Maharashtra

Jalgaon

CC/08/930

Jitendra prakashchandra Parekh - Complainant(s)

Versus

Om Furniture - Opp.Party(s)

Adv.Nikam

30 Oct 2014

ORDER

final order
District Consumer Redressal Forum,Jalgaon
 
Complaint Case No. CC/08/930
 
1. Jitendra prakashchandra Parekh
Amalner
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Om Furniture
Jalgaon
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vishwas D. Dhawale PRESIDENT
 HON'BLE MRS. Poonam N.Malik MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल-प्रत

व्‍दारा-श्री.विश्‍वास दौ.ढवळे, अध्‍यक्षः विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास सदोष घरगुती सामान विक्री करुन दिलेल्‍या सेवेतील त्रृटीदाखल तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. तक्रारदाराच्‍या तक्रार अर्जातील हकीकत थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

            2.    तक्रारदार हे वर नमुद पत्‍यावरील रहीवाशी असुन विरुध्‍द पक्ष क्र. 1 हे फर्निचर मॉलचे मालक तर विरुध्‍द पक्ष क्र. 2 हे व्‍यवस्‍थापक आहेत.  तक्रारदाराने विरुध्‍द पक्ष यांचेकडुन दि.5/6/2007 रोजी डायनिंग टेबल सहा खुर्च्‍यांचा एक सेट, रोलींग चेअरम 1 नग निळया रंगाची व सेंटर टेबल एक नग या वस्‍तु रक्‍कम रु.23,300/- इतक्‍या रक्‍कमेस विकत घेतल्‍या.    त्‍याबाबत विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास ऑर्डर फॉर्म नं.51 व बिल क्र.28 अदा केलेले आहे.   विरुध्‍द पक्षाकडुन वस्‍तु घेतल्‍यानंतर 14 ते 15 दिवसात डायनींग टेबलच्‍या पायात तडे पडले असुन सेंटर टेबलही खराब झाले असुन एका जागी स्‍थीर राहत नाहीत.   विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास सदरचे वस्‍तु विक्री करतांना जर त्‍यात काही दोष आढळला तर बदलुन देऊ अशी हमी दिली होती तथापी तक्रारदाराने विरुध्‍द पक्षाकडे वारंवार तक्रार करुनही त्‍यांनी त्‍याची दखल घेतली नाही.   तसेच तक्रारदाराने विरुध्‍द पक्ष यांचेकडुन दि.5/6/2007 रोजी ऑर्डर फॉर्म क्र.52 नुसार सेंटर टेबल रक्‍कम रु.2,565/- इतक्‍या किंमतीस घेण्‍याचे निश्चित करुन त्‍याचे खरेदीपोटी रक्‍कम रु.1,565/- अडव्‍हान्‍स दिले तथापी विरुध्‍द पक्षाने आजपर्यंत सदरचे टेबलची डिलेव्‍हरी तक्रारदारास दिली नाही.   सबब विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराचे खराब डायनिंग टेबल व सेंटर टेबल या वस्‍तु बदलुन द्याव्‍यात अथवा त्‍या वस्‍तुंची होणारी रक्‍कम व्‍याजासह परत करावी तसेच नवीन सेंटर टेबलसाठी दिलेली अडव्‍हान्‍सची रक्‍कम रु.1,565/- व्‍याजासह तक्रारदारास परत करावी, तसेच तक्रारदारास झालेल्‍या शारिरिक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे. 

            3.    विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2  यांना या मंचातर्फे रजिष्‍ट्रर ए.डी.नोटीस काढण्‍यात आली.  

            4.    विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे.   तक्रारदाराने खरेदी केलेल्‍या वस्‍तुंमध्‍ये दोष आहे किंवा नाही हे प्रथमतः ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 13 पोट कलम क,ड,ई,फ व ग प्रमाणे सिध्‍द होणे गरजेचे आहे.   तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार ग्राहक या संज्ञेत बसत नाही त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार रद्य होण्‍यास पात्र आहे.   विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 हे सदर मॉलचे अनुक्रमे मालक व व्‍यवस्‍थापक आहेत हे म्‍हणणे खोटे आहे तसेच तक्रारदाराने सदरची बाब सिध्‍द करण्‍यासाठी योग्‍य कागदोपत्री पुरावाही दिलेला नाही.   तक्रारदाराने विरुध्‍द पक्षाकडुन फॉर्म क्र.51 व 52 नुसार कोणत्‍याही वस्‍तु खरेदी केलेल्‍या नाहीत त्‍यामुळे त्‍यांना फॉर्म क्र.51 व बिल क्र.28 अदा करण्‍याचा संबंध येत नाही.   कोणत्‍याही प्रकारचा व्‍यवहार तक्रारदार व विरुध्‍द पक्षात झालेला नाही.   विरुध्‍द पक्षाने तक्रारदारास कोणतीही हमी दिलेली नव्‍हती तसेच तक्रारदाराने विरुध्‍द पक्षाकडे वस्‍तुबाबत आजपावेतो कोणतीही तक्रार उपस्थित केलेली नव्‍हती.   ओम फर्निचर मॉल याचेशी विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांचा कोणताही संबंध नसल्‍याने तक्रारदारास विरुध्‍द पक्षाकडुन कोणतीही मागणी करता येणार नाही.   सबब तक्रारदाराने तक्रारीत कथन केलेल्‍या वस्‍तुंबाबत दोष आहे किंवा नाही हे ठरवणे अत्‍यंत गरजेचे असल्‍याने ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 13 पोट कलम क,ड,ई,फ व ग प्रमाणे कार्यवाही करण्‍यात यावी, तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार खर्चासह रद्य करण्‍यात यावी तसेच विरुध्‍द पक्षांना विनाकारण खर्चात टाकले दाखल तक्रारदाराकडुन प्रत्‍येकी रु.10,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.10,000/- देण्‍याचे आदेश तक्रारदारास व्‍हावेत अशी विनंती विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांनी केलेली आहे.     

