Maharashtra

Nagpur

CC/10/731

Shri Manohar Mahadevrao Khobragade - Complainant(s)

Versus

Om Sairam Housing Agency Through Shri Ashok Anandrao Dhapodkar - Opp.Party(s)

Adv. Sachin Sambre

18 Oct 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/731
 
1. Shri Manohar Mahadevrao Khobragade
Dasara Road, Faijal Baba Dargah, New Shukrawari, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Om Sairam Housing Agency Through Shri Ashok Anandrao Dhapodkar
In front of Kalamana Market, NIT Room No. 204, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. Sachin Sambre, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

श्री. नरेश बनसोड, मा. सदस्‍य यांचे कथनांन्‍वये.
 
-आदेश-
 (पारित दिनांक 18.10.2011)
 
1.          तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत वि.प. क्र. 1 ते 3 विरुध्‍द दाखल केली असून, वि.प.ने 30.01.2005 चे विक्री करारनामा/बयानापत्रानुसार प्‍लॉट क्र. 240 चे विक्रीपत्र नोंदवून द्यावे, मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई, वकिलांचा फी खर्च व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
2.          तक्रारकर्त्‍याची तक्रार अशी आहे की, वि.प. ही एक भागिदारी संस्‍था असून ते जमिनीचा विकास करुन त्‍यावर प्‍लॉट पाडून विकण्‍याचा व्‍यवसाय करतात. वि.प.क्र. 1 व 2 यांनी प.ह.क्र.34, मौजा-पुनापूर, ख.क्र.66/1, 66/5 मधील एकूण क्षेत्रफळ 862.5 चौ.फु. क्षेत्रफळ असलेले एक प्‍लॉट क्र. 241 घेण्‍याचा करार वि.प.सोबत केला. प्‍लॉट क्र. 241 हा अगोदरच विकत घेतल्‍याने त्‍याची सर्व रक्‍कम वि.प.ला अदा करुन त्‍याचे विक्रीपत्र वि.प.ने तक्रारकर्त्‍याला 15.11.2010 रोजी नोंदवून दिले होते. प्‍लॉट क्र. 240 हा नंतर बयाना करुन रु.60,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार केला. त्‍यानुसार तक्रारकर्त्‍यांनी रु.60,000/- दि.30.01.2005 रोजी वि.प.ला रोख व संपूर्ण रक्‍कम अदा केली. वि.प.ने सदर प्‍लॉटचे विक्री कराराचे बयानापत्र, ताबापत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र तक्रारकर्त्‍याला दिले व बांधकाम करण्‍याची परवानगी दिली व प्‍लॉट क्र. 241 चे विक्रीपत्र झाल्‍यानंतर लगेच प्‍लॉट क्र. 240 चे विक्रीपत्र करुन देण्‍याचे कबूल केले. सदर दोन्‍ही प्‍लॉटवर वि.प.ने बांधकाम करण्‍याची परवानगी दिल्‍याने तक्रारकर्त्‍याने उपरोक्‍त प्‍लॉट बांधकाम करण्‍यास सुरुवात केली. परंतू आजपर्यंत प्‍लॉट क्र. 240 चे विक्रीपत्र नोंदवून दिले नाही. तक्रारकर्ते विक्रीपत्राचा खर्च करण्‍यास तयार असूनही व वि.प. प्‍लॉटची संपूर्ण किंमत स्विकारुनही विक्रीपत्र करुन देण्‍यास टाळाटाळ करीत आहे, म्‍हणून वि.प.ने सेवेत त्रुटी आहे असे तक्रारकर्त्‍याने म्‍हटले आहे. तक्रारकर्त्‍याने आपल्‍या म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ एकूण 8 दस्‍तऐवज तक्रारीसोबत दाखल केले असून, त्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने प्‍लॉट क्र. 240 चे बयानापत्र, ताबापत्र व ना हरकत प्रमाणपत्र, तसेच प्‍लॉट क्र. 241 चे बयानापत्र, ताबापत्र, ना हरकत प्रमाणपत्र व विक्रीपत्राची प्रत आणि अंतिम नोटीसची प्रत याचा समावेश आहे व ही कागदपत्रे पृष्‍ठ क्र. 9 ते 32 वर दाखल करण्‍यात आलेली आहे.
 
