Maharashtra

Nagpur

CC/137/2015

Namdeo Udhav Dhule - Complainant(s)

Versus

Orange City Hospital & Research Institute - Opp.Party(s)

Ananta K. Neware

13 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/137/2015
( Date of Filing : 11 Mar 2015 )
 
1. Namdeo Udhav Dhule
r/o Village wani Yavtmal
Yavtmal
Maharstra
...........Complainant(s)
Versus
1. Orange City Hospital & Research Institute
19, Pandey Layout, Veer Sawarkar Square Nagpur 440015
Nagpur
Maharastra
2. Dr. Suhas Salpekar
19, Pandey Layout, Veer Sawarkar Square Nagpur 440015
Nagpur
Maharastra
3. Dr. Mukund Thakur
19, Pandey Layout, Veer Sawarkar Square Nagpur 440015
Nagpur
Maharastra
4. Dr. Rajkumari Wadhwani
19, Pandey Layout, Veer Sawarkar Square Nagpur 440015
Nagpur
Maharastra
5. Dr. Smita Harkare
19, Pandey Layout, Veer Sawarkar Square Nagpur 440015
Nagpur
Maharastra
6. Reliance General Insurance Company Limited
6th Floor, Land Mark Building, Ramdaspeth, Wardha Road, Nagpur 440014
Nagpur
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:Ananta K. Neware , Advocate for the Complainant 1
 
Dated : 13 Jul 2022
Final Order / Judgement

मा.अध्‍यक्ष, श्री संजय वा. पाटील, यांच्या आदेशान्वये-

 

तक्रारकर्ते यांनी ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे दाखल केलेली आहे.