            5.    तक्रारदार यांची तक्रार,  दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 चे लेखी म्‍हणणे  याचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.

            मुद्ये                                       उत्‍तर

1)    विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना सदोष फर्निचर विक्री

      करुन त्रृटीयुक्‍त सेवा दिलेली आहे काय ?                     नाही.                                     

 2)    आदेश काय ?                                     खालीलप्रमाणे.

                              वि वे च न

            6.    मुद्या क्र.1  -         तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 कडुन

ऑर्डर फॉर्म क्र.51 नुसार एकुण रक्‍कम रु23,330/- इतक्‍या किंमतीस सेंटर टेंबर, सहा खुर्च्‍या, राऊंड चेअर (ब्‍लु) इत्‍यादी साहित्‍य घेतल्‍याबाबत नि.क्र.3 /3 लगत दाखल बिलाच्‍या छायाप्रतीवरुन स्‍पष्‍ट होते.   तसेच ऑर्डर फॉर्म क्र.52 नुसार विरुध्‍द पक्षाकडे सेंटर टेंबल करिता रक्‍कम रु.1,565/- आगाऊ भरणा केल्‍याचेही स्‍पष्‍ट होते.   विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास विक्री केलेले टेबल खुर्च्‍या हया सदोष असल्‍याचे तसेच टेबलच्‍या पायास तडे जाऊन ते दोषपुर्ण असल्‍याने बदलुन मिळण्‍यासाठी विरुध्‍द पक्षाकडे अनेक वेळा तक्रारी केल्‍याचे तक्रार अर्जातुन नमुद केलेले असुन ऑर्डर फॉर्म क्र.52 नुसार बुक केलेले टेबल विरुध्‍द पक्षाने आजतागायत तक्रारदारास न दिल्‍याची तक्रार तक्रारदाराने उपस्थित केलेली आहे. 

            7.    विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारलेली असुन त्‍यांनी लेखी म्‍हणण्‍यातुन प्रामुख्‍याने तक्रारदाराने तक्रारीत कथन केलेल्‍या वस्‍तुंबाबत दोष आहे किंवा नाही हे ठरवणे अत्‍यंत गरजेचे असल्‍याने ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 13 पोट कलम क,ड,ई,फ व ग प्रमाणे कार्यवाही करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.  

            8.    उपरोक्‍त विवेचन विचारात घेता तक्रारदाराची तक्रार ही सन 2008 साली या मंचासमोर दाखल आहे.    तक्रार अर्जाचे कामी उभयपक्षकार हे जानेवारी,2012 पासुन पुढे नेमलेल्‍या तारखांना सतत गैरहजर असल्‍याने उपलब्‍ध कागदपत्राआधारे तक्रार निकालासाठी घेतली.    तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत विरुध्‍द पक्षाकडुन डायनींग टेबल व इतर साहीत्‍य घेतल्‍याबाबतचे टॅक्‍स इनव्‍हाईस दाखल केले आहे तसेच दि.05/06/2007 रोजीचे ऑर्डर फॉर्म दाखल आहेत तथापी विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास विक्री केलेल्‍या घरगुती वापराच्‍या वस्‍तुंमध्‍ये दोष असल्‍याबाबतचा कोणताही तज्ञ पुरावा दाखल नाही.   त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांचेकडुन खरेदी केलेल्‍या वस्‍तुंमध्‍ये दोष असल्‍याबाबतचा कोणताही सबळ पुरावा तक्रार अर्जासोबत दाखल नसल्‍यामुळे तक्रारदार यांचे तक्रार अर्जात कोणतीही गुणवत्‍ता नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.    विरुध्‍द पक्षांनी तक्रारदारास विक्री केलेल्‍या वस्‍तुंमध्‍ये दोष असल्‍याचे सिध्‍द होत नसल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना सदोष फर्निचर विक्री करुन कोणतीही त्रृटीयुक्‍त सेवा दिलेली नसल्‍याचे निष्‍कर्षाप्रत आम्‍ही येत आहोत.   सबब मुद्या क्र. 1 चे उत्‍तर नकारार्थी देऊन मुद्या क्र.2 चे निष्‍कर्षास्‍तव आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.

                              आ    दे    श 

( अ )       तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्‍यात येतो.

 

( ब )       खर्चाबाबत आदेश नाहीत.

 

ज  ळ  गा  व

 

दिनांकः-  30/10/2014. 

 
 
[HON'BLE MR. Vishwas D. Dhawale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Poonam N.Malik]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.