍वे अपघातात मृत्‍यु झाला यातील विरुध्‍दपक्ष क्रं- 1 ही विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-2) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्‍ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीच्‍या पतीचा रुपये-1,00,000/- एवढया रकमेचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे काढण्‍यात आला असल्‍याने ती पत्‍नी या नात्‍याने कायदेशीर वारसदार म्‍हणून “लाभार्थी” आहे. पतीचे मृत्‍यू नंतर तिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं-2 तालुका कृषी अधिकारी तुमसर, जिल्‍हा भंडारा  यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव दाखल केला.  विरुध्‍द पक्षाने ज्‍या दस्‍ताऐवजाची मागणी केली त्‍या दस्‍ताऐवजांची पुर्तता तक्रारकर्तीने केली होती. तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांना तिचा प्रस्‍ताव प्राप्‍त होवूनही त्‍यांनी सदर दाव्‍याचे भुगातान न करता तक्रारकर्तीचा विमा दावा विनाकारण प्रलंबित ठेवून तिची फसवणूक केली ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे तकारकर्तीला दिलेली दोषपूर्ण सेवा असून, त्‍यामुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारकर्तीने वकीलामार्फत कायदेशीर नोटीस दिनांक 20/11/2018 रोजी पाठविली. सदर नोटीसला विरुध्‍द पक्षाने उत्‍तरही दिलेले नाही, म्‍हणून शेवटी तिने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्षां विरुध्‍द ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा कडून विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- प्रस्‍ताव सादर केल्‍याच्‍या दिनांकापासून द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह मिळावी तसेच तिला झालेल्‍या त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 20,000/- आणि तक्रार खर्च रुपये-10,000/- अशा रकमांची मागणी विरुध्‍दपक्षा विरुध्‍द केलेली आहे.

03.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनीने आपले लेखी उत्‍तर अभिलेखावर पान क्रं 51 व 52 वर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात असे नमुद केले की, मृतक दुर्योधन चिंधू बुध्‍दे हा शेतकरी होता व त्‍याचा दिनांक 18/04/2008 रोजी  मृत्‍यु झाला याबाबत वाद नाही. परंतु तक्रारकर्तीच्‍या पतीने रेल्‍वे खाली उडी घेवून आत्‍महत्‍या केली त्‍यामुळे ते अपघातात मरण पावले हे म्‍हणणे चूकीचे आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक 21/01/2009 रोजी नामंजूर केल्‍याचे पत्र रजिष्‍टर पोस्‍टाद्वारे तक्रारकर्तीला पाठवून तसे कळविले होते. तक्रारकर्तीने विमा दावा 1 वर्षाच्‍या आंत दाखल करायला पाहिजे होते, परंतु 10 वर्षानंतर प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे ती कालमर्यादेच्‍या बाहेर असल्‍यामुळे खारीज होण्‍यास पात्र आहे. तक्रारकर्तीच्‍या वकीलांनी विरुध्‍द पक्षाला पाठविलेली कायदेशीर नोटीस विरुध्‍द पक्ष विमा कंपनीला मिळालेली नाही.     

04.  विरुध्‍दपक्ष क्रं 2 तालुका कृषी अधिकारी, तुमसर, जिल्‍हा भंडारा यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 23/04/2019 रोजी पारीत करण्‍यात आला.

05.  तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ट क्रं- 09 नुसार एकूण-08 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून ज्‍यामध्‍ये शेतकरी अपघात योजना शासन निर्णय, 7/12 उतारा, 6-ड, मृत्‍यूचे  प्रमाणपत्र, मृतकाचे ओळखपत्र, पोलीस दस्‍तऐवज, शव विच्‍छेदन अहवाल, विरुध्‍द पक्षाला पाठविलेली कायदेशीर नोटीस व पोस्‍टाची पावती अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे. पृष्‍ट क्रं- 53  वर तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या तक्रार अर्जाला  शपथेवरील पुरावा समजण्‍यात यावा अशी पुरसिस दाखल केली असून, पृष्‍ट क्रं-57 नुसार तक्रारकर्तीने लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे. तसेच मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे दाखल केलेत.

06.   विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर अभिलेखावरील पान क्रं 51 व 52 वर दाखल केले. तसेच पुराव्‍याचे शपथपत्र पृष्‍ठ क्रं- 54 व 55  वर दाखल केले. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

07.  तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र,  विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर व शपथपत्र तसेच उभय पक्षाने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे मंचा तर्फे अवलोकन करण्‍यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री देवेद्र हटकर आणि विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती निला नशिने यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे-

             :: निष्‍कर्ष ::

08.  तक्रारकर्तीचा पती शेतकरी होता, त्‍याचा शेतकरी अपघात विमा योजने मध्‍ये समावेश होता व तक्रारकर्तीचे पतीचा मृत्‍यु दिनांक-18/04/2008 रोजी  मृत्‍यु झाला या बाबी उभय पक्षांमध्‍ये विवादास्‍पद नाहीत.

09.  विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने मंचासमक्ष दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात, शपथपत्रात व लेखी युक्तिवादात असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्तीच्‍या  पतीने रेल्‍वे खाली उडी घेवून आत्‍महत्‍या केली आहे व तक्रारकर्तीच्‍या पतीने आत्‍महत्‍या केल्‍यामुळे तक्रारकर्तीला दिनांक 21/01/2009 विमा दावा नामंजूर केल्‍याचे पत्र रजिस्‍टर पोस्‍टाने पाठवून कळविण्‍यात आले होते.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्‍तरात तक्रारकर्तीची तक्रार खारीज करावी असे प्रतिपादन केले आहे. तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु रेल्‍वे अपघातामुळे झाल्‍याचे अभिलेखावर दाखल दस्‍ताऐवजावरुन  स्‍पष्‍ट होते. मृतकाचा विरुध्‍दपक्ष क्रं-2 चे मार्फतीने शेतकरी अपघात विमा योजना सन-2007-08 अंतर्गत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा काढला होता या बाबी प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजांवरुन सिध्‍द होतात आणि या बाबी प्रकरणातील उभय पक्षांना मान्‍य आहेत, त्‍या बाबत विवाद नाही.

10.   महाराष्‍ट्र शासनाचे दिनांक-24  ऑगस्‍ट, 2007 रोजीचे परिपत्रका अनुसार शेतकरी अपघात विमा योजना-2007-2008 या वर्षा करीता राबविली होती आणि त्‍यामध्‍ये अपघाती मृत्‍यू आल्‍यास संबधित शेतक-याचे वारसदारांना रुपये-1,00,000/- विमा संरक्षण देण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्ष ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनीने स्विकारलेली होती. 

11.    सदर प्रकरणांत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीच्‍या लेखी उत्‍तरानुसार तक्रारकर्तीने वि.प.क्रं 2 कडे आवश्‍यक सर्व दस्‍तऐवजांसह विमा दावा एक वर्षाच्‍या आत सादर करावयास हवा होता. तक्रारकर्तीने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍युपासून 10 वर्षानंतर दाखल केला आहे. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने नियम व अटीचे आधिन राहून तक्रारकर्तीचा विमा दावा आत्‍महत्‍या असल्‍याचे कारणावरुन नामंजूर केला ही त्‍यांची कृती कायदेशीर आहे असे विमा कंपनीचे म्‍हणणे आहे. तसेच विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी वर्णन यादीतील पृष्‍ठ क्रं. 60 वर तक्रारकर्तीला रजिस्‍टर पोस्‍टाने पत्र पाठविल्‍याची प्रत दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीने दहा वर्षा नंतर प्रस्‍तुत ग्राहक तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे, त्‍यामुळे ती मुदतबाहय असल्‍याने खारीज होण्‍यास पात्र असल्‍याचे नमुद केले. परंतु तक्रारकर्तीचे असे म्‍हणणे आहे की, तिचा विमा दावा नामंजूर झाल्‍या बाबतचे पत्राची प्रत तिला विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून प्राप्‍त झालेली नाही. तक्रारकर्तीने घेतलेल्‍या सदर आक्षेपा बाबत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने कोणताही लेखी पुरावा ज्‍यामध्‍ये दावा नामंजूर केल्‍याचे पत्र तक्रारकर्तीला मिळाले असल्‍या बाबत रजि. पोच इत्‍यादी प्रकरणात दाखल केलेली नाही. या संदर्भात ग्राहक मंचा तर्फे खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयावर भिस्‍त ठेवण्‍यात येत आहे-

 

Hon’ble N.C.D.R.C. New-Delhi-Revision Petition No.-1179 of 2015 Decided on-01st December, 2015-“Divisional Manager, Oriential Insurance Company-Versus-Damni & 2 others.

 

     उपरोक्‍त नमुद आदरणीय राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, विमा दावा नाकारल्‍याचे दिनांका पासून मुदत सुरु होते. आमचे समोरील प्रकरणात विमा दावा नाकारल्‍याचे पत्र तक्रारकर्त्‍याला दिल्‍या बाबतचा कोणताही पुरावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दाखल केलेला नसल्‍याने सदर न्‍यायनिवाडा आमचे समोरील प्रकरणात अंशतः लागू होतो असे आमचे मत आहे.

12.   दुसरी बाब अशी आहे की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचे पतीने रेल्‍वे समोर उडी घेऊन आत्‍महत्‍या केली त्‍यामुळे अशा प्रकारचा मृत्‍यू हा विमा पॉलिसी अंतर्गत येत नसल्‍याने विमा दावा देय नाही असे कारण दर्शवून तक्रारकर्तीचा विमा दावा  दिनांक-21.01.2009 रोजीचे पत्रान्‍वये नामंजूर केला. परंतु तक्रारकर्तीचे पतीने नेमकी आत्‍महत्‍याच केली होती असा कोणताही प्रत्‍यक्षदर्शी पुरावा (Eye witness) या प्रकरणात केवळ पोलीस दस्‍तऐवजा शिवाय दाखल केलेला नाही त्‍यामुळे तक्रारकर्तीचे पतीने आत्‍महत्‍याच केली होती असा निष्‍कर्ष निघू शकत नाही.

13.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने पोलीस ठाणे तुमसर यांनी त्‍यांचे दिनांक-18.04.2008 अकस्‍मात मृत्‍यू खबरी मध्‍ये मुंडीकोटा तुमसर रोड अप रेल्‍वे लाईनपर एक अनजान व्‍यक्‍तीकी ट्रेनसे कटकर आत्‍महत्‍या कीया है असे जे विधान नमुद केलेले आहे, त्‍या आधारावर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचे पतीने आत्‍महत्‍या केली होती असा निष्‍कर्ष काढून तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केलेला आहे.

14.   पोलीस दस्‍तऐवजाचे आधारे तक्रारकर्तीचे पतीने आत्‍महत्‍या केली होती असा जो निष्‍कर्ष विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने काढलेला आहे त्‍या संदर्भात खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडयांवर ग्राहक मंच आपली भिस्‍त ठेवीत आहे-

 

  1. 2011 (4) CPR-23 (NC) “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Vyakatesh Babu”.

 

       सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्‍ये “FIR as also the statements recorded by police cannot be used by Insurance Company in support of its case”  पोलीसांनी नोंदविलेल्‍या एफआयआरचा उपयोग विमा कंपनीला होणार नाही असे मत नोंदविलेले आहे.

*****

 

2)   2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka”

            सदर प्रकरणात मा.राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी असे नमुद केले की,  पोलीसानीं गुन्‍हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्‍हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचा तर्फे जबाब देणा-याची साक्ष घेतल्‍या जात नाही असे मत नोंदविले.

*****

       उपरोक्‍त नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे हातातील प्रकरणात अंशतः लागू पडतात असे ग्राहक मंचाचे मत आहे.

15.      याशिवाय तक्रारकर्तीचे वकीलांनी आत्‍महत्‍ये संदर्भात खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडयांवर आपली भिस्‍त ठेवली-

 

  1. Hon’ble State Commmission, Circuit Bench Aurangabad-FA No-427/2011, decided on-21/11/2011-“United India Insurance Company-Versus-Sumanbai W/o Rangarao Mugal & others.

 

  1.  Hon’ble Kerla State Commmission, Thiruvanantharpuram-Appeal No-311/2013, decided on-30/04/2014-“”Moothodi Ayathar S/o Madhavan-Verus-The Keral Fishermens Welfare Fund Board & others”

 

  1. Hon’ble State Commmission, Punjab, Chandigarh-FA No-1406/2006, decided on-10/06/2011-“ National Insurance Company Ltd.-Versus- Gurmail Kaur”

 

  1. Hon’ble State Commmission, Mumbai-Compalint Case No.-CC/326/2001, decided on-20/10/2011-“Smt. Mangal Ramesh Sontakke-Versus-National Insurance Company Ltd.”.

 

 

  1. Hon’ble State Commmission, Circuit Bench Nagpur-FA No-205/2013, decided on-24/04/2017-“National Insurance Company-Versus-Smt. Sushila Dnyneshwarrao Bobade & others”

 

       उपरोक्‍त नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडयांचे आम्‍ही काळजीपूर्वक अवलोकन केले, त्‍यामध्‍ये केवळ पोलीसांचे दसतऐवजांचे आधारावरुन आत्‍महत्‍या केली असा निष्‍कर्ष काढता येत नाही तयासाठी सक्षम असा पुरावा समोर येणे आवश्‍यक असल्‍याचे मत नोंदविलेले आहे.

 

    उपरोक्‍त अनुक्रमांक-5 मधील नमुद मा.राज्‍य ग्राहक आयोग, महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई यांनी प्रथम अपिल क्रं-205/2013 आदेश पारीत दिनांक-24 एप्रिल, 2017 मध्‍ये दिलेल्‍या न्‍यायनिवाडयात पुढील प्रमाणे मत नोंदविलेले आहे.

”If a person is walking along the railway track and he is given dash by moving  railway engine that cannot be a criminal act on the part of a person moving along the railway line. No criminal act is involved. The Insurance Company had not registered any offence under Indian Railway Act against the deceased and therefore, on that ground Insurance Company cannot be permitted to say that it was not an accidental death but it was death due to criminal act of the deceased himself. There is no merit in the contention made in that behalf by Advocate for the Opponent Insurance Company.

     मा.राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी उपरोक्‍त नोंदविलेले मत हातातील प्रकरणात लागू पडते असे ग्राहक मंचाचे मत आहे.

 

16.   उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ती ही तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- तक्रार दाखल  दिनांक-20/12/2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीकडून मिळण्‍यास पात्र आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त)  विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीकडून तक्रारकर्तीला मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-(2) तालुका कृषी अधिकारी, तुमसर जिल्‍हा भंडारा यांनी कोणती दोषपूर्ण सेवा दिली असे तक्रारकर्तीचे म्‍हणणे नाही त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.

17.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                          :: आदेश ::

 

(01)  तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी, नागपूर यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02) विरुध्‍दपक्ष 1 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे  अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्‍त) तक्रार दाखल दिनांक-20/12/2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह तक्रारकर्तीला द्यावी.

(03) विरुध्‍दपक्ष क्रं. 1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या  मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.

(04)  विरुध्‍दपक्ष -(2) तालुका कृषी अधिकारी, तुमसर,जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने न केल्‍यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्‍ये नमुद केलेली देय विमा राशी मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारकर्तीला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी जबाबदार राहिल.

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.