  1. वि.प.क्रं-1 हे डब्लुसीएलने नामनिर्देशीत केलेले हॉस्पीटल असुन वि.प.क्रं. 2 ते 5 हे तेथील डॉक्टर आहेत. तक्रारकदाराच्या पत्नीचे नाव शोभा नामदेव घुले असे होते आणि ती दिनांक 25.4.2014 रोजी वि.प. यांचे दवाखान्यात मयत झाली.
  2. तक्रारदाराच्या पत्नीला पोटात दुखत असल्यामूळे एप्रिल-2014 मध्‍ये चंद्रपूर येथील डॉ.मदुरवार यांचेकडे नेले असता डॉ मदुरवार यांनी तपासणी केल्यानंतर सांगीतले की, तिच्या पोटीतील खालच्या भागात  cystic mass तयार झालेले आहे आणि त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल म्हणुन तिला वि.प.कं.1 यांचे दवाखान्यात नेण्‍यात आले. दिनांक 21.4.2014 रोजी वि.प.क्रं.2 यांनी पेशंट शोभा हिला तपासले आणि त्यांनी सुध्‍दा पोटाच्या खालच्या भागात (lower abdomen) cystic mass असल्याबाबत सांगीतले आणि त्यासाठी छोटीशी शस्त्रक्रीया करावी लागेल असे सांगीतले. सुरुवातीला वि.प.क्रं.2 व 3 या डॉक्टारांनी पेशंट शोभा हिला तपासले आणि लॅप्रोस्कोपीव्दारे शस्त्रक्रीया करण्‍यात येईल असे सांगीतले. त्यावेळेस त्यांनी रक्त द्यावे लागेल याबाबत काहीही सांगीतले नाही. सदरहू शस्त्रक्रिया दिनांक 25.4.2014 रोजी करण्‍याचे ठरविले. त्यादिवशी तक्रारदाराचे पत्नीची तब्येत चांगली होती फक्त पोटात थोडे थोडे दुखत होते. तिला रक्तदाब किंवा मधुमेह नव्हता. दिनांक 25.4.2014 रोजी पेशंट शोभा हिला दुपारी 3.30 मिनीटांनी शस्त्रक्रियागृहात नेण्‍यात आले. त्यानंतर पूढील एक तास तक्रारकर्ते यांना शस्त्रक्रिया संपल्याबाबत सांगीतले नाही. एक तास झाल्यानंतर वि.प. यांच्या कर्मचा-यांने त्वरीत रक्ताची आवश्‍यकता असल्याचे सांगीतले आणि तक्रारकर्ते यांना रक्त आणण्‍यास सांगीतले. तक्रारकर्ते यांनी दवाखान्यातील स्टॉक मधुन रक्त पुरवठा करण्‍यात यावा असे सांगीतले त्यावेळेस स्टाफ नर्स या सतत बाहेर यायच्या आणि रक्ताचे पॅकेट घेऊन जायच्या. तक्रारदाराचे पत्नीला चार बाटल्या रक्त देण्‍यात आले. थोडयावेळावे दुस-या पेशंटला शस्त्रक्रियागृहात नेण्‍यात आले. संध्‍याकाळी 6.30 मिनीटांपर्यत तक्रारकर्ता वाट पहात होता परंतु त्याला स्टॉफ ने कोणतीही माहिती दिली नाही म्हणुन तक्रारकर्ते यांना संशय आला आणि तो जबरदस्तीने शस्त्रक्रियागृहात गेला आणि त्याला असे दिसले की, वि.प.क्रं.2 ते 5 हे डॉक्टर दुस-यांच पेशंटची शस्त्रक्रिया करित होते आणि तेथे त्यांची पत्नी नव्हती आणि  चौकशी केल्यानंतरही त्यांनी काहीही माहिती सांगीतली नाही. त्यावेळेस तक्रारकर्ते यांना स्टॉफने बाहेर ढकण्‍यास सुरुवात केली आणि तक्रारदाराने त्यावेळी कापडाखाली असलेली बॉडी बघितली आणि त्याने म्हणुन कापड बाजूला केले आणि ती त्याची पत्नी असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याला धक्काच बसला. तक्रारदाराची पत्नी पूर्वीचमयत झाली होती आणि त्याला माहिती देण्‍यात आली नाही आणि तिलाबाजुला ठेवण्‍यात आले होते आणि त्याला राग आल्याने त्याने आरडाओरडा केला आणि दवाखान्याच्या सुरक्षा अधिका-यांनी तक्रारदाराला दवाखान्याच्या बाहेर आणले आणि शस्त्रक्रिया करित असतांना त्याचा पत्नीचा मृत्य झाला असे त्याला सांगण्‍यात आले. तक्रारकर्ता हा यवतमाळ जवळील वणी जवळील छोटया खेडयातला राहणारा आहे आणि त्याचे नागपूर मध्‍ये कोणी नातेवाईक नव्हते आणि या सर्व प्रकारामूळे त्याला धक्का बसला आणि त्याची मानसिक स्थीती बिघ्‍डली होती. रात्री 10 वाजताचे सुमारास वि.प.चे कर्मचा-यांनी आणि स्टॉफने काही कागदपत्रांवर तक्रारकर्ते यांच्या सहया घेतल्या आणि बॉडी देण्‍याकरिता सहया घेणे आवश्‍यक आहे असे सांगीतले.
  3. तक्रारदाराने पूढे असे नमुद केले की, वि.प.यांनी तक्रारदाराला शस्त्रक्रियाबाबत सिडी दिली नाही तसेच डेथ समरी दिली नाही. आणि शस्त्रक्रिया करतेवेळी वैद्यकीय निष्‍काळजीपणा केला म्हणुन त्यांचा पत्नीचा मृत्यु झाला.
  4. त्यानंतर तक्रारकर्ते यांनी दिनांक 7.5.2014 रोजी डब्ल्युसीएलच्या नागपूर येथील मुख्‍य कार्यालयाला लेखी तक्रार केली. डब्ल्युसीएलच्या अधिका-यांनी चौकशी केली पंरतु वि.प. यांनी दिनांक 19.7.2014 रोजी खोटे उत्तर दिले.
  5. तक्रारकर्ते यांनी असा आक्षेप घेतला की, वि.प. यांनी निष्‍काळजीपणा केल्यामूळे त्याच्या पत्नीचा मृत्यु झालेला आहे. तकारदार यांनी तक्रार मंजूर करुन रक्कम रुपये 20,00,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केलेली आहे.
  6. तक्रारकर्ते यांची तकार दाखल करुन वि.प.1 ते 6 यांना आयोगामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली असता वि.प.12,3,5 तक्रारीत हजर झाले व तक्रारीला आपले लेखी उत्तर दाखल केले. वि.प.कं. 4 व 6 तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍यात आले.
  7. वि.प.कं. क्रं 1,2, 3, व 5 यांनी त्यांचे लेखी उत्तरात असे नमुद केले की, परिच्छेद क्रं.1 मधील मजकूर बरोबर आहे आणि परिच्‍छेद क्रं.2 मधील मजकूर हा रेकॉर्डचा भाग आहे आणि परिच्‍छेद क्रं.3 मधील सुरवातीलचा भाग बरोबर आहे. त्यांनी पूढे असे नमुद केले की, सदरहू पेशंटला लोअर अॅबडॉमनल दुःखत असल्यामूळे तिच्याबाबत  Right supra-Renal Cystic Mass चे निदान करण्‍यात आले. पूढील चौकशी केल्यानंतर सदरहू निदान बरोबर असल्याचे डॉक्टारांना समजले आणि वरिष्‍ठ युरोसर्जन डॉ.सुहास साल्पेकर, वरीष्‍ठ लॅपरोस्कोपी सर्जन श्री मुकंद ठाकुर, डॉ राजेश अटल,एम.डी. यांनी सदरहू पेशंटला उपचार दिले आणि लॅपरोस्कोपीव्दारे आणि आवश्‍यक असल्यास ओपन सर्जरी व्दारे सिस्टीक मास काढण्‍याचा सल्ला दिला याबाबत तक्रारकर्ते यांना सविस्तर माहिती देऊन त्यांची संमती घेण्‍यात आली. शस्त्रकियेपूर्वी करावा लागणा-या सर्व तपसण्‍या केल्या आणि सदरहू पेशंट याला हायरिस्क पेशंट म्हणुन उपचार केले आणि याबाबत सर्व माहिती तक्रारकर्ते यांना देण्‍यात आली होती. याबबात तक्रारकर्ते यांचा valid high risk inform consent. घेण्‍यात आला होता.  या शस्त्रकियेकरिता सिनीयर अनेस्थेटीस्ट डॉ.स्मीता हरकरे यांची सेवा घेण्‍यात आली. वि.प. यांनी पूढे असे नमुद केले की सदरहू पेशंटला सिस्ट काढुन टाकण्‍यानंतर bradycardia आणि Hypotension झाला त्याबाबत तिचेवर उपचार करण्‍यात आले आणि आयसीयुला नेण्‍यात आले.  वि.प. यांनी उपचाराबाबत  standards and protocol याचे पालन केले. परंतु पेशंटचा दिनांक 25.4.2014 रोजी सकाळी 10.00 वाजता मृत्यु झाला. तक्रारकर्ते यांनी टेंशन असता संमती दिली ही बाब वि.प. यांनी नाकारलेली आहे. वि.प. यांनी तक्रारकर्ते यांना रक्तचा पुरवठा लागणार याबाबत माहिती दिली नाही ही बाब सुध्‍दा वि.प. यांनी नाकारलेली आहे. त्यांनी पूढे असे नमुद केले की, पेशंटच्या नातेवाईकाची समंती घेतल्याशिवाय व्हीडीओग्रॉफी करण्‍यात येत नाही आणि तक्रारकर्ते यांनी याबाबत कोणतीही मागणी केली नव्हती. शस्त्रकियेबाबत वि.प. यांनी खालीलप्रमाणे नमुद केले. The patient on 25.4.2014 was shifted to the Operation Theatre for Laproscopic excision of Rt Adrenal mass at 3.30 p.m. and after requisite anesthesia, surgery was initiated from 4.30 p.m. Durin the procedure patient was having Tachycardia(+) with BP-160/110 mm Hg. As BP was on higher side NTG drip was stated and beta blockes were also given. I.V.Fluids given 2 units RL, 3 units DNS, 2 Units NS, NTG was titrated with BP record. There was bleeding from dilated vessels over the mass which was more than average, hence procedure was converted to open surgery. After removel of the cyst, suddenly patient went to Bradycardia and Hypotension. Patient was given inotopes Inj. Atropin, Sodabicard, Colliows. Patient was having bradycardia, Hypotension. या कारणास्तव सदरहू पेशंट यांचा मृत्यु झालेला आहे सदरहू पेशंटला फक्त रक्ताच्या दोन बाटल्या रक्त पुरविण्‍यात आले होते तकारदाराचे म्हणण्‍याप्रमाणे 4 बाटल्या रक्त पुरविण्‍यात आलेले नव्हते. वि.प. यांनी तक्रारीमधी परिच्‍छेद क्रं.9 ते 12 यामधील मजकूर नाकारलेला आहे. निष्‍काळजीपणामूळे तक्रारदाराचे पत्नीचा मृत्यु झाला ही बाब वि.प. यांनी नाकारलेली आहे. वि.प.कं.1 हा दवाखाना उत्तम कीर्ती असलेला आहे आणि तक्रारदाराचे पत्नीला उत्तम सेवा दिलेली आहे. वि.प. यांनी वैदयकीय निष्‍काळजीपणा केल्याचा आक्षेप नाकारलेला आहे तक्रार ही खोटी आहे आणि दंडणीय खर्चासह खारीज करण्‍यात यावी.
  8. उभयपक्षाने अभिलेखावर दाखल केलेले दस्‍तऐवजांचे, वि.प.चे लेखी उत्तर व लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता व  पूढील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

