Maharashtra

Kolhapur

CC/10/224

Ananda Shripati Warute. - Complainant(s)

Versus

Omkar Laghu Udyojaka Nagari Sah Pat Sanstha - Opp.Party(s)

Sandeep Jadhav.

12 Oct 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/223
1. A) Kum.Vrushali Sattappa Varute, B) Kum.Meenakshi Satappa Varute, C) Kum.Shreya Ragunath Varute, D) Kum.Madhuri Ananda Varute, E) Kum.Shivani Bhagwan Varute, All r/o.Aare, Tal.Karveer, Dist.KolhapurComplainants in Complaint No.223/102. Shri Ananda Shripat Varute, r/o. Aare, Tal.Karveer, Dist.Kolhapur. (Complainant in Complaint No. 224/10)Complainants thorough Shri Satappa Shripati Varute, r/o.Aare, Tal.Karveer, Dist.Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Omkar Laghu Udoyjak Nagari Sah Pat Sanstha, Kolhapur 1884-B/C, Maharana Pratap Chowk, Laxmipuri, Kolhapur.2. Chairman, Shri Namdeo Narayan Arekar-PatilA/P. Aare, Tal.Karveer, Dist.Kolhapur3. Vice Chairman, Shri Dadmakar Dattatray Patil,R/o.2942, C, Sonya Maruti Chowk, Kolhapur.4. Shri Hindurao Bapuso Magdum.5. Shri Namdeo Bapu MetilA/p. Aare, Tal.Karveer, Dist.Kolhapur6. Shri Niwas Sampatrao MohiteR/o. As above7. Shri Janardhan Gundu PatilA/p. Parite, Tal.Karveer, Dist.Kolhapur8. Shri Kundlik Mahadeo NarkarA/p.Pungaon, Tal.Radhanagari, Dist.Kolhapur9. Shri Sanjay Sambhaji DesaiR/o. Aasar Aashiyana, Baba Jaragnagar, Lay-out Colony, Kolhapur.10. Sou.Suman Pralhad LamboreR/o. 44, A Ward, Shivaji Peth, Kolhapur11. General Manager, Janardhan Gundappa NikharageA/p. Aare, Tal.Karveer, Dist.Kolhapur12. Manager, Vijendra Hindurao Patil,R/o.Vakare, Tal.Karveer, Dist.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv.Sandeep Jadhav for the complainants
Opponent No.2 in person

Dated : 12 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

संयुक्‍त निकालपत्र :- (दि.12.11.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)        ग्राहक तक्रार केस नं.223 व 224/10 या तक्रारींच्‍या विषयांमध्‍ये साम्‍य आहे.  तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्‍याने हे मंच दोन्‍ही प्रकरणांमध्‍ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे.

(2)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला.  सामनेवाला क्र.2 तसेच सामनेवाला क्र. 1 व 12 यांनी म्‍हणणे दाखल केले.  उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही.  सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी व सामनेवाला क्र.2 यांनी स्‍वत: युक्तिवाद केला.

(3)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,

           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत बंद, दामदुप्‍पट, ॐकार ठेवीच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-

 

अ.क्र.

तक्रार क्र.

ठेव पावती क्र.

ठेव रक्‍कम

ठेव तारीख

मुदतपूर्ण तारीख

मुदतपूर्ण रक्‍कम/व्‍याजदर

1.

223/10

2044

26000/-

06.06.2002

06.06.2007

52000/-

2.

--”--

4722

16000/-

02.11.2005

02.11.2007

9%

3.

--”--

181

10000/-

05.11.2002

05.11.2023

208500/-

4.

--”--

2043

26000/-

06.06.2002

06.06.2007

52000/-

5.

--”--

2434

7000/-

08.08.2003

08.08.2009

14000/-

6.

224/10

2279

20000/-

05.05.2002

05.05.2007

40000/-

 

(4)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे सव्‍याज रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे.  तथापि, सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत.  त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.

    

(5)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या, व वटमुखत्‍यारपत्र इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.

(6)        सामनेवाला क्र.2 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत.  ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, प्रस्‍तुत सामनेवाला यांनी उपनिबंधक, सहकारी संस्‍था, शहर कोल्‍हापूर यांचेकडे दि.05.10.2009 रोजी प्रकृति साथ देत नसलेमुळे राजीनामा दिलेला आहे.  सबब, प्रस्‍तुत कामांतून त्‍यांना वगळणेत यावे अशी विनंती केली आहे.

(7)        सामनेवाला क्र.1 व 12 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत.  ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सामनेवाला क्र.12 विजेंद्र हिंदूराव पाटील हे सामनेवाला संस्‍थेचे केंव्‍हाही मॅनेजर नव्‍हते.  तसेच, सामेनवाला क्र.2 ते 10 हे तक्रारदारांची ठेव रक्‍कम देण्‍यास केंव्‍हाही वैयक्तिक जबाबदार नव्‍हते.  तसेच, वसुल होईल त्‍याप्रमाणात मुद्दल अधिक सेव्‍हींगच्‍या व्‍याजदराने होणारे व्‍याज हप्‍त्‍याने देणेस संस्‍था तयार आहे.  सामनेवाला संस्‍था ही गेली 2-3 वर्षे आर्थिक अडचणीत असल्‍याने सदर रक्‍कमा देणे अडचणीचे झाले आहे.  तक्रारदारांना यापूर्वी ब-याच रक्‍कमा अदा केलेल्‍या आहेत.  तक्रारदारांनी तक्रारीत केलेल्‍या मागण्‍या चुकीच्‍या व बेकायदेशीर आहेत.  सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे.

 

(8)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे.  सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही.  सदर ठेवींपैकी काही ठेव पावत्‍यांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तसेच मुदतपूर्व ठेव रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे.  ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे.  सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेली नसल्‍याने केवळ त्‍यांच्‍या कथनावर विश्‍वास ठेवता येणार नाही. तसेच, त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.   सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा  सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे.  सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 ते 10 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.11 व 12 हे संस्‍थेचे कर्मचारी असल्‍याने त्‍यांची केवळ संयुक्तिक‍ जबाबदारी  आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

 

(9)        तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍यांपैकी पावती क्र.2044, 2043, 2434 व 2279 या दामदुप्‍पट ठेवींच्‍या असून त्‍यांच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत असे दिसून येते.  त्‍यामुळे तक्रारदार हे दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांवरील मुदतपूर्ण रक्‍कमा मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

(10)       तक्रार क्र.223/10 मधील तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांपैकी ओंकार ठेव पावती क्र.181 ची मुदत अ़द्याप पूर्ण झालेली नाही असे दिसून येते.  म्‍हणजेच तक्रारदारांनी सदर ठेव रक्‍कमांची मुदतपूर्व मागणी केलेचे स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे तक्रारदार हे सदर ठेव पावत्‍यांच्‍या रक्‍कमा या भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वानुसार सदर ठेव पावत्‍यांची तक्रार दाखल दि.09.04.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्‍या मुदतीकरिता देय असणा-या व्‍याजदरातून द.सा.द.शे.1 टक्‍का वजाजाता होणा-या व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत.

 

(11)        तसेच, तक्रार क्र.223/10 मधील तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांपैकी पावती क्र.4722 ही मुदत बंद ठेवींची आहे व तिची मुदत संपलेचे दिसून येते.  त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत.  तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

(12)       तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले.  त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

आदेश

(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.

(2)   सामनेवाला क्र.1 ते 10 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.11 व 12 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रार क्र.223/10 मधील तक्रारदारांना मुदत बंद ठेव पावती क्र.4722 वरील रक्‍कम रुपये 16,000/- (रुपये सोळा हजार फक्‍त) द्यावी.  सदर रक्‍कमेवर ठेव पावतीवर नमूद मुदतीकरिता द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.

(3)   सामनेवाला क्र.1 ते 10 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.11 व 12 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील दामदुप्‍पट रक्‍कमा द्याव्‍यात.  सदर रक्‍कमांवर कोष्‍टकात नमूद तारखांपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.

 

अ.क्र.

तक्रार क्र.

ठेव पावती क्र.

देय मुदतपूर्ण रक्‍कम

व्‍याज देय तारीख

1.

223/10

2044

52000/-

06.06.2007

2.

--”--

2043

52000/-

06.06.2007

3.

--”--

2434

14000/-

08.08.2009

4.

224/10

2279

40000/-

05.05.2007

 

(4)   सामनेवाला क्र.1 ते 10 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.11 व 12 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रार क्र.223/10 मधील तक्रारदारांना ॐकार ठेव पावती क्र.181 वरील रक्‍कम रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्‍त) द्यावी.  सदर रक्‍कमेवर भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वानुसार ठेव तारखेपासून सदर ठेव पावत्‍यांची तक्रार दाखल दि. 09.04.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्‍या मुदतीकरिता देय असणा-या व्‍याजदरातून द.सा.द.शे.1 टक्‍का व्‍याज वजाजाता होणारे व्‍याज द्यावे व दि. 10.04.2010 रोजीपासून सदर रक्‍कमेवर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.

 

(6)   सामनेवाला क्र.1 ते 10 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.11 व 12 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना प्रत्‍येक तक्रारीकरिता मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT