Maharashtra

Chandrapur

CC/21/214

RITESH SHELKE - Complainant(s)

Versus

OMSAI TELECOM - Opp.Party(s)

23 Mar 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/21/214
( Date of Filing : 04 Apr 2021 )
 
1. RITESH SHELKE
HOUSE NO. 609, SISTER COLONY, NEAR HANUMAN TEMPLE, CHANDRAPUR
CHANDRAPUR
MAHARASHTRA
2. INFINIX MOBILE INDIA
SHOP NO F197 1ST FLOOR, HAWARE FANTASIA BUSINESS PARK VASHI NAVI MUMBAI 400703
MUMBAI
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. OMSAI TELECOM
SHOP NO. F-197, 1ST FLOOR, HAWARE FANTASIA BUSINESS PARK, PLOT NO 47, SECTOR 30A, BEHIND INORBIT MALL, VASHI 400703
CHANDRAPUR
MAHARASHTRA
2. INFINIX INDIA MOBILE
SHOP NO F197, 1ST FLOOR, FANTASIA PARK, VASHI, NAVI MUMBAI, 400703
MUMBAI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 23 Mar 2022
Final Order / Judgement

 ::: नि का ल  प ञ   :::

          (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)

                    (पारीत दिनांक २३/३/२०२२ )

 

                       

  1. तक्रारकर्ता हा चंद्रपूर येथे सिस्‍टर कॉलनी येथे राहत असून त्‍यांचा मोबाईल फोन इंफिनिक्‍स हॉट ४ प्रो यात काही तांञिक अडचणी आल्‍यामुळे त्‍यांनी ओम टेलिकॉम या इंफिनिक्‍स मोबाईल भारत या अधिकृत सेवा केंद्रात दुरुस्‍तीसाठी दिनांक ६/७/२०१९ रोजी दिला. तक्रारकर्त्‍याने पूढे नमूद केले की, त्‍यांनी सदर मोबाईल दुरुस्‍तीकरिता दिल्‍यावर त्‍यांनी तब्‍बल पाच महिण्‍यानंतर सदर मोबाईल तात्‍पुरता दुरुस्‍त  करुन दिला परंतु त्‍यानंतरही मोबाईलमध्‍ये अडचणी येवू लागल्‍या  म्‍हणजेच विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी सदर मोबाईलचे दुरुस्‍तीचे शुल्‍क  पूर्ण आकारले परंतु कामचलाऊ दुरुस्‍त करुन दिला. सबब तक्रारकर्ता यांनी पुन्‍हा दिनांक १३/०३/२०२० रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे दुरुस्‍ती करिता मोबाईल दिला परंतु आज दोन वर्ष होऊन सुध्‍दा वेळोवेळी पाठपुरावा करुनही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी सदर मोबाईल परत केला नाही. तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी सदर मोबाईल दुरुस्‍त करुन न दिल्‍यामुळे त्‍यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक ञास सहन करावा लागत आहे. सबब तक्रारकर्त्‍याने आयोगासमोर सदर तक्रार विरुध्‍द पक्ष यांचेविरुध्‍द दाखल केलेली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याची तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस काढण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हे सदर प्रकरणात उपस्थित न झाल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द दिनांक १५/०२/२०२२ रोजी प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचे आदेश करण्‍यात आला तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी निशानी क्रमांक ८ नुसार नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा प्रकरणात उपस्थित न झाल्‍यामुळे प्रकरण विरुध्‍द पक्ष क्रमांक २ विरुध्‍द एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. तसेच

 

कारणमीमांसा

 

  1. तक्रारकर्त्‍याने त्‍यांचा मोबाईल फोन इंफिनिक्‍स हॉट ४ प्रो. यात काही तांञिक अडचणी आल्‍यामुळे इंफिनिक्‍स मोबाईल भारत यांचे अधिकृत सेवा केंद्र येथे दुरुस्‍तीकरिता पाठविला, ही बाब तक्रारकर्त्‍याने तक्रारीत दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होत असल्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द  पक्ष यांचा ग्राहक आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍यांचा मोबाईल दुरुस्‍त करुन पाठविला त्‍याबद्दलचे बील तक्रारीत दाखल आहे परंतु त्‍यानंतर पुन्‍हा मोबाईल खराब झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा तो विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे दुरुस्‍तीला पाठविला परंतु त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी सदर मोबाईल तक्रारकर्त्‍याला आजतागायत परत केला नाही. तक्रारकर्त्‍याने त्‍यानंतर मोबाईल दुरुस्‍त करावा म्‍हणून वेळोवेळी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना विनंती केली तसेच विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना त्‍याच्‍या वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून मोबाईलची मागणी केली परंतु विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी उपरोक्‍त मोबाईल आजतागायत तक्रारकर्त्‍याला परत केला नाही किंवा त्‍याबद्दल आयोगात उपस्थित राहून तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील म्‍हणणे खोडून काढले नाही. सबब आयोगाच्‍या मते विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी दुरुस्‍ती करिता तक्रारकर्त्‍याकडून घेतलेल्‍या मोबाईल दुरुस्‍त न करुन देवून तक्रारकर्त्‍याप्रति सेवेत न्‍युनता केलेली आहे. सबब तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी इंफिनिक्‍स हॉट ४ प्रो. ची किंतम रुपये ७,४९९/- द्यावी तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारकर्त्‍याप्रति सेवेत कोणतीही न्‍युनता न दिल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ विरुध्‍द कोणतेही आदेश नाही.
  2.      वरील विवेचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

 

अंतिम आदेश

 

  1. ग्राहक तक्रार क्रमांक २१४/२०२१ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष १ यांनी तक्रारकर्त्‍याला इंफिनिक्‍स हॉट ४ प्रो. या मॉडेल ची किंमत रुपये ७,४९९/- द्यावी.  
  3. विरुध्द पक्ष १ यांनी तक्रारदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी व तक्रारीचा खर्च रुपये २,०००/-  द्यावे.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ विरुध्‍द कोणताही आदेश नाही.
  5. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.