मुद्दे                                                                    उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                         होय
  2. वि.प.क्रं.1 ते 5 यांनी तक्रारदाराचे पत्नीवर

उपचार करतांना वैद्यकीय निष्‍काळजीपणा

केला आहे काय ?                                                                       नाही

  1. विरुध्‍द पक्ष क्रं.1 ते 5 यांनी तक्रारदाराला त्रुटीपूर्ण

सेवा दिली आहे काय ?                                     नाही

  1. वि.प.क्रं.6 यांनी तकारदाराचे प्रती त्रुटीपूर्ण सेवा दिली

आहे काय ?                                    नाही

  1. काय आदेश ?                                                        अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. मुद्दा क्रं.1 व 2 बाबतः- आम्ही तक्रारकर्ते यांचे वकील श्री नेवारे, आणि वि.प.क्रं.1,2,3 व 5 तर्फे श्री नायर, वकील यांचा युक्तीवाद ऐकला.
  2. तक्रारकर्ते यांचे वकीलांनी थोडक्यात असा युक्तवाद केला की, तक्रारकर्ते यांचे पत्नीला दिनांक 21.4.2014 रोजी दवाखान्यात भरती करण्‍यात आले आणि दिनांक 24.4.2014 रोजी शस्त्रक्रीया करण्‍याबाबतचा सल्ला दिला त्यावेळेस तक्रारकर्ते यांना रक्ताचा पुरवठा करावा लागेल याबाबत काहीही सूचना दिली नाही आणि तक्रारकर्ते यांना रक्त आणण्‍यास सांगीतले आणि तक्रारकर्ता जेव्हा जबरदस्तीने शस्त्रक्रीयागृहात गेला तेव्हा त्याच्या पत्नीची बॉडी वेगळी ठेवल्याचे दिसले. त्यांनी पूढे असा युकतीवाद केला की, डब्लूसीएल मार्फत करण्‍यात येणा-या चौकशीसाठी वि.प. यांनी कोणतेही कागदपत्रे दिले नाही आणि सहकार्य केले नाही. त्यांनी पूढे असा युक्तीवाद केला की, बेड तिकीट आणि डेथ समरी यामध्‍ये तफावत आहे आणि वि.प.यांनी रक्तदाब उच्च असतांनाही शस्त्रक्रीयाकरुन निष्‍काळजीपणा केलेला आहे. वि.प. यांनी अॅनेस्थस्टीटचा अहवाल दाखल केलेला नाही आणि शस्त्रक्रीयागृहाच्या नोटस व सिडी तकारकर्ते यांना दिलेल्या नाहीत म्हणुन वि.प. यांनी सेवेत त्रुटी केलेली आहे म्हणुन सदर तक्रार मंजूर करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे. त्यांनी खालील न्यायनिवाडयांचा आधार घेतला.  
  3. वि.प. यांचे वकील श्री नायर यांनी असा युक्तीवाद केला की तकारकर्ता हा सामान्य व्यक्ती आहे तज्ञ नाही. तक्रारकर्ते यांनी कोणत्याही तज्ञ डॉक्टरांचे मत मागविलेले नाही. त्यांनी पूढे असे नमुद केले की, वि.प.क्रं.1 यांच्या दवाखान्यातील तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे शस्त्रक्रीया करण्‍यात आली आणि वि.प. यांनी कोणत्याही प्रकारे निष्‍काळजीपणा केलेला नाही. वि.प. यांनी सदरहू शस्त्रक्रीयेबाबतची पध्‍दत व्यवस्थीतपणे सांगीतलेली आहे आणि तकारकर्ते यांनी घेतलेला न्यायनिवडयांचा आधार वर्तमान प्रकरणाला लागू होत नाही म्हणुन तकार खारीज करण्‍यात यावी.
  4. आम्ही वर्तमान प्रकरणातील सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले आणि तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या न्यायनिवाडयातील निरिक्षणे विचारात घेतली. तक्रारकर्ता हा सदरहू पेंशटचा पती असल्यामूळे ग्राहक आहे हे अगदी स्पष्‍ट आहे. सर्वप्रथम तक्रारकर्ते यांची तक्रार काळजीपूर्वक तपासली असता तक्रारकर्ते यांनी केवळ वैद्यकीय निष्‍काळजीपणाचा आक्षेप घेतलेला आहे आणि तकारकर्ते याला केवळ रक्त आणण्‍यास सांगीतले होते या बाबीवरुन शस्त्रक्रीयेमध्‍ये निष्काळजीपणा केलेला आहे असे सिध्‍द होत नाही.  वि.प. यांनी तकारकर्ते यांना दवाखान्यासंबंधीची सर्व कागदपत्रे दिलेली आहे आणि शस्त्रक्रीयेपर्वी आवश्‍यक असलेल्या चाचण्‍या वि.प. यांनी केलेल्या आहेत. सर्वात म‍हत्वाची बाब म्हणजे तक्रारकर्ते यांना चंद्रपूर येथील डॉक्टरांनी सुध्‍दा Cystic Mass असल्याचे निदान केलेले होते आणि वि.प. यांचे दवाखान्यामध्‍ये तपासण्‍या केल्यानंतर तेच निदान आढळले. तेव्हा सदरहू निदानाप्रमाणे पूढील कार्यवाही वि.प.चे दवाखान्यातील तज्ञ डॉक्टारांनी केलेली असल्याचे दिसून येते. या सर्व कार्यवाहीमध्‍ये नेमका निष्‍काळजीपणा कोणी आणि कसा केला हे सिध्‍द करण्‍यासाठी तक्रारकर्ते यांनी तज्ञ डॉक्टरांचे मत मागविलेले नाही आणि तसा अहवालही तकारकर्ते यांनी सादर केलेला नाही म्हणुन वि.प. यांनी शस्त्रक्रीयेदरम्यान निष्‍काळजीपणा केला असा निष्‍कर्ष वर्तमान प्रकरणातील कागदपत्रांवरुन काढता येत नाही.
  5. तक्रारदाराचे वकीलांनी वर नमुद केलेल्या नंदकिशोरप्रसाद वि. डॉ. मोहीब हमीदी, या न्यायनिवाडयातील निरिक्षणांचा आधार घेतलेला आहे. परंतु वर्तमान प्रकरणात वि.प.डॉक्टरांचे निदान आणि चंद्रपूर येथील डॉक्टरांचे निदान एकच असल्याचे आढळून येते आणि म्हणुन वर्तमान प्रकरणातील वस्तुस्थीती भिन्न असल्यामूळे सदरहू निरिक्षणे वर्तमान प्रकरणाला लागू पडत नाही असे आमचे मत आहे.
  6. वि.प. याचे वकीलांनी नमुद केलेल्या सी पी श्री कूमार वि. आर रामानूजम, (2009(6)Mh.L.J.892) या न्यायनिवाडयातील निरिक्षणांचा आधार घेतलेला आहे. सदरहू निरिक्षणांप्रमाणे वर्तमान प्रकरणात सुध्‍दा तक्रारकर्ते यांनी निष्‍काळजीपणाबाबतचा पूरावा सादर केलेला नाही आणि केवळ तकारीमध्‍ये नमुद केलेली विधाने हा पूरावा होऊ शकत नाही म्हणुन तकारकर्ते यांनी निष्‍काळजीपणाबाबत तज्ञांचे मत वर्तमान प्रकरणामध्‍ये मागविणे आवश्‍यक होते असे आमचे मत आहे.
  7. तकारकर्ते यांनी वि.प. क्रं. 6 यांना नंतर तक्रारीत पक्षकार केले परंतु त्यांचेबाबत कोणतेही आक्षेप घेतलेले नाही. वरील सर्व कारणांस्तव मु्द्दा क्रं.1 चे होकारार्थी व मुद्दा क्रं.2 व 4 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

सबब आदेश खालीलप्रमाणे....

आदेश

  1. तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्‍यात करण्‍यात येते.
  2. वि.प. क्रं.1 ते 5 यांना तक्रारकर्ते यांनी खर्चाबाबत रक्कम रुपये 5,000/- अदा करावे. 
  3. तकारदाराने वरील आदेशाची पूर्तता आदेश पारित दिनांकापासून ४५  दिवसाचे आत करावी.
  4. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  5. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.