Maharashtra

Chandrapur

CC/21/73

Shri.Aman Ravindrasingh Babeja - Complainant(s)

Versus

One Place Mobile Company - Opp.Party(s)

Viney M.Linge

09 Mar 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/21/73
( Date of Filing : 16 Jun 2021 )
 
1. Shri.Aman Ravindrasingh Babeja
R/o.Ballarpur,Dist-Chandrapur
Chandrapur
Maharshtra
...........Complainant(s)
Versus
1. One Place Mobile Company
Hira Building,Myunipal Navin kra.213,Ward no-76,Richmand Town,Bridge Road,Banglore-560001
Banglore
Banglore
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 09 Mar 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

                        (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)                  

     (पारीत दिनांक ९/३/२०२२ )

                                           

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे  कलम ३५ सह कलम ३८ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता हा बल्‍लारपूर येथील रहिवासी असून विरूध्‍द पक्ष ही मोबाईलची निर्मिती  करून भारतात मोबाईलचे रिटेल दुकान आणि ऑनलाईन व्‍दारे विक्री करते. विरूध्‍द पक्ष हयांनी वन प्‍लस ७ प्रो. मोबाईल विक्रीकरिता अॅमेझान या ऑनलाईन शॉपिंग अॅपवर विक्रीकरिता जाहिरात जुलै-२०१९ मध्‍ये दिली होती. सदर मोबाईलची किंमत रू. ५२,९९९/-, होती. तक्रारदाराने सदर जाहिरातीवर  विश्‍वास ठेवून दि. १६/०७/२०१९ रोजी उपरोक्‍त मोबाईल खरेदी केला. विरुध्‍द पक्षाने सदर मोबाईल च्‍या सुट्या भागावर 1 वर्षाची गॅरंटी दिली होती. मोबाईल घेतल्‍यावर काही महीने सुरळीत चालला. परंतु फेब्रुवारी २०२० च्‍या दुस-या आठवडयात मोबाईलच्‍या डिस्‍प्‍ले स्‍क्रीनवर चित्र व्‍यवस्‍थीत दिसत नव्‍हते तसेच फिंगरप्रींट, स्‍कॅनर, नेटवर्क आणि बॅटरीवरील डिस्‍प्‍लेवर स्‍क्रीन पांढरी होत होती. त्‍यामुळे मोबाईलचा वापर करतांना अडचण येऊन मोबाईल वापरणे शक्‍य नव्‍हते. सबब, तक्रारदाराने कस्‍टमर केअरकडे तक्रार केली तेव्‍हा त्‍यांचेकडून प्रतिसाद/ उत्‍तर मिळाले की, मोबाईल जर वॉरंटी कालावधीमध्‍ये असेल तर कोणतेही शुल्‍क न आकारता मोबाईल दुरूस्‍त करून देण्‍यात येईल त्‍याकरीता मोबाईल सर्व्‍हीस सिल पॅक करून ब्‍ल्‍युडार्ट कुरीअरव्‍दारे पाठवावा लागेल परंतु ब्‍ल्युडार्ट कुरीअर हे चंद्रपूर येथे असल्‍यामुळे तक्रारदाराला कोविड-१९ मुळे संचारबंदी लागल्‍यामुळे बल्‍लारशा येथून चंद्रपूरला जाणे शक्‍य झाले नाही. तक्रारदाराने दि. १८/०६/२०२० रोजी विरूध्‍द पक्ष हयांना ई-मेल पाठवून  दि. ०१/०७/२०२० रोजी मोबाईल मध्‍ये दोष असल्‍याबाबत तक्रार केली. त्‍यावर त्‍यांनी मोबाईल कुरीअर व्‍दारे पाठवावे असे सांगितले म्‍हणून तक्रारदाराने ब्‍ल्युडार्ट कुरीअरद्वारे विरूध्‍द पक्षाकडे दिनांक २/७/२०२० रोजी मोबाईल पाठविल्‍यावर विरूध्‍द पक्षानी मोबाईल दुरूस्‍ती खर्चाचे इस्‍टीमेट रू. १८,७२३/- दिले. तक्रारदाराने तक्रारीत नमुद केले की, सदर मोबाईल एक वर्षाच्‍या गॅंरंटी कालावधीमध्‍ये खराब झाला असल्‍यामुळे दुरूस्‍ती खर्च लागणार नाही असे असतांनाही विरूध्‍द पक्ष हयांनी तक्रारदाराला सदर मोबाईल परत पाठविला, परंतु जेव्‍हा मोबाईल परत पाठविला तेव्‍हा त्‍याच्‍या मागील बाजुस खरचटलेला होता. त्‍यानंतर तक्रारदाराने त्‍याच्‍या वकीलामार्फत दिनांक १३/११/२०२० रोजीविरूध्‍द पक्ष हयांना नोटीस पाठवुन मोबाईल दुरूस्‍त करून देण्‍याची विनंती केली. पंरतु विरूध्‍द पक्ष हयांनी काहीही उत्‍तर दिले नाही. सदर मोबाईलवर  १ वर्षाची गॅंरंटी असुन विरूध्‍द पक्ष हयांनी मोबाईल दुरूस्‍त करून न दिल्‍यामुळे   तक्रारदाराप्रति अनुचित पध्‍दतीचा अवलंब करून न्‍युनतापूर्ण सेवा दिली असल्‍यामुळे सदर तक्रार विरूध्‍द पक्षाविरूध्‍द  आयोगासमोर दाखल केलेली आहे.
  3. तक्रारदाराची तक्रार स्‍वीकृत करून विरूध्‍द पक्ष हयांना नोटीस पाठविण्‍यात आले.विरूध्‍द पक्ष हयांना प्रकरणात नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा तक्रारीत उपस्थित न राहिल्‍यामुळे  दि. ०६/०१/२०२२ रोजी प्रकरण विरूध्‍द पक्षाविरूध्‍द एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला. 
  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेकडून वन प्‍लस ७ प्रो हा मोबाईल रुपये ५२,९९९/ ला अॅमेझॉन शॉपिंग अॅपवरुन ऑनलाईन खरेदी केला सदर मोबाईल व त्‍याचे पार्टसची १ वर्षाची गॅरंटी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिली होती ही बाब विरुध्‍द पक्ष यांना देखील मान्‍य असल्‍यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक आहे. सदर मोबाईल जुर्ले २०१९ रोजी विकत घेतल्‍यावर फेब्रुवारी २०२० च्‍या दुस-या आठवड्यात मोबाईलच्‍या स्‍क्रीनवर चिञ व्‍यवस्थित दिसत नव्‍हते व फींगरप्रिंट, स्‍कॅनर व बॅटरीवरील स्‍क्रीन पांढरी होत होती या बद्दल तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचे कस्‍टमर केअर कडे तक्रार केली असता त्यांनी मोबाईल १ वर्षाच्‍या गॅरंटी मध्‍ये असल्‍यामुळे काहीही शुल्‍क न आकारता दुरुस्‍त करण्‍यात येईल असे सांगितले व त्‍यासाठी मोबाईल सर्व्हिस सेंटर बंगलुरु येथे तक्रारकर्त्‍याने कुरीअर ब्‍ल्‍युडर्ट व्‍दारे दिनांक २/७/२०२० रोजी पाठविला असता विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक १२/७/२०२० रोजी सदर मोबाईल दुरुस्‍तीचा खर्च रुपये १८,७२३/- एवढा येईल असे सांगून मोबाईल दुरुस्‍त न करता तक्रारकर्त्‍याला परत दिनांक १०/८/२०२० रोजी परत पाठविला. तक्रारकर्त्‍याचा मोबाईल हा गॅरंटी कालावधीत होता तसेच तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष ह्यांचेमध्‍ये  सदर मोबाईल दुरस्‍ती बद्दल तक्रारीत दाखल मेलव्‍दारे चर्चा चालू होती ही बाब तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट दिसून येते आहे असे असूनसुध्‍दा तक्रारकर्त्‍याला विनाकारण मोबाईल दुरस्‍तीच्‍या खर्चाचे विवरण पाठवून विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारकर्त्‍याप्रति अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा वापर केला आहे असे आयोगाचे मत आहे. तक्रारकर्त्‍याला वेळेत सदर मोबाईल दुरस्‍त करुन न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागले असल्‍यामुळे आयोगाचे मते विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला मॉडेल क्रमांक वन प्‍लस ७ प्रो चा नवीन मोबाईल हॅन्‍डसेट द्यावा व तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक, शारीरिक व तक्रारीचा खर्च देण्‍यासही विरुध्‍द पक्ष जबाबदार आहे, असे आयोगाचे मत आहे. सबब वरील विवेचनावरुन आयोग खालिल आदेश पारित करीत आहे.

 

अंतिम आदेश

 

1. ग्राहक तक्रार क्रमांक ७३/२०२१ अंशतः मंजूर करण्‍यात येते.

२. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला मॉडेल क्रमांक वन प्‍लस ७ प्रो चा नवीन   

मोबाईल द्यावा.  

३. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी

रक्‍कम रुपये ३,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २,०००/-  द्यावे.

४. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.