Maharashtra

Kolhapur

CC/10/388

Shantabai Rangrao Gavade. - Complainant(s)

Versus

Omkar Laghu Udyojak Nagari Sah Pat Sanstha and others. - Opp.Party(s)

Y.L.Warute.

16 Nov 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/388
1. Shantabai Rangrao Gavade.Are.Tal-Karvir.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Omkar Laghu Udyojak Nagari Sah Pat Sanstha and others.Maharana Pratap Chowk.Kolhapur2. Namdev Narayan Arekar PatilA/p.Aare, Tal,Karvir, Kolhapur3. Hindurao Bapuso MadumSadoliKhalasa, Tal.KarvirKolhapur4. Padmakar Dattatraya Patil2942 C, Sonya Maruti Chowk, Kolhapur5. Namdev Bapu MetilA/p. Aare, Tal,Karvir, Kolhapur6. Janardan Gundu PatilA/p.Parite, Tal.KarvirKolhapur7. Kundlik Mahadev NarkarPugaon, Tal.Radhanagari, Kolhapur8. SAnjay Sambhaji DesaiAsar Asiana, Baba Jaragnagar, Lay out Colony, Kolhapur9. Sau.Suman Pralhad Lambore44, A Ward, Shivaji Peth, Kolhapur10. Nivas Sampatrao MohiteAare, Tal.KarvirKolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Y.L.Warute., Advocate for Complainant

Dated : 16 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र :- (दि.16/11/2010) (श्री एम.डी.देशमुख,अध्‍यक्ष)
 
(01)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1, 3, 4, 6 व 8 हे सदर मंचापुढे आपल्‍या वकीलांमार्फत हजर झाले. परंतु त्‍यांना संधी देऊनही त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले नाही. सामनेवाला क्र.5, 7, 9 व 10 यांना नोटीस लागू होऊनसुध्‍दा ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणेही दाखल केलेले नाही. सामनेवाला क्र.2 यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचे वेळेस तक्रारदाराचे वकीलांनी युक्‍तीवाद केला.
 
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी :- सामनेवाला क्र.1 ही महाराष्‍ट्र राज्‍य सहकार कायदयाखाली नोंद झालेली सहकारी पत संस्‍था आहे. सामनेवाला क्र.1 पत संस्‍‍थेचे सामनेवाला क्र. 2 ते 10 हे संचालक आहेत. सदर पत संस्‍थेत यातील तक्रारदार यांनी खालीलप्रमाणे दामदुप्‍पट ठेव रक्‍कम ठेवली होती. 

अ.
क्र.   
तक्रारदाराचे नांवे
ठेव
पावती
क्र    
ठेवीचा
दिनांक
मुदत
संपलेचा
दि.   
ठेवलेली
रक्‍कम
मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम
01
सौ.शांताबाई रं. गावडे
2709 
17/12/03
17/12/09
20,000/-
40,000/-
02
सौ.शांताबाई रं. गावडे
2710 
17/12/03
17/12/09
20,000/-
40,000/-
03
सौ.शांताबाई रं.गावडे
2709 
17/12/03
17/12/09
10,000/-
20,000/-
04
रंगराव बा.गावडे
2718 
17/12/03
17/12/09
21,000/-
42,000/-
05
बाजीराव रं.गावडे
2712
17/12/03
17/12/09
20,000/-
40,000/-
06
बाजीराव रं.गावडे
2713
17/12/03
17/12/09
20,000/-
40,000/-
07
बाजीराव रं.गावडे
2714
17/12/03
17/12/09
10,000/-
20,000/-
08
शहाजी रं.गावडे
2716
17/12/03
17/12/09
20,000/-
40,000/-

(03)       तक्रारदार आपल्‍या तक्रारीत पुढे सांगतात, सदर दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांची मुदत संपलेनंतर सदर रक्‍कमेची तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे व्‍याजासह मागणी केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारास दाद दिली नाही. तक्रारदाराच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा मुदती अंती  परत करणेची सर्व सामनेवाला यांची कायदेशीर व नैतीक जबाबदारी होती व आहे. तथापि, सदरच्‍या ठेव रक्‍कमांची सामनेवालांकडे वारंवार मागणी करुनही सामनेवालांनी ठेव रक्‍कमा न दिलेने तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.17/06/2010 रोजी वकीलांमार्फत रजि.पोष्‍टाने नोटीस पाठवली असता सदरची नोटीस मिळूनही सामनेवालांनी तक्रारदाराची देऊन तक्रारदाराची ठेव रक्‍कम देणेस टाळाटाळ केलेली आहे. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराची ठेव परत न करता आर्थिक,मानसिक त्रास दिलेला आहे.यामुळे सामनेवाला हे तक्रारदारांच्‍या ठेव पावतीवरील रक्‍कमा द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह परत करण्‍यास वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या जबाबदार आहेत. सबब, तक्रारदारांची ठेव पावतीवरील रक्‍कमा व त्‍यावर व्‍याज व मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा कोर्ट खर्च मिळणेकरिता या मंचासमोर सदरील तक्रार अर्ज दाखल केला आहे.
 
(04)       तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांची सत्‍यप्रत, तक्रारदाराने सामनेवाला यांना वकीलां मार्फत पाठविलेली नोटीस, नोटीस पोहोचलेची पोष्‍टाची पोच पावती इ.कागदपत्रे जोडलेली आहेत व शपथपत्र दाखल केलेले आहे.
 
(05)       सामनेवाला क्र. 2 यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेमध्‍ये तक्रारदाराच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमांचा तपशील वगळता इतर सर्व कथने नाकारलेली आहेत. ते आपल्‍या लेखी म्‍हणणेत पुढे सांगतात, प्रस्‍तुत सामनेवाला यांनी सामनेवाला संस्‍थेला व उपनिबंधक, सहकारी संस्‍था(शहर)कोल्‍हापूर यांना दि.05/10/2009 रोजी तसेच जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था कोल्‍हापूर यांना दि.08/10/009 रोजी प्रकृती साथ देत नसले कारणाने राजीनामा दिलेला आहे. त्‍यामुळे परतफेडीची संयुक्तिक व वैयक्तिक जबाबदारी प्रस्‍तुत सामनेवाला यांचेवर येत नाही. तसेच तक्रारदाराने वकीलांमार्फत दि.17/06/2009रोजी पाठविलेली नोटीस प्रस्‍तुत सामनेवाला यांना मिळालेली नाही.सबब तक्रारदाराने खोटे कथन करुन अॅफिडेव्‍हीट केले आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज निकाली काढण्‍यात यावा व प्रस्‍तुत सामनेवाला यांना सदर तक्रारीतून वगळण्‍यात यावे तसेच तक्रारदाराने प्रस्‍तुत सामनेवाला यांना विनाकारण पक्षकार करुन मानसिक व आर्थिक त्रास दिल्‍याने तक्रारदाराकडून प्रस्‍तुत सामनेवाला यांना नुकसानीपोटी रक्‍कम रु.5,000/- देणेबाबतचा आदेश व्‍हावा अशी विनंती प्रस्‍तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(06)      सामनेवाला क्र.2 यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेसोबत सामनेवाला संस्‍थेकडे, उपनिबंधक, सहकारी संस्‍था व जिल्‍हा उपनिबंधक, सहकार संस्‍था, कोल्‍हापूर यांना राजीनामा मंजूरीबाबत दिलेली पत्रे दाखल केली आहेत.
 
(07)       सामनेवाला क्र.1, 3, 4, 6, 8 हे सदर मंचापुढे आपल्‍या वकीलांमार्फत हजर झाले. परंतु त्‍यांना या मंचाने संधी देऊनही त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले नाही. सामनेवाला क्र.5, 7, 9, 10, यांना नोटीस लागू होऊनसुध्‍दा ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणेही दाखल केलेले नाही.सदर सामनेवाला यांचे वर्तणूकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांची रक्‍कम परत करणेकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्‍न केलेले नाहीत हे स्‍पष्‍ट दिसून येते. तसेच सामनेवाला यांनी सदर प्रकरणी आपले म्‍हणणे वेळेत दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांचा तक्रार अर्ज मान्‍य असल्‍याचे दाखवून दिले आहे. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी राजीनामा दिलेबाबतचे पत्र दाखल केले आहे. परंतु सदर राजीनामा मंजूर झाला आहे किंवा नाही याबाबत कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. सामनेवाला यांचे वर्तणूकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांची रक्‍कम परत करणेकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्‍न केलेले नाहीत हे स्‍पष्‍ट दिसून येते. सबब प्रस्‍तुत सामनेवाला आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत.
 
(08)       तक्रारदारांचा शपथेवरील तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे यांचा साकल्‍याने विचार करता तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेप्रमाणे सामनेवाला यांचेकडे दामदुप्‍पट ठेव खातेवर रक्‍कम ठेवल्‍याचे निदर्शनास येते.तथापि,मुदतीनंतर सदर ठेव पावतीवरील रक्‍कमेची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कम परत न केल्‍याने तक्रारदारांनी सदरील तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. 
 
(09)       तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टी प्रित्‍यर्थ सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेल्‍या दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍यांची मुदत संपलेचे दिसून येते. सदर दामदुप्‍पट ठेव पावत्‍यां क्र.2709, 2710, 2712, 2713, 2716 वरील प्रत्‍येकी दामदुप्‍पट रक्‍कम रु.40,000/- तसेच दामदुप्‍पट ठेव पावती क्र.2711, 2714 वरील प्रत्‍येकी दामदुप्‍पट रक्‍कम रु.20,000/-व दामदुप्‍पट ठेव पावती क्र.2718 वरील रक्‍कम रु.42,000/-मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.तसेच सदर दामदुप्‍पट रक्‍कमेवर मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत सदर रक्‍कमेवर द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सदरची रक्‍कम देणेस सामनेवाला क्र. 2 ते 10 हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या जबाबदार आहेत,तर सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला संस्‍थेचे मॅनेजर असलेने ते फक्‍त संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांच्‍या रक्‍कमा देणेस जबाबदार आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.    
                
2) सामनेवाला क्र.2 ते 10 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.1 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालीलप्रमाणे दामदुप्‍पट ठेव रक्‍कम अदा करावी व सदर रक्‍कमेवर मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे. 

अ.
क्र.
तक्रारदाराचे नांवे
ठेव पावती क्र
मुदत संपलेचा
दि.
मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम
01
सौ.शांताबाई रं. गावडे
2709 
17/12/09
40,000/-
02
सौ.शांताबाई रं. गावडे
2710 
17/12/09
40,000/-
03
सौ.शांताबाई रं.गावडे
2709 
17/12/09
20,000/-
04
रंगराव बा.गावडे
2718 
17/12/09
42,000/-
05
बाजीराव रं.गावडे
2712
17/12/09
40,000/-
06
बाजीराव रं.गावडे
2713
17/12/09
40,000/-
07
बाजीराव रं.गावडे
2714
17/12/09
20,000/-
08
शहाजी रं.गावडे
2716
17/12/09
40,000/-

 
3) सामनेवाला क्र.2 ते 10 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.1 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त)  व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) दयावेत.

 


[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER