निकालपत्र :- (दि.28.09.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, सामनेवाला विमा कंपनीचे वकिलांनी युक्तिवाद केला. तक्रारदार गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांच्या मालकीची हिरो होंडा नं. एम्.एच्.09 एई 0299 या वाहनाचा सामनेवाला विमा कंपनीकडे दि.27.07.2005 ते दि.26.07.2006 या कालावधीकरिता विमा उतरविला होता. सदर विमा कालावधीमध्ये दि.30.07.2005 रोजी सदर वाहन तक्रारदारांच्या घराजवळ लावलेले असताना चोरीस गेले आहे. त्याबाबत शाहुवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली होती. सामनेवाला विमा कंपनीकडे सदर विमा क्लेमची मागणी केली असता त्यांनी तक्रारदारांचा सदरचा क्लेम नाकारला आहे. सबब, गाडीची किंमत रुपये 32,000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व दाव्याचा खर्च रुपये 1,000/- देणेचा आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत इन्श्युरन्स पॉलीसी, रिजेक्शन लेटर इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारीत उल्लेख केलेल्या वाहनाचा सामनेवाला यांचेकडे विमा उतरविला होता. परंतु, वाहन चोरीस गेले त्यावेळेस ते लॉक केलेले नव्हते. त्यामुळे अटी व शर्तीनुसार तक्रारदारांच्या क्लेम देय होत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत पॉलीसी, तक्रारदारांचे दि.08.01.2007 रोजीचे पत्र, पोलीसांकडील तक्रार, पोलीसांकडील ए समरी रिपोर्ट, तक्रारदारांनी हँडल लॉक न केलेबाबतचे पत्र इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे तसेच सामनेवाला यांच्या वकिलांचे युक्तिवाद यांचे अवलोकन केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेल्या वाहनावर सामनेवाला विमा कंपनीने पॉलीसी दिली होती. तसेच, सदरचे वाहन दि.30.07.2005 रोजी चोरीस गेले आहे व त्याबाबत शाहुवाडी पोलीस स्टेशनकडे तक्रार नोंदविली आहे. इत्यादी बाबी निर्विवाद आहेत. या मंचाने पोलीस अॅथॉरिटीकडील कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनीला दिलेल्या पत्रामध्ये ‘गाडीचे हँडल लॉक नादुरुस्त असलेमुळे ते बसत नव्हते. तरी अर्जाचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा’ अशी विनंती केली आहे. तसेच, या मंचाने पॉलीसीतील अट क्र.4 चे अवलोकन केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेल्या वाहनास लॉक केले नसल्याने वाहन चोरीस गेले असल्याने सदर अटीचा भंग होत आहे. इत्यादी विवेचनाचा विचार करता सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारुन त्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येते. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाही. 3. सदरचा आदेश ओपन कोर्टात अधिघोषित करणेत आला.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |