अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
१. अर्जदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार पतसंस्थे मध्ये बचत खाते उघडले व दिनांक 01/09/2014 पासुन ते दिनांक 02/06/2015 पर्यन्त 400/- रू रोज या प्रमाणे एकुण रक्कम 104000/- रूपये गैरअर्जदार यानी नेमलेले अभिकर्ता श्री. विजय बारापात्रे यांच्या द्वारे जमा केले होते. सदर रक्कम घेता बाबतची नोंद अर्जदाराकडे असलेला पासबुक वर आहे व त्यात गैरअर्जदार पतसंस्थेचे अध्यक्ष यांची सही सुद्धा आहे. अर्जदाराने दिनांक 20/06/2015 रोजी गैरअर्जदाराचे पतसंस्थाचे कार्यालयामधे स्वतः जाउन अर्जदाराच्या खात्यात जमा असलेली रक्कम लाभासह मिळण्यास मागणी केली परंतु गैरअर्जदार पतसंस्थाने सदर रक्कम देण्यास टाळमटाळ केले. म्हणुन अर्जदाराने दिनांक 23/07/2015 ला गैरअर्जदाराकडे सदर रक्कम मिळण्याकरिता नोटीस पाठविले. सदर नोटीस गैरअर्जदाराला मिळाले व गैरअर्जदाराने अर्जदाराला दिनांक12/08/2015 रोजी चुकीचे नोटीस चे उत्तर पाठविले. गैरअर्जदाराने अर्जदाराचे बचत खाते मध्ये जमा असलेली रक्कम व्याजा सह देण्यास टाळमटाळ केली. म्हणून अजादाराने गैरअर्जदाराविरुध्द मंचात तक्रार दाखल केली.
२. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, अर्जदाराचे बचत खाते मध्ये जमा असलेली रक्कम गैरअर्जदाराने व्याजासह अर्जदाराला देण्याचे आदेश व्हावे व अर्जदाराला झालेल्या शारीरिक, माणसिक त्रासापोटी रक्कम व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडुन अर्जदाराला देण्याचे आदेश व्हावे.
३. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार सदर तक्रारीत हजर होऊन नि.क्रं 8 वर त्यांचे लेखी उत्तर दाखल केले आहे. गैरअर्जदाराने त्यांचे लेखी बयाणात असे कथन केलेले आहे की, अर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदाराविरूध्द लावलेले आरोप खोटे असुन त्यांना ना कबुल आहे. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केलेले आहे की, अर्जदाराची तथाकथीत रक्कम मिळण्याची तारीख 01/09/15 आहे, सदर तक्रार पुर्वी दाखल केलेली असल्याने खारीज होण्यास पात्र आहे. अर्जदाराने त्यांच्या खात्यात संदर्भ असलेले पासबुक ची तपासणी गैरअर्जदाराकडे वेळो वेळी केली नाही व पासबुकची तपासणी गैरअर्जदाराकडुन करून घेतली नाही त्यामुळे गैरअर्जदार संस्थेनी सेवेत न्युनता दर्शवलेली नाही. गैरअर्जदाराचे अभिकर्ता विजय बारापात्रे यांनी रक्कमाची गुंतवणुक केल्याने त्यांच्या विरूध्द भा. दा. वि. कलम 420 व 406 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणुन सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
४. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत ञुटी दिली आहे काय ? होय
3) आदेश काय ? अंतीम आदेशा प्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने गैरअर्जदार पतसंस्थेमध्ये बचत खाते क्रं 13103 अन्वये खाते उघडले होते. ही बाब अर्जदार व गैरअर्जदाराला मान्य असुन अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं.01 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. गैरअर्जदार पतसंस्थेचे अभिकर्ता विजय बारापात्रे होते. ही बाब गैरअर्जदारांना मान्य आहे. गैरअर्जदार पतसंस्थेने त्यांचे अभिकर्ता विरूध्द गुन्हा नोंदविले व त्या अभिकर्तानी कोणत्या ग्राहकाणकडुन फसवणी केली या बाबतचा गैरअर्जदाराने मंचा समक्ष सदर तक्रारीत कोणतेही पुरावा दाखल केलेले नाही. अर्जदाराने नि.क्रं 5 वर दस्त क्रं अ-2 दैनिक ठेव पासबुक यांची पडताडणी करतांना असे दिसले की, सदरहू गैरअर्जदार पतसंस्थेची अध्यक्षांची स्वाक्षरी आहे. सदरहु पासबुक अभिकर्ता यानी गैरअर्जदार पतसंस्था मधे स्वाक्षरी केलेले कोरे पासबुक बिना परवानगी ने घेऊन जाऊन अर्जदाराचे खाते उघडले या बाबतचा गैरअर्जदाराने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. म्हणुन गैरअर्जदाराने बचाव पक्षात घेतलेले/ मांडलेले कथन ध्याय धरता येत नाही. असे मंचाचे मत ठरले आहे. गैरअर्जदार पतसंस्थाचे अभिकर्ता यानी संस्था तर्फै घेतलेली रक्कम गैरअर्जदार संस्थाचे ग्राहकांना परत देणे आवश्यक आहे व त्यात गैरअर्जदार पतसंस्थानी रक्कम देण्यास टाळमटाह केली असुन निश्चित पणे गैरअर्जदार पतसंस्थाने अर्जदारास प्रती न्युनतम सेवा दर्शवलेली आहे असे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
1. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदाराने व्यक्तीगत किंवा संयुक्त रितीने अर्जदाराच्या खाते क्रं 13103
मधे जमा असलेली रक्कम रूपये
50400/- दिनांक 01/09/2015 पासुन 8 टक्के द.सा.द.शे व्याजा सह
गैरअर्जदारांना आदेशाची प्रत मिळल्यापासुन 45 दिवसाच्या आत अर्जदाराला
दयावे.
3. उभय पक्षाने आप आपला खर्च स्वतः सहन करावे.
4. उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 19/05/2016