जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/256 प्रकरण दाखल तारीख - 12/10/2010 प्रकरण निकाल तारीख – 27/01/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. विठठलराव पि. मल्लेशराव दुडलावार वय 38 वर्षे, धंदा शिवणकाम अर्जदार. रा. सगरोळी ता.बिलोली जि. नांदेड. विरुध्द. 1. ओंकार इण्डेन तर्फे गहीनाथ महाराज देगलूरकर, देना बँकेजवळ, कूंडलवाडी ता.बिलोली जि.नांदेड 2. इंडीयन ऑइल कॉपोरेशन लि. तर्फे मॅनिजिंग डायरेक्टर तथा प्राधिकृत अधिकारी (मार्केटींग डिव्हीजन) (वेस्टर्न रिजन 254 सी ) डॉ.अनी बेझंट रोड, वरळी कॉलनी, मुंबई -30 गैरअर्जदार 3. युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी तर्फे शाखा प्रबंधक शाखा देगलूर ता.देगलूर जि.नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.जी.आर.देशमूख गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - अड.एस.जी.मडडे निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हे सगरोळी येथील रहीवासी असून त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचा गॅस सिलेंडर गैरअर्जदार क्र.1 वितरक यांचेकडून विकत घेतला आहे. त्यांचा ग्राहक क्र.3131 असा आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी घरगूती गॅस सिलेंडरचे वापरातून होणा-या अपघाताची नूकसान भरपाई देण्याबददलचे विमा पॉलिसी घेतलेली आहे. त्यामूळे नूकसान भरपाईसाठी गैरअर्जदार क्र.1 ते 3 हे जबाबदार आहेत. दि.5.1.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदाराच्या मागणीनुसार महेश सायलू यांच्यामार्फत घरपोच गॅस सिलेंडरचा पूरवठा केला. दि.17.1.2010 रोजी सकाळी गॅस स्वयंपाकासाठी लावला असता अचानक रेग्यूलेटर जवळ आग लागून आगीचा भडका उडाला व घरगूती सामान टी.व्ही., कपडे, दागदागिने, अन्नधान्य, तांदूळ, गहू, ततूरदाळ चनादाळ, लोंखंडी रॅक, स्टिल रॅक व घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. घराचे रु.1,00,000/- चे नूकसान झाले. शेजारील घराचे सूध्दा नूकसान झाले त्यामूळे अर्जदाराचे रु.2,00,000/- चे नूकसान झालेले आहे. सदर घटनेची माहीती पोलिस स्टेशन बिलोली यांना दि.17.1.2010 रोजी दिली. त्यांनी येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच मंडळ अधिकारी यांनीही घटनास्थळला भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. गैरअर्जदार क्र.1 यांनी दिलेल्या गॅस सिलेंडरला वॉल नसल्यामूळे आग लागून अर्जदाराचे नूकसान झालेले आहे. वॉल नव्हता ही बाब गैरअर्जदार क्र.1 व महेश सायलू यांनी मान्य केली आहे. सदरचा गॅस सिलेंडर गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे नूकसान भरपाईसाठी अर्ज केलदा परंतु अद्यापपर्यत नूकसान भरपाई दिली नाही तसेच गैरअर्जदार क्र.3 कडून नूकसान भरपाई देण्यासाठ मदत सूध्दा केली नाही.गेरअर्जदार क्र.1 यांनी दि.21.1.2010 रोजी थर्ड पार्टी इन्शूरन्स द्वारे अर्जदारांना मदत देण्यासाठी पञ दिले आहे त्यांची प्रत तक्रारीसोबत दाखल केली आहे. नूकसान भरपाईची रक्कम न देऊन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली आहे म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, आगीची नूकसान भरपाई रु.2,00,000/-, तसेच ञूटीच्या सेवेमूळे झालेली नूकसान भरपाई रु.1,85,000/-व शारिरिक ञासापोटी रु.15,000/- दयावेत. गैरअर्जदार क्र.1 हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. देगलूरकर यांचा ओंकार इण्डेन कूडलवाडी यांचेशी काहीही संबंध नाही. गैरअर्जदार यांना प्राप्त झालेल्या तक्रार प्रतीवर अज्रदाराच्या सहया नाहीत. पैसे उकळणे एवढाच उददेश तक्रारीचा दिसत आहे. नूकसान भरपाईच्या रक्कमा वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया नमूद केलेल्या आहेत. तसेच कोणताही पूरावा दाखल केलेला नाही. खरेच तेवढा माल होता काय,किंवा काय किंमतीच्या होत्या, किती वर्ष वापरल्या होत्या, नूकसान झाले त्यावेळी त्यांच्या किंमती किती तरी कमी असाव्यात तरी पण मूळ किंमती गृहीत धरुन नूकसान भरपाई मागितलेली आहे. घर मालकाचेही नूकसान झाले व त्यांची पण नूकसान भरपाई मागितली आहे. व्हॉल्ह नव्हता हे म्हणणे खोटे आहे कारण सिलेंडर दि.5.1.2010 रोजी दिलेले आहे व आग दि.17.1.2010 रोजी लागली. सिलेंडरचा ताबा घेतल्यापासून अर्जदाराची जबाबदारी असते व तो कूठे ठेवावा, कसा वापरावा यांची काळजी घेण्याचे सांगितलेले असते. अपघाता बददलची शहानीशा गैरअर्जदार क्र.3 यांनी करावयाची असते त्याबाबत कंपनीने विमा कंपनीस पञ दिलेले आहे. म्हणून त्यांचे सेवेत कोणतीही ञूटी नसून त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 हे हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.3 हे वकिलामार्फ हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार ही खोटी असल्यामूळे फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. पूरावा नसल्यामूळे नसल्यामूळे अर्जदाराची तक्रार ही खोटी असल्यामूळे फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे.अर्जदार यांनी रहीवाशी प्रमाणपञ, भाडेपञ, गॅस सिलेंडरची पावती व इतर कागदपञे दाखल केलेले नाहीत. त्यामूळे अर्जदार हे ग्राहक आहेत हे सिध्द होत नाही.सदर तक्रारीमध्ये पॉलिसी कव्हर नाही.दि.5.1.2010 रोजी अर्जदार यांना महेश यांचेमार्फत गॅसचा पूरवठा करण्यात आला या बाबत कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. त्यामूळे गैरअर्जदार क्र.3 हे नूकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. गैरअर्जदार क्र.1 यांनी योग्य व चांगल्या गॅस सिलेंडरचा पूरवठा करणे ही त्यांची डयूटी आहे. त्यामूळे अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्र.3 हे जबाबदार नाहीत. गॅस सिलेंडरची केअर घेतली नसेल तर गैरअर्जदार क्र.3 हे नूकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. गैरअर्जदार यांनी पॉलिसी देताना ज्या नियम व अटी दिलेल्या आहेत त्यांचा वापर न झाल्यामूळे ते नूकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. गैरअर्जदार क्र.3 यांना लेखी तक्रार न दिल्यामूळे त्यांना सर्व्हेअरची नियूक्ती करता आली नाही त्यामूळे नेमके किती नूकसान झाले हे काढता आले नाही. अर्जदार यांनी वस्तूबददल कोणताही पूरावा दिलेला नाही. शेजारील व्यक्तीचे नूकसान झाले याबददल पूरावा नाही. तसेच त्यांनी फायर ब्रिगेड चे प्रमाणपञ दाखल केलेले नाही. तसेच नगर पालिकेचे पाण्या बददलचे चार्जेस भरल्याबददल पावती दाखल केलेली नाही. तसेच महेश हा गैरअर्जदार क्र.1 यांचा नौकर नाही.अर्जदार यांनी कोणताही ठोस पूरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. फायनल रिपोर्ट पोलिस बिलोली यांचा दाखल केलेला नाही तसेच मंडळ अधिकारी बिलोली यांची सही व शिक्का असलेला रिपोर्ट दाखल केलेला नाही. कोणत्या वस्तू जळाल्या याबददलचा मंडल अधिकारी बिलोली व पोलिस स्टेशन बिलोली यांचा रिपोर्ट दाखल नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार ही खर्चासहीत फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञाप्रमाणे खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय. 2. अर्जदाराने मागणी केलेली नूकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 व 2 ः- अर्जदार यांनी घरात वापरासाठी घेतलेले सिलेंडर हे इण्डेन कंपनीचे होते या बाबत वाद नाही. म्हणून अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. दि.5.1.2010 रोजी अर्जदारयांनी गॅस सिलेंडर घेतलेले होते. त्यानंतर दि.17.1.2010 रोजी गॅस पेटविला असता अचानक आग लागली व त्यामध्ये घरगूती सामान, टी.