तक्रारकर्त्यातर्फे वकील ः- श्री. एन.डि. भौतीक
विरूध्द पक्ष क्र 1 व 2 ः- एकतर्फा
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः- श्री. भास्कर बी. योगी अध्यक्ष, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 15/02/2019 रोजी घोषीत )
1. तक्रारकर्ता यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये विरूध्द पक्षांविरूध्द ही तक्रार या मंचात दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्त्यानी विरूध्द पक्ष क्र 2 कडून, विरूध्द पक्ष क्र 1 अॅपोज मोबाईल कंपनी यांनी बाजारात आणलेला मॉडेल क्र. OPPOR7 Lit IMEI No 8676170235563395, रू. 18,990/-,भरून दि. 21/11/2015 रोजी विकत घेतला. तक्रारकर्त्याने जेव्हा फोनची तपासणी केली तेव्हा त्याला कळले की, मोबाईलची बॉडी डॅमेज्ड आहे. म्हणून तक्रारकर्त्यानी विरूध्द पक्ष क्र 1 यांना सर्व्हिस सेंटरला सर्व्हिसींगसाठी दिले असतांना भरपूर कालावधी लोटूनही त्यांनी परत केला नाही म्हणून त्यांनी दि. 24/10/2016 रोजी त्यांना विचारपूस केली तरी देखील मोबाईल फोन दिला नाही.
3. तक्रारकर्त्याच्या कथनानूसार त्यांनी स्वतःच्या वापराकरीता हा फोन विकत घेतला होता. तसेच तक्रारकर्ता हा ‘विद्यार्थी’ असून त्याला कॉलेजमध्ये अॅडमिशनकरीता मोबाईलचा वापर करणे गरजेचे होते. परंतू विरूध्द पक्ष क्र 1 चा सर्व्हिस सेंटर यांनी तो दुरूस्त करून 1 वर्ष लोटूनही दिला नाही. तसेच विरूध्द पक्ष क्र 1 चा सर्व्हिस सेंटर व विरूध्द पक्ष क्र 2 यांना व्यक्तीगत भेटूनही दोघांनी कोणताही समाधानकारक उत्तर दिले नाही आणि तक्रारकर्त्याचा मोबाईल एक वर्ष होऊन सुध्दा त्यांच्याच ताब्यात आहे. म्हणून तक्रारकर्त्याने योग्य न्याय मिळण्याकरीता हि तक्रार या मंचात दाखल केली आहे.
4. तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाची नोटीस मिळूनही दोन्ही विरूध्द पक्ष मंचात उपस्थित झाले नाही व त्यांनी लेखीजबाब सादर केला नाही. म्हणून त्यांच्याविरूध्द एकतर्फा आदेश निशाणी क्र ‘1’ वर पारीत केला आहे.
5. तक्रारकर्त्याने आपल्या कथनाच्या पृष्ठर्थ आपला साक्षपुरावा, शपथपत्र अभिलेखावर सादर केला आहे. तसेच त्यांनी इनवॉइस बिल व मोबाईल विरूध्द पक्ष क्र 1 च्या सर्व्हिस सेंटरला दिले ज्याचा जॉबशीट दाखल केलेला आहे. तक्रारकत्या्रने त्यांचा लेखीयुक्तीवादही या मंचात सादर केला आहे. तक्रारकर्त्याचे विद्वान वकीलांचा मौखीक युक्तीवाद या मंचाने ऐकला. त्यावरून मंचापुढे मौखीक युक्तीवाद व सादर केलेल्या दस्ताऐवजाच्या आधारे कारणासंहित आमचे निःष्कर्ष खालीलप्रमाणे आहेतः-
:- निःष्कर्ष -:
6. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 1 ने बनवलेला फोन, विरूध्द पक्ष क्र 2 कडून रू. 18,990/-,देऊन खरेदी केला आहे. तसेच जॉबकार्डमध्ये मोबाईलचा टचेस स्क्रीन बिघडलेला आहे आणि दुरूस्तीकरीता त्यांनी तक्रारकर्त्याकडून रू. 500/-,घेतलेले आहे ते देखील नमूद आहे. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांचा पत्ता जे बिलवर आहे त्याच पत्यावर मंचाद्वारे नोटीस पाठविली असून तसेच दोन्ही पक्षाला नोटीस मिळूणही त्यांनी आपआपला लेखीजबाब कलम 13 (2) नूसार दाखल केला नसल्यामूळे तसेच तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीच्या कथनाच्या पृष्ठार्थ साक्षपुरावा शपथपत्रावर कलम 13 (4) (iii) नूसार दाखल केलेला आहे. पुराव्याच्या अभावी तक्रारकर्त्याचे कथन अबाधित राहिल्यामूळे विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला सेवा पुरावण्यिात कसुर केला आहे हि बाब सिध्द झाली असून हि तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला मोबाईलची मूळ किंमत रू. 18,990/-, वास्तविक बिलाप्रमाणे तसेच दुरूस्तीकरीता घेतलेले रू. 500/-,दि. 24/10/2016 पासून द.सा.द.शे 6 टक्के व्याजासह देण्यात यावा. तसेच तक्रारकर्त्याला शारीरीक व मानसिक त्रासाबद्दल रू. 2,000/-,व दाव्याचा खर्चाबाबत रक्कम रू. 2,000/-,देणे योग्य व न्यायोचित होईल असे या मंचाचे मत आहे.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1.तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी संयुक्तीक व वैयक्तीकरित्या मोबाईलची मूळ किंमत रू. 18,990/-, वास्तविक बिलाप्रमाणे तसेच दुरूस्तीकरीता घेतलेले रू. 500/-,दि. 24/10/2016 पासून द.सा.द.शे 6 टक्के व्याजासह देण्यात यावा.
3. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी संयुक्तीक व वैयक्तीकरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 2,000/-आणि तक्रारीच्या खर्चापोटी रू.2,000/-द्यावे.
4. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे. तसे न केल्यास वरील नमूद (2) व (3) प्रमाणे रकमेवर द.सा.द.शे 9 टक्के व्याज अदा करावे.
5. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
6. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्याला परत करावी.