3.          सदर प्रकरणी वि.प. क्र. 1 ते 3 ला नोटीस पाठविण्‍यात आली असता वि.प. क्र. 1 व 3 ने सदर तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले. वि.प.क्र.2 यांची नोटीस पोस्‍टाच्‍या ‘नॉट क्‍लेम’ या शे-यासह परत आला. तसेच वि.प.क्र.2 मंचासमोर हजर झाले नाही किंवा त्‍यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले नाही, म्‍हणून त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश दि.01.03.2011 रोजी मंचाने पारित केला.
 
4.          वि.प.क्र.1 ने तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल करुन नमूद केले की, वि.प.क्र.1 व 3 चाप्‍लॉटचा व्‍यवसाय आहे, परंतू त्‍यांचा वि.प.क्र.2 सोबत कोणत्‍याही स्‍वरुपाचा संबंध नाही. वि.प.क्र.2 चा ‘ओम साईराम हाऊसिंग एजेंसी’ या नावाने व्‍यवसाय करतात कि नाही याबाबत माहिती नाही. तसेच वि.प.क्र. 1 व 3 हे कीशोर गृहनिर्माण सहकारी संस्‍था मर्या. नागपूर या संस्‍थेचे सचिव आहेत आणि म्‍हणून त्‍यांनी प्‍लॉट क्र. 241 चे विक्रीपत्र करुन दिलेले आहे. वि.प.ने तक्रारीचे परिच्‍छेद क्र. 1,3, 4, 5 व 6 नाकारले आहेत.
            पुढे वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्‍याला प्‍लॉट क्र. 240 बाबत कोणताही करार केला नसून ताबापत्र व ना हरकत प्रमाणपत्र देण्‍यात आलेले नसून त्‍याबाबत कोणतीही रक्‍कम त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडून स्विकारलेली नाही. वि.प.क्र.1 ने पुढे नमूद केले आहे की, ख.क्र.66/1 व 66/5 हा सन 2010 मध्‍ये खरेदी केलेला आहे व त्‍यामुळे सन 2000 मध्‍ये किंवा 2005 मध्‍ये करारनामा करण्‍याचा कोणतेही कारण नाही. तक्रारकर्त्‍यासोबत त्‍यांचा कोणताही व्‍यवहार झालेला नसल्‍याने तक्रारकर्ता हा त्‍यांचा ग्राहक होत नाही व त्‍यामुळे सेवेत त्रुटी होण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. तक्रारीतील इतर कथने नाकारुन तक्रारकर्त्‍याची तक्रार ही खारीज करण्‍याची मागणी केलेली आहे.  
 
5.          गैरअर्जदार क्र. 3 यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल करुन, ते कीशोर गृहनिर्माण सहकारी संस्‍था मर्या. नागपूर या संस्‍थेचे सचिव आहेत. ‘ओम साईराम हाऊसिंग एजेंसी’ व कीशोर गृहनिर्माण सहकारी संस्‍था मर्यादित या एकाच नाण्‍याच्‍या दोन बाजू नाहीत असे त्‍यांचे म्‍हणणे आहे. तक्रारकर्ते व वि.प.क्र.3 यांच्‍यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा करार झालेला नाही. त्‍यामुळे वि.प.क्र.3 चे कोणतेही हक्‍क संपुष्‍टात आलेले नाही. त्‍यांनी कधीही तक्रारकर्त्‍याला प्‍लॉट क्र. 240 वर बांधकाम करण्‍याची परवानगी दिलेली नाही. तसेच तक्रारकर्त्‍यांनी विवादित प्‍लॉटवर बांधकाम केले असल्‍याचे नाकारले. तक्रारकर्त्‍यांचे तक्रारीतील इतर सर्व कथने नाकारली आहेत व तक्रार खारीज करण्‍याची मागणी केली आहे.
 
6.          तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 1 व 3 चे लेखी उत्‍तर दाखल झाल्‍यानंतर प्रतिउत्‍तर दाखल केले व तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणेच पुन्‍हा वस्‍तुस्थिती स्‍पष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न केला. तक्रारकर्त्‍याने नमूद केल्‍याप्रमाणे वि.प.नी बांधकामाची संमती दिल्‍याप्रमाणे व प्‍लॉटचे ताबापत्र दिल्‍यामुळे त्‍यांनी प्‍लॉटवर बांधकाम करण्‍यास सुरुवात केली. बांधकाम पूर्णत्‍वास आलेले असून विजेचे मिटरसुध्‍दा बसविण्‍यात आलेले आहे आणि तक्रारकर्ता त्‍याचा वापर करीत आहे. वि.प.क्र.3 हे कारण सांगून विक्रीपत्र करुन देण्‍याचे टाळीत आहे. आपल्‍या म्‍हणण्‍यादाखल तक्रारकर्त्‍याने विजेच्‍या वापराच्‍या देयकाची प्रत व भागीदारी विसर्जनाचा करारनामा पृष्‍ठ क्र. 70 ते 78 वर दाखल केलेला आहे.
 
7.          प्रकरण युक्‍तीवादाकरीता आल्‍यावर मंचाने दोन्‍ही पक्षांचा युक्‍तीवाद त्‍यांचे वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
 
8.          गैरअर्जदार क्र. 1 व 3 ने आपल्‍या लेखी उत्‍तरामध्‍ये आक्षेप घेतला आहे की, सदर तक्रार मुदतीच्‍या आत दाखल नाही व मुदतबाह्य असल्‍याने मंचाला ती चालविण्‍याचा अधिकार नाही, म्‍हणून ती खारीज करण्‍यात यावी. परंतू दाखल दस्‍तऐवजांवरुन गैरअर्जदार क्र.2 ने ओम साईराम हाऊसिंग एजंसीचे भागीदार म्‍हणून बयानापत्र करुन दिले व गैरअर्जदार क्र. 1 हे भागीदार आहेत. बयानापत्रात स्‍पष्‍टपणे उल्‍लेख केला आहे की, रजिस्‍ट्रेशनचा खर्च हा घेणा-यांकडे राहिल. त्‍यातच नमूद आहे की, प्‍लॉटमध्‍ये कोणतीही अडचण आली तर संस्‍था बयानापत्रानुसार जबाबदारी राहिल. ज्‍या अर्थी, तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 2 मार्फत बयानापत्र केले, त्‍यानुसार प्‍लॉट क्र. 240 चे विक्रीपत्र करुन देण्‍याची जबाबदारी ही गैरअर्जदाराची होती. ती त्‍यांनी पूर्ण रक्‍कम प्‍लॉटबाबत प्राप्‍त होऊनही जबाबदारी पार न पाडल्‍यामुळे प्‍लॉट क्र. 240 संदर्भात वादाचे कारण हे 30.01.2005 पासून सतत सुरु आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट निष्‍कर्ष आहेत आणि त्‍याबाबत गैरअर्जदार क्र. आणि 3 चे म्‍हणणे मंच नाकारीत आहे.
  
9.          तक्रारकर्त्‍याचे नुसार त्‍यांना प्‍लॉट क्र. 241 व 240 करीता दि.30.01.2005 ला बयानापत्र, ताबापत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र ओम साईराम हाऊसिंग एजेंसी यांचेद्वारे प्राप्‍त आहेत. त्‍यात प्‍लॉटची किंमत प्रत्‍येकी रु.60,000/- मिळाल्‍याबाबत स्‍पष्‍ट उल्‍लेख आढळून येतो. तसेच त्‍यात काही अडचण आली तर संस्‍था जबाबदार राहील असे नमूद आहे. दि.08.02.2005 चे बयानापत्र 30.01.2005 चे ताबा पत्र व ना हरकत प्रमाण पत्र यांचेनुसार प्‍लॉट क्र. 241 करीता तक्रारकर्त्‍याने ओम साईराम हाऊसिंग एजेंसी यांना रु.60,000/- दिल्‍याचे स्‍पष्‍ट होते. पृष्‍ठ क्र. 9 ते 15 मधील दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता लिहून देण्‍या-यांचे नाव तसेच पृष्‍ठ क्र. 71 वरील भागिदार विसर्जनाचा करारनामा नुसार सुध्‍दा हे स्‍पष्‍ट होते की, त्‍या सर्व दस्‍तऐवजांवर वि.प.क्र.2 भागिदार सुरेश नथ्‍थुजी सरोदे यांच्‍या सह्या आहेत.
 
10.         सदर तक्रारीत प्‍लॉट क्र. 241 चे विक्रीपत्र करुन दिल्‍याबाबत दोन्‍ही पक्षात वाद नाही. दोन्‍ही पक्षातील मुळ वाद हा ख.क्र.66/1, 66ङ5 मधील प्‍लॉट क्र. 240 च्‍या विक्रीपत्र न करुन दिल्‍याबाबत आहे. तसेच सदर प्‍लॉटवर तक्रारकर्त्‍याचेनुसार त्‍याचा ताबा असून, त्‍यांनी घर बांधले आहे आणि इलेक्‍ट्रीक मिटर आहे व तक्रारकर्ते त्‍याचा उपयोग करीत आहे. वि.प.नुसार प्‍लॉट क्र. 240 च्‍या ताबा हा त्‍यांच्‍याकडे असून त्‍यावर तक्रारकर्त्‍याने कुठलेही बांधकाम केले नाही असे म्‍हटले आहे. तक्रारकर्त्‍यांनी अनुक्रमे पृष्‍ठ क्र. 70 वर दाखल केलेले विजेच्‍या वापराचे देयकावरुन हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍यास महाराष्‍ट्र राज्‍य विज मंडळाने दि.25.02.2011 ला विज पुरवठा केलेला आहे व तो त्‍याचा वापर करीत आहे. त्‍यामुळे सुध्‍दा प्‍लॉट क्र. 240 व 241 वर कुठलेही बांधकाम झालेले नाही व वि.प. क्र. 1 व 3 चा ताबा आहे हे त्‍यांचे म्‍हणणे पूर्णतः खोडसाळ स्‍वरुपाचे असल्‍यामुळे मंच नाकारीत आहे.
 
11.         वि.प. क्र. 1 व 3 ने आपल्‍या लेखी उत्‍तरात म्‍हटले आहे की, वि.प.क्र.2 यांचेशी काहीही संबंध नाही जेव्‍हा की, तक्रारकर्त्‍याने म्‍हणण्‍यानुसार वि.प.क्र. 1 व 2 हे ओम साईराम हाऊसिंग एजेंसीचे भागीदार होते. तक्रारकर्त्‍यांनी अनुक्रमे पृष्‍ठ क्र. 71 ते 78 वर दाखल भागिदार विसर्जनाचा करारनामानुसार हे स्‍पष्‍ट होते की, वि.प.क्र.1 व 2 हे ओम साईराम हाऊसिंग एजेंसीचे 22.08.2000चे करारनाम्‍यानुसार भागिदार होते व 10.10.2006 ला भागिदारीचा व्‍यवसाय संपुष्‍टात आला. यावरुन सुध्‍दा हे स्‍पष्‍ट होते की, वि.प. क्र. 1 व 2 हे भागिदारीत ओम साईराम हाऊसिंग एजेंसी चालवित होते, त्‍यामुळे वि.क्र. 1 चे संबंध नसल्‍याबाबतचे कथन पूर्णतः खोटे आहे व मंचाची दिशाभूल करण्‍याचा एकमेव प्रयत्‍न आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट निष्‍कर्ष आहे.
 
12.         तक्रारकर्त्‍याने अनुक्रमे पृष्‍ठ क्र. 16 ते 21 वर दाखल केलेल्‍या विक्रीपत्रावरुन हे स्‍पष्‍ट होते की, प्‍लॉट क्र. 241 चे विक्रीपत्र हे वि.प.क्र.3 ने अध्‍यक्ष, किशोर गृहनिर्माण सहकारी संस्‍था मर्या. यांनी करुन दिलेले आहे. वि.प.ने आपल्‍या उत्‍तरात हे मान्‍य केले आहे की, वि.प.क्र. 1 व 3 हे किशोर गृहनिर्माण सहकारी संस्‍था मर्या. चे अध्‍यक्ष व सचिव आहेत. वि.प.ने आपल्‍या उत्‍तरात हे मान्‍य केले आहे की, तक्रारकर्ते हे किशोर गृहनिर्माण सहकारी संस्‍था मर्या. चे सभासद झाल्‍याने त्‍यांना नोव्‍हेंबर 2010 ला प्‍लॉट क्र. 241 चे रीतसर विक्रीपत्र करुन दिले. ज्‍या अर्थी 241 व 240 हे एकाच खस-यातील प्‍लॉट असून तक्रारकर्ता हा किशोर गृहनिर्माण सहकारी संस्‍था मर्या. चा सदस्‍य असल्‍यामुळे, वि.प.ने त्‍यांना विक्रीपत्र करुन देण्‍याची त्‍यांची जबाबदारी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे सुध्‍दा वि.प.क्र. 1 व 3 चे वि.प. क्र. 2 सोबत काहीही संबंध नाही हे म्‍हणणे पूर्णतः खोटे व खोडसाळ स्‍वरुपाचे असल्‍यामुळे मंचाने नाकारले. वि.प.क्र. 1 व 3 ने ख.क्र. 66/1 व 66/5 त्‍यांना कसा प्राप्‍त झाला ही वस्‍तूस्थिती त्‍यांनी दस्‍तऐवजासह मंचासमोर सिध्‍द केलेली नाही. त्‍यामुळे सुध्‍दा गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे सुरुवातीला ओम साई हाऊसिंग एजेंसीचे नावाने भागीदारी स्‍वरुपात प्‍लॉटची विक्री करीत होते व तक्रारकर्त्‍यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांवरुन हे स्‍पष्‍ट होते की, ओम साई हाऊसिंग एजेंसीचे भागीदार श्री. सुरेश सरोदे यांचा प्‍लॉट क्र. 240 व 241 बयानापत्र, ताबापत्र, बांधकामाकरीता ना हरकत प्रमाणपत्रसुध्‍दा दिलेले होते. त्‍यामुळे वि.प.क्र.1 ही बाब आता नाकारु शकत नाही. तसेच तक्रारकर्त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार ओम साई हाऊसिंग एजेंसी व कीशोर गृहनिर्माण सहकारी संस्‍था या एकाच नाण्‍याच्‍या दोन बाजू आहेत या तक्रारकर्त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यास बळ मिळते. मंचाचे असे स्‍पष्‍ट मत आहे की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने ओम साई हाऊसिंग एजेंसी प्‍लॉट विक्रीचे व्‍यवसाय करुन ख.क्र. 66/1, 66/5 हा कीशोर गृह निर्माण सहकारी संस्‍था यांनी हस्‍तांतरीत केलेला आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 1 व 3 म्‍हणणे पूर्णतः आधारहीन व वस्‍तूस्थितीचा विपर्यास करणारा आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. गैरअर्जदारांनी प्‍लॉटची पूर्ण रक्‍कम प्राप्‍त करुन, 30.01.2005 रोजी बयाना पत्र करुनसुध्‍दा आणि विक्रीपत्र करुन न देणे ही गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे व गैरअर्जदार तक्रारकर्त्‍याने घेतलेल्‍या प्‍लॉट क्र. 240 चे विक्रीपत्र करुन देण्‍यास बाध्‍य आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
13.         गैरअर्जदारांनी पाच वर्षाच्‍या अवधीनंतर सुध्‍दा प्‍लॉट क्र. 240 व 241 पैकी प्‍लॉट क्र. 241 चे विक्रीपत्र करुन देणे व 240 चे विक्रीपत्र करुन न देणे, जेव्‍हा की, बांधकामासाठी दिलेली ना हरकत प्रमाणपत्राबरोबर तक्रारकर्त्‍यांनी सदर दोन्‍ही प्‍लॉटवर मिळून बांधकाम केले आहे हे सिध्‍द झालेले असतांना सुध्‍दा विक्रीपत्र न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला. या तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यास मंच सहमत आहे. म्‍हणून गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाबाबत रु.10,000/- नुकसान भरपाई, तसेच तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.3,000/- देणे संयुक्‍तीक होईल असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. बयानापत्रानुसार रजिस्‍ट्रेशनचा खर्च तक्रारकर्त्‍याने करण्‍याचा स्‍पष्‍ट उल्‍लेख आहे. उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.  
 
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदारास आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला प.ह.क्र.34, मौजा-पुनापूर, ख.क्र.66/1, 66/5 मधील एकूण क्षेत्रफळ 862.5 चौ.फु. क्षेत्रफळ असलेले एक प्‍लॉट क्र. 240 चे विक्रीपत्र तक्रारकर्त्‍यांच्‍या नावे करुन द्यावे. विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.
3)    गैरअर्जदारास आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मानसिक, शारिरीक त्रासाच्‍या भरपाईपोटी रु.10,000/- नुकसान भरपाई द्यावी व तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.3,000/- द्यावे.
4)    वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 व 3 ने संयुक्‍तरीत्‍या व पृथ्‍थकरीत्‍या आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी, अन्‍यथा आदेश क्र. 1 च्‍या आदेश पालन विलंबाबाबत, प्रत्‍येक दिवसाकरीता रु.50/- तक्रारकर्त्‍यास देण्‍यास गैरअर्जदार बाध्‍य राहतील.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.