व्ही. कपडे, दागदागिने, अन्नधान्य, तांदूळ, गहू, लोंखडी व स्टील रॅक व बरेसचे सामान जळून गेले. तसेच अर्जदार ज्या जागेमध्ये राहत आहेत त्या घराचे नूकसान झाल्यामूळे घर मालक यांनीही अर्जदाराकडून रु,1,00,000/- घेतले. घरातील जळालेले सामाजन व घर मालक यांनी वसूल केलेले रु.1,00,000/- असे मिळून अर्जदार यांचे रु.2,00,000/’- चे नूकसान झाले अशा प्रकारे अर्ज अर्जदार यांनी दाख्ल केला आहे पण प्रत्यक्षात पाहता किती सामान जळाले त्यांची किंमत किती याबददलचा व्यवस्थित किंवा कायदेशीर पूरावा अर्जदार यांनी दाखल केलेला नाही. साध्या कागदपञावर पंचनामा करणे, मोघम रक्कम रु. 1,82,000/- अर्जदाराने दाखवलेले आहे पण प्रत्यक्षात अर्जदार हा सर्व्हेअर नेमू शकला असता व त्यांचे प्रत्यक्षात सामानाचे किती नूकसान झाले हे पूराव्यासहीत समोर आले असते. पंरतु अर्जदार यांनी तसे कोणतेही पाऊल उचलले नाही तसेच अर्जदाराच्या घरामध्ये राहत आहेत त्या घर मालकाचे घर खराब झाले म्हणून रु,1,00,000/- वसूल केले असे त्यांचे म्हणणे आहे त्या बाबत घर मालकाचे शपथपञ दाखल नाही. ज्यावेळेस अर्जदाराने सिलेंडर घेतले त्यावेळी त्यांला वॉल नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे. दि.5.1.2010 ते 17.1.2010 रोजीच्या कालावधीत अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे कोणतीही तक्रार केल्याचे दिसून येत नाही. किंवा तशा प्रकारचा अर्ज दिलेला आहे असेही प्रत्यक्षात समोर आलेले नाही. या काळात अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे तक्रार दाखल केलेली नाही. त्यामूळे नेमका स्फोट कशाने झाला याबददल सखोल पूरावा आवश्यक आहे. अर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे त्यांनी अग्नीशामक दल यांचेकडून आग विझवण्यासंबंधी कोणताही पूरावा मंचासमोर नाही. प्रत्यक्ष आग कशामूळे लागली यांची कोणताही पूरावा समोर नसल्यामूळे व अर्जदार यांचे नूकसान झाले याबददलही कोणताही पूरावा नसल्यामूळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास ञूटीची सेवा दिली असे म्हणता येत नाही. गैरअर्जदार यांचे दूकानाचा विमा उतरविला असतो. सदरच्या विमा पॉलिसीमध्हये थर्ड पार्टी इन्शूरन्स नांवाचा एक प्रकार असतो त्या प्रकारा अंतर्गत नियमाप्रमाणे जर अर्जदार बसत असेल तर त्या संबंधीचे कागदपञ अर्ज घेऊन गैरअर्जदार क्र.1 2 व 3 यांनी अर्जदारास नियमाप्रमाणे जे होत असेल ती रक्कम दयावी या नीर्णयास्तव हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. गैरअर्जदार क्र.1,2 व 3 यांनी अर्जदारास थर्ड पार्टी इन्शूरन्सच्या नियमाप्रमाणे बसत असल्यास ती रक्कम एक महिन्यात दयावी व जर नियमात बसत नसेल तर तसे अर्जदारास पञ देऊन कळवावे जेणे करुन अर्जदार सखोल पूरावा सिध्द करुन योग्य न्यायालयात तक्रार दाखल करु शकतील. 1. 2. खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. 2. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक.
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |