Maharashtra

Additional DCF, Thane

CC/10/83

Smt.Radhaben Mangaldas Thakkar - Complainant(s)

Versus

Oriental bank of commerce, - Opp.Party(s)

Dinesh Kumar Gupta

11 Mar 2011

ORDER


Consumer FroumThane Additional District Consumer Disputes Redressal Forum, Konkan Bhavan CBD Belapur, Navi Mumbai
CONSUMER CASE NO. 10 of 83
1. Smt.Radhaben Mangaldas Thakkar43-401,1st floor,plot no.19/9A,FAM CHS,Sector-11,Koparkhairne, 400709Navi MumbaiMaharastra ...........Appellant(s)

Vs.
1. Oriental bank of commerce,Plot. no.110,Shabi Complex,Sector-12,Vashi 400703Navi MumbaiMaharastra2. Union Bank of India.66/80, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai-400023Thane AdditionalMaharastra3. The Reserve Bank of IndiaBhagat Singh Marg Fort MumbaiThane AdditionalMaharastra ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 11 Mar 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

-ः निकालपत्र ः-

 

द्वारा- मा.सदस्‍या, सौ.मांधळे.

 

 

 

 

तक्रारकर्तीचे कथन खालीलप्रमाणे

         तक्रारकर्ती ही जेष्‍ठ नागरीक असून, नवी मुंबई ,येथील रहिवासी आहे. ती आपल्‍या उदरनिर्वाहासाठी शेअर्सचा खरेदी विक्री चा व्‍यवसाय करते.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 हया बॅका आहेत. तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांच्‍याकडे बॅक खाते उघडले होते.  त्‍याप्रमाणे त्‍यांनी, त्‍यांना बॅक खाते क्रमांक व पासबुक दिलेले होते. त्‍यांचा चालू खाते क्रमांक 11202314059 असा होतो. विरुध्‍दपक्ष  नियमीतपणे दरमहा त्‍यांच्‍या खात्‍याचे मासिक विवरणपत्र  देत होते. विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 ही विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांच्‍याशी बॅक व्‍यवहारासाठी संलग्‍न होती.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 3 यांच्‍या मार्गदर्शनाप्रमाणे व नियमावलीप्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 काम करीत होते. 

    तक्रारकर्ती पुढे म्‍हणते की. तीने दिनांक 11.9.07 रोजी धनादेश क्रमांक 302505 रुपये 97,500/- चा Escrow Account-Power Grid Public Issue R यांच्‍या नावाचा Power Grid Corporation Of India यांना शेअर्स खरेदी करण्‍यासाठी दिला.  तीने पुढच्‍या दृष्‍टीने सदर शेअर्सच्‍या किंमतीत वाढ होण्‍याच्‍या दृष्‍टीने व नफा कमावण्‍याच्‍या दृष्‍टीने शेअर्स घेण्‍याचे ठरविले.  Power Grid Corporation Of India यानी तक्रारकर्तीचा धनादेश विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍या बॅकेत वटविण्‍यासाठी जमा केला, कारण Power Grid Corporation Of India चे खाते विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडे होते.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी सदरचा धनादेश विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांच्‍याकडे क्‍लीअरींगसाठी पाठविला.  परतू सदरचा धनादेश तक्रारकर्तीच्‍या खात्‍यामध्‍ये अपूरे रक्‍कम असल्‍याने (Insufficient Funds) या शे-यासह परत आला.  तक्रारकर्ती पुढे म्‍हणते की Power Grid Corporation Of India यांना सदरचा धनादेश देतांना तिने काळजी घेतली होती की, तिच्‍या खात्‍यामध्‍ये पुरेसे पैसे आहेत.  परंतू तिचा धनादेश परत आल्याने तिची हिमंत खचली तीने ताबडतोब विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांना तीच्‍या खात्‍यामध्‍ये किती रक्‍क्‍म आहे, याबाबतची खात्री करण्‍याचे सांगितले.  तिच्‍या खात्‍याची शाबीती झाल्‍यावर असे लक्षात आले की, दिनांक 10.9.07 रोजी तिच्‍या खात्‍यामध्‍ये रुपये 4,90,557/- एवढी रक्‍क्‍म होती.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे तसेच कामाच्‍या हयगयीमुळे तीचा धनादेश परत आला. अथवा वटला नाही, त्‍यामुळे सोसायटीमध्‍ये तीच्‍या असलेल्‍या तीच्‍या वैयक्‍तीक प्रतिमेला धक्‍का पोचला.   तसेच ती जेष्‍ठ नागरीक असल्‍यामुळे तिला त्‍याचा अतिशय मानसिक त्रास झाला.  तक्रारकर्तीने ताबडतोब दिनांक 13.5.09 रोजी तीच्‍या वकीलामार्फत विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांना कायदेशीर नोटीस पाठविली ,व विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे व दोषपूर्ण सेवेमुळे तिला त्रास झाल्‍याबददल तीने नोटीसीमध्‍ये नूकसानभरपाई पोटी रुपये 10,03,000/- ची मागणी केली.  विरुध्‍दपक्षानी त्‍यांच्‍या नोटीसीला काहीही उत्‍त्‍ार दिले नाही. 

     तक्रारकर्ती पुढे म्‍हणते की, विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 हे फायनान्‍सीयल इन्स्टिटयूट असल्‍याने व बॅकींग कंपनी अँक्‍टखाली त्‍यांची नोंदणी झालेली असल्‍याने त्‍यांनी त्‍यांच्‍या कामामध्‍ये संपूर्णतः काळजी घेतलीच पाहीजे.  तीने Power Grid Corporation Of India यांना सदरचा धनादेश शेअर्स खरेदी करण्‍यासाठी दिला होता तीला Escrow Account-Power Grid Public Issue R याचा शेअर्स खरेदी करावयाचा होता. त्‍यावेळी सदरच्‍या शेअर्सची किंमत रुपये 52/- इतकी होती. परंतू त्‍यांचा धनादेश न वटल्‍यामुळे सदरचे शेअर्स तिला खरेदी करता आले नाही.  त्‍यामुळे तिला मानसिक त्रासाबरोबर आर्थीक नुकसान झाल्‍ो. ज्‍या वेळी विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी  दिनांक 12.1.09 रोजी तीला तीचा धनादेश मेमो बरोबर पाठविला,त्‍यावेळी सदर तक्रारीला कारण घडले,असे तक्रारकर्तीचे म्‍हणणे आहे. तसेच दिनांक 13.5.09 रोजी सदर तक्रारीला दाखल करण्‍यासाठी दुसरे कारणे घडले, जेव्‍हा तीने तिच्‍या वकीलामार्फत विरुध्‍दपक्षाला नोटीस पाठविली तक्रारकर्तीची विनंती की, विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांना त्‍यांनी दिलेल्‍या दोषपूर्ण सेवेसाठी तसेच निष्‍काळजीपणासाठी दोषी धरावे व विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांना तिला झालेल्‍या त्रासाबददल नुकसानभ्‍ारपाईपोटी रुपये 10,03.000/- मंचाने पारीत करावे.

       तक्रारकर्तीने आपल्‍या तक्रार अर्जासोबत नि. 2 अन्‍वये प्रतिज्ञापत्र दाखल केले व नि. 3 अन्‍व्‍ये कागदपत्राची यादी दाखल केली त्‍यात मुख्‍यतः दिनांक 11.9.07 रोजीचा रुपये 97,500/- चा धनादेश, विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांनी विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांना सदरचा धनादेश अपुरे भांडवलाअभावी पाठविण्‍याचे पत्र ,बॅक विवरणपत्र, दि.7.1.09 रोजी विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी, तक्रारकर्तीला पाठविलेले रजिस्‍टर एडी चा लखोटा, KARVY यांनी तक्रारकर्तीला पाठविल्‍याचे पत्र, तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष  यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस, Joindere Capital Services यांनी तक्रारकर्तीला पाठविलेले पत्र, इत्‍यादी दस्‍तऐवज दाखल कलेले आहे. 

   मंचाने नि.6 अन्‍व्‍ये विरुध्‍दपक्ष क्रमांक 1,2,3 यांना नोटीस पाठवून आपला लेखी जबाब दाखल करण्‍याचे निर्देश दिले नि. 9 अन्‍व्‍ये विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी आपला लेखी जबाब प्रतीज्ञापत्रासह दाखल केला.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 हे आपल्‍या लेखी जबाबात म्‍हणतात की, तक्रारकर्ती, ही त्‍यांची ग्राहक नाही. तिने त्‍यांच्‍याकडून कुठल्‍याही प्रकारची सेवा घेतलेली नाही.  त्‍यामुळे सदरची तक्रार मेन्‍टेनेबल नाही म्‍हणून ती खारीज करण्‍यात यावी.  तक्रारकर्तीने त्‍याना केवळ त्रास देण्‍याच्‍या हेतूने त्‍यांच्‍याविरुध्‍द तक्रार केलेली आहे.  ते स्‍वतः हे Collecting Bankar आहेत. .  Power Grid Corporation Of India यांनी त्‍यांच्‍याकडे तक्रारकर्तीने दिलेला धनादेश जमा केलेला होता.  त्‍यानूसार त्‍यांनी तक्रारकर्ती चा धनादेश विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांच्‍याकडे क्‍लेरिंगसाठी पाठविला विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांच्‍याकडे तकारकर्ती च्‍या खात्‍यामध्‍ये पुरेसे भांडवल नसल्‍यामुळे त्‍यांच्‍या (Insufficient Funds) म्‍हणून परत पाठविला.  त्‍यामुळे त्‍यांचा रोल फक्‍त कलेक्‍टींग बॅकरचा होता.  त्‍यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही.  तक्रारकर्तीने त्‍यांच्‍याविरुध्‍द खोटी तक्रार दाखल केलेली असल्‍याने ती खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांचे म्‍हणणे आहे. 

    निशाणि 10 अन्‍व्‍ये विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी आपल्‍या लेखी जबाबाच्‍या पुष्‍ठार्थ प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.  निशाणि 13 अनव्‍ये विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांनी आपला लेखी जबाब,प्रतिज्ञापत्र व कागदपत्रासह दाखल केला.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 हे आपल्‍या लेखी जबाबात म्‍हणतात की, तक्रारकर्ती ही त्‍यांची ग्राहक आहे.  तक्रारकर्तीने त्‍यांच्‍याकडे खाते उघडलेले आहे. ज्‍यांचा खाते क्रमांक 11202031000059 असा आहे.  धनादेश क्रमांक 302505 हा  Escrow Account-Power Grid Public Issue R यांनी तक्रारकर्तीने त्‍यांना दिलेला धनादेश  विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडून त्‍यांच्‍याकडे जमा करण्‍यात आला होता.  त्‍यांच्‍याकडे संबंधीत कर्मचा-यांच्‍या चुकीमुळे सदरचा धनादेश डिसऑनर्ड झाला त्‍यांनुसार त्‍यांनी ताबडतोब दिनांक 18.9.07 रोजी विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडे पाठविला.  त्‍यामुळे सदर तक्रारीला कारण सन 2007 मध्‍ये घडलेले परंतु तक्रारकर्तीने सदरची तक्रार सन 2010 मध्‍ये दाखल केलेली आहे.  त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या तक्रारीला मुदतीची बाधा येते. 

       तक्रारकर्तीचा धनादेश क्रमांक 302505 व 302504 हे दोन्‍ही धनादेश क्‍लेअरींगसाठी त्‍यांच्‍याकडे आलेले होतें.  परंतु संबंधीत कर्मचा-यांकडून तक्रारकर्तीचे दोन्‍ही धनादेश डिसऑनर्ड झाले.  त्‍यामुळे त्‍यांनी दोन्‍ही धनादेशाच्‍या सबंधीत दोन्‍ही मेमो दिनांक 18.9.07 रोजी पाठविले.  तक्रारकर्तीला याबाबत माहित होते, त्‍यामुळे तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या सदरच्‍या तक्रारीला मुदतीची बाधा येते. 

    तक्रारकर्तीने दिनांक 13.5.09 रोजी केवळ तक्रारीला कारण उत्‍पन्‍न करण्‍यासाठी त्‍यांना कायदेशीर नोटीस पाठविली.  तक्रारकर्तीने या आधी एका दुस-या तक्रारीमध्‍ये त्‍यांनी दिलेल्‍या दोषपूर्ण सेवेसाठी या मंचाने पारीत केलेल्‍या आदेशानुसार रुपये 10,000/-नुकसान भरपाई देण्‍यात आली होती. त्‍यामुळे तक्रारकर्ती नि केवळ तक्रार दाखल करण्‍यासाठी, नवीन कारण शोधण्‍यासाठी त्‍यांना कायदेशीर नोटीस पाठविली होती.  तक्रारकर्तीने तक्रार दाखल करण्‍यासाठी शोधलेले कारण्‍ा चुकीचे असल्‍याने  सदरची तक्रार फेटाळण्‍यात यावी. असे विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांचे म्‍हणणे आहे.  त्‍यांनी दिनांक 18.9.07 रोजी धनादेश रिटर्न मेमो परत दिला होता.त्‍यामुळे तक्रारीला त्‍याच दिवशी कारण घडलेले आहे.  तक्रारकर्ती नि दाखल केलेली तक्रार मुदतीत नसल्‍याने ती फेटाळण्‍यात यावी. असे त्‍यांचे म्‍हणणे आहे. 

     निशाणि 15/1  अन्‍वये विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांनी दिनांक 29.9.08 रोजी या मंचाने पारीत केलेला आदेश दाखल केलेला आहे,बॅक विवरणपत्र,इत्‍यादी दस्‍तऐवज दाखल करण्‍यात आले आहे.  निशाणि 20 अन्‍वये विरुध्‍दपक्ष क्रमांक 3 यांनी आपला लेखी जबाब प्रतित्रापत्रासह दाखल केलेला आहे.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 3 हे आपल्‍या लेखी जबाबात म्‍हणतात की. तक्रारकर्ती ही त्‍यांची ग्राहक नाही. त्‍यांनी तीला कोणतीही सेवा दिलेली नाही, अथवा तीने त्‍यांच्‍याकडून कोणतेही सेवा घेतलेली नाही. ग्राहक सरंक्षण कायदयाच्‍या तरतुदीनुसार सदरची तक्रार फेटाळण्‍यात यावी असे त्‍यांचे म्‍हणणे आहे.  सदरची तक्रार दाखल करण्‍यासाठी तक्रारकर्ती ला त्‍यांच्‍याविरुध्‍द कोणतेही कारण नाही.  त्‍यामुळे तक्रारकर्ती  नि दाखल केलेली तक्रार खोटी असल्‍याने ती फेटाळावी असे त्‍यांचे म्‍हणणे आहे.  निशाणि 21 अन्‍वये तक्रारकर्ती नि काही कागदपत्रे दाखल केलेले आहेत.  त्‍यात त्‍यांनी Dishonour of Cheques ची प्रोसिजर व राष्‍ट्रीय आयोगाने पारीत केलेला निवाडा दाखल केलेला आहे. 

      दि 5.3.11 रोजी सदर प्रकरण अंतीम सुनावणीसाठी आले असता तक्रारकर्ती चे व विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 चे वकील मंचात हजर होते. विरुध्‍दपक्ष क्रमांक 3 हे गैरहजर होते.  उभयपक्षांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद ऐकुण मंचाने सदरची तक्रार अंतीम आदेशासाठी निश्चित केली . 

      तक्रारकर्तीनी दाखल केलेला तक्रार अर्ज,प्रतिज्ञापत्र,दस्‍तऐवज, विरुध्‍दपक्ष क्रमांक 1,2,3 यांनी दाखल केलेला लेखी जबाब, प्रतिज्ञापत्र ,इत्‍यादी दस्‍तऐवज तसेच तक्रारकर्ती व विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांच्‍या वकीलांनी केलेला तोंडी युक्‍तीवाद या सर्वाचा विचार करुन मंचाने खालील मुददे निश्चित केले. 

मुद्दा क्रमांक 1  तक्रारकर्तीनी दाखल केलेली तक्रार मुदतीत आहे काय?

उत्‍तर         होय 

 

 मुद्दा क्रमांक 2  विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 हे तक्रसाकर्तीला दिलेल्‍या दोषपूर्ण           

              सेवेसाठी जबाबदार आहेत काय?  

 उत्‍तर         होय

         

मुद्दा क्रमांक  3  तक्रारकर्ती विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांच्‍याकडून नुकसान भरपाई व   

               न्‍यायीक खर्च मिळण्‍यास पात्र आहे काय?

उत्‍तर          होय

स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्रमांक 1

     मुद्दा क्रमांक 1 च्‍या बाबत मंचाच्‍या असे निदर्शनास येते की, विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांनी आपल्‍या लेखी जबाबात तक्रारकर्तीची तक्रार मुदतीत येत नसल्‍याचे म्‍हटलेले आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांच्‍या कर्मचा-यांच्‍या चुकीमुळे तक्रारकर्तीचा धनादेश डिसऑनर्ड झाला त्‍या बाबतचा मेमो विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांना दि.18.9.07 रोजी कळविले होते. त्‍यामुळे तक्रारकतीने दिनांक 18.9.07 नंतर दोन वर्षाच्‍या आत तक्रार दाखल करणे जरुर होते, तसेच तक्रारकर्तीने दिनांक.16.4.10 रोजी तक्रार दाखल केली असल्‍याने ती ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या तरतुदीनुसार मुदतीत दाखल केली नसल्‍याने ती फेटाळण्‍यात यावी.

      मंचाच्‍या मते तक्रारकर्तीने सदरची तक्रार दि.16.4.10 रोजी दाखल केली आहे.  दिनांक 11.09.2007 रोजी Escrow Account-Power Grid Public Issue R यांना धनादेश दिला होता. सदरचा धनादेश Power Grid Corporation Of India यांनी त्‍यांच्‍या बॅकेमध्‍ये म्‍हणजेच विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडे जमा केला विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्तीचा धनादेश विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांच्‍याकडे वटविण्‍यासाठी पाठविला व विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांनी त्‍यांचा धनादेश तक्रारकर्तीच्‍या  खात्‍यामध्‍ये (Insufficient Funds) असल्‍याचा शेरा देवून परत पाठविला तक्रारकर्तीने आपल्‍या तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्‍या नि.3वरील कागदपत्रानुसार तसेच नि.3वरील अँने. 4 नुसार विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्तीला दिनांक.07.01.2009 रोजी रजिस्‍टर एडी ने पत्र पाठविल्‍याचे निदर्शनास येते यावरुन असा बोध होतो की, विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्तीला तिचा धनादेश न वटल्‍याबाबतचा मेमो दिनांक 07.01.2009 रोजी कळविल्‍याचे दिसते. त्‍यामुळे तक्रारीला कारण दि.07.01.2009 रोजी घडल्‍याचे दिसते, व त्‍यानंतर  तक्रारकर्तीने दिनांक.16.04.2010 रोजी म्‍हणजेच दोन वर्षाच्‍या आत तक्रार दाखल केल्‍याने ती मुदतीत आहे, असे मंचाचे मत आहे.

 स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्रमांक 2

       स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्रमांक 2 बाबत मंचाचे असे स्‍पष्‍ट मत आहे की,तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांच्‍याकडे आपले खाते उघडले होते.  सदर खात्‍याचा क्रमांक 11202031000059 असा आहे  त्‍यामुळे तक्ररीकर्ती ही विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांची ग्राहक आहे.  तीने आपल्‍या Escrow Account-Power Grid Public Issue R यांना धनादेश दिला होता. सदरचा धनादेश Power Grid Corporation Of India यांनी त्‍यांच्‍या बॅकेमध्‍ये म्‍हणजेच विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडे जमा केला विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्तीचा धनादेश विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांच्‍याकडे वटविण्‍यासाठी पाठविला परंतु बॅकेने दि.10.09.2007 रोजीच्‍या दिलेल्‍या विवरणपत्रानुसार तक्रारकर्ती च्‍या खात्‍यामध्‍ये रु 4,88,763/- इतकी रक्‍क्‍म जमा असतांनाही बॅकेने तक्रारकर्ती  चा दिनांक 11.9.07 रोजीचा धनादेश रुपये 97,500/- चा वटला नाही व त्‍याक्षणी बॅकेने(Insufficient Funds) हा शेरा मारला.  तक्रारकर्ती ही जेष्‍ठ नागरीक असून विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ची अधिकृत ग्राहक आहे.  व विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे व सेवेतील त्रुटीमुळे त्‍यांचा धनादेश परत आला.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 हे आपला लेखी जबाबात म्‍हणतात की, या बाबतची सूचना विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांना दिनांक.18.09.2007 रोजी कळविले होते. परंतु याबाबतचा लेखी पुरावा किंवा कुठलेही दस्‍तऐवज त्‍यांच्‍या लेखी जबाबासोबत दाखल केले नाही. त्‍यामुळे ते तक्रारकर्तीस ते दोषपूर्ण सेवेसाठी जबाबदार आहेत, असे मंचाचे मत आहे.

       विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 आपल्‍या लेखी जबाबात म्‍हणतात की, तक्रारकर्ती  ही त्‍यांची ग्राहक नसल्‍याने व तिने त्‍यांच्‍याकडून कोणतीची सेवा घेतली नसल्‍याने व त्‍यांनी दाखल केलेली तक्रार खोटी असल्‍याने ती खर्चासहीत फेटाळण्‍यात यावी.  तक्रारकर्तीने नि. 3अन्‍वये अँने.4 च्‍या कागदपत्रानुसार त्‍यांनी तक्रारकर्ती दिनांक .07.01.2009 रोजी त्‍यांचा धानादेश डिसऑनर्ड झाल्‍याबाबतचा मेमो रजिस्‍टर पोष्‍टाने कळविल्‍याचा दिसतो.  तक्रारकतीचा धनादेश जर सन 2007 मध्‍ये डिसऑनर्ड झाला होता तर विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी सन 2009 पर्यत आपल्‍या जवळ का ठेवला?  त्‍या बाबत त्‍यांनी तक्रारकर्तीस अथवा  Power Grid Corporation Of India  यांना का कळविला नाही विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनीसदरचा धनादेश आपल्याकडे दोन वर्षाकरीता का ठेवला याबाबतचे स्‍पष्‍टीकरण त्‍यांनी दाखल केलेले नाही.  त्‍यांच्‍या या निष्‍काजीपणामुळे तक्रारकर्तीस सदरची तक्रार दाखल करण्‍यासाठी विलंब झाला, असे म्‍हणण्‍यास काहीच हरकत नाही.  त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 हे दोघेही ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2(1)(ग)अन्‍व्‍ये दोषपूर्ण सेवेसाठी जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे.  तसेच विरुध्‍दपक्ष क्रमांक 3 त्‍यांची कोणतीही चूक नाही असे मंचाच्‍या निदर्शनास येते.

 

 स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्रमांक 3

       स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्रमांक 3 च्‍या बाबत मंचाच्‍या असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीचे तिचे धनादेश न वटल्‍यामुळे तीला आर्थीक नुकसान झाले.  तिला मार्केटमधून शेअर्स विकत घेता आले नाही. त्‍यामुळे तिला आर्थीक नूकसान झाले. तसेच  विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांच्‍या कृतीमुळे व निष्‍काळजीपणामुळे तिला अतिशय मानसिक त्रास हाणे अपरीहार्य आहे. तीच्‍या वैयक्‍तीक प्रतिमेस धक्‍का पोचला. या बाबत मंच सहमत आहे.  तसेच विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी तीचा न वटलेला धनादेश पाठविण्‍यासाठी दोन वर्षाचा विलंब लावला व तिला मंचात उशिरा तक्रार दाखल करावी लागली. या बाबत विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांच्‍याकडून आर्थीक व  मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई  रुपये.70,000/- मिळण्‍यास पात्र आहे.

         विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांच्‍या निष्‍काजीपणामूळे त्‍यांना कायदेशीर नोटीस पाठवावी लागली तसेच तिला मंचात तक्रार दाखल करावी लागली, त्‍यामुळे तक्रारकर्ती विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांच्‍या कडून प्रत्‍येकी न्‍यायीक खर्च रुपये 5,000/- मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे,

अंतीम आदेश

1)  तक्रार क्रमांक 83/2010 मंजूर करण्‍यात येते.

2)  आदेश पारीत तारखेच्‍या 45 दिवसाचे आत विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी एकत्रीकरित्‍या किंवा संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्तीला खालील प्रमाणे रकमा दयाव्‍यात

अ)     आर्थीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 70,000/-  दयावेत.    

     ब) विरुपध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी प्रत्‍येकी रुपये 5,000/-न्‍यायीक खर्च दयावा.

     विहित मुदतीत उपरोक्‍त आदेशाचे पालन विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी न केल्‍यास तक्रारकर्ती उपरोक्‍त संपूर्ण रक्‍कम आदेश पारीत तारखेपासून ते प्रत्‍यक्ष रक्‍क्‍म मिळेपर्यत दरसाल दरशेकडा 9 टक्‍के दराने व्‍याजासह वसूल करण्‍यास पात्र राहील.

3)सदर आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभयपक्षकाराना पाठवण्‍यात याव्‍यात. 

 

ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई.

दि.11-3-2011.

 

 

                     (ज्‍योती अभय मांधळे)     (आर.डी.म्‍हेत्रस)

                         सदस्‍या               अध्‍यक्ष

                    अति.ठाणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.

                                                  

                                                 

 


Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT ,