नि.14 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 163/2010 नोंदणी तारीख – 13/07/2010 निकाल तारीख – 23/12/2010 निकाल कालावधी – 160 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्रीमती अंजली रामचंद्र निकम 2. अजिंक्य रामचंद्र निकम 3. मयुरी रामचंद्र निकम सर्व रा.कोडोली एम.आय.डी.सी. सातारा ता.जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री एस.एस.सातभाई) विरुध्द 1. मे.ओम डेव्हलपर्स तर्फे हरीश मानिकराव वाघ 2. सुकेन विलास धोत्रे नं.1 रा. पुणे प्लॉट नं.14, डी विंग 15, सुंदर गार्डन सर्वे नं.15/2/1अ + 16/2 + 1अ माणिक बाग, वडगाव बु पुणे-51 नं.2 रा. 470, नारायण पेठ, पुणे ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांचे मालकीची मौजे वाई शहरात गंगापूर येथे जमीन मिळकत आहे. सदरची मिळकत अर्जदार यांनी जाबदार यांना विकसनासाठी देण्याचे ठरविले व त्यानुसार अर्जदार व जाबदार यांचेमध्ये विकसन करार झाला. नियोजित इमारतीमध्ये अर्जदार यांना पहिल्या मजल्यावर व दुस-या मजल्यावर प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण दोन फलॅट देण्याचे ठरले होते. तसेच रक्कम रु.2,25,000/- जादा रक्कम देणेचे जाबदार यांनी कराराप्रमाणे कबूल केले होते. त्यापैकी रु.50,000/- जाबदार यांनी अर्जदार यांना दिले व उर्वरीत रक्कम चार महिन्याचे मुदतीत देण्याचे कबूल केले होते. करारप्रमाणे जाबदार यांनी अर्जदार यांना रु.70,000/- दिले परंतु उर्वरीत रक्कम आजअखेर दिलेली नाही. तसेच मुदतीमध्ये फलॅटचा ताबा दिला नाही. बांधकाम झालेनंतर फक्त एकच फलॅट अर्जदार यांना दिला. दुस-या फलॅटचे काम मुद्दाम मागे ठेवले आहे. सबब अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस पाठविली परंतु जाबदार यांनी त्यास प्रतिसाद दिलेला नाही. सबब करारात ठरलेप्रमाणे उर्वरीत रक्कम व त्यावरील व्याज मिळावेत, एका फलॅटचा ताबा मिळावा, व दरमहा नुकसान भरपाई दाखल रु. 1,68,750/- मिळावेत, मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.1 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. जाबदार क्र.2 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचा पोस्टाचा शेरा असलेला लखोटा परत आलेला आहे. जाबदार क्र.1 व 2 हे नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदारतर्फे दाखल नि.13 कडील लेखी युक्तिवाद पाहिला तसेच दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 4. अर्जदारची तक्रार पाहता अर्जदारने जाबदार यांना वाई ता.वाई गंगापूर येथील नगरभूमापन क्र.51/अ 12 क्षेत्र 106.80 चौ.मी. नगरभूमापन क्र. 51अ/13 क्षेत्र 128 चौ.मी.या मिळकती विकसन करणेसाठी दिल्या. मोबदल्यात जाबदारने दोन फलॅट व रक्कम रु.2,25,000/- देणेचे ठरले. परंतु जाबदारने फक्त एक फलॅट व रक्कम रु.70,000/- दिले. उर्वरीत एक फलॅट व रक्कम रु.1,05,000/- अद्याप न देवून सेवेत त्रुटी केली आहे. सबब सदर देणेबाबत आदेश व्हावा अशी तक्रार दिसते. 5. निर्विवादीतपणे अर्जदार व जाबदार यांचा व्यवहार वाई जि.सातारा येथे झालेला दिसतो. निर्विवादीतपणे जाबदार विकसनसाठी घेतलेल्या मिळकतीमधून रक्कम कमविणार आहेत व मोबदल्यात अर्जदार यांना दोन फलॅट व रु.2,25,000/- देणार आहे. अर्जदारने नि.5 सोबत विकसन करार दाखल केला आहे. त्याचे अवलोकन करता जाबदारने अर्जदार यास पहिल्या कजल्यावरील 500 चौ.फूट बिल्टअप क्षेत्राचा फलॅट व दुस-या मजल्यावरील 500 चौ.फूट बिल्ट अप क्षेत्राचा फलॅट देणेचा आहे. तसेच रक्कम रु.2,25,000/- देणेची आहे हे स्पष्ट आहे. पैकी अर्जदार तक्रारअर्जामध्ये एक फलॅट व रक्कम रु.70,000/- दिले आहेत हे मान्य करतात. दुस-या फलॅटचे फक्त वीट बांधकाम करुन फलॅटचे काम मुद्दाम मागे ठेवले आहे असे अर्जदारचे पुढील कथन आहे. निर्विवादीतपणे जाबदार यांनी मे.मंचासमोर उपस्थित राहून अर्जदारची सदर कथने नाकारली नाहीत. 6. नि.5/6 कडे अर्जदारने दि.4/11/09 ची जाबदारला वकीलामार्फत पाठविलेल्या नोटीसची स्थळप्रत दाखल केली आहे. सबब अर्जदार मागणीचा पाठपुरावा करत आहेत हे दिसून येते. सबब अर्जदारचे शपथपत्र व दाखल कागदपत्रे पाहता जाबदारने एक फलॅट व उर्वरीत रक्कम अर्जदारास न देवून सदोष सेवा दिली आहे हे शाबीत होत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 7. निर्विवादीतपणे करारातील कलम 20 पाहता 12 महिन्यात फलॅट न दिलेस मुदतीनंतर दरमहा रु.5,000/- नुकसान भरपाई द्यावी असे कथन दिसते. अर्जदारची तक्रारअर्जातील विनंती पाहता एका फलॅटचा ताबा व त्याची नुकसान भरपाई रक्कम रु.2,500/- मिळावी असे आहे. निर्विवादीतपणे एका फलॅटला रु.2,500/- व दुस-या फलॅटला रु.2,500/- नुकसान भरपाई असे स्पष्ट कोठेही करारात नमूद दिसत नाही. सबब तसा अर्थ काढणे योग्य नाही. 8. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना करारात नमूद सोयींनी युक्त उर्वरीत फलॅट द्यावा तसेच उर्वरीत देणे रक्कम रु.1,05,000/- (एक लाख पाच हजार) द्यावी व सदर रक्कम अर्जदारचे पदरी पडेपर्यंत रक्कम रु.1,05,000/- वर दि.6/11/2008 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे. 3. जाबदार क्र.1 व 2 यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 5,000/- (पाच हजार) द्यावी. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 23/12/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |