Maharashtra

Nagpur

CC/601/2019

SHRI PRIYADARSHI SURESH WANJARI - Complainant(s)

Versus

OLA FLEET TECHNOLOGIES PRIVATE LIMITED THROUGH ITS DIRECTORS i. SHRI HARISH ABHICHANDANI II. SHRI S - Opp.Party(s)

SELF

30 Sep 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/601/2019
( Date of Filing : 17 Oct 2019 )
 
1. SHRI PRIYADARSHI SURESH WANJARI
25, RBI COLONY, KATOL ROAD, NAGAPUR 440013
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. OLA FLEET TECHNOLOGIES PRIVATE LIMITED THROUGH ITS DIRECTORS i. SHRI HARISH ABHICHANDANI II. SHRI SANDEEP DIVAKARAN III. SHRI PRITAM DAS MOHAPATRA
3RD FLOOR, SALARPURIA TOWER 2 NO 32, LUSKER HOSUR ROAD NEXT TO FORUM MALL BENGALURU 560095 OR BUILDING NO 1 3RD FLOOR SECTOR B-1, LOCAL SHOPPING COMPLEX, NEAR DELHI JAL BOARD VASANT KUNJ, NEW DELHI 110070
NEW DELHI
2. CITY MANAGER OF OLA FLEET TECHNOLOGIES PVT LTD
PLOT NO 47, HINGNA ROAD, PARSODI SUBHASH NAGAR, NAGPUR 440022
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:SELF, Advocate for the Complainant 1
 
Dated : 30 Sep 2021
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये -

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष हा ओला अॅप द्वारे प्रवाशांनी अॅप द्वारे बुक केलेली कॅब/ टॅक्‍सीने प्रवाशांनी नियुक्‍त केलेल्‍या ठिकाणावरुन घेऊन त्‍यांनी निश्चित केलेल्‍या ठिकाणापर्यंत पोहचविण्‍याचा व्‍यवसाय करतो. तसेच प्रवाशांनी अॅप द्वारे केलेली बुकिंग स्‍वीकारुन राईडचे ( confirmation) कान्‍फर्मेशन देण्‍यापूर्वी भाडे ठरवितात तसेच प्रवाशांना कॅब द्वारे घेऊन जाण्‍याची वेळ व निश्चित केलेल्‍या ठिकाणावर पोहचण्‍याची वेळ सुध्‍दा कळवितात. त्‍याचप्रमाणे विरुध्‍द पक्ष हे जी.पी.एस. द्वारे प्रवाशाला घेऊन जाण्‍याच्‍या ठिकाणी व वेळेवर पोहचविल्‍याची देखरेख करतात व याकरिता आकारण्‍यात येत असलेले भाडे हे कॅशलेस पध्‍दतीने तसेच वाहन चालकाद्वारे रोख स्‍वरुपात ही स्‍वीकारतात.  
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने दि. 14.08.2019 रोजी सायंकाळी 7.30 pm वाजता विरुध्‍द पक्षाच्‍या अॅप द्वारे कॅब/टॅक्‍सी त्‍याच्‍या राहत्‍या घरचा पत्‍ता,  25, आर.बी.आय.कॉलनी, काटोल रोड, नागपूर -13 या पत्‍त्‍यावरुन संत्रा मार्केट गेट,  रेल्‍वे स्‍टेशन नागपूर येथे पोहचण्‍याकरिता बुक केली होती. तक्रारकर्त्‍याला त्‍याची वृध्‍द आई वय अंदाजे 70 वर्षे हिला सोबत घेऊन ट्रेन 12290 सुटण्‍याची वेळ 8.40 pm दुरातों एक्‍सप्रेसने मुंबईला जायचे होते. तक्रारकर्त्‍याने  त्‍याचे मोठा भाऊ आणि त्‍याची पत्‍नी असे एकूण 4 जणांकरिता THIRD A.C.  चे तिकीट आरक्षित केले होते.
  3.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाच्‍या अॅप द्वारे कॅब/टॅक्‍सी बुक केल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने 7.22. pm वा. ओ.टी.पी. पाठविला आणि 5 मि. कॅब / टॅक्‍सी तक्रारकर्त्‍याने अॅप द्वारे बुक केलेल्‍या त्‍याच्‍या राहत्‍या घरच्‍या लोकेशन वर पोहचेल असे सांगितले,  परंतु 5 मि. अवधी संपल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या कॅबचे वाहन चालक निलेश लोखंडे यांना त्‍याच्‍या भ्रमणध्‍वनी क्रं. 91- 8830672361 वर 7.39pm , 7.40. pm, 7.41 pm, 7.42 pm, 7.44 pm वा. फोन केला असता वि.प. च्‍या अॅप द्वारे बुक केलेल्‍या कॅब वाहन चालकाचा भ्रमणध्‍वनी क्रमांक व्‍यस्‍त असल्‍याने फोन लागला नाही. त्‍यानंतर 7.45 pm वा. विरुध्‍द पक्षाच्‍या वाहन चालकाने तक्रारकर्त्‍याला भ्रमणध्‍वनीवरुन संपर्क साधला आणि लोकेशनबाबत माहिती विचारली. परंतु 5 मि. वाट बघून ही टॅक्‍सी / कॅब पोहचली नाही.  त्‍यानंतर पुनःश्‍च 7.54 वा. वाहन चालकाने तक्रारकर्त्‍याला फोन करुन राईड रद्द करण्‍याचे सूचविले.  तेव्‍हा तक्रारकर्त्‍याने कोणतीही वेळ न गमविता राईड रद्द केली आणि तात्‍काळ विरुध्‍द पक्षाच्‍या अॅप वरुन दुसरी कॅब बुक केली व विरुध्‍द पक्षाचे अॅप द्वारे बुक केलेल्‍या कॅब/टॅक्‍सीचे वाहन चालक आशिष कटरे यांच्‍या दूरध्‍वनी क्रमांक 91-7620657653 वर 8.11 pm., वर 8.15 pm, वा. फोन केला.  तेव्‍हा तक्रारकर्त्‍याने केलेल्‍या दूरध्‍वनीच्‍या अनुषंगाने 5 मि. पोहचत असल्‍याचे सांगितले, परंतु  विरुध्‍द पक्षा द्वारे बुक केलेली कॅब/टॅक्‍सी  ही 5 मि. न पोहचल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा 8.21 pm., 8.24 pm, व  8.25 pm ला मोबाईलवर संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला, परंतु कॅब/टॅक्‍सी चालकाचा भ्रमणध्‍वनी व्‍यस्‍त असल्‍याने तक्रारकर्त्‍याचा फोन लागला नाही व शेवटी कॅब/टॅक्‍सी चालक आशिष कटरे हा कॅबसह ठिक 8.26 pm वा. तक्रारकर्त्‍याने अॅप द्वारे दिलेल्‍या पत्‍त्‍यावर पोहचला.
  4.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाच्‍या अॅप द्वारे  बुक केलेले  दोन्‍ही कॅब/ टॅक्‍सीचे  वाहन चालक हे त्‍यांचे वाहन तक्रारकर्त्‍याच्‍या घरी वेळेवर घेऊन न आल्‍यामुळे तक्रारकर्ता त्‍याच्‍या वृध्‍द आई सोबत रेल्‍वे स्‍टेशनला दुरांतो एक्‍सप्रेस सुटण्‍याच्‍या वेळेपर्यंत पोहचू शकला नाही. तक्रारकर्त्‍याने बुक केलेली कॅब ही दुरांतो एक्‍सप्रेस रेल्‍वे स्‍टेशन पोहचण्‍यापूर्वी सुटली, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे Third AC चे 2 तिकीट रुपये 2500/- चे अंदाज नुकसान झाले, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला शारीरिक व मानसिक त्रासाला समोर जावे लागले. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाच्‍या अॅप वरील Travel History बघू शकत नसल्‍यामुळे तक्रारकर्ता वि.प.च्‍या अॅप द्वारे दि. 14.08.2019 रोजी बुक केलेल्‍या दोन्‍ही कॅब / टॅक्‍सीचे वाहन क्रमांक देऊ शकत नाही. त्‍याचप्रमाणे विरुध्‍द पक्षाने दिलेल्‍या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या मुंबईच्‍या पुनश्‍च प्रवासाकरिता रुपये 2,630/- इतके खर्च करावे लागले. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने दि. 04.09.2019 व 17.09.2019 ला विरुध्‍द पक्षाच्‍या पत्‍त्‍यावर कायदेशीर नोटीस पाठविली असता विरुध्‍द पक्ष 1 ला पाठविलेली नोटीस Left या शे-यासह परत आली व विरुध्‍द पक्ष 2 ला पाठविलेली नोटीस त्‍याला दि. 07.09.2019 ला प्राप्‍त झाली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या नोटीसची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की,  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रेल्‍वे तिकीट रक्‍कम रुपये 2500/- आणि पुनश्‍च तिकीट बुक करण्‍याकरिता लागलेली  रक्‍कम रुपये 2630/- असे एकूण रुपये 5130/- ही रक्‍कम 18 टक्‍के व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च ही देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 (i),  ( ii),  ( iii) व विरुध्‍द पक्ष 2 यांना आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 12.03.2020 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने दि. 11.08.2021 रोजी अर्ज करुन विरुध्‍द पक्ष 2 चे नांव सदरच्‍या प्रकरणातून वगळण्‍याबाबतचा परवानगीचा अर्ज सादर केलेला होता. सदरचा अर्ज मंजूर केल्‍यानंतर त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने  वि.प. 2 चे नांव वगळलेले आहे.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता  व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

            मुद्दे                                    उत्‍तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?          होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?   होय
  3. काय आदेश?                              अंतिम आदेशानुसार

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या अधिकृत असलेल्‍या  ओला अॅपवरुन त्‍याच्‍या राहत्‍या घरी  25, आर.बी.आय.कॉलनी, काटोल रोड, नागपूर -13 या पत्‍त्‍यावरुन संत्रा मार्केट गेट रेल्‍वे स्‍टेशन नागपूर येथे पोहचण्‍याकरिता दि. 14.08.2019 ला ठिक सायकाळी 7.30 pm वाजता कॅब/ टॅक्‍सी बुक केली होती. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला आश्‍वासित केल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाची टॅक्‍सी /कॅब ही 5 मि. न पोहचल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने कॅब/ टॅक्‍सी चालक निलेश लोखंडे याच्‍या भ्रमणध्‍वनी क्रं. 91- 8830672361 वर 7.39 ते 7.44 वा. च्‍या दरम्‍यान किमान 5 वेळा फोन लावला असल्‍याचे नि.क्रं. 2(4) वरील दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. विरुध्‍द पक्षाच्‍या अॅप द्वारे बुक केलेल्‍या कॅब/टॅक्‍सीचे चालक निलेश लोखंड यांनी ठिक 7.45pm वा. तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या घराचे लोकेशन विचारले,  परंतु कॅब तक्रारकर्त्‍याच्‍या घरी पोहचली नाही. त्‍यानंतर ठिक 7.54pm वा. कॅब/टॅक्‍सी चालक निलेश लोखंडे यांनी फोन द्वारे तक्रारकर्त्‍याला सदरची राईड रद्द करण्‍याचे सूचविले. तेव्‍हा तक्रारकर्त्‍याने कुठलाही वेळ वाया न करता विरुध्‍द पक्षाच्‍या अॅप वरुन पुन्‍हा दुसरी कॅब बुक केली. त्‍यानंतर सदरच्‍या कॅबचे चालक आशिष कटरे यांच्‍या दूरध्‍वनी क्रमांक 91-7620657653 वर अ.क्रं. 8.11.pm व 8.15 pm, वा. फोन केला असता 5 मि. वाहन पोहचत असल्‍याचे सांगितले. परंतु कॅबचे चालक आशिष कटरे हे सुध्‍दा 5 मि. न पोहचल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा रात्री 8.21pm , 8.24pm व 8.25 pm वा. मोबाईलवरुन संपर्कसाधण्‍याचा प्रयत्‍न केला असता कॅबचे चालक आशिष कटरे याचा मोबाईल व्‍यस्‍त असल्‍याने तक्रारकर्त्‍याचा फोन लागला नाही व शेवटी वि.प. द्वारे बुक कॅबचे चालक आशिष कटरे हे ठिक 8.26pm वा. त.क.ने दिलेल्‍या घरच्‍या लोकेशनवर पोहचला, त्‍यामुळे तक्रारकर्ता नागपूर रेल्‍वे स्‍टेशन, येथे दुरांता एक्‍सप्रेस सुटण्‍याची वेळ सांयकाळी 8.40 वा. पर्यंत पोहचू शकला नाही.  तक्रारकर्त्‍याने नि.क्रं. 2(2) वर दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाप्रमाणे तक्रारकर्ता व त्‍याची आई दुरांतो एक्‍सप्रेसने प्रवास करु शकली नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला रेल्‍वेच्‍या नियमाप्रमाणे रेल्‍वे तिकिटाची रक्‍कम ही परत मिळाली नाही व अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाच्‍या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला रेल्‍वे तिकिटचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. म्‍हणून तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडून सदरच्‍या रेल्‍वे तिकिटाची नु‍कसानभरपाई मिळण्‍यास पात्र आहे. तसेच विरुध्‍द पक्षाच्‍या अॅप द्वारे बुक केलेल्‍या टॅक्‍सीचे चालक निलेश लोखंडे याच्‍या चुकिमुळे तक्रारकर्त्‍याला त्‍याची 7.30 pm वा. बुक केलेली राईड रद्द करावी लागली व सदरच्‍या राईडचा भुर्दंड ही तक्रारकर्त्‍याला  सहन करावा लागला. परंतु याबाबतचे तक्रारकर्त्‍याने कुठलेही दस्‍तावेज दाखल केलेले नाही, तसेच पुनश्‍च दुरांतो ने प्रवासाकरिता ति‍कीट काढल्‍याचे ही दस्‍तावेज तक्रारी सोबत जोडलले नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची सदरची मागणी अमान्‍य करण्‍यात येते. 

 

 सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष 1 (i), 1 (ii) व 1(iii) यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या आर्थिक नुकसानीकरिता रुपये 3,026/- ही रक्‍कम व त्‍यावर दि. 14.08.2019 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.  
  3. विरुध्‍द पक्ष 1 (i), 1 (ii) व 1(iii) यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- द्यावे.
  4. विरुध्‍द पक्ष 1 (i), 1 (ii) व 1(iii) यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आंत करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.    
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.