Maharashtra

Sangli

CC/11/143

1.Kum.Aditi Ashok Rajmane 2.Kum.Yash Ashok Rajmane through Sau.Sulabha Ashok Rajmane - Complainant(s)

Versus

Om Ganesh Nag.Sah.Pat.Mar., Sangli etc., 12 - Opp.Party(s)

T.S.Aarge

19 May 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/143
 
1. 1.Kum.Aditi Ashok Rajmane 2.Kum.Yash Ashok Rajmane through Sau.Sulabha Ashok Rajmane
Gomati Apartment, Behind D.C.C.Bank Sangli, Sangli
...........Complainant(s)
Versus
1. Om Ganesh Nag.Sah.Pat.Mar., Sangli etc., 12
Jyoti Complex, Chandani Chowk, Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:T.S.Aarge, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

                                           नि.नं. 20
 
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
 
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
 
 
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 143/2011
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख    25/5/2011
तक्रार दाखल तारीख  16/6/2011 
निकाल तारीख      - 19/05/2012
----------------------------------------------
 
1. कु. आदिती अशोक राजमाने
    व.व.13, धंदा शिक्षण
 
2. कु. यश अशोक राजमाने
    व.व.7, धंदा शिक्षण
    1 व 2 तर्फे अ.पा.क.
    सौ सुलभा अशोक राजमाने
    व.व.36, धंदा घरकाम
    सर्व रा. गोमती अपार्टमेंट,
    जिल्‍हा मध्‍यवर्ती बॅंकेसमोर, सांगली                        ..... तक्रारदार
विरुध्‍द
 
1.  ओम गणेश नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.सांगली
    रा. ज्‍योती कॉम्‍प्‍लेक्‍स, चांदणी चौक, सांगली
 
2.  ओम गणेश नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.सांगली
       तर्फे चेअरमन श्री लक्ष्‍मण शिवराम नवलाई
    वय सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.शिवशांती निवास, प्‍लॉट नं.20, चांदणी चौक, सांगली
 
 
3. व्‍हा.चेअरमन, श्री रामदास पांडुरंग माने,
    वय सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.अमित बंगला, माळी प्‍लॉट, दक्षिण शिवाजीनगर,
    सांगली
 
4. संचालक, श्री बाळासाहेब दौलतराव पाटील
    वय सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा. माळी प्‍लॉट, दक्षिण शिवाजीनगर,
    सांगली
 
5. संचालक, श्री भिमसेन आप्‍पासो नवलाई
    वय सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.कलावती निवास, प्‍लॉट नं.20, चांदणी चौक,
    सांगली
 
6. संचालक, श्री भिमसेन शिवराम नवलाई
    वय सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.शिवशांती निवास, प्‍लॉट नं.20, चांदणी चौक,
    सांगली
 
7. संचालक, श्री शांतीनाथ भिमगोंडा पाटील
    वय सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.दामाणी हायस्‍कूल, दक्षिण शिवाजीनगर,
    चांदणी चौक, सांगली
 
8. संचालक, श्री राजेंद्र संभाजी निंबाळकर
    वय सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.सहयाद्रीनगर, सांगली
 
9. संचालक, श्री सुरेश मधुकर गडदे
    वय सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.प्‍लॉट नं.1, लक्ष्‍मीनगर, कुपवाड रोड,
    सांगली
 
10. संचालक, श्री बाळासो हुसेन नदाफ
    वय सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.नदाफ टेलर्स, करमरकर प्‍लॉट, चांदणी चौक,
    सांगली
 
 
 
11. संचालक, श्री शिवाप्‍पा कासाप्‍पा मादीगर
    वय सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.आप्‍पा कासार प्‍लॉट, चांदणी चौक,
    सांगली
 
12. संचालिका, सौ रेखा चंद्रकांत जाधव
    वय सज्ञान, व्‍यवसाय संचालिका
    रा.मोती चौक, सांगली                            ..... जाबदार  
 
                            तक्रारदार तर्फेः   श्री टी.एस.आरगे
                            जाबदार क्र.1 ते 12 एकतर्फा
 
                    
   नि का ल प त्र
 
 
द्वारा- मा. सदस्‍या- गीता घाटगे
 
1.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने दामदुप्‍पट ठेवी अन्‍वये गुंतविलेल्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार ओम गणेश नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.सांगली (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्‍या होत्‍या. यातील सर्व ठेवींच्‍या मुदती पूर्ण झालेल्‍या आहेत.  तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रकमांची पतसंस्‍थेकडे मागणी केली असता पतसंस्‍थेने ती देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्‍याला रकमा देवविण्‍यात याव्‍यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.4 अन्‍वये एकूण 18 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
2.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र. 1 ते 12 यांना रजि.पोस्‍टाने नोटीस पाठविणेत आली होती. या रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेल्‍या नोटीसीच्‍या पावत्‍या नि.8/1 वर दाखल आहेत. मात्र या नोटीसा जाबदार यांना मिळाल्‍याच्‍या पोहोचपावत्‍या प्राप्‍त न झाल्‍याने प्रस्‍तुत प्रकरणी दाखल नाहीत. परंतु तक्रारदार यांनी जाबदार यांचा पत्‍ता बरोबर असलेबाबतचे शपथपत्र नि.10 वर दाखल केले आहे. सबब ग्राहक संरक्षण कायदा कलम 28 अ नुसार जाबदार यांना नोटीस मिळाली आहे असे मानणेत येवून जाबदार क्र.1 ते 12 यांचेविरुध्‍द नि.1 वर एकतर्फा आदेश करण्‍यात आले. 
            त्‍यानंतर दि.14/10/2011 रोजी जाबदार क्र.1 व 2 यांनी विधिज्ञांमार्फत हजर होवून त्‍यांचेविरुध्‍द करण्‍यात आलेला एकतर्फा आदेश रद्द व्‍हावा असा अर्ज व म्‍हणणे दाखल केले. या अर्जावर तक्रारदारांनी म्‍हणणे देण्‍याचा आदेश करण्‍यात आला. जाबदारांच्‍या या अर्जास तक्रारदारांनी हरकत घेऊन सदरहू अर्ज मंजूर करावयाचा झाल्‍यास हेवी कॉस्‍टसह मंजूर करण्‍यात यावा अशी विनंती केली. जाबदारांचा सदरहू अर्ज व त्‍यावरील तक्रारदारांचे म्‍हणणे विचारात घेवून जाबदार क्र.1 व 2 विरुध्‍द करण्‍यात आलेला एकतर्फा आदेश जाबदारांनी तक्रारदारांना रक्‍कम रु.700/- कॉस्‍ट म्‍हणून अदा करण्‍याच्‍या अटीवर मान्‍य करणेत आला. परंतु जाबदारांनी आजअखेर तक्रारदारांना कॉस्‍टची रक्‍कम अदा केली नाही. त्‍यामुळे जाबदार क्र.1 व 2 यांचेविरुध्‍द करण्‍यात आलेला एकतर्फा आदेश रद्द करण्‍यात आलेला नाही व त्‍यांचे म्‍हणणेही प्रस्‍तुत प्रकरणी विचारात घेण्‍यात आलेले नाही. 
 
3.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार पतसंस्‍थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. 5223/09 सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक 22 डिसेंबर 2010 रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies Act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम 88 व नियम 72 अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र. 2 ते 12 यांना पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो. व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने पतसंस्‍थाच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो.
     
4.    प्रस्‍तुत प्रकरणी नि.14 अन्‍वये दाखल व्‍याज निवेदनाचे अवलोकन करता तक्रारदारांना ठेवींत गुंतविलेल्‍या रकमांवर कोणतेही व्‍याज मिळाल्‍याचे दिसून येत नाही. ठेवींच्‍या मुदतीही पूर्ण झालेल्‍या आहेत. सबब या सर्व ठेवींतील मुदतीनंतर मिळणा-या रकमा मुदत संपल्‍याच्‍या दुस-या दिवशीपासून 10 टक्‍के व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहेत. हे व्‍याजदर मंजूर करीत असताना गुंतविलेल्‍या रकमांची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्‍याची बाब लक्षात घेणेत आलेली आहे. 
 
सबब, मंचाचा आदेश की,
दे
 
1. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र.000279 मधील रक्‍कम रु.28,000/- (अक्षरी रुपये अठ्ठावीस हजार फक्‍त) दि.18/6/2010 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.10 टक्‍के व्‍याजदराने अदा करावी.
 
2. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावत्‍या क्र.000398, 000399, 000400 मधील प्रत्‍येकी रक्‍कम रु.40,000/- (अक्षरी रुपये चाळीस हजार फक्‍त) दि.26/9/2010 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.10 टक्‍के व्‍याजदराने अदा करावी.
 
3. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र.000494 मधील रक्‍कम रु.30,000/- (अक्षरी रुपये तीस हजार फक्‍त) दि.20/2/2011 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.10 टक्‍के व्‍याजदराने अदा करावी.
 
4. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.2,000/- (दोन हजार फक्‍त) अदा करावेत.
 
5. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.4/7/2012 पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
 
सांगली
दिनांक: 19/5/2012    
 
                  (गीता सु.घाटगे)                               (अनिल य.गोडसे)
                        सदस्‍या                                             अध्‍यक्ष           
                               जिल्‍हा मंच, सांगली                         जिल्‍हा मंच, सांगली.  
      
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.