Maharashtra

Ratnagiri

CC/44/2022

Ravindra Yashwant Bhelekar - Complainant(s)

Versus

Omsai Construction for Tanvi Tushar Khedekar - Opp.Party(s)

M.M.Jadhav

09 May 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, RATNAGIRI
Collector Office Compound, Ratnagiri
Phone No.02352 223745
 
Complaint Case No. CC/44/2022
( Date of Filing : 12 Apr 2022 )
 
1. Ravindra Yashwant Bhelekar
Alore, Tal.Chiplun
Ratnagiri
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Omsai Construction for Tanvi Tushar Khedekar
Tatkarevadi, Malghar, Tal.Chiplun
Ratnagiri
Maharashtra
2. Nitin Vishwanath Chaudhari
401, Sundarm Babaji Angan, 90ft Road, Cholegaon, Khambalpada, Thakurli, Dombivali(E), Thane 421201
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ARUN R GAIKWAD PRESIDENT
 HON'BLE MR. SWAPNIL D MEDHE MEMBER
 HON'BLE MRS. AMRUTA N BHOSALE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 09 May 2024
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(दि.09/05/2024)

 

व्‍दाराः- मा. श्री स्वप्निल मेढे, सदस्य

 

1)    तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून तक्रारीत नमुद वादातील मिळकत सदनिकेची रक्कम अदा करुनही सदनिकेचे नोंद खरेदीखत करुन दिले नाही अथवा ताबाही दिला नाही त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.

 

      तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथन पुढीलप्रमाणे- तक्रारदार हे तक्रारीत नमुद पत्त्यावर राहतात. सामनेवाला क्र.1 व 2 हे बिल्डर डेव्हलपर आहेत. गांव मौजे मिरजोळी, ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथील भूमापन क्र.133, उपविभाग 122, क्षेत्र 0.04-00 हे. आर.आकार0.02 पैसे, सि.स.नं.5740 ते 5742 ही जमीन मिळकत सुरेश राजाराम लवेकर, सदानंद राजाराम लवेकर, मनोहर राजाराम लवेकर यांचेकडून सामनेवाला क्र.1 यांनी विकसनाकरिता घेतली होती. त्यासाठी सामनेवाला क्र.1 व जमीन मालक यांचेमध्ये दि.08/06/2015 रोजी नोंदणीकृत विकसन करारनामा दस्त नं.चपल2642/2015 ने नोंदणी केलेली असून मुखत्यारपत्रासुध्दा नोंदणीकृत करण्यात आलेले आहे. सदर‍ मिळकतीवर सामनेवाला क्र.1 हे बांधत असलेल्या इमारतीमधील तिस-या मजल्यावरील सदनिका क्र.301 क्षेत्र 630 चौ.फुट बांधीव ही निवासी सदनिका सामनेवाला क्र.1 यांचेकडून रक्कम रु.9,45,000/- इतक्या रकमेस खरेदी करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचेमध्ये दि.14/12/2016 रोजी नोंदणी साठेखत दस्त क्र.चपल4789/2016 नोंदविण्यात आला. सदनिकेच्या ठरलेल्या मोबदल्यापैकी वेळोवेळी रोख स्वरुपात रक्कम रु.5,00,000/- सामनेवाला क्र.1 यांना अदा केलेले आहे. तसेच साठेखतासाठी रक्कम रु.64,500/- चा स्टॅम्प दिला असून रक्कम रु.12,900/- रजिस्ट्रेशन फी दिली आहे. अशी एकूण रक्कम रु.5,77,400/- साठेखतावेळी तक्रारदार यांची खर्च झाली आहे. तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचेमध्ये वेळोवेळी फोनव्दारे व प्रत्यक्ष भेटीने बांधकामासंदर्भात बोलणे होत होते. जवळजवळ एक ते दिड वर्ष सदर इमारतीचे बांधकाम पहिल्या मजल्याच्या वर जात नव्हते. त्याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना विचारणा केली असता सामनेवाला क्र.1 यांनी थातूर-मातूर कारणे सांगितले. त्यानंतर सन-2020 या कोव्हीड काळात शासन निर्बंधामुळे तक्रारदारास कोठेही बाहेर पडता आले नाही. त्यानंतर 10, डिसेंबर,2021 रोजी तक्रारदार सदर मिळकतीचे बांधकाम पाहण्यासाठी गेले असता ओमसाई कन्स्ट्रक्शनच्या जागी मनोरमा प्लाझा अशा नावाचा बोर्ड लागल्याचे दिसून आले. त्यामुळे तक्रारदार यांनी रितसर चौकशी केली असता ओमसाई कन्स्ट्रक्शन यांनी सदरच्या जमिनीबाबतचा विकसनाचा करार रद्द केला असून जमिन मालकांनी सदर विश्वनाथ आर्केड करिता प्रोप्रायटर श्री नितीन विश्वनाथ चौधरी यांचेशी सदरच्या मिळकतीचा विकसन करार केला असून सामनेवाला क्र.2 यांनी सदर इमारत विकसीत करणेसाठी घेतलेचे समजले. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांना वकील श्री विश्वजीत मनोहर यादव मार्फत दि.13/12/2021 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून सदनिकेच्या मोबदल्यापोटी स्विकारलेली रक्कम रु.5,00,000/- त्यावर 12 % व्याजासह परत करणेची मागणी केली. सामनेवाला क्र.1 यांनी सदर नोटीस न स्विकारलेने नोटीसचा लखोटा परत आला. सामनेवाला क्र.2 यांना नोटीस मिळूनदेखील त्यांनी सदर नोटीसला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे सदरची तक्रार आयोगात दाखल करणे तक्रारदारास भाग पडले आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर करुन सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास वादातील मिळकत सदनिकेचे नोंदणीकृत खरेदीखत करुन देऊन सदनिकेचा ताबा देणेबाबत सामनेवालास आदेश व्हावा किंवा सदनिकेच्या मोबदल्यापोटी सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराकडून स्विकारलेली रक्कम रु.5,00,000/- व त्यावर द.सा.द.शे.12 % व्याजाने होणारी रक्कम रु.3,00,000/- व स्टॅम्प डयुटी व रजिस्ट्रेशनचा झालेला खर्च रक्कम रु.77,400/- अशी एकूण रक्कम रु.8,77,400/- सामनेवालाकडून वसूल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.

 

2)    तक्रारदाराने त्याचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.6 सोबत एकूण 10 कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये नोंदणीकृत साठेखत दस्त क्र.चपल/4789/2016 ची प्रत, विकसन करार रद्द करणारा करार, मुखत्यारपत्र रद्द करणारा करार, सामनेवाला क्र.2 व जमिन मालक यांच्यामध्ये नोंदणीकृत झालेले विकसनकरारपत्र, तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 व 2 यांना वकीलामार्फत पाठविलेली कायदेशीर नोटीस, पोष्टाची पावती, सामनेवाला क्र.1 यांचा नोटीसचा परत आलेला लखोटा, सामनेवाला यांना नोटीस पोहोचलेची पोष्टाची पोहोच पावती, तक्रारदाराने वृत्तपत्रात दिलेली जाहीर नोटीस, सामनेवाला यांनी वाद मिळकत इमारतीचे काढलेले फोटोग्राफ्रस इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच नि.24 कडे दोन कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये तक्रारदाराने सामनेवाला यांना दि.13/12/21 रोजी वकीलामार्फत पाठविलेली नोटीसची मूळ प्रत व दि.08/06/15 रोजी जमीन मालक व सामनेवाला क्र.1 यांच्यामधील झालेले विकसन करारपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.25 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.26 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.31 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.

    

3)    प्रस्तुत कामी सामनेवाला क्र.1 यांना सदर आयोगामार्फत पाठविलेली नोटीस दि.06/09/2022 रोजी मिळालेची पोष्ष्टाची पोहोच पावती नि.20 कडे दाखल आहे. सामनेवाला क्र.1 यांना नोटीस लागू होऊनही ते सदर कामी गैरहजर राहिलेने सामनेवाला क्र.1 यांचेविरुध्द दि.01/11/2022 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.

