जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/298 प्रकरण दाखल तारीख - 08/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 29/01/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. अजायबसिंघ पि. ध्यानसिंघ सोखी, वय 48 वर्षे, धंदा कंत्राटदार, अर्जदार रा. वजीराबाद नांदेड विरुध्द. ओमेगा कन्स्ट्रक्शन इिक्वपमेंट प्रायव्हेट लि, गैरअर्जदार तर्फे संचालक (डायरेक्टर), मोहित गुलाठी, कार्यालयीन पत्ता प्लॉट नं.262, एम.अण्ड एल सेक्टर – 24, फरीदाबाद - हरीयाना. अर्जदारा तर्फे वकील - अड.शिरीष नागापुरकर गैरअर्जदारा तर्फे वकील - एकतर्फा निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) गैरअर्जदार यांनी त्रुटीची सेवा दिली म्हणुन अर्जदारांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केलेले आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हे नांदेड येथील रहिवाशी असून त्यांनी दि.25/01/2010 रोजी हायड्रोलिक मोबाईल क्रेन विकत घेतली होती. परत त्यांना व्यवसायासाठी दुस-या क्रेनची गरज भासली म्हणुन त्यांनी गैरअर्जदाराकडे मागणी केली. गैरअर्जदार यांनी रु.50,000/- दि.04/10/2010 रोजी दिलेल्या कोटेशनुसार नगदी स्वरुपात भरले. त्याची पावती क्र.17 गैरअर्जदार यांनी दिला व अर्जदाराची मागणी बुक केली व अर्जदार यांना क्रेन 20 दिवसात नांदेड येथे देतो असे आश्वासन दिले होते. बरेच दिवस वाट पाहील्यानंतर दि.26/10/2010 रोजी चौकशी केली असता, सध्या हायड्रोलिक मोबाईल क्रेन देऊ शकत नाही असे सांगीतले. अर्जदाराच्या कामात व्यत्यय येत असल्यामुळे परत दि.06/11/2010 रोजी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे दिली व आजपावेतो हायड्रोलिक मोबाईल क्रेनची डिलिवरी दिली नाही व रु.50,000/- अनामत रक्कमही दिली नाही. म्हणुन अर्जदार यांनी तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, रु.50,000/- व त्यावर दि.05/10/2010 12 टक्के व्याजासह मिळावे किंवा पुढील 20 दिवसांत हायड्रोलिक मोबाईल क्रेनची डिलीवरी मिळावी तसेच आर्थीक नुसानीबद्यल रु.1,00,000/-, मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु.20,000/- दावा खर्च रु.10,000/- मिळावेत.
गैरअर्जदार यांना पाठवलेली नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही. म्हणुन त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासल्यानंतर खालील मुद्ये स्पष्ट झाले. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हा ग्राहक आहे काय होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदार यांना नुकसान भरपाई देण्यास बांधील आहे काय होय. 3. काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 – गैरअर्जदार यांना नोटीस मिळूनही गैरहजर. त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही, संधी देऊनही लेखी जबाब व युक्तीवाद केला नाही. दि.11/01/2011 रोजी अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रानुसार त्यांनी गैरअर्जदार यांना रु.50,000/-कॅश दिलेले आहे,हे स्पष्ट होते तसेच त्यांनी हायड्रोलिक मोबाईल क्रेनची ऑडर बुक केली होती पण गैरअर्जदार यांनी ठराविक मुदतीत त्यांना हायड्रोलिक मोबाईल क्रेनचा पुरवठा केला नाही, ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी हे अर्जदार यांनी सिध्द केले आहे. गैरअर्जदार यांच्या या वर्तणुकीमुळे निश्चितच अर्जदाराचे नुकसान झालेले असणार यात वाद नाही. यापुर्वी अर्जदाराने त्यांच्या पत्नीच्या नांवावर एक क्रेन घेतलेले होते हे तक्रारीमध्ये आलेले आहे व त्याची खरेदी पावती दि.25/01/2010 ची मंचासमोर दाखल केलेली आहे. असे असुनही गैरअर्जदारांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे. म्हणून गैरअर्जदार यांनी अर्जदारास निकालपत्र मिळाल्यापासुन एक महिन्यात त्यांचे ऑडरप्रमाणे क्रेन नांदेड येथे आणुन द्यावी व उर्वरित किंमत अर्जदाराने गैरअर्जदारास द्यावी. अस न केल्यास अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेले क्रेनची अनामत रक्कम रु.50,000/- 12 टक्के व्याजाने दि.05/10/2010 पासुन रक्कम फिटेपर्यंत वापस द्यावी व अर्जदारास क्रेन डिलीव्हीरी न मिळाल्यामुळे झालेल्या नुकसानपोटी रु.25,000/- नुकसान भरपाई व मानसिक त्रासापोटी द्यावेत व दावा खर्च रु.2,000/- एक महिन्यात द्यावे, असे न केल्यास रु.50,000 +रु.25,000 + रु.2000 = रु.77000 वर 12 टक्के दराने रक्कम फिटेपर्यंत व्याजासह द्यावे, या निर्णयास्तव हे मंच आलेले आहे.
आदेश 1. गैरअर्जदार यांनी निकाल कळाल्यापासुन एक महिन्याच्या आंत क्रेन नांदेड येथे आणुन द्यावी व क्रेन दिल्यास अर्जदार यांनी उर्वरित रक्कम गैरअर्जदार यांना द्यावी.
किंवा 2. गैरअर्जदार यांनी रु.50,000/- दि.05/10/2010 पासुन 12 टक्के व्याजाने अर्जदार यांना द्यावे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना रु.25,000/- नुकसान भरपाई व मानसिक त्रासापोटी व रु.2,000/- दावा खर्च म्हणुन द्यावेत. असे न केल्यास एकुण रक्कम रु.77,000/- वर 12 टक्के व्याज रक्कम फिटपर्यंत द्यावे लागेल. 3. संबधीताना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |