द्वारा – श्रीमती. स्नेहा म्हात्रे, अध्यक्षा
तक्रारदार पुकारले असता गैरहजर. सामनेवाले 1 यांचेतर्फे वकील श्री.सचिन राजे यांचेतर्फे वकील श्री. धनाजी देसाई हजर. सामनेवाले 2 पुकारले असता गैरहजर. तक्रारदारांनी दाखल केलेल्या विलंब माफीच्या अर्जावर सामनेवाले 1 यांनी दि.01/01/2021 रोजी त्यांचे म्हणणे (Affidavit-in-Reply) दाखल केले असून सामनेवाले क्र. 2 यांचे म्हणणे आयोगाच्या आवक कक्षात दि. 11/03/2020 रोजी आवक क्र.173 अन्वये प्राप्त झाले आहे. सदर प्रकरणामध्ये तक्रारदार तसेच सामनेवाला 1 यांच्या वकीलांचा दि. 17/11/2021 रोजी युक्तिवाद ऐकण्यात आला. सदर प्रकरणामध्ये नमूद तक्रारदार हे शेतकरी कुटुंबातील असून अशिक्षित व आर्थिकदृष्टया दुर्बल असल्याने सदर योजनेबाबत त्यांना माहित झाल्यावर प्रस्तूत तक्रार दाखल करणेकामी झालेला 07 वर्ष 08 महिने व 22 दिवसांचा विलंब माफ करण्यात यावा असा अर्ज तक्रारदारांनी दाखल केला आहे.
(2) सामनेवाले 1 यांनी त्यावर म्हणणे दाखल करुन त्यांचा आक्षेप नोंदविला असून सदर विलंबा बाबतचे ठोस कारण तसेच सदर विलंब झाल्याबाबतचा प्रत्येक दिवसाचा तपशिल तक्रारदारांनी दिला नसल्याने तक्रारदारांचा प्रस्तूत अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद सामनेवाले 1 यांनी केला आहे.
(3) सामनेवाला 2 यांनी, तक्रारदारास तक्रार दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत त्यांच्या म्हणण्यामध्ये कोणताही आक्षेप घेतल्याचे दिसून येत नाही. परंतु शासन निर्णयानुसार, तालुका कृषि कार्यालयाने कागदपत्रे जमा करुन एसीओ कार्यालय, अहमदनगर तसेच कबाल ब्रोकींग कंपनी मुंबईमार्फत सामनेवाला 1 यांचेकडे विहीत मुदतीत पाठविली आहेत. तसेच
4.Therefore, in the said matter the opponent no 1 has to sanction the claim proposal as guidelines of Government Resolution and Agreement made between opponent no 1 &2.
5. There is humble request of opponent no 2 that there is no any fault on the part of the opponent no 2 therefore there is no need of making party to us.
असे नमूद केले आहे.
(4) तक्रारदाराचे वकीलांनी सदर प्रकरणात नमूद विमा दावा सामनेवाले 1 विमा कंपनीने नाकारल्याबाबत तक्रारदारांना कळविले नसल्याचे युक्तिवाद केला. सामनेवाले 1 यांनी त्यांच्या म्हणण्यासह सदर दावा नाकारल्याबाबत सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना कळविल्या असल्याबाबतचे कागदपत्रे अभिलेखावर दाखल केल्याचे दिसून येत नाही. तसेच विलंब माफीच्या अर्जात नमूद कारण पाहता तसेच प्रस्तूत तक्रार गुणवत्तेवर निकाली काढणे संयुक्तिक असल्याचे आयोगाचे मत असल्याने तसेच शेतकरी अपघात योजना ही महाराष्ट्र शासनाने ज्या शेतकरी कुटुंबातील शेतक-याचा मृत्यु अपघाताने झाला आहे त्याच्या वारसांना शासना तर्फे आर्थिक मदत देण्याचे हेतुने सुरु केले असल्याने त्यामधील सामाजिक हेतु लक्षात घेता प्रस्तूत प्रकरणामधील विलंब माफीचा अर्ज त्यामधील वर नमूद केल्याप्रमाणे विलंब न्यायहिताचे दृष्टीने माफ करुन मंजूर करण्यात येतो. पुढील तारीख तक्रार दाखल सुनावणीकामी पु.ने.ता.23/02/2022.