Maharashtra

Nashik

CC/47/2011

Dyaneshwar Narhari Chandvadkar - Complainant(s)

Versus

Oriental insuarnce - Opp.Party(s)

Deepa Talreja

29 Sep 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/47/2011
 
1. Dyaneshwar Narhari Chandvadkar
Mainroad,nashik
...........Complainant(s)
Versus
1. Oriental insuarnce
Satpur,nashik
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:Deepa Talreja, Advocate for the Complainant 1
 
ORDER

        

 

           (मा.अध्‍यक्ष, श्री.आर.एस.पैलवान  यांनी निकालपत्र पारीत केले)

 

                      नि  का      त्र                             

               

      अर्जदार यांना गाडीचे नुकसानीपोटी सामनेवाला यांचेकडून रक्‍कम रु.2 लाख रुपये मिळावेत शारिरीक मानसिक त्रासापोटी रु.25,000/- मिळावेत, अर्जाचे खर्चापोटी रु.5000/- मिळावेत, वरील सर्व रकमेवर द.सा.द.शे.21 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.

     सामनेवाला यांनी पान क्र.27 लगत लेखी म्‍हणणे, पान क्र.28 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.

     अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढील प्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.

1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? - होय.

2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केली आहे काय?- होय.

3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्‍लेमपोटी व्‍याजासह रक्‍कम वसूल होवून

   मिळण्‍यास पात्र आहेत काय?- होय.

4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम

   वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत काय?- होय.

5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज  सामनेवाला यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर

   करण्‍यात येत आहे.

विवेचन

     या कामी अर्जदार यांचे वतीने अँड.श्रीमती डी.एल.तलरेजा यांनी युक्‍तीवाद केलेला आहे.  सामनेवाला यांचेवतीने अँड श्रीमती एस.एस.पुर्णपात्रे यांनी युक्‍तीवाद केलेला आहे तसेच सामनेवाला यांनी पान क्र.43 लगत लेखी युक्‍तीवाद सादर केलेला आहे.

     सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व प्रतिज्ञापत्रामध्‍ये, त्‍यांनी अर्जदार यांना दि.23/11/2009 ते दि.22/01/2010 या कालावधीसाठी विमापॉलीसी दिलेली आहे ही बाब मान्‍य केलेली आहे.  अर्जदार यांनी या कामी पान क्र.6 लगत विमापॉलीसी सर्टिफिकेट हजर केलेले आहे.  पान क्र.6 चे कागदपत्रे व सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

     सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व प्रतिज्ञापत्रामध्‍ये वादातील वाहन सामनेवालाकडे टॅक्‍सी म्‍हणून संरक्षीत केलेले आहे.  वाहनचालकाजवळ लाइट मोटर व्‍हेईकल लायसन्‍स असावे लागते व त्‍यावर ट्रान्‍सपोर्ट अशी नोंदही असणे गरजेचे असते.  अपघाताचे वेळी गंगाधर वाघचौरे हे ड्रायव्‍हींग करीत होते व त्‍यांना टॅक्‍सी चालवण्‍याचा वाहन योग्‍य तो परवाना नव्‍हता, वाहन परवान्‍यावर योग्‍य त्‍या नोंदी नोंदी नव्‍हत्‍या व नाहीत. त्‍यामुळे विमापॉलीसीच्‍या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे, सेवा देण्‍यात कमतरता केलेली नाही. असे म्‍हटलेले आहे.

     या कामी अर्जदार यांनी पान क्र.17 लगत वाहनचालकाचे लायसन्‍सची झेरॉक्‍स प्रत हजर केलेली आहे.  या लायसन्‍सवरती लाईट मोटर व्‍हेयीकल नॉन ट्रान्‍सपोर्ट असा शेरा आहे.  परंतु पान क्र.14 लगतचे पोलीसांचेकडील फिर्यादीमध्‍ये अर्जदार यांचे टाटा सुमो गाडीस समोरुन येणा-या वाहनाने हुलकावणी दिल्‍यामुळे अपघात झाला आहे असा उल्‍लेख आहे.  तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेले पान क्र.39 च्‍या सर्व्‍हे अहवालामध्‍येही समोरुन येणारे वाहन रॅश पध्‍दतीने आले व त्‍यामुळे अपघात झाला असाच उल्‍लेख आहे.  याचा विचार करता अर्जदार यांचे अपघातग्रस्‍त वाहनावरील ड्रायव्‍हर यांचे चुकीमुळे अपघात झालेला नाही ही बाब स्‍पष्‍ट होत आहे.  अपघाताचे कारणांचा विचार होता अपघाताचे वेळी अर्जदार यांचे वाहनचालकास कोणत्‍या प्रकारचे लायसन्‍स होते हा मुद्दा महत्‍वाचाच नाही असे दिसून येत आहे. 

 वास्‍तविक पोलीसांचेकडील फिर्याद व सर्व्‍हे अहवाल यामध्‍ये अपघाताचे जे कारण दिलेले आहे त्‍याचा विचार करुन सामनेवाला यांनी अर्जदार यांचा योग्‍य तो विमाक्‍लेम मंजूर करणे गरजेचे होते.  वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांचा विमाक्‍लेम अयोग्‍य व चुकिचे कारण देवून नाकारलेला आहे व त्‍यामुळे सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. 

     सामनेवाला यांनी पान क्र.39 लगत आर.व्‍ही.दिक्षीत यांचा सर्व्‍हे अहवाल दाखल केलेला आहे.  या अहवालामध्‍ये पान क्र.5 वरती लायबिलीटी ऑन रिपेयर बेसीस या ठिकाणी रु.2,10,627/- अशी नुकसान भरपाई दर्शवली आहे.  याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून अपघातग्रस्‍त वाहनाचे नुकसान भरपाईपोटी अर्जातील मागणीप्रमाणे रक्‍कम रु.2,00,000/- इतकी रक्‍कम वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

     सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांना रक्‍कम रु.2,00,000/- इतकी मोठी रक्‍कम योग्‍य त्‍या वेळेत मिळालेली नाही. यामुळे अर्जदार यांना निश्‍चीतपणे आर्थीक नुकसान सहन करावे लागले आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून आर्थीक नुकसान भरपाई म्‍हणून मंजूर रक्‍कम रु.2 लाख या रकमेवर पान क्र.39 चे सर्व्‍हे रिपोर्टची तारीख दि.05/08/2010 पासून दोन महिन्‍यानंतर म्‍हणजे दि.06/10/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

     याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्‍ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे.

 

1)     2 (2008)  सी.पी.जे.  राष्ट्रीय आयोग.  पान क्र.186.  ओरीएंन्टल इंन्शुरन् कंपनी  विरुध्   राजेंद्रप्रसाद बंन्सल.

2)     1 (2008)  सी.पी.जे.  राष्ट्रीय आयोग.  पान क्र.265. संजीवकुमार   विरुध् न्यु  इंडिया  इंन्शुरन् कंपनी.

 

     सामनेवाला यांचेकडून विमाक्‍लेमची रक्‍कम वसूल होवून मिळावी म्‍हणून अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्‍द या मंचामध्‍ये दाद मागावी लागली  आहे.  वरील सर्व कारणामुळे निश्‍चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे.  याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्‍कम वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाला यांनी या कामी पान क्र.40 लगत  पुढीलप्रमाणे वरीष्‍ठ कोर्टाची निकालपत्रे हजर केलेली आहेत.

1) 2(2009) सि.पी.जे.  सर्वोच्‍च न्‍यायालय.  पान 89.  नॅशनल इन्‍शुरन्‍स

कं. लि.  विरुध्‍द   जे महेशवर्मा 

3)     1(2008) ए. सी. सी.  सर्वोच्‍च न्‍यायालय.   पान 54.   न्‍यु इंडिया

अँश्‍युरन्‍स कं  लि.   विरुध्‍द   प्रभु लाल

4)     4(2010) सि.पी.जे.  सर्वोच्‍च न्‍यायालय.  पान 38.  सुरजमल रामनिवास

ऑईलमिल्‍स प्रा लि.   विरुध्‍द   युनायटेड इं.इन्‍शुरन्‍स कं. लि.

 

     परंतु सामनेवाला यांनी दाखल केलेले व वर उल्‍लेख केलेले वरीष्‍ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्‍तुतचे तक्रार अर्जामधील हकिकत यामध्‍ये फरक आहे.  प्रस्‍तुत तक्रार अर्जामध्‍ये अपघातग्रस्‍त वाहनावरील ड्रायव्‍हरचे चुकीमुळे अपघात झालेला नाही ही बाब स्‍पष्‍ट झालेली आहे.  यामुळे वर उल्‍लेख केलेली वरीष्‍ठ कोर्टाची निकालपत्रे या कामी लागु होत नाहीत.

     अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्‍तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, प्रतिज्ञापत्र, त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा व लेखी युक्‍तीवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेली वरीष्‍ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेः

                            आ दे श

 

1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2) आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाला यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्‍यातः

अ) विमा क्‍लेमपोटी रक्‍कम रु.2,00,000/- व आर्थीक नुकसान भरपाई  

म्‍हणून या मंजूर रकमेवरती दि.06/10/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत

द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

ब) मानसिक त्रासापोटी रु.15,000/- द्यावेत.

क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत

3) वरीलप्रमाणे संपुर्ण रक्‍कम मिळालेनंतर तेथून पुढे 8 दिवसांचे आत अपघातग्रस्‍त वाहनाचे सॅलव्‍हेज अर्जदार यांनी स्‍वखर्चाने सामनेवाला यांचे या अर्जात दिलेल्‍या पत्‍त्‍यावर पोहोच करावे.

 

            

 

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.