जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 776/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-23/06/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 12/06/2013.
शालीक सिताराम पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः शिक्षक,
रा.कु-हाकाकोडा, ता.मुक्ताईनगर,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. दि.ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनी लि,
1.हॉल क्र.जी व एच सेंट्रल फुले मार्केट, जळगांव.
2. जळगांव जिल्हा माध्यमीक शिक्षक व
इतर नोकरांची नागरी सह.पतपेढी मर्या,जळगांव, माध्यमीक शिक्षक
सदन, जिल्हापेठ,जळगांव, ता.जि.जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.विजय रा.महाजन वकील.
विरुध्द पक्ष क्र. 1 तर्फे श्रीमती चारुशिला एस.कुलकर्णी वकील.
विरुध्द पक्ष क्र. 2 तर्फे श्री.विशाल सुरेश सोनवणे वकील.
निकालपत्र
नि.क्र.1 खालील आदेश व्दाराः श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः विरुध्द पक्षाने तक्रारदारास विमा क्लेम देण्याचे नाकारुन केलेल्या सेवेतील त्रृटी दाखल प्रस्तुत तक्रार या मंचासमोर दाखल केली होती. तक्रारदार यांचे युक्तीवादाकरिता नेमलेली तारीख 12/06/2013 रोजी तक्रारदाराचे वकील या मंचासमोर हजर झाले व तक्रारदार हे मयत झालेले असुन त्यांचे वारसांनी मयतापासुन मिळणारे फायदे घेतलेले असल्याने सदरचे प्रकरण पुढे चालवायचे नाही अशी विनंती पुरसीस देऊन तक्रार प्रकरण काढुन टाकण्यात यावेत अशी विनंती केली. सबब तक्रारदाराचे विनंती पुरसीस नुसार प्रस्तुत तक्रार काढुन टाकण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 12/06/2013. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.