Maharashtra

Chandrapur

CC/10/175

Amrut Wasudeo Kuchankar, - Complainant(s)

Versus

Om Agro Organics & 1 other - Opp.Party(s)

A.U.Kullarwar

04 May 2011

ORDER


Arange sequence number in year 2009 confo-ch-mh@nic.in
Complaint Case No. CC/10/175
1. Amrut Wasudeo Kuchankar,Age 50 yesrs Occ-Agri & medicine R/o.Warur Road Tah ajura dist-ChandrapurChandrapurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Om Agro Organics & 1 otherThrough Branch Manager /Owner R/o- Lohara Industrial Estate Lohara.Tah & Dist- YevatamalYevatamalMaharashtra2. Taluka Krushi Adhikari ,RajuraMasade Builiding,Gadchandur road Rajura Tah Rajura Dist -ChandrapurChandrapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONORABLE Shri Anil. N.Kamble ,PRESIDENTHONABLE MR. Sadik M. Zaveri ,MEMBERHONABLE MRS. Adv. Varsha Jamdar ,MEMBER
PRESENT :

Dated : 04 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

              अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 14 सह 12 अन्‍वये दाखल केला असून तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.           अर्जदार हा वरुर रोड ये‍थील रहिवासी असून अर्जदाराची शेती खास वरुर रोड येथे भूमापन क्र.153, 268, 280, 204, 126 एकूण आराजी 7 हेक्‍टर 55 आर असून अर्जदार राजुराच नव्‍हे तर चंद्रपूर जिल्‍ह्यातील प्रगतशिल, नविन-नविन प्रयोग करणारे शेतकरी म्‍हणून प्रसिध्‍द आहेत.  त्‍याचप्रमाणे, कमीत-कमी रासायनिक खते वापरुन जास्‍तीत-जास्‍त जैविक व नैसर्गिक साधने वापरुन शेती करणारा व्‍यक्‍ती म्‍हणून अर्जदार सर्व परिचीत आहे. 

 

2.          गै.अ.क्र.1 ही जैविक औषधी खत तयार करणारी कंपनी असून, गै.अ.क्र.2 ही महाराष्‍ट्र शासनाचे कृषी विभागाचे तालुका स्‍तरावरील अधिकारी असून शासनाच्‍या शेतक-यांकरीता चालणा-या योजना, अनुदान तसेच नविन शोध शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍याकरीता आलेली सामुग्री पुरविणारे कार्यालय आहे.  महाराष्‍ट्र शासनाने जैविक सामुग्रीचा वापर शेतक-यांनी करावा म्‍हणून सरकारी अनुदानावर जैविक औषधी खत गै.अ.क्र.2 चे मार्फत स्‍थानिक शेतक-यांना अनुदानातून वाटप केले. अर्जदारास दि.27.8.09 रोजी गै.अ.क्र.2 ने गै.अ.क्र.1 निर्मीत बिव्‍हेरीया नावाचे औषध बॅच नं.3, निर्माण दि. मार्च 2009, या वर्णनाचे 1 किलोचे 10 पॉकेट अर्जदारास दिले व यातील औषध द्रावण तयार करुन पंपांने कापसाच्‍या पिकावर फवारणी करण्‍यास सांगीतले.

 

3.          अर्जदाराने सर्व्‍हे न.153 आराजी 2 हेक्‍टर  02 आर या शेतजमीनीत 2009 च्‍या हंगामात बिटी प्रवर्गाची कापसाची पेरणी केली होती.  सप्‍टेंबर 2009 पर्यंत कापसाच्‍या झाडाची वाढ अत्‍यंत जोमदार व चांगली झाली होती.  यामुळे, अर्जदारास सन 2009 चे हंगामात एकरी 15 क्विंटल पिक येईल असे खाञीलायक वाटू लागले होते.  गै.अ.क्र.2 ने गै.अ.क्र.1 निर्मीत सदर औषध फवारल्‍यास झाडाला बोंड जास्‍त येतात व बोंडाचा आकार मोठा होतो व यामुळे जास्‍त कापसाचे उत्‍पन्‍न मिळते, असे अर्जदारास सांगीतले.  यावर विश्‍वास ठेवून अर्जदाराने, गै.अ.क्र.2 कडून मिळालेले सदर औषध 3 एकर कापसाचे पिकावर दि.29.8.09 रोजी फवारणी केले.  सदर औषध फवारणी केल्‍यानंतर लगेच असे लक्षात आले की, फवारणी केलेले कापसाचे झाड कोमजले मलूल झालेले आहेत.  त्‍यानंतर, 2 ते 3 दिवसातच फवारणी केलेल्‍या झाडाची पाने लाल येवून गळू लागले व पूर्ण 3 एकरचे कापसाचे पिक नष्‍ट होवू लागले.  यामुळे, अर्जदाराने लगेच दि.4.9.09 रोजी गै.अ.क्र.2 कडे वरील तक्रार देवून तात्‍काळ मोक्‍यावर उभ्‍या जळलेल्‍या पिकाची पाहणी करण्‍याची विनंती केली.  परंतू, गै.अ.क्र.2 ने त्‍याची कोणतीही दखल घेतली नाही.  यामुळे, अर्जदाराने गै.अ.क्र.2 चे वरिष्‍ठ मा.जिल्‍हा कृषी अधिकारी यांचेकडे दि.4.11.09 रोजी लेखी तक्रार दिली व तशीच एक तक्रार गै.अ.क्र.1 कडे पाठविली.  परंतू, त्‍यांनी सुध्‍दा त्‍याची कोणतीही दखल घेतली नाही.  त्‍यानंतर, गै.अ.कडून कोणताही संदर्भ नसलेला रिपोर्ट दस्‍तऐवज प्राप्‍त झाला.  त्‍यामध्‍ये अर्जदारास देण्‍यात आलेल्‍या औषधाचा उल्‍लेख नव्‍हता.  तर एका वर्धेच्‍या कंपनीने तयार केलेल्‍या मालाचा तो रिपोर्ट होता. यानंतर, अर्जदाराने, गै.अ.क्र.2 कडे लेखी तक्रार दिली व तज्ञा मार्फत पिकाची व औषधीची चौकशी करण्‍याची विनंती केली.  सदर तक्रारीवर सुध्‍दा गै.अ.क्र.2 ने कोणतीही दखल घेतली नाही.

 

4.          अर्जदाराने, दि.28.10.09 रोजी मौक्‍यावर गावातील सरपंच, पोलिस पाटील व इतर 13 प्रतिष्‍ठीत व्‍यक्‍ती यांना मौक्‍यावर बोलावून पंचनामा केला.  तसेच नुकसान झालेल्‍या पिकाचे फोटो सुध्‍दा घेतले. अर्जदाराचे 3 एकर मधील कापसाचे पिक गै.अ.च्‍या औषधामुळे खराब झाल्‍याने अर्जदाराचे सरासरी 45 क्विंटल तयार कापसाचे नुकसान झाले.  सन 2009 मध्‍ये कापसाचा भाव रुपये 3000/- प्रती क्विंटल होता. गैरअर्जदारांनी अर्जदारास दिलेली सेवा न्‍युनतापूर्ण व अनुचित वयापार पध्‍दती ठरविण्‍यात यावी.  गै.अ.क्र.1 व 2 यांनी अर्जदारास पिकचे झालेले नुकसान रुपये 1,35,000/- व त्‍यावर 1 जानेवारी 2010 पासून व्‍याजासह द्यावे.  अर्जदारास झालेल्‍या शारीरीक व मानसिक ञासापोटी व केसचा खर्च असे एकूण रुपये 50,000/- देण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात यावा, अशी मागणी केली आहे. 

 

5.          अर्जदाराने नि.4 नुसार 15 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले.  गै.अ.क्र.1 व 2 हजर होऊन गै.अ.क्र.1 ने नि.10 नुसार लेखी बयान व नि.11 नुसार 3 दस्‍ताऐवज दाखल केले. गै.अ.क्र.2 ने नि.8 नुसार लेखी बयान दाखल केले.

 

6.          गै.अ.क्र.1 ने लेखी बयानात नमूद केले की, गै.अ.कंपनी जैवीक किटकनाशके उत्‍पादनामधली अग्रेसर कंपनी असून कंपनीला ISO90001,  2000 ISO  प्रमाणीत आहे.  बिव्‍हेरीया हे जैवीक औषध असून याचा उपयोग पिकावरील विविध किडीच्‍या नियंञणासाठी होतो.  हे जैवीक औषध असून बिनविषारी, पर्यावरणास सुसंगत उपयोगी किडीस हानीकारण नाही असे हे औषध असून ह्या औषधीने कुठलेही दुष्‍परिणाम होत नाही.  कारण, हे औषध सुक्षम जिवाणू पासून तयार केले जाते व ते कुठल्‍याही पिकास हानीकारक नाही.  कृषी विद्यापिठामध्‍ये यावर बरेच संशोधन झाले असून हे एक रासायनिक किटकनाशकाला पर्यायी असे हे जैवीक किटकनाशक ठरविले आहे.

7.          अर्जदाराने बिव्‍हेरीया हे औषध तालुका कृषी अधिकारी, राजुरा यांचे कडून घेतलेले आहे. त्‍याचा बॅच नं.3, उत्‍पादन दि. मार्च 2009 अशी आहे.  सदर औषध किटकनाशक प्रयोग शाळा, पुणे, अमरावती व महात्‍मा फुले कृषी विद्यापिठ राहूरी या ठिकाणी चाचणी करुनच गुणवत्‍ता पूर्वक आहे, असा तिनही प्रयोग शाळेचा अहवाल आहे.  पुरवठा करण्‍यापूर्वी सदर उत्‍पादनाचा जिल्‍हा गुणवत्‍ता नियंञण अधिकारी, यवतमाळ यांचेकडून नमूना काढून तो प्रयोग शाळा चाचणी करीता पुणे येथे पाठवून त्‍याचा अहवाल प्रमाणीत आल्‍यावरच गुणवत्‍ता धारक मालाचा पुरवठा केला.  त्‍यामुळे, बिव्‍हेरीया हे औषध उच्‍च गुणवत्‍ता धारक होते.  हे प्रयोग शाळा अहवालावरुन दिसून येते. सदर बिव्‍हेरीया औषध फवारल्‍यावर किडीवर नियंञण येते.  औषध फवारल्‍यास झाडाला बोंडे जास्‍त येतात, बोंडाचा आकार मोठा होतो, हे अर्जदाराचे म्‍हणणे चुकीचे आहे.

 

8.          मौका पंचनामा मध्‍ये बिव्‍हेरीया न्‍युसोफॉन हे औषध ता.कृ.अ. च्‍या सल्‍ल्‍यानुसार मार्गदर्शनात फवारणी केले आहे असे ही अमृत कुचनकर व त्‍याच्‍या शेतातील कामगार नावे रुबी विठूजी भोयर यांनी आंम्‍हास सांगितले, असे पंचनाम्‍यात नमूद केले आहे.  यावरुन हे सिध्‍द होते की, बिव्‍हेरीया हे औषध व न्‍युसोफॉन हे औषध वेगवेगळे आहे.  त्‍यामुळे, बिव्‍हेरीया हे औषध न फवारता न्‍युसोफॉन हे औषध फवारले आहे.  न्‍युसोफॉन हे औषध आमच्‍या कंपनीचे नाही.  त्‍यामुळे, बिव्‍हेरीया औषध फवारण्‍याचा व अर्जदाराच्‍या नुकसानीचा कुठेही संबंध नाही.  अर्जदाराचे भुमीकेवरच संशय निर्माण होत असून त्‍यांनी आपल्‍या पिकाकडे लक्ष न देता त्‍या माध्‍यमातून खोटे आरोप करुन पैशाची मागणी केलेली आहे, असे त्‍यांच्‍या प्रत्‍येक पञामधून दिसून येते.  त्‍यामुळे, या माध्‍यमातून आंम्‍हास नाहक ञास देवून पैशाची मागणी करणे हे बेकायदेशीर आहे.  त्‍यांनीच पंचनाम्‍यामध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे न्‍युसोफॉन हे औषध फवारले आहे.  त्‍यामुळे, न्‍युसोफॉन हे औषध आमचे प्रयोग शाळेचे नाही व याचा आमचा काहीही संबंध नाही.  त्‍यामुळे, सदर तक्रार रद्द करण्‍यात यावी.

 

9.          गै.अ.क्र.2 ने लेखी बयानात नमूद केले की, अर्जदार हा रा. वरुर रोड, तालुका राजुरा, जि. चंद्रपूर येथील शेत जमीन भूमापन क्र.153 एकूण आराजी 2.02 हेक्‍टर असून प्रगतीशिल शेतकरी असल्‍याने रासायनिक खते वापरुन जास्‍तीत जास्‍त जैविक व नैसर्गिक साधने वापरुन शेती करणार शेतकरी आहे.

10.         गै.अ.क्र.1 ओम अग्रोऑरगॅनिक्‍स कंपनी लोहारा इंडस्‍ट्रीएल स्‍टेट लोहारा, तह.जि. यवतमाळ ही जैविक औषधी, खते तयार करणारी कंपनी असून गै.अ.क्र.2 महाराष्‍ट्र शासनाचे कृषी विभागाचे तालुका स्‍तरीय अधिकारी असून शासनाच्‍या योजना गावपातळीवर नवीन शोध कार्य पोहचविण्‍याचे विस्‍तारीत कामे करीत असतात.  गै.अ.क्र.2 कडून बिव्‍हेरिया बॅसीयाना या नावाची जैविक औषधी कपाशी या पिकावर फवारणीसाठी अनुदानावर घेवून ही जैविक औषधी पाण्‍यात द्रावण तयार करुन किडीच्‍या नियंञणासाठी कापूस  या पिकावर फवारणी करण्‍यास सांगितले.

 

11.          सदरील शेतक-यांनी दि.4.9.09 रोजी गै.अ.क्र.2 यांना पाठविलेल्‍या पञात 3 एकरावरील पीक करपल्‍याबाबत तक्रार दिली, त्‍यानुसार तालुका कृषी अधिकारी, राजुरा यांनी विस्‍तार कृषी विद्यावेता प्रशिक्षण व भेटी योजना सिंदेवाही जि. चंद्रपूर यांना जा.क्र./ता.कृ.अ./1815 दि.12.11.09 ला पञ पाठविले त्‍याअनुषंगाने विद्यापिठाची चमु शहानिशा करण्‍यासाठी संबंधीत शेतकरी यांच्‍या प्रक्षेञावर दि.17.11.09 रोजी भेट दिली.  चमुनी संबंधीत अर्जदार शेतक-याशी चर्चा केली असता, तणनाशकाची फवारणी केलेल्‍या पंपांने बिव्‍हेरिया बॅसियाना या जैविक किटकनाशकाचा पाण्‍यात द्रावण करुन कपासीच्‍या पिकावर फवारणी केली असे चमुच्‍या लक्षात आले.  यावरुन, तणनाशक फवारणीसाठी वापरलेल्‍या पंपांचा उपयोग जैविक किटकनाशक बिव्‍हेरिया बॅसियाना फवारणी करीता कपासी या पिकावर केल्‍यामुळे कपासीची पाने सुरकुतल्‍यासारखी झाली.  वास्‍तविक पाहता बिव्‍हेरिया बॅसियाना हे जैविक किटकनाशक असल्‍याने त्‍याचा कोणताही विपरीत परिणाम पिकावर होत नाही, असे सदर चमुने सांगितले.  यामुळे, अर्जदाराला दिलेली सेवा न्‍युनतापूर्ण नाही.  तसेच, अनुचीत व्‍यापार पध्‍दत अवलंबविण्‍यात आली नाही, त्‍यामुळे अर्जदाराला नुकसान भरपाई देण्‍याचा प्रश्‍न उद्भवत नाही.

 

12.         अर्जदाराने तक्रारीच्‍या कथना पृष्‍ठर्थ्‍य शपथपञ नि.14 नुसार दाखल केला.  गै.अ.क्र.1 व 2 यांना पुरेपूर संधी देवूनही शपथपञ दाखल केला नाही, तसेच युक्‍तीवाद केला नाही, त्‍यामुळे तक्रार उपलब्‍ध रेकॉर्डवरुन गुणदोषावर निकाली काढण्‍याकरीता ठेवण्‍यात यावे, असा आदेश नि.1 वर पारीत करण्‍यात आला.  अर्जदार व गै.अ. यांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज आणि अर्जदाराचे वकीलांनी केलेल्‍या युक्‍तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                                  :  उत्‍तर

 

(1)  गै.अ.नी अनुचीत व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करुन सेवा    :  नाही

देण्‍यात न्‍युनता केली आहे काय.

(2)  अर्जदार नुकसान भरपाई मिळण्‍यास पाञ आहे काय .         :  नाही

(3)   या तक्रारीचा अंतिम निकाल काय .                                      :  आदेशान्‍वये.

 

@@ कारण मिमांसा @@

मुद्दा क्र. 1 व 2 :

 

13.         अर्जदाराने, गै.अ.क्र.2 कडून अनुदानावर बिव्‍हेरीया नावाचे जैवीक औषध कपासीच्‍या पिकावर फवारणीकरीता घेतली, याबाबत वाद नाही. परंतू, अर्जदाराने गै.अ.क्र.1 निर्मीत बिव्‍हेरीया बॅसियाना हे किटकनाशक औषध किडीच्‍या नियंञणाकरीता 3 एकर मधील कपाशीच्‍या शेतामध्‍ये फवारणी केल्‍यानंतर, कपासीचे पाने सुकून पूर्ण पिक नष्‍ट झाल्‍यामुळे झालेल्‍या पिकाची नुकसान भरपाई मिळण्‍याकरीता अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.

 

14.         अर्जदाराचे कथनानुसार दि.29.8.09 रोजी औषध फवारणी केल्‍यानंतर दोन-तीन दिवसातच पाने लाल येवून गळू लागले व पूर्ण 3 एकराचे पिक नष्‍ट होऊ लागले.  अर्जदाराने लगेच दि.4.9.09 रोजी जळलेल्‍या पिकाची पाहणी करण्‍याकरीता गै.अ.क्र.2 ला विनंती केली.  अर्जदाराने त्‍यानंतर 4.11.09, 26.10.09 ला संबंधीत विभागाकडे तक्रार केली आणि 28.10.09 ला पंचनामा केला.  अर्जदाराने, अ-4, अ-5, अ-6 व अ-8 वर केलेल्‍या तक्रारीची प्रत दाखल केली आणि दि.28.10.09 रोजी करण्‍यात आलेल्‍या पंचनाम्‍याची प्रत अ-9 वर दाखल केली आहे.  सदर पंचनाम्‍याचे अवलोकन केले असता, अर्जदाराने सर्व्‍हे  क्र.153 मौजा वरुर रोड येथील शेत जमीनीवर असलेल्‍या परिस्थितीचा पंचनामा केलेले नमूद केलेले आहे.  परंतू, हा पंचनामा अर्जदाराचे सांगण्‍यावरुनच केला आहे असे दिसून येते.  अर्जदाराने पंचाना सांगितलेल्‍या वरुन लिहिल्‍या गेल्‍याचे दिसून येते.  सदर पंचनाम्‍या (बिव्‍हेरीया) न्‍युसोफॉन हे औषध तालुका कृषी अधिका-याच्‍या सल्‍ल्‍यानुसार, मार्गदर्शनात फवारणी केले आहे असे श्री अमृत कुचनकर व त्‍याचा गडी शेतातील कामगार नामे ऋषी विठूजी भोयर यांनी सांगितलेल्‍या परिस्थितीनुसार खाञी केली असे पंचनाम्‍यात नमूद आहे. गै.अ.क्र.1 यांनी शपथेवर दाखल केलेल्‍या  लेखी बयानात बिव्‍हेरीया हे औषध व न्‍युसोफॉन हे औषध वेगवेगळे आहे. ही बाब पंचनाम्‍यावरुन स्‍पष्‍ट होते.  बिव्‍हेरीया हे कंसात लिहिलेले असून न्‍युसोफॉन हे औषधाचा नावाचा उल्‍लेख केलेला आहे.  अशास्थितीत, अर्जदाराने कपासीच्‍या पिकावर बिव्‍हेरीया औषध फवारणी केली की, न्‍युसोफॉन हे औषध फवारणी केली ही बाब संदिग्‍ध आहे.  वास्‍तविक, बिव्‍हेरीया हे किटकनाशक फवारणी औषध हे जैवीक असून बॅक्‍टेरीयाने पिकावर नुकसान होत नाही किंवा बिव्‍हेरीया औषध हे दोषपूर्ण आहे असे ही म्‍हणता येणार नाही.  गै.अ.क्र.1 ने ब-1 व ब-2 वर निरिक्षण रिपोर्ट दाखल केलेला आहे. त्‍यात, बॅच क्र.3 हे शॅम्‍पल पुणे लेबॉटरीने मंजूर केले आहे. तसेच, अमरावती लेबॉटरीने सुध्‍दा योग्‍य असल्‍याचे मान्‍य करुन बॅच न.3 चे बिव्‍हेरीया बॅसोनिया हे फवारणी औषध योग्‍य दर्जाचे असल्‍याचा अहवाल राहूरी येथील कार्यालयाने ब-3 वर दिला आहे.  गै.अ.क्र.1 यांनी दाखल केलेले दस्‍ताऐवजावरुन अर्जदार कपासीच्‍या पिकाला झालेल्‍या नुकसानाची भरपाई मिळण्‍यास पाञ नाही.

 

15.         अर्जदाराने नि.14 नुसार शपथपञ दाखल केला. त्‍यामध्‍ये, गै.अ.क्र.2 यांनी अर्जदाराकडून तक्रार प्राप्‍त झाल्‍यानंतर विस्‍तार कृषी विद्यावेता प्रशिक्षण व भेट योजना सिंदेवाही जि. चंद्रपूर यांच्‍याकडे पञ पाठवून  विद्यापीठाची चमु अर्जदाराचे विरुर येथील शेतात कपासीच्‍या पिकाची पाहणी करण्‍याकरीता दि.17.11.09 रोजी आली होती.  त्‍यावेळी, त्‍यांनी अर्जदार शेतकरी सोबत चर्चा केली.  अर्जदाराने शपथपञात असे म्‍हटले आहे की, 17.11.09 रोजी श्री व्‍ही.आय. देवतळे, डॉ.पी.व्‍ही.महातळे व डॉ.पी.एन.चौधरी यांचेकडून मौका पाहणी केली. अर्जदाराला गै.अ.क्र.2 च्‍या तक्रारीवरुन विद्यापीठाची चमु त्‍याचे शेतात येवून पाहणी केली, ही बाब माहित असून सुध्‍दा तक्रारीत त्‍याचा काहीही उल्‍लेख केला नाही.  यावरुन, अर्जदार स्‍वच्‍छ हाताने तक्रार घेवून आलेला नाही तर नुकसान भरपाई मिळण्‍याच्‍या वाईट हेतूने महत्‍वाची बाब लपवून दाखल केल्‍याची बाब सिध्‍द होते. 

 

16.         गै.अ.क्र.2 यांनी लेखी उत्‍तरात असे कथन केले की, तणनाशक फवारणी केलेल्‍या पंपांने बिव्‍हेरीया बॅसियाना या जैवीक किटकनाशकाची पाण्‍यात द्रावण करुन फवारणी केल्‍यामुळेच झाडाचे पाने गळून पिकाचे नुकसान झाले.  अर्जदाराच्‍या स्‍वतःच्‍या चुकीमुळे नुकसान झाले असेल तर त्‍याकरीता गै.अ.ना जबाबदार धरता येणार नाही. गै.अ.क्र.2 ने, विद्यापीठ चमुने दिलेल्‍या पञाची प्रत लेखी बयानासोबत दाखल केली आहे.  सदर पञावरुन गै.अ.क्र.1 व 2 यांनी अनुचीत व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करुन सेवा देण्‍यात न्‍युनता केली ही बाब सिध्‍द होत नाही.

 

17.         अर्जदार स्‍वतःच्‍या चुकीमुळे झालेले नुकसान भरपाई गै.अ.कडून मिळण्‍याकरीता ही तक्रार महत्‍वाची माहिती लपवून दाखल केल्‍याचे, दाखल दस्‍ताऐवजावरुन सिध्‍द होतो.  अर्जदाराने अ-4, अ-5, अ-6 नुसार केलेल्‍या तक्रारीत झालेल्‍या पिकाची नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- ची मागणी केली. आणि आता तीच मागणी तक्रारीमध्‍ये नुकसान भरपाई रुपये 1,35,000/- केली आहे.  म्‍हणजेच अर्जदार पूर्वी नुकसान भरपाईची मागणी कमी करुन, आता तीच मागणी वाढीव करीत आहे.  गै.अ.क्र.1 ने अर्जदाराच्‍या भुमिकेवर संशय निर्माण केला आहे.  अर्जदाराच्‍या कथनावरुन, गै.अ.क्र.1 चे म्‍हणणे संयुक्‍तीक वाटते.  अर्जदाराने, खोटे आरोप करुन पैशाची मागणी केली, हीच बाब गै.अ.च्‍या लेखी उत्‍तरावरुन सिध्‍द होतो. 

 

18.         अर्जदाराने झालेल्‍या नुकसानीबाबत पिकाची स्थिती दर्शविण्‍याकरीता अ-10, 11, 13 व 14  प्रमाणे फोटोच्‍या झेरॉक्‍स प्रत दाखल केल्‍या आहेत.  वास्‍तविक, झेरॉक्‍स फोटो ह्या पुरावा म्‍हणून ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  गै.अ. यांनी सेवा देण्‍यात न्‍युनता केली, हे झेरॉक्‍स फोटोवरुन निश्चित करता येत नाही, तसेच अर्जदाराने दाखल केलेले दस्‍ताऐवज ठोस पुरावा म्‍हणून ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.

 

19.         अर्जदाराने, गै.अ.क्र.2 कडून अनुदानावर बिव्‍हेरीया औषधाचे 10 पॉकेट घेतले, तसा प्रमाणपञ गै.अ.क्र.2 यांनी दिला.  त्‍यामध्‍ये बॅच नं.03 उत्‍पादन दिनांक मार्च 2009 असे नमूद केले आहे.  अर्जदाराने फवारणी केलेल्‍या रिकामे पॉकीटस् किंवा बॅच नंबर असलेला पॉकीट दाखल केला नाही. तर या उलट अ-3 वर दाखल केलेले गै.अ.क्र.2 चे पञाप्रमाणे, नि.11 वर गै.अ.क्र.1 ने दाखल केलेल्‍या तज्ञाचे रिपोर्ट वरुन गै.अ. यांनी सेवेत न्‍युनता केली ही बाब  सिध्‍द होत नाही.  यावरुन, अर्जदाराची तक्रार मंजूर करण्‍यास पाञ नाही व अर्जदार कोणतीही नुकसान भरपाई गै.अ.कडून मिळण्‍यास पाञ नाही, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले  असल्‍याने, मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्र. 3 :

20.         वरील मुद्दा क्र.1 व 2 च्‍या विवंचने वरुन तक्रार मंजूर करण्‍यास पाञ नाही, या निर्णया प्रत हे न्‍यायमंच आले असल्‍यामुळे तक्रार नामंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

                        // अंतिम आदेश //

            (1)   अर्जदाराची तक्रार खारीज.

            (2)   उभय पक्षानी आपआपला खर्च सहन करावा.

            (3)   उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.

 

चंद्रपूर,

 


[HONABLE MR. Sadik M. Zaveri] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER