Maharashtra

Nashik

CC/137/2011

Narayan dadasaheb Gadakh - Complainant(s)

Versus

Oriental insuarnce co.Ltd - Opp.Party(s)

Sandip Kadam

29 Sep 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/137/2011
 
1. Narayan dadasaheb Gadakh
Devpur Sinnar,nashik
...........Complainant(s)
Versus
1. Oriental insuarnce co.Ltd
Pumping station road,Gangapur road,nashik
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:Sandip Kadam, Advocate for the Complainant 1
 
ORDER

(मा.सदस्‍या अँड.सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी  यांनी निकालपत्र पारीत केले)

 

                      नि  का      त्र                             

                            

      अर्जदार यांची आई इंदुबाई दादा गडाख या दि.29/09/09 रोजी भाजल्‍यामुळे त्‍यांना औषधोपचाराकामी दाखल केले असता दि.30/09/09 रोजी मयत झाल्‍या. अर्जदार यांना शेतकरी अपघात विमा योजनेप्रमाणे सामनेवाले यांनी लाभ दिल्याने सदरचा अर्ज दाखल करावा लागलेला आहे. सबब अर्जदार यांना सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- दि.30/11/2009 पासून 15% व्याजदराने मिळावे, तसेच मानसिक,शारिरीक आर्थिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावेत या मागणीसाठी सदर अर्ज दाखल केलेला आहे.

 

 

 

 

                                              तक्रार क्र.137/2011

सामनेवाला क्र.1 यांनी त्‍यांचा जबाब पान क्र.19 लगत  व प्रतिज्ञापत्र पान क्र.20 लगत दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी त्‍यांचा जबाब पोष्‍टाद्वारे पाठवला असून तो पान क्र.14 लगत दाखल केलेला आहे.

अर्जदार यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्‍हणणे  त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः

मुद्देः

1.    अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय

2.    सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय? -- होय. सामनेवाले क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे.

3.    अर्जदार हे सामनेवाले क्र.1 यांचेकडून विमा क्लेमची रक्कम व्याजासह

     मिळण्यास पात्र आहेत काय? -- होय

4.    अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून मानसिक त्रासापोटी अर्जाचे खर्चापोटी

      रक्कम मिळणेस पात्र आहेत काय? -- होय

5.    अंतीम आदेश?  -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज  सामनेवाले क्र.2 विरुध्द नामंजूर

     करणेत येत आहे सामनेवाले क्र.1 विरुध् अंशतः मंजूर करण्यात येत आहे.            

विवेचनः

याकामी अर्जदार सामनेवाले यांचा युक्तीवाद ऐकला.         

      महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरीता दि.5/8/2008 चे परिपत्रकाप्रमाणे शेतकरी व्यक्तीगत अपघात संरक्षण विमा योजना सुरु केलेली आहे. त्याचा कालावधी दि.15/8/2008 ते दि.14/8/2009 असा होता.  सामनेवाले क्र.1 यांनी शेतकरी अपघात विमा योजना प्रस्ताव स्विकारलेला आहे.    

सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे पोष्टामार्फत दाखल केले आहे. सदर जबाब पाहता त्यामध्ये सामनेवालेची भूमिका अत्यंत जुजबी आहे, यामध्ये शेतक-यांचा विमादावा अर्ज तहसिलदारांमार्फत आल्यावर दावा अर्ज योग्यपणे भरलेला आहे काय? सोबत जोडलेली कागदपत्रे मागणीप्रमाणे आहेत काय? नसल्यास तहसिलदार यांना कळवून त्यांची पूर्तता करवून घेणे, त्यानंतर विमा कंपनीकडे पाठविणे, विमा कंपनीकडे दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबंधीत वारसांना देणे ही कामे आहेत. यासाठी सामनेवाले हे राज् शासन वा शेतकरी यांचेकडून कोणताही

 

                                              तक्रार क्र.137/2011

मोबदला घेत नाही असे नमूद  आहे. याचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध् नामंजूर करणेत यावा असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी जबाबात सदर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना नाकारलेली नाही. सदर पॉलिसी ही  शेतक-यांकरीता विमा योजनेंतर्गत घेतलेली होती ही बाब मान् केलेली आहे. अर्जदार हा मयत इंदुबाई दादा गडाख यांचा मुलगा आहे  ही बाब सामनेवालेंनी नाकारलेली नाही. सामनेवाले यांचे लेखी म्हणणे त्यामधील कथनावरुन अर्जदार हे मयतचे वारस म्हणून सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे

सामनेवाले क्र.1 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये घेतलेल्‍या बचावामध्‍ये, अर्जदार हे सामनेवालेंचे ग्राहक नाहीत. अर्जदाराकडून मयताचे मृत्‍युबाबतचा पोलिसांकडील अंतीम अहवाल व इतर महत्‍वाची कागदपत्रे दि.14/2/2011, दि. /2011 व दि.11/03/2011 चे पत्राने मागणी केलेली आहे.  त्‍याची पुर्तता अर्जदार यांनी कधीच केली नाही. त्‍यामुळे पॉलीसीच्‍या अटी व शर्तीनुसार सदर नुकसान भरपाई देण्‍याबाबत सामनेवाला जबाबदार नाहीत, सबब अर्जदाराचा अर्ज रद्द करावा. असे नमूद केलेले आहे.

अर्जदार यांनी अपघाताचेबाबत पोलिसांकडील कागदपत्रे दाखल केलेली आहेत. या कागदपत्रांमध्‍ये पान क्र.5 लगत दाखल खबरमध्‍ये मयत इंदुबाई दादा गडाख या राहाते घरी 90टके जळाल्‍याने औषधोपचार चालु असतांना त्‍यांचा मृत्‍यु झाला असल्‍याचे नमूद आहे. मयताचा पोष्‍ट मार्टेम रिपोर्ट पान क्र.15 लगत  दाखल केलेला आहे.त्‍यामध्‍ये मयताच्‍या मृत्‍युचे कारण shock due to 90 % burn असे नमूद केलेले आहे. यावरुन मयताचा मृत्‍यु जळाल्‍याने झालेला आहे हे  स्‍पष्‍ट होत आहे. 

परंतु याबाबत सामनेवाले यांनी, असा बचाव घेतला आहे की अर्जदार यांनी मयताचे मृत्‍युबाबतचा पोलिसांकडील अंतीम अहवाल व इतर महत्‍वाची कागदपत्रे दि.14/2/2011, दि. /2011 व दि.11/03/2011 चे पत्राने मागणी केलेली आहे.  त्‍याची पुर्तता अर्जदार यांनी कधीच केली नाही. त्‍यामुळे पॉलीसीच्‍या अटी व शर्तीनुसार सदर नुकसान भरपाई देण्‍याबाबत सामनेवाला जबाबदार नाहीत. याबाबत शासन परिपत्रकाचा विचार होता अर्जदाराने विमाक्‍लेमचा प्रस्‍ताव संबंधीत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सादर करुन त्‍यांनी तो सामनेवाला क्र.2 कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी यांचेकडे देवून त्‍यांनी तो प्रस्‍ताव सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे द्यावयाचा आहे.  अर्जदार यांनी स्‍वतंत्रपणे विमा कंपनीकडे प्रस्‍ताव करावयाची आवश्‍यकता नाही. विमा कंपनीस कागदपत्रांची आवश्‍यकता भासल्‍यास त्‍यांनी सदर कागदपत्रे

 

                                              तक्रार क्र.137/2011

कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीकडे मागणी करुन त्‍याबाबतची पुर्तता करावयाची आहे. याबाबत शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रकानुसार पान क्र.3 कलम 10 यामध्‍ये शासन निर्णयासोबत नमूद केलेली कागदपत्र शेतक-याने स्‍वतंत्रपणे सादर करण्‍याची आवश्‍यकता नाही. विमा प्रस्‍तावासंदर्भात काही अपवादात्‍मक परिस्थितीमध्‍ये काही कागदपत्रे सादर करावयाची राहिल्‍यास पर्यायी कागदपत्रे किंवा चौकशीच्‍या आधारे प्रस्‍तावाचा निर्णय घेण्‍यात यावा.  याचा विचार होता सामनेवाला यांचे बचावात तथ्‍य नाही.

पोलीस कागदपत्र व पोस्‍टमार्टेम रिपोर्ट यांचा विचार होता मयताचा मृत्‍यु हा जळून झालेला दिसत आहे. सदर मृत्‍युची घटना ही अपघाती कारणानेच झालेली आहे. सदर मृत्‍युचे कारण हे पॉलीसीप्रमाणे इतर अपघात या कलमामध्‍ये येत असल्‍याने सदर घटना ही पॉलीसी अंतर्गत येते असे मंचाचे मत आहे. याबाबत शासन परिपत्रकानुसार महाराष्‍ट्र शासनाने शेतक-यांचा शेती व्‍यवसाय करतांना होणारे रस्‍त्‍यावरील अपघात, विज पडणे, पूर,सर्पदंश इ. नैसर्गिक आपत्‍तीमुळे होणारे अपघात किंवा अन्‍य कोणतेही अपघात यामुळे शेतक-यांना मृत्‍यू किंवा अपंगत्‍व ओढवल्‍यास अपघातग्रस्‍त कुटुंबास आर्थिक लाभ देण्‍याकरीता सदरची विमा योजना केलेली आहे. या योजनेप्रमाणे सदर अर्जदार हे विमा क्‍लेम मिळणेस पात्र आहेत

सदर अपघाताबाबत अर्जदार यांनी तालुका कृषी अधिकारी, सिन्‍नर यांचेकडे कागदपत्रांची पूर्तता करुन प्रस्‍ताव दाखल केला आहे. यावरुन अर्जदार यांनी विमा क्‍लेमची पूर्तता केलेली दिसत आहे. अर्जदाराने पान क्र.9 लगत 7/12, खाते उतारा व हक्‍काचे पत्रक गा.नं.6 ची झेरॉक्‍स प्रती  दाखल केलेल्‍या आहेत. यावरील नोंद पाहता मयत इंदुबाई दाद गडाख हे अपघाताचेवेळी व विमा कराराचेवेळी शेतकरी होते असे स्‍पष्‍ट होत आहे.

शासन परिपत्रकाचा व कागदपत्रांचा व वरील सर्व कारणांचा विचार होता  सामनेवाले यांना अर्जदार यांचा क्‍लेम अद्यापपावेतो न देवून सामनेवाले क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्‍हणणे तसेच अर्जदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे विचारात घेतली असता शेतकरी अपघात विमा योजनेनुसार शेतक-याचा मृत्‍यू झाल्‍यास रु.1,00,000/-ची विमा जोखीम घेण्‍यात आली,  दावा रकमेवर व्‍याज मिळणेस अर्जदार हे पात्र आहेत. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून विमा क्‍लेमपोटी रक्‍कम रु.1,00,000/- व या रकमेवर तक्रार अर्ज दाखल

 

 

                                              तक्रार क्र.137/2011

तारखेपासून म्‍हणजेच दि.21/4/2011 पासून संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज अशी एकूण रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांनी सामनेवालेकडून मानसिक त्रासापोटी व खर्चाचे रकमेची मागणी केलेली आहे.  वास्‍तविक वर उल्‍लेख केलेल्‍या महाराष्‍ट्र शासनाच्‍या परिपत्रकानुसार सामनेवाले यांनी कोणत्‍याही तांत्रिक बाबींचा आधार न घेता अर्जदाराचा विमा क्‍लेम योग्‍य त्‍या वेळेत मंजूर करणे गरजेचे होते.  विमा क्‍लेमची रु.1,00,000/- इतकी मोठी रक्‍कम अर्जदार यांना योग्‍य वेळेत मिळालेली नाही.  विमा क्‍लेमची रक्‍कम मिळावी म्‍हणून अर्जदार यांना सामनेवालेकडून या मंचात दाद  मागावी लागलेली आहे. वरील कारणांमुळे निश्चितपणे अर्जदारास मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्‍यास खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

याकामी मंचाचेवतीने पुढीलप्रमाणे वरिष्‍ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेणेत आलेला आहेः

     1. मा. उच्‍च न्‍यायालय, मुंबई, शकुंतला धोंडीराम मुंडे वि. स्‍टेट ऑफ    

        महाराष्‍ट्र व इतर (2010(2)Mh.L.J.)

 2. 2008(2) सीपीआर महाराष्‍ट्र आयोग पान 203 आय.सी.आय.सी.आय 

    लोंबार्ड  वि. सिंधुताई खैरनार

3. 2(2008) ए.सी.सी. मुंबई  उच्‍च न्‍यायालय पान 888 निर्मलाबाई विरुध्‍द 

   महाराष्‍ट्र सरकार.

वरील निकालपत्रांत शेतकरी अपघात विमा योजनेबाबत विचार करुन निर्णय देण्‍यात आलेला आहे.  यामुळे या निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.

अर्जदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्‍तीवाद तसेच सामनेवाले क्र.1 यांचे लेखी म्‍हणणे, दाखल केलेली कागदपत्रे, वर उल्‍लेख केलेली व आधार घेतलेली वरिष्‍ठ कोर्टाची निकालपत्रे व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेः

                              आ दे श

1)     अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध्‍द नामंजूर करण्‍यात येत आहे.

2)     अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

 

                                            तक्रार क्र.137/2011   

3)     आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाले क्र. 1 यांनी अर्जदारास खालीलप्रमाणे रक्‍कम दयावीः

अ.          विमा क्‍लेमपोटी रक्‍कम रु.1,00,000/-व या रकमेवर दि.14/06/2011

    पासून द.सा.द.शे. 12% दराने संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत व्‍याज दयावे.

ब.  मानसिक त्रासापोटी रु.5,000/- दयावेत.

क.  अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- दयावेत.

 

 

 

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.