जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १६१/२०११ तक्रार दाखल दिनांक – २५/०८/२०११
तक्रार निकाली दिनांक – २९/०५/२०१४
रामकरण सिताराम वर्मा – मयत
मयत वारस
१) रणजीत रामरतन वर्मा,
वय ३५, धंदा – व्यापार
२) श्रीमती कौशलाबाई रामरतन वर्मा,
वय ५५ वर्षे, धंदा – व्यापार
३) अरविंद रामरतन वर्मा,
वय २९ वर्षे, धंदा – व्यापार
४) सौ किरण दिपक वर्मा
वय ३२, धंदा – घरकाम
५) बसंती सुरेश वर्मा
वय ३८, धंदा – घरकाम
६) सौ अंजली रामरतन वर्मा
वय ४२, धंदा – घरकाम
सर्व रा.तारगल्ली, सराफ बाजार,
गल्ली नं.३, धुळे . तक्रारदार
विरूध्द
- शाखा व्यवस्थापक
दि ओरिएंन्टल इंन्शुरन्स कं.लि.
के.एम. भावसार शॅपिंग कॉम्प्लेक्स
गल्ली नं.५, धुळे ४२४००३
- मुख्य प्रबंधक ,
दि ओरिएंन्टल इंन्शुरन्स कं.लि.
पंजीकृत कार्यालय,
नवी दिल्ली
- एस.एच.जैन
अधिकृत कंपनीचे एजंट
के.एम. भावसार कॉम्प्लेक्स्
गल्ली नं.५, धुळे ४२४००३. - सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.एस.आर. चव्हाण)
(सामनेवाले नं.१ व २ तर्फे – अॅड.आर.ए. चौधरी)
(सामनेवाले नं.३ तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
तक्रारदार यांनी त्यांच्या दुकानात चोरी झाल्याने त्याकामी क्लेमची रक्कम मिळण्यासाठी सदर तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ प्रमाणे या मंचात दाखल केला आहे.
- तक्रारदार यांचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, तक्रारदार हे सोने चांदीचे व्यापार धुळे शहरात करतात. सदर दुकानात दि.२१/०८/२०१० रोजी दोन बुरखाधारी महिला आल्या त्यांनी मागणी केली की सोन्याच्या फुल्या दाखवा. त्याप्रमाणे तक्रारदारने सोन्याच्या फुल्यांचा बॉक्स दाखविला. सदर बॉक्समध्ये ६० फुल्यांचे एक पाकिट याप्रमाणे ९ पाकिटे होते. सदर फुले दाखवीत असतांना त्यातील एका महिलीने लक्षविचलीत करण्याचा हेतूने दुकानातील कोप-यात लावलेले सोन्याचे मंगळसुत्र पहावयास मागीतले, ते मंगळसुत्र काढत असतांना सदर महिलांनी काऊंटर वर ठेवलेल्या बॉक्स मधुन रक्कम रूपये ६०,७५०/- किंमतीच्या ३० ग्रॅम वजनाच्या ६० फुल्या झालर व फिरकीच्या प्रत्येकी अर्धा ग्रॅम वजनाच्या नवीन मजुरीसह चोरून निघुन गेल्या. त्याबाबात तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला चोरीची फिर्याद दिली. त्यानंतर तक्रारदार यांनी ओरिएंन्टल इंन्शुरन्स कंपनी यांच्याकडून मालमत्ता संरक्षण म्हणून पॉलिसीप्रमाणे नुकसान भरपाई रक्कम रूपये ६०,७५०/- मिळण्याकामी अर्ज दाखल केला. परंतु सामनेवाले यांनी दि.०३/०३/२०११ रोजीच्या आर्जाने क्लेम नामंजूर केला. त्याकामी तक्रारदार यांनी सामनेवाला यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले यांनी नोटीसीची दखल घेतलेली नाही. सबब तक्रारदार यांना सदरचा अर्ज या मंचात दाखल करावा लागलेला आहे.
तक्रारदाराची विनंती अशी आहे की, सामनेवाला यांच्याकडून नुकसान भरपाईची रक्कम व्याजासह मिळावी, मानसिक त्रास व अर्जाचा खर्च मिळावा.
२. तक्रारदार यांनी सदर तक्रारीच्या पुष्ट्यर्थ नि.२ वर शपथपत्र, नि.४ वर दस्तऐवज यादी सोबत एकूण १ ते १२ छायांकीत कागदपत्र दाखल, त्यामध्ये विमा प्रस्ताव, पॉलीसी, फिर्यादा, चार्जशीट व नोटीस, इत्यादी दाखल केले आहे.
- , त्यामध्ये त्यांनी सदरचा अर्ज नाकरला असून त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची चोरी ही व्यवसायाच्या वेळेत ग्राहकानी केली आहे. चोरी ही बळजबरीने, दुकानात घूसून अथवा दुकान फोडुन झालेली नसल्याने पॉलीसीच्या क्रमांक ८ च्या अटी व शर्तीप्रमाणे जोखीम अंर्तभुत होत नाही. सदरची चोरी ही दुकान मालक यांच्या चुकीमुळे व निष्काळजीपणामुळे ग्राहकाकडून झालेली आहे. त्यामुळे विमा कंपनीची कोणतीही नुकसान भरपाई देण्याची जाबाबदारी नाही. वैकल्पेकरून सामनेवाले यांचे असे म्हणणे आहे की, सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे दुकानामधील माल हा प्रत्यक्ष विम्यापेक्षा जास्त असल्याने रक्कम रूपये ३२,३०८/- एवढीच जबाबदारी येते. सबब सदरचा तक्रार अर्ज खर्चासह रदद करण्यात यावा.
सामनेवाले यांनी त्यांच्या कैफियतच्या पुष्ट्यर्थ नि.१६ वर प्रतिज्ञापत्र व नि.१९ वर दस्तऐवज सोबत सर्व्हे रिपोर्ट व पॉलिसीच्या अटी व शर्ती दाखल केल्या आहेत.
४. तक्रारदार व सामनेवाले यांचे शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे व युक्तिवाद पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कसूर केली आहे काय ? होय
- तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडून विमा होय
रक्कम आणि मानसिक त्रास व तक्रार अर्जाच्या
खर्चापोटी भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ?
ड. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
- ‘अ’ - तक्रारदार यांनी त्यांच्या सोन्या चांदीचा दुकानातील मालाचा सामनेवाला यांच्याकडून विमा उतरवीला आहे. त्याकामी ज्वेलरी ब्लॉक पॉलीसी शेडयूलची छायांकीत प्रत नि.३/२ वर दाखल केली आहे. याप्रमाणे तक्रारदार यांनी दि.२५/०८/२००९ ते दि.२४/०८/२०१० या कालावधीकरीता रूपये ६६,००,०००/- या रकमेचा विमा सामनेवाला क्र.१ यांच्याकडून उतरवीलेला आहे. या कागदपत्राचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
- ‘ब’- तक्रारदार यांच्या सदर दुकानात दि.२१/०८/२०१० रोजी चोरी झालेली आहे. त्याबाबत संबंधीत पोलीस स्टेशनला खबर दिलेली असून, नि.५/४ वर खबर व घटनास्थळाचा पंचनामा दाखल केलेला आहे. या कागदपत्रांचा विचार करता तक्रारदार यांच्या, धुळे शहरातील सोने चांदीच्या दुकानात दोन अज्ञात बुरखाधारी महिलांनी ३० ग्रॉम वजनाचे रूपये ६०,७५०/- किंमतीचे सोन्याच्या फुल्या चोरून नेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याप्रमाणे चार्जशीट दाखल झालेली असून एफ.आय.आर. च रिपोर्टप्रमाणे कायम तपासावर ठेवून ‘अ फायनल समरी’ मंजूरीबाबत विनंती करण्यात आलेली आहे असे दिसते.
या कागदपत्राप्रमाणे तक्रारदार यांच्या चोरीच्या घटनेत रक्कम रूपये ६०,७५०/- रकमेचे नुकसान झाले आहे हे स्पष्ट होते. त्याकामी तक्रारदार यांनी नुकसान भरपाई मिळणेकामी सामनेवाले यांच्याकडे विमा क्लेम केलेला आहे. परंतु सामनेवाले यांनी तो नामंजूर केला आहे. त्याबाबातचे पत्र नि.३/६ वर दाखल केलेले आहे. यापत्राप्रमाणे सदर चोरी ही बळजबरीने दुकानात घूसून किंवा फोडून झालेली नसल्याने पॉलिसीतील अट क्र.८ प्रमाणे नुकसान भरपाई देता येत नाही, असे नमूद केले आहे. या अटीप्रमाणे सदर दुकानात ग्राहकाकडून चोरी झाली असल्याने सामनेवाला हे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही असा बचाव घेतलेला आहे.
परंतू आमच्या मते तक्रारदार यांच्या सदर दुकानात दोन बुरखाधारी महिला चोरी करण्याच्या उददेशाने आल्या, त्यांनी फसवणुकीने व नजरचुकीने सोन्याच्या फुले हे दागीने चोरून त्या पसार झाल्या आहेत. त्यांनी ग्राहक म्हणून कोणतेही इतर वस्तुंची खरेदी केलेली नाही. त्यांनी केवळ चोरी करण्याच्या उददेशाने दुकानात प्रवेश केलेला आहे व दुकानात चोरी करून निघुन गेल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांच्या विरूध्द संबंधीत पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा नोंदवीला गेला असून त्याची दखल घेतलेली आहे.
पोलीस कागदपत्राप्रमाणे घटना लक्षात घेता सदर अज्ञात स्त्रीयांनी चोरी केलेली आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे पॉलिसीतील अट लक्षात घेता चोरी ही दुकानात घूसून किेंवा बळजबरीने झालेली नाही हे सामनेवाले यांचे म्हणणे योग्य वाटत नाही. याचा विचार होता सामनेवाले यांनी केवळ तांत्रिक कारणांच्या आधारे सदरचा विमा क्लेम नाकारलेला आहे असे दिसते. सामनेवाले हे सदर घटनेमध्ये झालेले नुकसान भरपाईची रककम देण्यास जाबाबदार आहे व ती रक्कम वेळेत न दिल्याने सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होत आहे. म्हणून मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
- ‘क’ – सदर घटनेत झालेली नुकसान भरपाई रक्कम रूपये ६०,७५०/- देण्यास सामनेवाले हे जबाबदार आहे. याकामी सामनेवाला यांनी सर्व्हे रिपोर्ट नि.१९ वर दाखल केलेला आहे. या सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे दुकानातील मालाचा रक्कम रूपये ६६,००,०००/- चा विमा काढलेला होता. परंतु घटनेच्या वेळी प्रत्यक्षात दुकानात रक्कम रूपये १,०८,५९,९६५/- चा माल होता. त्यामुळे दुकानातील माल हा प्रत्यक्ष निम्यापेक्षा जास्त असल्याने सामनेवाले हे ३२,३०८/- एवढी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे असे दिसते. या सर्व्हे रिपोर्ट चा विचार होता सामनेवाले हे रूपये ३२,३०८/- ही रक्कम देण्यास जबाबदार आहे. परंतु ती वेळेत दिलेली नाही, त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक त्रास व सदर अर्जाचा खर्च सहन करावा लागलेला आहे. सबब सदरची रक्कम विमा क्लेम नाकारल्या पासून म्हणजे दि.०३/०३/२०११ रोजी पासून व्याजासह देण्यास तसेच मानसिक त्रास व अर्जाचा खर्च देण्यास जबाबदार आहे हे स्पष्ट होते.
८. सदर पॉलिसी ही विमा कंपनीच्या धुळे शाखा येथून सामनेवाले नं.१ यांनी तक्रारदार यांना दिलेली आहे व सामनेवाले नं.२ हे सामनेवाले नं.१ यांचे मुख्य कार्यालय आहे. याचा अर्थ सदर पॉलिसी ही सामनेवाला नं.१ व २ यांनी दिलीआहे. पॉलिसीच्या हप्त्याची रक्कम स्विकारलेली आहे. तसेच सामनेवाले नं.३ हे विमा कंपनीचे एजंट आहेत. सामनेवाले नं.३ यांनी पॉलिसीची रक्कम स्विकारलेली नसून तक्रारदार यांनी त्यांच्याकडून पॉलीसी घेतलेली नाही. याचा विचार होता सामनेवाले नं.३ व तक्रारदार यांच्यामध्ये ग्राहक विक्रेता संबंध नाही. त्यामुळे सदरची विमा क्लेमची रक्कम देण्यास सामनेवाले क्र. ३ हे जबाबदार नाहीत त्यामुळे त्यांचे विरूध्द कोणतेही आदेश नाही.
९. ७. मुद्दा ‘ड’ - वरील सर्व कागदपत्रांचा व कारणांचा विचार होता तक्रारदाराची मागणी योग्य व रास्त आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर करून खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
आ दे श
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- सदरचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.३ यांच्याविरूध्द नामंजूर करण्यात येत आहे.
३. सामनेवाले क्र.१ व २ यांनी आदेश दिनांकापासून तीस दिवसाचा आत
खालील रकमा तक्रारदार यांना द्याव्यात.
- सदर नुकसान भरपाई कामी विमा पॉलिसी रक्कम रूपये ३२,३०८/- (अक्षरी रूपये बत्तीस हजार तीनशे आठ मात्र) ही दि.०३/०३/२०११ या तारखे पासून पूर्ण रक्कम फिटेपर्यंत ६ टक्के व्याजाने द्यावी.
- ,०००/- (अक्षरी रूपये एक हजार मात्र) आणि सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये १,०००/- (अक्षरी रूपये एक हजार मात्र) तक्रारदार यांना द्यावा.
-
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.