 

4)    सामनेवाला क्र.2 यांना नोटीस लागू होऊन ते सदर कामी वकीलामार्फत हजर झाले व त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.16 कडे दाखल केले आहे. त्यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारीमधील संपूर्ण मजकूर खोटा व खोडसाळ असल्याने नाकारला आहे. सामनेवाला क्र.2 पुढे कथन करतात की, तक्रारीत नमुद वाद मिळकत ही जागा मालक लवेकर बंधुंनी सामनेवाला क्र.1 यांना दि.08/06/2015 रोजी रजि.डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट क्र.2642/2015 अन्वये व रजिस्टर कुलमुखत्यारपत्र क्र.2643/2015 अन्वये विकसनाकरिता दिलेली होती. सदर दोन्ही दस्तांचे रद्दकरार चिपळूण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दि.08/06/2018 रोजी केलेले आहेत व सदर दोन्ही दस्तांचे नंबर अनुक्रमे 2583/2018 व 2584/2018 असे आहेत. त्यानंतर सामनेवाला यांनी वाद मिळकतीचे जागा मालक यांचेशी संबंधीत मिळकतीचे रजिस्टर विकसन करारनामा अ.क्र.1672/2021 हा दि.01/04/2021 रोजी केलेला आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.2 हा सदर तक्रारीमध्ये योग्य व   लायक ठरत नसल्याने सदर तक्रारीस दिवाणी प्रक्रिया संहितेचे mis joinder of parties  या कायदेशीर तत्वाची बाधा येते. तसेच तक्रारदार यांनी वाद मिळकतीच्या जागा मालकांना पक्षकार केलेले नाही. तक्रारदारास सामनेवाला क्र.1 यांनी साठेखत करुन दिलेले असलेने त्याची जबाबदारी जमीन मालक व सामनेवाला क्र.2 यांना लागू होत नाही. तसेच तक्रारदाराची तक्रार ही मुदतीत नाही. सामनेवाला यांनी वादातील मिळकतीची नव्याने बांधकाम परवानगी घेतलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार ही पूर्णपणे गैरलागू असलेने तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.

 

5)    सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणेसोबत नि.28कडे सरतपासाचे प्रतिज्ञापज्ञ दाखल केले आहे. नि.30 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.32 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.

 

6)   वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार व तक्रारीसोबतचे सर्व कागदपत्रांचे तसेच सामनेवाला क्र.2 यांचे म्हणणे यांचे अवलोकन करुन आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

­अ.क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार व सामनेवाला हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

 

होय.

2

तक्रारदाराच्या तक्रारीस मुदतीचा बाध येतो काय?     

नाही.

3

प्रस्तुत तक्रारीस mis joinder of partiesया कायदेशीर तत्वाची बाधा येते काय ?       

नाही.

4

तक्रारदार हे सामनेवालाकडून वाद मिळकतीचे नोंद खरेदीखत करुन मिळणेस अथवा वाद मिळकत सदनिकेच्या मोबदल्यापोटी दिलेली रक्कम व्याजासह मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?

होय. 

5

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

-वि वे च न

 

7)    मुददा क्र.1 :-  तक्रारदाराने नि.6/1 कडे दाखल केलेले तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचेमधील साठेखताचे अवलोकन करता, गांव मौजे मिरजोळी, ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथील भूमापन क्र.133, उपविभाग 122, क्षेत्र 0.04-00 हे. आर.आकार0.02 पैसे, सि.स.नं.5740 ते 5742या जमीन मिळकतीवर सामनेवाला क्र.1 हे बांधत असलेल्या इमारतीमधील तिस-या मजल्यावरील सदनिका क्र.301 क्षेत्र 630 चौ.फुट बांधीव ही निवासी सदनिका सामनेवाला क्र.1 यांचेकडून रक्कम रु.9,45,000/- इतक्या रकमेस खरेदी करण्याचे तक्रारदाराने ठरविले. त्याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाला क्र.1यांचेमध्ये दि.14/12/2016 रोजी सदर सदनिका मिळकतीबाबतचे नोंदणी साठेखत दस्त क्र.चपल4789/2016 नोंदविण्यात आले. त्यासाठी मुद्रांक शुल्क रु.64500/- भरलेचे नमुद आहे. सदरची बाब सामनेवाला क्र.1 यांनी हजर होऊन नाकारलेली नाही. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे नि.16कडील लेखी म्हणणेमध्ये सदर वाद मिळकत पुन्हा विकसनाकरिता जागा मालकाकडून घेतलेचे मान्य केलेले आहे. सबब, तक्रारदार व सामनेवाला क्र.1 व 2 हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्‍पष्‍ट सिध्‍द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

8)    मुददा क्र.2 :-  सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांना आजअखेर प्रस्तुत वादमिळकतीचे नोंदणीकृत अंतिम खरेदीखत करुन दिलेले नाही. तक्रारदाराने वारंवार सामनेवालाकडे नोंद खरेदीखत करुन सदनिकेचा ताबा देणेची विनंती करुनही सामनेवाला क्र.1 यांनी अदयाप वादातील मिळकतीचे नोंद खरेदीखत करुन तक्रारदाराला करुन दिलेले नाही. सबब सदर तक्रार अर्जास कारण हे सातत्याने घडणारे (Continuous cause of action) असल्याने सदरच्या तक्रार अर्जास मुदतीची बाधा येत नसून तक्रारदाराचा तक्रार अर्ज मुदतीत आहे असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

9)    मुददा क्र.3 :-  सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे नि.16 कडील लेखी म्हणणेमध्ये सदर तक्रारीस mis joinder of parties या कायदेशीर तत्वाची बाधा येते असे कथन केले आहे. परंतु तक्रारदाराने नि.6/4 कडे दाखल केलेले सामनेवाला क्र.2 व वाद मिळकतीचे जमीन मालक यांचेमधील दि.01/04/2021 रोजीचा रजि. दस्त क्र.चपल//1672/2021 नोंद विकसन करारनामा पाहिला असता तक्रारीत नमुद वाद मिळकतीबाबत सामनेवाला क्र.1 व जागा मालक यांचेमध्ये झालेले विकसन करारपत्र व कुलमुखत्यारपत्र दि.08/06/2018 रोजी दस्त क्र.2583/2018 व 2584/2018 अन्वये रद्द केलेले असून, सामनेवाला क्र.2 यांना सदर वाद मिळकत पुन्हा विकसनाकरिता दिलेचे दिसून येते. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांना याकामी सामनेवाला पक्षकार म्हणून सामील केलेले आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी सदर तक्रारीस mis joinder of parties या कायदेशीर तत्वाची बाधा येत असलेचा घेतलेला आक्षेप हे आयोग फेटाळत आहे. सबब मुद्दा क्र.3 चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी दिले आहे.

 

10)   मुददा क्र.4 :- तक्रारदाराने तक्रारीत नमुद वाद मिळकत इमारतीमधील सदनिका क्र.301 क्षेत्र 630 चौ.फुट बांधीव ही निवासी सदनिका सामनेवाला क्र.1 यांचेकडून रक्कम रु.9,45,000/- इतक्या रकमेस खरेदी करण्याचे ठरवून त्याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचेमध्ये दि.14/12/2016 रोजी सदर सदनिका मिळकतीबाबतचे नोंदणी साठेखत दस्त क्र.चपल4789/2016 अन्वये नोंद करण्यात आले. सदर सदनिकाचे खरेदीपोटी तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना वेळोवेळी एकूण रक्कम रु.5,00,000/- अदा केलेचे सदर साठेखत दस्तामध्ये नमुद आहे. परंतु सदर वाद मिळकत इमारतीचे बांधकाम सामनेवाला क्र.1 यांनी पूर्ण न केलेने सदर वाद मिळकतीचे जागा मालक यांनी सदरच्या मिळकतीचे सामनेवाला क्र.1 यांचेसोबत दि.08/06/2015 रोजी केलेले नोंद विकसन करारपत्र व कुलमुखत्यापत्र दस्त अनुक्रमे 2642/2015 व 2643/2015 जागा मालक यांनी, दि.08/06/2018 रोजी दस्त क्र.2583/2018 व दस्त क्र.2584/2018 अन्वये रद्द केलेचे दिसून येते. सदरचे दस्त तक्रारदार यांनी नि.6/2 व 6/3 कडे दाखल केलेले आहे. तसेच सदरचे वाद मिळकतीचे जागा मालकांनी सामनेवाला क्र.1 सोबतचे विकसन करारपत्र व कुलमुखत्यारपत्र रद्द केलेनंतर दि.01/04/2021 रोजी सामनेवाला क्र.2 यांचेसोबत नोंद दस्त क्र.1672/2021 अन्वये तक्रारीत नमुद वाद मिळकतीबाबतच नवीन विकसन करारनामा केलेला आहे. ही गोष्ट जेव्हा तक्रारदाराला कळली तेव्हा तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 व सामनेवाला क्र.2 यांना वकीलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठविली होती. सदरची नोटीसची मूळ प्रत तक्रारदाराने नि.24/1 कडे दाखल केली आहे. सदरची नोटीस सामनेवाला क्र.1 यांनी स्विकारली नसलेने परत आलेला लखोटा तक्रारदाराने नि.6/7 कडे दाखल केला आहे. सामनेवाला क्र.1 हे सदर कामी आयोगाची नोटीस मिळूनदेखील याकामी हजर राहून त्यांचे म्हणणे दाखल केलेले नाही. यावरुन सामनेवाला क्र.1 यांना तक्रारदाराच्या तक्रारीतील सर्व कथने मान्य आहेत असेच गृहीत धरावे लागेल. तसेच सामनेवाला क्र.2 यांना सदर नोटीस पोहोचलेबाबतची पोष्टाची पोहोच पावती तक्रारदाराने नि.6/8 कडे दाखल केलेली आहे. यावरुन सामनेवाला क्र.2 यांना वाद मिळकत सदनिकेचे नोंद साठेखत तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचेमध्ये झालेची कल्पना होती. तक्रारदाराची नोटीस मिळूनदेखील सामनेवाला क्र.2 यांनी सदर नोटीसला कोणतेही उत्तर दिलेले नाही. याचाच अर्थ सदरची बाब सामनेवाला क्र.2 यांना मान्य आहे. तसेच तक्रारदाराने दै.सागर या वृत्तपत्रामध्ये दिलेली जाहीर नोटीसमध्येही सदर मिळकतीबाबत वर्णन केलेले आहे. तसेच तक्रारदाराने नि.6/10कडे वाद मिळकत इमारतीचे अर्धवट असलेल्या बांधकामाचे फोटो दाखल केले आहेत. सदर फोटो पाहता वाद मिळकत इमारत ही अपूर्ण अवस्थेत असलेचे दिसते. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथन खोडून काढण्यासाठी याकामी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये जमीन मालक व सामनेवाला क्र.1 यांच्यात झालेले विकसन करारपत्र व कुलमुखत्यारपत्र रितसर रद्द केलेले असून त्याबाबत त्यांच्याकडून दैनिक सागर चिपळूण या वृत्तपत्रामध्ये रितसर जाहीर नोटीस दिली होती असे कथन केले आहे. परंतु त्याबाबतचा कुठलाही कागदोपत्री पुरावा याकामी सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेला नाही. तसेच ॲङ कदम यांनी दि.24/06/2019 च्या नोटीसीने तत्कालीन जमीन मालक व सामनेवाला क्र.2 यांचेमध्ये विकसन करार होऊ घातल्याचे स्पष्टपणे जाहीर केलेले होते असे कथन केले आहे. परंतु त्याबाबत कोणताही पुरावा याकामी दाखल केलेला नाही. जरी साठेखतात तत्कालीन जमीन मालक यांना मान्यता देणारा किंवा खरेदी देणारा म्हणून पक्षकार केले नसले तरी तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांच्यात झालेला साठेकरार क्र.4789/2016 अजूनही रद्द झालेला नाही. तसेच सामनेवाला क्र.2 हे जमीन मालक यांचे मुखत्यार असलेकारणाने जमीन मालकांची जी काही मिळकती अथवा त्यावरील बांधकामाबाबत जबाबदारी आहे ती सर्व मुखत्यार या नात्याने सामनेवाला क्र.2 यांच्यावर येते. तसेच सामनेवाला क्र.2 यांना सामनेवाला क्र.1 व जागा मालक यांचेमध्ये झालेले विकसन करारपत्र व कुलमुखत्यार रद्द झालेची कल्पना होती. त्यावेळी त्यांनी सामनेवाला क्र.1 यांनी पूर्वी कुणाबरोबर करार केला आहे काय व त्यांचा त्याबाबतच्या जबाबदारीबाबत जागा मालकांशी कोणताही ठराव केलेचा दिसून येत नाही. तक्रारदारांनी त्यांचे कथनाचे पुष्ठयर्थ पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सबब, तक्रारदाराने तक्रार अर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. सदरची बाब विचारात घेता, सामनेवाला यांनी तक्रारदार यांचेकडून वादमिळकतीचे मोबदल्यापोटी रक्कम स्विकारुनही नोंद खरेदीखत करुन दिलेले नाही किंवा वाद मिळकतीच्या मोबदल्यापोटी स्विकारलेली रक्कमही परत दिलेली नाही ही बाब शाबीत होते. यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारास सदनिकेचे नोंदणीकृत खरेदीखत करुन न देऊन अथवा सदनिकेच्या मोबदल्यापोटी स्विकारलेली रक्कमही परत न करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली असलेचे शाबीत होते. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.

      सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे म्हणणे व सरतपासाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये वादातील मिळकत नव्याने विकसीत करार केल्यानंतर त्याबाबत संबंधीत प्रशासकीय यंत्रणेची नव्याने परवानगी घेतलेचे नमुद केले आहे. त्यामुळे तक्रारदारास नविन बांधकामामध्ये साठेखतात नमुद क्षेत्राएवढी म्हणजेच 630 चौ.फुट बांधीव सदनिकेचे खरेदीखत तक्रारदाराकडून देय असलेली रक्कम रु.4,45,000/- स्विकारुन देणे आवश्यक ठरेल. परंतु सामनेवालास नवीन बांधकामामध्ये तक्रारदारास सदनिका देणे अशक्य झाल्यास, तक्रारदार हे वाद मिळकत सदनिकेच्या मोबदल्यापोटी सामनेवालास अदा केलेली रक्कम रु.5,00,000/- (र.रु.पाच लाख फक्त) तसेच साठेखताचे नोंदणीसाठी झालेला स्टॅम्प व रजिस्ट्रेशनच्या खर्चाची एकूण रक्कम रु.77,400/- सामनेवाला क्र.1 व 2 कडून परत मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्दा क्र.4 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.

 

11)   सबब, प्रस्‍तुत कामी हे आयेाग पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.

 

                        आदेश

 

1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.

 

2) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास गांव मौजे मिरजोळी, ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथील भूमापन क्र.133, उपविभाग 122, क्षेत्र 0.04-00 हे. आर.आकार0.02 पैसे, सि.स.नं.5740 ते 5742 या जमीन मिळकतीवर बांधत असलेल्या मनोरमा प्लाझा या इमारतीमधील सदनिका क्षेत्र 630 चौ.फुट चे नोंद खरेदीखत करुन सदनिकेचा ताबा दयावा. तत्पुर्वी तक्रारदाराने सदनिकेची मोबदल्याची उर्वरित रक्कम रु.4,45,000/- सामनेवाला यांना अदा करावी.

 

अथवा

 

      सामनेवाला क्र.1 व 2 यांना तक्रारदारास वाद मिळकत इमारतीमध्ये सदनिका देणे शक्य नसल्यास तक्रारदाराकडून वाद मिळकत सदनिकेच्या खरेदीपोटी स्विकारलेली रक्कम रु.5,00,000/- (रक्कम रुपये पाच लाख मात्र) व साठेखताचे नोंदणीसाठी झालेला स्टॅम्प व रजिस्ट्रेशनच्या खर्चाची रक्कम रु.77,400/- तक्रारदारास अदा करावी. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज अदा करावे.

 

3) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- (रक्कम रुपये वीस हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्क्म रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.

 

4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

5) विहीत मुदतीत सामनेवाला यांनी आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्‍वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6) आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. ARUN R GAIKWAD]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. SWAPNIL D MEDHE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. AMRUTA N BHOSALE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.